Maharashtra

Satara

CC/13/13

KANCHAN PRADIP MATE - Complainant(s)

Versus

PRACHARYA,DO.DAULATRAO AAHER COLLAGE OF ENGI. - Opp.Party(s)

30 Jul 2015

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/13/13
 
1. KANCHAN PRADIP MATE
63,SHIVAJINAGAR KARAD
...........Complainant(s)
Versus
1. PRACHARYA,DO.DAULATRAO AAHER COLLAGE OF ENGI.
BANWADI,TA.KARAD
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
 HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                          मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                तक्रार अर्ज क्र. 13/2013

                      तक्रार दाखल दि.14-03-2013.

                            तक्रार निकाली दि.30-07-2015. 

कु. कांचन प्रदिप माटे,

रा. शिवाजीनगर,

रा. 63,शिवाजीनगर,

मु.पो.ता.कराड,जि.सातारा.                      ....  तक्रारदार

         विरुध्‍द

1. प्राचार्य, डॉ. दोलतराव आहेत कॉलेज ऑफ

   इंजिनिअरींग,विद्यानगर,बनवडी,

   ता.कराड,जि.सातारा

2. सह-संचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय,

   412-ई, शिवाजीनगर,पुणे -16.                   ....  जाबदार

                                 तक्रारदारातर्फे अँड.पी.के.बारसावडे

                                 जाबदार क्र.1 तर्फेअँड.व्‍ही.पी.खामकर.

                                 जाबदार क्र.2 तर्फे- प्रतिनिधी

-ः न्‍यायनिर्णय ः-

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला)

1.  तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात मजकूर पुढीलप्रमाणे-

     तक्रारदाराने हे कराड येथील कायमस्‍वरुपी रहिवासी असून तक्रारदाराने जाबदार क्र.1 या कॉलेजमध्‍ये सन 2011-2012 या शैक्षणिक वर्षाकरीता अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी अभ्‍यासक्रमाकरीता FE.E&TC. या अभ्‍यासक्रमाकरीता दि.26/07/2011 रोजी प्रवेश घेतला होता.  त्‍याचदिवशी तिने जाबदार क्र.2 यांचेकडे डी.डी.व्‍दारे रक्‍कम रु.66,655/- (रुपये सहासष्‍ट हजार सहाशे पंचावन्‍न मात्र) जमा केले होते व आहेत.  जाबदार क्र. 1 यांची प्रवेश प्रक्रिया 25/9/2011 पर्यंत चालू होती.  शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, कराड यांचेकडे प्रवेश प्रक्रीयेचा 4 था फेरा पूर्ण झाल्‍यावर प्रथमवर्ष पदवी अभ्‍यासक्रमाकरीता 17 जागा रिक्‍त होत्‍या.  म्‍हणून त्‍यांनी वृत्‍तपत्रामध्‍ये रिक्‍त जागांबाबत जाहीरात प्रसिध्‍द केली होती.  त्‍यास अनुसरुन तक्रारदाराने अर्ज केला होता.  तिला गुणवत्‍तेवर आधारीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे प्रथम वर्षाकरीता माहिती तंत्रज्ञान विभागात दि.15/7/2011 रोजी प्रवेश मिळाला.  शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, कराड यांचे निर्देशाप्रमाणे जाबदार क्र.1 यांचेकडे तक्रारदाराने प्रथम वर्षाकरीता घेतलेला प्रवेश दि.16/9/2011 रोजी रद्द केला व त्‍यानंतर नमूद रक्‍कम रु. 66,655/- परत देणेबाबत विनंती केली.  त्‍यानंतर जाबदार क्र. 1 यांचे महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीया दि.25/09/2011 पर्यंत सुरु होती.  तथापी, जाबदार क्र.1 यांनी तक्रारदारास रक्‍कम रु.66,655/- (रुपये सहासष्‍ट हजार सहाशे पंचावन्‍न मात्र) परत केलेले नाहीत व सदरची रक्‍कम ‘Cancellation charges’ या नावाखाली जप्‍त करुन सदर रक्‍कम तक्रारदाराला देणेस इन्‍कार केला.  तक्रारदाराने पुन्‍हा दि. 23/9/2011 रोजी जाबदाराकडे अर्ज करुन प्रस्‍तुत रकमेची मागणी केली. त्‍यानंतर अनेकवेळा संबंधीत रकमेच्‍या परताव्‍याबाबत तोंडी विनंती केलेली होती.  परंतु जाबदार क्र. 1 यांनी संबंधीत रक्‍कम  आजपर्यंत तक्रारदाराला परत केलेली नाही.  तक्रारदार ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जाबदाराची  ग्राहक असून त्‍यांची वर नमूद रक्‍कम परत न करणे ही सेवेतील त्रुटी आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांना मानसिक त्रास झालेला आहे.  सबब तक्रारदाराची जाबदाराने फसवणूक केली असलेने तक्रारदाराने दि.16/10/2012 रोजी वकीलामार्फत जाबदाराला नोटीस पाठवली व प्रस्‍तुत रक्‍कम तक्रारदाराला देणेबाबत कळविले परंतु त्‍यास जाबदार क्र. 1 ने खोटया मजकूराचे उत्‍तर दिले व तक्रारदाराला सदरची रक्‍कम परत देणेस नकार दिला.  त्‍यामुळे तक्रारदाराने प्रस्‍तुतची रक्‍कम रु.66,655/- (रुपये सहासष्‍ट हजार सहाशे पंचावन्‍न मात्र) तसेच नुकसानभरपाई जाबदाराकडून परत मिळणेसाठी सदर तक्रार अर्ज मे. मंचात दाखल केला आहे.

2.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून रक्‍कम रु.66,655/- (रुपये सहासष्‍ट हजार सहाशे पंचावन्‍न मात्र) परत मिळावेत, प्रस्‍तुत रकमेवर दि.16/9/2011 पासून रक्‍कम तक्रारदाराचे प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 20 टक्‍के दराने व्‍याज मिळावे, मानसिक व शारीरिक त्रासापोटी जाबदारकडून तक्रारदार यांना रक्‍कम रु.20,000/- मिळावेत, अर्जाचा खर्च जाबदाराकडून मिळावा अशी मागणी प्रस्‍तुत कामी केली आहे.

3. तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि.2 कडे अँफीडेव्‍हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे तक्रारदाराने जाबदाराला पाठवले नोटीसची झेरॉक्‍स प्रत, नि. 5/2 कडे सदर नोटीसला जाबदाराने दिलेले उत्‍तर, नि. 27 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्र, मे. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे इत्‍यादी कागदपत्रे मे मंचात दाखल केली आहेत. तक्रारदाराने दाखल केलेली मे. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे पुढीलप्रमाणे आहेत.

I   Brilliant Tutorials Pvt. Ltd., V/s Ashwini Varma

     (IV (2010) CPJ 396 NC)

Ii   Fiit Jee Ltd., V/s. Dr. Minathi Rathi

     (I(2012) CPJ 194 (NC)

Iii  Sehegal School of Compitition Vs. Dalbir Singh

     (III(2009)CPJ 33 (NC)

Iv   Ganpati College of Engineering V/s. Vijeta Mahima Singh

       (Rev. Petition No.347/2012)

वगैरे कागदपत्रे मे. मंचात दाखल केली आहेत.

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 2  यांनी नि.11 कडे परिच्‍छेदनिहाय अभिप्राय, नि.13 व 14 कडे डायरेक्‍टर ऑफ टेक्‍नीकल एज्‍युकेशन, महाराष्‍ट्र राज्‍य यांचे प्रवेशाबाबत माहीतीपत्रके नि.19 कडे म्‍हणणे, नि. 20 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट,

वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत तर जाबदार क्र. 1 यांनी नि. 22 कडे म्‍हणणे, नि.23 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 25 कडे कागदयादीसोबत नि. 25/1 ते 25/9 कडे अनुक्रमे डी.टी.ई., मुंबई यांचे सन 2001 एम.एच.टी. सी.ई.टी.इंजिनिअरींग/टेक्‍नीकल चे कॅपराऊंड चे वेळापत्रक, तक्रारदाराची अँडमीशन कन्‍फरमेशन रिसीट (ऑनलाईन प्रत), तक्रारदाराने जाबदार क्र. 1 महाविद्यालयात प्रथम वर्ष 2011 E & TC Engineering पदविका अभ्‍यासक्रमामध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांची अंतिम यादी OTE ने दिलेली, तक्रारदाराने भरलेला Proforma ‘O’ Cap Brochure 2011 मधील नियम नं. 8.9 तक्रारदाराची रिफंड रिसीट (On-line), जाबदारतर्फे दिलेले नोटीस उत्‍तर, नोटीस उत्‍तर- रजिस्‍टर ए.डी.पावती, नोटीस उत्‍तर पोहोच पावती, नि.30 कडे जाबदार क्र. 1 ने दाखल केलेले म्‍हणणे व कागदपत्रे तेच पुराव्‍याचे शपथपत्र समजण्‍यात यावे म्‍हणून पुरसीस, नि. 31 कडे लेखी युक्‍तीवाद, व मे. उच्‍च न्‍यायालय,मुंबई यांचा न्‍यायनिवाडा – रिटपिटीशन नं.2933/2011 अमित सदाशिव वैद्य वि. प्राचार्य के.सी.कॉलेज ऑफ इंजिनिअरींग हा केस-लॉ वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 2 ने याकामी दाखल केली आहेत.

5.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी म्‍हणणे/कैफीयतमध्‍ये तक्रारदाराचे तक्रार अर्जातील  सर्व कथने फेटाळलेली आहेत. जाबदार नं. 1 यांनी पुढील प्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत. 

 I   तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कथन मान्‍य व कबूल नाही- वस्‍तुस्थिती पुढीलप्रमाणे,

     अ.  तक्रारदार हिने ता. 26/7/2011 रोजी जाबदार क्र. 1 महाविद्यालयात प्रथमवर्ष E. & T.C. या इंजिनिअरींग पदवी अभ्‍यासक्रमाकरीता प्रवेश घेतला.  सदर महाविद्यालयात DTE Maharashtra Education, Mumbai ( Directorate of Technical Education) यांचे मार्फत ऑनलाईन, CAP  Rounds (Centralized Admission Process) पध्‍दतीने प्रवेश प्रक्रिया अन्‍वये प्रवेश अर्ज करणारा विद्यार्थी, DTE या शासकीय संस्‍थेच्‍या नियम व अटींना बांधील असतो.  सदर प्रवेश प्रक्रीया सन 2011-12 करीता ता.5/7/2011 ते 20/9/2011  पर्यंत राबविण्‍यात आली होती.  प्रस्‍तुत प्रवेश प्रक्रीयेमध्‍ये जाबदार क्र. 1 महाविद्यालयास कोणताही हस्‍तक्षेप करता येत नाही. CAP ROUNDS  अन्‍वये प्रवेश मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यास महाविद्यालयामध्‍ये आवश्‍यक शैक्षणिक कागदपत्रे तथा शासकीय शुल्‍क भरुन प्रवेश निश्चित करुन घेणे एवढेच काम या जाबदाराचे असते.  प्रस्‍तुत तक्रारदार हिचेवर जाबदारांचा रोष असणेचे कारण नाही व नव्‍हते.  DTE मार्फत प्रवेश प्रक्रीयेच्‍या अनुषंगाने Admission Brochure  या नावाने नियम/नियमावली प्रसिध्‍द करण्‍यात आले असून सदर माहिती इंटरनेटवरही प्रसिध्‍द करणेत आली आहे.

      ब)  प्रस्‍तुत तक्रारदाराने दि.16/9/2011 रोजी जाबदार महाविद्यालयात प्रवेश रद्द करीत असलेबाबत  या जाबदार यांना कळविले.  तसेच DTE च्‍या नियमानुसार नमुना ‘O’ हा फॉर्म भरुन तक्रारदाराचे शुल्‍क परताव्‍याची मागणी तसेच मूळ शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली.  त्‍यानुसार जाबदार क्र. 1 यांनी त्‍वरीत जाबदार क्र. 2 यांच्‍या ऑनलाईन फॉर्म भरुन तक्रारदाराचे शुल्‍क परतण्‍याची मागणी सादर केली.  त्‍यावेळी जाबदार क्र. 2 यांच्‍यामार्फत ऑनलाईन पध्‍दतीने पावती पारीत करणेत आली.  त्‍यामध्‍ये DTE यांच्‍या नियम क्र. 8.9 उपकलम (3) अन्‍वये परतावा रक्‍कम रुपये 00/- (शून्‍य रुपये फक्‍त) असे नमूद करणेत आले आहे. 

