जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 414/2010. तक्रार दाखल दिनांक : 12/07/2010. तक्रार आदेश दिनांक :13/01/2011. सोमनाथ नामदेव जाधव, वय 42 वर्षे, व्यवसाय : शेती, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. प्रा. शिवाजीराव सावंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, वाकाव-कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर. 2. संजय महादेव भोसले, चेअरमन, प्रा. शिवाजीराव सावंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, वाकाव-कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता.माढा, जि. सोलापूर. 3. रविंद्र उमाकांत ननवरे, व्हाईस चेअरमन, प्रा. शिवाजीराव सावंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, वाकाव-कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. कुर्डुवाडी, ता.माढा, जि. सोलापूर. 4. दत्तात्रय गजेंद्र शेलार, सचिव, प्रा. शिवाजीराव सावंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, वाकाव-कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. बारलोणी, ता.माढा, जि. सोलापूर. 5. महादेव विठोबा शिंदे, व्यवस्थापक, प्रा. शिवाजीराव सावंत ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादीत, वाकाव-कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, रा. सापटणे, ता.माढा, जि. सोलापूर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : आर.एफ. सोनिमिंडे विरुध्द पक्ष क्र. 3 ते 5 यांचेतर्फे अभियोक्ता : व्ही.पी. सक्री आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, त्यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये खालीलप्रमाणे नमूद रक्कम गुंतवणूक केलेली आहे. ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | दामदुप्पट ठेव | 13,000 | 000051 | 7/5/04 | 7/12/2009 | दाम- दुप्पट ठेव | दामदुप्पट ठेव | 10,000 | 000052 | 21/5/04 | 21/12/2009 | दामदुप्पट ठेव | 20,000 | 000056 | 16/7/04 | 16/2/2010 | दामदुप्पट ठेव | 6,000 | 000059 | 26/7/04 | 27/2/2010 | दामदुप्पट ठेव | 17,000 | 000060 | 27/7/04 | 28/2/2010 | दामदुप्पट ठेव | 10,000 | 000062 | 28/8/04 | 28/3/2010 | दामदुप्पट ठेव | 10,000 | 000064 | 10/9/04 | 11/4/2010 | मुदत ठेव | 30,000 | 000042 | 24/2/05 | 11/4/2005 | 10 टक्के |
2. मुदतीनंतर तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.10,000/- व तक्रार खर्चापोट रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे.
3. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 4. विरुध्द पक्ष क्र.3 ते 5 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी झालेली असून ते मंचासमोर हजर झाले. परंतु त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द कैफियतीशिवाय तक्रार चालविण्याचे आदेश करण्यात आले. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेव व मुदत ठेवीद्वारे रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते. तक्रारदार यांच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर त्यांनी ठेव रकमेची मागणी केली असता रक्कम परत करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. 7. निर्विवादपणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेव व मुदत ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. मुदत संपल्यानंतर ठेव रकमेची वेळोवेळी मागणी करुनही त्यांना ठेव रक्कम देण्यात आलेली नाही. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. 8. विरुध्द पक्ष क्र.4 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे सचिव व विरुध्द पक्ष क्र.5 हे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. ठेव रक्कम परत करण्यासाठी त्यांची जबाबदारी सिध्द झाल्याशिवाय त्यांना जबाबदार धरता येत नाही. 9. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना खालीलप्रमाणे नमूद रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. ठेवीचा तपशील | पावती क्रमांक | ठेव रक्कम (रुपयामध्ये) | खालील तारखेपासून व्याज द्यावयाचे | देय व्याज दर (द.सा.द.शे.) | दामदुप्पट ठेव | 000051 | 26,000 | 7/12/2009 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000052 | 20,000 | 21/12/2009 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000056 | 40,000 | 16/2/2010 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000059 | 12,000 | 27/2/2010 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000060 | 34,000 | 28/2/2010 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000062 | 20,000 | 29/8/2010 | 12 टक्के | दामदुप्पट ठेव | 000064 | 20,000 | 11/4/2010 | 12 टक्के | मुदत ठेव | 000042 | 30,000 | 11/4/2005 | 10 टक्के |
2. विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/14111)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT | |