निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 17/05/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 07/06/2010 तक्रार निकाल दिनांकः- 12/10/2010 कालावधी 04 महिने 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ दिनकर पिता विठ्ठलराव दाभाडे. अर्जदार वय 43 धंदा. अडव्होकेट. अड.डि.यू.दराडे. रा.जांब नाका जिंतूररोड.परभणी. विरुध्द प्रदिप सायकल स्टोअर्स गैरअर्जदार. व्दारा प्रो.प्रा.स्टेशनरोड.परभणी. अड.अशोक तलरेजा. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदाराने सेवात्रुटी केल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार याने त्याच्या पाल्यासाठी गैरअर्जदाराकडून दिनांक 28/09/2009 रोजी अटलस कंपनीची सायकल रक्कम रु. 3350/- ला पावती क्रमांक 11805 अन्वये विकत घेतली .गैरअर्जदाराने अर्जदारास सायकल विकत घेतल्यापासून 1 महिन्याच्या आत सायकलसाठी 2 फ्रि सर्व्हीसींग देण्यात येईल असे सांगितले होते.त्यानुसार अर्जदाराच्या सायकलीला दिनांक 13/10/2009 रोजी पहिली फ्रि सर्व्हीसींग देण्यात आली.त्यानंतर दुसरी व शेवटच्या फ्री सर्व्हीसींगची नियोजीत तारीख दिनांक 28/10/2009 रोजी होती अर्जदार दिनांक 28/10/2009 रोजी गैरअर्जदाराच्या दुकानी सायकल घेवुन गेला असता इतर कामात व्यस्त असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास 3-4 दिवसानंतर येण्यास सांगीतले.त्याच्या म्हणण्यानुसार दिनांक 2/11/2009 रोजी पुन्हा अर्जदार गैरअर्जदाराच्या दुकानी गेला असता फ्री सर्व्हीसींग देण्यास इनकार करुन अर्जदाराचा अपमान केला.तदनंतर अर्जदाराने दिनांक 7/11/2009 रोजी गैरअर्जदारास पाठविलेल्या नोटीशीस कोणताही प्रतिसाद न दिल्याने अर्जदाराने ही तक्रार मंचात दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी व सेवात्रुटी बद्दल रक्कम रु. 50000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- द्यावे अशा मागण्या केल्या आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि. 4/1 ते नि.4/4 वर मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्यानंतर त्याने लेखी निवेदन नि.11 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहूतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, दिनांक 28/10/2009 रोजी किंवा त्यानंतर कधीही अर्जदार गैरअर्जदाराच्या दुकानी आलेला नसल्यामुळे त्याचा अपमान करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.अर्जदाराने खोटी व भ्रामक तक्रार गैरअर्जदाराच्या विरोधात केली आहे. त्यामुळे अर्जदाराची तक्रार रक्कम रु.2000/- कॉम्पेसेटरी कॉस्ट सह फेटाळण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदन सोबत शपथपत्र नि.12 वर दाखल केले आहे. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे . कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 – दिनांक 28/09/2009 रोजी अर्जदाराने त्याच्या पाल्यासाठी गैरअर्जदाराकडून सायकल विकत घेतली होती सायकल विकत घेतल्यापासून एका महिन्याच्या आत दोन फ्रि सर्व्हीसींग देण्यात येईल. असे अर्जदारास सांगण्यात आले होते.व त्याला देण्यात येणा-या पावतीवर देखील हे नमुद करण्यात आले होते.त्यानुसार अर्जदाराच्या सायकलीस दिनांक 13/10/2009 रोजी पहिली फ्रि सर्व्हीसींग करण्यात आली दुसरी फ्रि सर्व्हींसींगची नियोजीत तारीख दिनांक 28/10/2009 होती त्या रोजी अर्जदार गैरअर्जदाराच्या दुकानी गेला असता कामाच्या व्यस्ततेमुळे त्याने अर्जदारास 2-3 दिवसानंतर येण्यास सांगीतले त्यानुसार अर्जदार त्याची सायकल घेवुन दिनांक 2/11/2009 रोजी गैरअर्जदाराच्या दुकानी गेला असता त्याने फ्रि सर्व्हीसींग देण्यास साफ इनकार करुन अर्जदारास अपमानास्पद वागणुक दिली. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदार कधीही गैरअर्जदाराच्या दुकानी आला नाही त्यामुळे त्याचा अपमान करण्याचा किंवा त्रुटीची सेवा देण्याचा प्रश्नच उदभवत नाही.यावर मंचाचे असे मत आहे की, वास्तविक पाहता सदरचे प्रकरण अतिशय किरकोळ स्वरुपाचे आहे परंतु दोन्ही बाजूंनी सदर प्रकरणाला प्रतिष्ठेचा मुद्दा केल्यामुळे त्याला वादाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.अशी परिस्थिती सामाजिक स्वास्थ्यासाठी हानीकारक आहे.वास्तविक पाहता गैरअर्जदार हा व्यवसायीक आहे.ग्राहकांच्या हिताचा विचार करणे त्यांना सुविधा पुरविणे ही त्याची जबाबदारी आहे तसेच व्यवसाय वृध्दीसाठी सुध्दा याची नितांत गरज आहे.हे उमगण्या इतपत गैरअर्जदार नक्कीच सुज्ञ असावा गैरअर्जदाराने असा बचाव घेतलेला आहे की,अर्जदार हा कधीही त्याच्या दुकानात आलेला नाही ग्राहकाने घेतलेला बचाव जरी ग्राहय धरला तरी प्रश्न असा उपस्थित होतो की, मग मंचाने नोटीस पाठविल्यानंतर त्याने अर्जदारास फ्रि सर्व्हीसींग देण्याची तयारी का दर्शविली नाही ? कारण त्याने लेखी निवेदनातून परिच्छेद क्रमांक 3 मध्ये असे नमुद केले आहे की गॅरंटी संपल्यानंतर देखील गैरअर्जदार हा फ्रि सर्व्हींसींग देण्यासाठी तत्पर असतो.मग ही तत्परता या प्रकरणात गैरअर्जदाराने का दाखवली नाही ? यावरुन अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे अनुमान काढावे लागेल म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सेवात्रुटी बद्दल व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 300/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु. 300/- अर्जदारास द्यावे. 3 संबंधीतांना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |