Maharashtra

Additional DCF, Pune

CC/08/238

Shiv Ki Jai Co-op Housing Society - Complainant(s)

Versus

PRADEEP G VORA - Opp.Party(s)

Adv. T.G.Gosavi

29 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/08/238
 
1. Shiv Ki Jai Co-op Housing Society
16, port clube road, pune -01
Pune
Maharashtra
2. Mr. J. Tambole
B/301, Shiv Ki Jay Co-op Hsg Soc. Ltd, 16 boat club raod pune-01
Pune
Maharashtra
3. M. Dhambhere
flat No -Z, 902, shiv ki jay co-op hsg soci. , 16 boat club road , pune -01
Pune
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. PRADEEP G VORA
Rungat House, Napen CA road Mumbai 400006
Mumbai
Maharashtra
2. M/S, Mahindra Gasco Developers
City Point, 2 nd Floar, Off. no 215, boat club road pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा: मा.अध्‍यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत

                         

    //  नि का ल प त्र  //

 

 

(1)               प्रस्‍तूतचे प्रकरण सन 2006 मध्‍ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे दाखल केला होता तेव्‍हा त्‍यास पीडीएफ/54/2006 असा नोंदणीकृत क्रमांक देण्‍यात आला होता. मा.राज्‍य आयोग, मुंबई  यांचे आदेशान्‍वये सदरचे प्रकरण अतिरिक्‍त पुणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच येथे वर्ग केल्‍यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/238/2008 असा नोंदविण्‍यात आला आहे.

 

(2)         प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदारांनी   केलेल्‍या बांधकामातील त्रूटी दुर होऊन मिळाव्‍यात तसेच त्‍यांचेकडून कन्‍व्‍हेयन्‍स डीड करुन मिळावे या व इतर अन्‍य मागण्‍यांसाठी तक्रारदारांनी सदरहू तक्रारअर्ज दाखल केला आहे. या प्रकरणामध्‍ये तक्रारदारांनी  जाबदार क्र 1 म्‍हणून श्री प्रदिप होरा या जमीन मालकांना व जाबदार क्र  2  महेंद्र गॅस्‍को डेव्‍हलपर्स यांना प्रोजेक्‍ट मॅनेजर म्‍हणून या कामी सामील केलेले आहे.   या प्रकरणामध्‍ये दोन्‍ही जाबदारांना नोटिस काढली असता जाबदार क्र 2 हे मंचापुढे हजर झाले  व त्‍यांनी सन्‍मा उच्‍च न्‍यायालय  यांच्‍या पुढे  उभयपक्षकारांचे दरम्‍यान ठरलेला तडजोडीचा मसुदा मंचापुढे दाखल केला.   या तडजोडच्‍या मसुदयाप्रमाणे तक्रारदारांनी  जाबदार क्र 2  यांचे विरुध्‍द दाखल केलेला ग्राहक तक्रार अर्ज काढून घेण्‍याचे आश्‍वासन सन्‍मा उच्‍च न्‍यायालयापुढे दिले होते.   सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयापुढे अशा प्रकारचे आश्‍वासन देऊनही तक्रारदारांनी हा अर्ज मागे न घेतल्‍यामुळे जाबदार क्र 2 यांनी  मंचापुढे  निशाणी 9 अन्‍वये अर्ज दाखल करुन हा तक्रारअर्ज आपले विरुध्‍द रद्य करण्‍यात यावा अशी विनंती मंचाला केली.  सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन जाबदार क्र 2 चा हा अर्ज मंजुर करुन सदरहू तक्रारअर्ज त्‍यांच्‍या विरुध्‍द रद्य केल्‍याचा आदेश दिनांक 03/01/2012 रोजी पारित करण्‍यात आला होता.   या नंतर जाबदार क्र 1 तर्फे अड श्री सुर्यवंशी मंचापुढे उपस्थित राहीले व हा अर्ज त्‍यांचे विरुध्‍द सुध्‍दा रद्य करण्‍यात यावा अशी त्‍यांनी मंचाला विनंती केली.  अड श्री सुर्यवंशी यांच्‍या निवेदनाच्‍या आधारे सन्‍मा उच्‍च न्‍यायालयापुढे दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले असता  तक्रारअर्जामध्‍ये नमुद तक्रारींचे निवारण करुन देण्‍याचे आश्‍वासन जाबदार क्र 2 यांनी दिलेले आढळते.   अशा परिस्थितीत सदरहू तक्रारअर्ज जाबदार क्र 1 यांचे विरुध्‍द कसा सुरु ठेवता येईल याचे कोणतेही स्‍पष्टिकरण तक्रारदारांनी दाखल केलेले नाही.   किंबहुना दिनांक 10/08/2011 पासून तक्रारदार सातत्‍याने मंचापुढे गैरहजर असून जाबदार क्र 1 यांनी म्‍हणणे दाखल केल्‍या नंतर त्‍यांनी आपला पुरावाही मंचापुढे दाखल केलेला नाही.  तसेच मंचाने आदेशित करुनही जाबदार क्र 2 यांना वगळणेबाबत त्‍यांनी तजवीज केलेली नाही.   एकुणच या प्रकरणातील सर्व वस्‍तुस्थिती व सन्‍मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांच्‍यापुढील दाखल कागदपत्रे यांचा एकत्रित विचार केला असता  सदरहू तक्रारअर्ज जाबदार क्र 1 यांचे विरुध्‍द सुध्‍दा रद्य होणेस पात्र ठरतो असा मंचाचा निष्‍कर्ष आहे.  वर नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा एकत्रित विचार करुन सदरहू तक्रारअर्ज काढून टाकणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे

     

 (3)        वर नमूद सर्व निष्‍कर्ष व विवेचनाच्‍या आधारे प्रस्‍तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित करण्‍यात येत आहेत.

          सबब मंचाचा आदेश की

                        // आदेश //

            (1)   तक्रारअर्ज काढून टाकण्‍यात येत आहे.

            (2)   खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.

             (3)  निकालपत्राची प्रत सर्व पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.