// आदेश निशाणी क्र.1 वर //
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 27 जानेवारी 2014)
1. अर्जदार यांनी, सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अन्वये दाखल केली. अर्जदाराने टि.व्ही. मध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे तो बदलवून दूसरा देण्यात यावा, अथवा टि.व्ही. ची संपूर्ण रक्कम परत देण्यात यावी व वॉरंटी कालावधी वाढवून देण्यात यावा याकरीता तक्रार दाखल केली.
2. सदर तक्रार नोंदणी करुन, विरुध्दपक्षाविरुध्द नोटीस काढण्यात आली. तक्रार मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार यांनी आज दि.27.1.2014 रोजी अर्जदार हजर होऊन गैरअर्जदार यांनी टि.व्ही दुरुस्त करुन दिल्यामुळे तक्रार अर्ज वापस घेण्याकरीता अर्ज नि.क्र.4 नुसार दाखल केला. अर्जदारास अर्जामधील मजकुराबाबत विचारणा केली असता तक्रार काढून टाकण्यात यावे असे सांगीतले. नि.क्र.4 चा अर्ज मंजूर, त्याअनुषंगणाने नि.क्र.1 वर आदेश पारीत.
3. अर्जदार यांनी नि.4 नुसार तक्रार मागे घेण्याचा अर्ज दाखल केल्यामुळे, तक्रार अंतिमतः निकाली काढून खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे निकाली.
( Complaint disposed by way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :- 27/01/2014