     क)  ता.15/9/2011 रोजी उपरोक्‍त CAP ROUND  अन्‍वये सन 2011-2012 ची प्रवेश प्र‍क्रीया झाली.  सन 2011-12 यावर्षी तक्रारदाराने प्रवेश घेतलेल्‍या E & TC या पदवीका अभ्‍यासक्रमासाठी जाबदार यांचेकडील 120 जागांपैकी 52 जागा रिक्‍त राहील्‍या. त्‍यामुळे उपरोक्‍त नियम क्र. 8.9 उपकलम (3) अन्‍वये विद्यालयामध्‍ये जागा रिक्‍त राहील्‍यास कोणतेही शुल्‍क परत घेत नाही असा नियम आहे.  त्‍यानुसार जाबदार क्र. 2 यांनी पारीत केलेल्‍या पावतीची प्रत या तक्रारदाराला ता.16/9/2011 रोजीच देणेत आली आहे. तसेच महाविद्यालयाकडील पावतीवर तक्रारदाराची पोहोच घेतली आहे.  सबब तक्रारदाराचे शुल्‍क जप्‍त केले अगर देणेस इन्‍कार केला या आरोपांमध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही.  तक्रारदाराने जाबदार क्र. 1 वर दबाव आणणेसाठी तक्रारदाराने विनाकारण ता.16/10/2012 रोजी वकीलांमार्फत नोटीस पाठवली.  सदर नोटीसला ता. 10/11/2012 रोजी प्रस्‍तुत जाबदाराने उत्‍तर दिले आहे.  प्रस्‍तुत उत्‍तरी नोटीस तक्रारदाराला दि.14/11/2012 रोजी मिळाली आहे.

    ड)  तक्रारदार ही या महाविद्यालयाची विद्यार्थिनी नाही.  तसेच तिला प्रवेश देणेपासून तो रद्द करेपर्यंत कार्यवाही जाबदार क्र.2 DTE यांचेमार्फत झाली आहे.  त्‍यामुळे जाबदार क्र. 1 व तक्रारदार यांचे मध्‍ये ग्राहक व सेवा देणार असे नाते निर्माण झालेले नाही.  तक्रारदाराने मोघमपणे तक्रार दाखल केली असून त्‍यासाठी कोणता‍ही कागदोपत्री पुरावा तक्रारदाराने मे मंचात दाखल केलेला नाही.  केवळ पोकळ आरोप करुन तक्रारदाराने निरर्थक, बेकायदेशीर मागण्‍या केलेल्‍या आहेत. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळाणेत यावा व जाबदार क्र.1 यांना झाले मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रक्‍कम रु.25,000/- Compensatory Cost  म्‍हणून तक्रारदारांकडून मिळावेत. अशास्‍वरुपाचे म्‍हणणे जाबदार क्र. 1 यांनी दाखल केले आहे.   

ii     जाबदार क्र. 2 यांनी प्रस्‍तुत तक्रार अर्जावर पुढीलप्रमाणे आक्षेप घेतले आहेत.

    तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्‍यातील कथने मान्‍य व कबूल नाहीत.  तक्रारदाराने दि. 26/7/2011 रोजी डी.टी.ई महाराष्‍ट्र शिक्षण मुंबई (तंत्र शिक्षण संचनालयाच्‍या अंतर्गत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीया मार्फत जाबदार क्र. 1 यांचे एफ.ई.ई.अँन्‍ड टी.सी. या अभ्‍यासक्रमाकरीता (फर्स्‍ट ईयर फॉर दि इलेक्‍ट्रॉनिक अँन्‍ड टेलिकम्‍युनिकेशन या प्रथम वर्षाकरीता प्रवेश घेतला.  त्‍यावेळी तक्रारदाराने रक्‍कम रु.66,000/- (रुपये सहासष्‍ट हजार मात्र) प्रवेश फी अदा केली होती. सदरची सर्व प्रवेश प्रक्रिया डी.टी.ई महाराष्‍ट्र शिक्षण (तंत्र शिक्षण संचालनाच्‍या अटी व नियमानुसार चालते.  सदर महाविद्यालयात संपूर्ण प्रवेश प्रक्रीयांची अंतीम मुदत ही ता.15/9/2011 अशी होती.  डी.टी.ई महाराष्‍ट्र शिक्षण (तंत्रशिक्षण संचलनालय) च्‍या मार्फत प्रवेश घेताना दिल्‍या जाणा-या नियमावली प्रत्‍येक विद्यार्थी हा डी.टी.ई.महाराष्‍ट्र शिक्षण,मुंबई ने बांधील आहे.

    तक्रारदाराला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे दि.15/9/2011 रोजी प्रवेश मिळाला होता. त्‍यामुळे तक्रारदाराने दि.16/9/2011 च्‍या अर्जान्‍वये जाबदार क्र. 1 महाविद्यालयातील आपला प्रवेश रद्द केल.  तत्‍पूर्वीच दि.15/9/2011 रोजी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख Cut off date  उलटून गेली होती.  तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे प्रवेश घेतलेल्‍या शाखेतील प्रवेश रद्द करण्‍याच्‍या तसेच फी परतीसाठीचा अर्ज व डी.टी.ई च्‍या नियमानुसार केंदीभुत ऑनलाईन प्रवेश रद्द प्रक्रीयेचा अवलंब करुन रुल क्र. 8.9 अन्‍वये प्रोफॉर्मा ‘D’ अन्‍वये फी परतीसाठी अर्ज दिला होता.  परंतू तत्‍पूर्वीच दि.15/9/2011 रोजी प्रवेश प्रक्रीयेची अंतिम मुदत संपलेली होती.  जाबदार क्र. 2 यांनी सदरचा अर्ज प्राप्‍त होताच तक्रारदाराला ऑनलाईन पध्‍दतीने त्‍याची प्राप्‍ती स्विकृती पोहोच दिली होती.  प्रस्‍तुत डी.टी.ई महाराष्‍ट्र शिक्षण (तंत्र शिक्षण संचलनालयाच्‍या) नियमावलीतील नियम क्र. 8.9 अन्‍वये एखाद्या विद्यार्थ्‍याने अंतिम मुदतीनंतर Cut off date नंतर प्रवेश रद्द चा अर्ज दाखल केल्‍यास तक्रारदाराने प्रवेश घेतले.  शाखेतील  रिक्‍त  जागेवर त्‍यानंतर एकाही विद्यार्थ्‍यांचा प्रवेश झाला नाही तर, तंत्रशिक्षण संचलनालयाच्‍या नियम क्र. 8.9 नुसार फीचा परतावा मिळत नाही असा नियम आहे.  याची स्‍पष्‍ट कल्‍पना तक्रारदाराला होती व आहे. या नियमाची प्रत मे. मंचात दाखल केली आहे.  तक्रारदार हे जाबदार क्र. 2 चे ग्राहक नाहीत.  त्‍यामुळे जाबदार क्र. 2 ने तक्रारदाराला सेवेत त्रुटी देणेचा प्रश्‍नच उद्भवत नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराने केलेला तक्रार अर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र. 2 ने दाखल केले आहे.

5.    वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व म्‍हणणे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे निराकरणार्थ मे मंचाने पुढील मुदद्यांचा विचार केला.

अ.क्र.                  मुद्दा                        उत्‍तर

 1.  तक्रारदार हे जाबदारांचे  ग्राहक आहेत काय?                  होय.                                         

 2.  जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा

     पुरवली आहे काय?                                      नाही.

 3.  अंतिम आदेश काय?                                 खाली नमूद

                                                      आदेशाप्रमाणे.

विवेचन-

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार हिने जाबदार क्र. 1 यांचे महाविद्यालयात सन 2011-2012 या शैक्षणिक  वर्षाकरीता अभियांत्रिकी प्रथमवर्ष पदवी अभ्‍यासक्रमाकरीता FE.E&T.C. या अभ्‍ंयासक्रमाकरीता दि. 26/7/2011 रोजी प्रवेश घेतला होता.  त्‍याचदिवशी तक्रारदाराने जाबदार क्र. 1 यांचेकडे डी.डी.व्‍दारे रक्‍कम रु.66,655/- (रुपये सहासष्‍ट हजार सहाशे पंचावन्‍न फक्‍त) जमा केले आहेत.  ही बाब जाबदारांनी‍ही मान्‍य केली आहे.  सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे स्‍पष्‍टपणे सिध्‍द होते.  त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

7.  प्रस्‍तुत कामी मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण जाबदार यांनी याकामी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता असे स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार हीने ता. 26/7/2011 रोजी जाबदार क्र. 1 महाविद्यालयात प्रथमवर्ष E&T.C.  या इंजिनिअरींग पदविका अभ्‍यासक्रमाकरीता प्रवेश घेतला.  सदर महाविद्यालयात DTC Maharashtra Education, Mumbai (Director of Technical Education) यांचेमार्फत ऑनलाईन CAP Rounds (Centralized  Admission process) पध्‍दतीने प्रवेश प्रक्रीया सन 2011-2012 करीता दि.5/7/2011 ते दि. 20/9/2011 पर्यंत राबविणेत आली होती.  सदर प्रवेश प्रक्रीया अन्‍वये प्रवेश अर्ज करणारा विद्यार्थी DTE या शासकीय संस्‍थेच्‍या नियम व अटींना बांधील असतो आणि सदर प्रवेशकामी जाबदार क्र. 1 यांना कोणताही हस्‍तक्षेप करता येत नाही. CAP Round अन्‍वये प्रवेश मिळालेल्‍या विद्यार्थ्‍यास महाविद्यालयामध्‍ये आवश्‍यक शैक्षणिक कागदपत्रे तथा शासकीय शुल्‍क भरुन घेवून निश्चित प्रवेश करुन घेणे एवढेच काम या जाबदार क्र. 1 यांचे असते.  सदर कामी तंत्रशिक्षण मंडळाव्‍दारा पारीत करण्‍यात आलेले ऑनलाईन वेळापत्रक नि.25/1 ते नि.25/4 ला दाखल आहेत.  डी.टी.ई मार्फत प्रवेश प्रक्रीयेच्‍या अनुषंगाने Admission Brochure  या नावाने नियमावली प्रसिध्‍द करणेत आली असून सदरची माहिती इंटरनेटवर सुध्‍दा प्रसिध्‍द केली आहे.  सदर कामी तंत्रशिक्षण मंडळाचे व्‍दारा पारीत करणेत आलेले नियम व नियमावली नि. 25/5 ला दाखल केले आहे. (नियम क्रमांक 8.9)

     प्रस्‍तुत तक्रारदाराने दि.16/9/2011 रोजी जाबदार महाविद्यालयात तिचा प्रवेश रद्द करत असलेबाबत जाबदार नं.1 यांना कळविले.  तसेच DTE च्‍या नियमानुसार  नमुना ‘O’ हा फॉर्म भरुन शुल्‍क परताव्‍याची तसेच मुळ शैक्षणीक कागदपत्रांची मागणी केली.  त्‍यानुसार जाबदार क्र. 1 यांनी जाबदार क्र. 2 तंत्रशिक्षण मंडळाकडे त्‍वरीत ऑनलाईन फॉर्म भरुन तक्रारदाराचे शुल्‍क परताव्‍याची मागणी केली.  त्‍यावेळी जाबदार क्र. 2 यांच्‍यामार्फत ऑनलाईन पध्‍दतीने पावती पारीत करणेत आली.  त्‍याअन्‍वये  यांच्‍या नियम क्र. 8.9 उपकलम 3 अन्‍वये परतावा रक्‍कम रु. 00/- रुपये शुन्‍य फक्‍त असे नमूद करणेत आले.  प्रस्‍तुत पावती जाबदार क्र. 1 ने नि.25 चे कागदयादीसोबत नि. 25/6 कडे दाखल केली आहे.  वास्‍तविक दि.15/9/2011 रोजी उपरोक्‍त CAP ROUNDS अन्‍वये सन 2011 2012 ची प्रवेश प्रक्रीया बंद झाली.  सन 2011-12 यावर्ष तक्रारदाराने जाबदार क्र.1 महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्‍या E & T.C  या पदविका अभ्‍यासक्रमासाठी जाबदार क्र. 1 यांचेकडील प्राप्‍त 120 जागांपैकी 52 जागा रिक्‍त राहील्‍या.  प्रस्‍तुतची यादी जाबदार क्र. 1 चे नि. 25 चे कागदयादीसोबत नि. 25/3 ला दाखल केली आहे.  त्‍यामुळे उपरोक्‍त नियम क्र. 8.9 उपकलम 3 अन्‍वये विद्यालयामध्‍ये जागा रिक्‍त राहील्‍यास कोणतेही शुल्‍क परत मिळत नाही असा नियम आहे.  त्‍यानुसार जाबदार क्र. 2 यांनी पारीत केले पावतीची प्रत या तक्रारदाराला दिली असून याकामी नि.25/6 कडे दाखल आहे.  अशा सर्व परिस्थितीत प्रस्‍तुत नियम क्र. 8.9 च्‍या उपकलम 3 नुसार तक्रारदाराचे शुल्‍क परत न देणे ही सेवा त्रुटी होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  तसेच प्रस्‍तुत तक्रारदार यांना प्रवेश देणेपासून तो रद्द होईपर्यंतची सर्व कार्यवाही जाबदार क्र. 2 DTE यांचेमार्फत झालेली आहे.

     प्रस्‍तुत कामी जाबदाराने दाखल केले मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई यांच्‍याकडील सिव्‍हील रिटपिटीशन क्र. 2933/2011 अमीत सदाशिव वैद्य वि. प्रिन्सिपाल, के.सी. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कोपरी हा न्‍यायनिवाडा दाखल केला आहे. सदर न्‍यायनिवाडा व त्‍यातील दंडकांचा आम्‍ही आधार घेत आहोत.

मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय- रिट पिटीशन क्र. 2933/2011

Amit Sadashiv Vaidya V/s. The Principal K. C. College of  Engineering, Kopri यामध्‍ये मे. उच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले आहे की, In present case as a result of the withdrawal by the Petitioner from the seat allotted, the seat would remain vacant for a period  of four years.  Hence, no case for interference is made out.  Petition is dismissed.  म्‍हणजेच तक्रारदाराने अॅडमिशन रद्द केलेनंतर त्‍याचे जागेवर दुस-या विद्यार्थ्‍याचे अँडमिशन झाले नाही आणि ती सिट रिक्‍त राहीली तर फी परत देता येत नाही.  प्रस्‍तुत तक्रार अर्जातील परिस्थिती ही अशीच आहे असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच नियम क्र. 8.9 चे उपकलम 3 याठिकाणी लागू होत असून प्रस्‍तुत नियमात पुढीलप्रमाणे कथन आहे. नि. 25/5 कडे दाखल. नियम क्र.8.9 चे उपकलम 3 Request for cancellation of admission is received before/after start of the academic session and the seat could not be filled by the Institute % No Refund (except security deposit).   नि. 25/1 कडील DTE च्‍या वेळापत्रकामध्‍ये Cut off date for all  type of admission for the academic year 2011-2012 - 15-9-2011 अशी आहे. व तक्रारदाराने दि.16/9/2011 रोजी अँडमिशन रद्द केले.  तसेच प्रस्‍तुत जाबदार क्र. 1 महाविद्यालयामध्‍ये प्रस्‍तुत अँडमिशन रद्द झालेनंतर 52 रित जागा राहील्‍या  त्‍या जागेवर दुसरे विद्यार्थ्‍याचे अँडमिशन त्‍या शैक्षणिक वर्षाकरीता झालेले नाही ही बाब जाबदार क्र. 1 ने नि. 25 चे कागदयादी सोबत नि. 25/3 कडे दाखल केले.  सन 2011-12 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रथमवर्ष  E & T.C. Engineering पदविका अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेलेल्‍या विद्यार्थ्‍यांची अंतिम यादी दाखल केली आहे  यावरुन सिध्‍द होते.

8.    सबब प्रस्‍तुत कामी जाबदार यांनी तक्रारदाराला नियमाप्रमाणे (नियम 8.9 उपकलम 3) शुल्‍क परत देता येत नसलेने ते परत दिलेले नाही, यामध्‍ये कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही असे या मे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी दिलेले आहे.  तक्रारदाराने याकामी दाखल केलेले न्‍यायनिवाडे लागू होत नाहीत.

     सबब प्रस्‍तुत तक्रारदार यांनी या तक्रार अर्जात केलेली शुल्‍क परतीची मागणी मान्‍य करणे न्‍यायोचीत होणार नाही असे या मे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

9.    सबब आम्‍ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.    

                           -ः आदेश ः-

1.  तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.

2.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत

    याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि. 30-7-2015.

            (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या          सदस्‍य             अध्‍यक्षा

             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Mrs.Surekha Hazare]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.