Maharashtra

Washim

CC/44/2017

Prakash Bisanlal Bagdiya - Complainant(s)

Versus

Prabandhak,Bajaj Alliance life Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Self

28 Nov 2017

ORDER

Judgment
Final Order
 
Complaint Case No. CC/44/2017
 
1. Prakash Bisanlal Bagdiya
At.Vyankatesh coloney,Washim
Washim
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Prabandhak,Bajaj Alliance life Insurance Co.Ltd.
Tapadiya Nagar,Shivmahima Tower,Infront of Fitness First,Birala Gate No2,satav Chowk, Akola
Akola
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale PRESIDENT
 HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Nov 2017
Final Order / Judgement

                     :::     आ  दे  श   :::

             (  पारित दिनांक  :   28/11/2017  )

माननिय सदस्‍य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार  : -

1.      तक्रारकर्त्‍याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्‍वये, दोषपूर्ण सेवे संदर्भात, विमा रक्‍कम व नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाविरुध्‍द दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात पुढीलप्रमाणे आहे. 

     तक्रारकर्ता हे वाशिम येथील रहिवासी असून त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडून तीन विमा पॉलिसी काढल्‍या होत्‍या. त्‍यावेळेस विरुध्‍द पक्षाचे कार्यालय वाशिम येथे मणिप्रभा हॉटेल जवळ होते. रक्‍कमेचा भरणा वाशिम येथेच केला. नंतर  विरुध्‍द पक्षाने वाशिम येथील कार्यालय बंद केले व वाशिम येथील कामकाज अकोला कार्यालयामार्फत चालते. तक्रारकर्त्‍याने भरणा केलेली रक्‍कम ही त्‍याचे मुदतीअंती चार पटीने मिळण्‍याचे विरुध्‍द पक्षाने आश्‍वासन दिले होते. त्‍या पॉलिसींचे विवरण खालीलप्रमाणे.

 अ.क्र.    क्रमांक        पावती क्रमांक   दिनांक    जमा रक्‍कम.

 अ)     6999654      0085458186  30/08/07  रु. 10,000/-

 ब)     5334864      0169933692  26/08/08  रु. 10,000/-

 क)     4001262      0252706225  03/09/09  रु. 10,000/-

     तक्रारकर्त्‍याने वरील पावत्‍यांप्रमाणे एकूण रुपये 30,000/- रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे जमा केली. विरुध्‍द पक्ष यांनी पॉलिसी क्र. 0064890285 दिलेला आहे.

     विरुध्‍द पक्षाने आय.आर.डी.ए. च्‍या नियमाची पुर्तता केली नाही व तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या जमा रक्‍कमेचा कधिही हिशोब दिला नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या नागपूर, पुणे व अकोला येथील कार्यालयाशी पत्रव्‍यवहार केला व विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या सुचनेनुसार दिनांक 26/04/2017 रोजी नविन प्रतिज्ञालेख रुपये 500/- च्‍या मुद्रांकावर करुन घेतला तसेच विरुध्‍द पक्षाचे सुचनेनुसार रद्द झालेला धनादेश, बॅंकेने साक्षांकित केलेला अर्ज व सर्व कागदपत्रे सादर केलीत. तरीसुध्‍दा विरुध्‍द पक्षाने रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने ही तक्रार प्रार्थनेनुसार मंजूर करावी, अशी विनंती केली.  

2) सदर प्रकरणात विरुध्‍द पक्षाला मंचाची नोटीस प्राप्‍त होवूनही ते गैरहजर राहिले. म्‍हणून दिनांक 17/10/2017 रोजी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द एकतर्फीचा आदेश पारित करण्‍यांत आला. 

3) कारणे व निष्कर्ष ::    

     तक्रारकर्त्‍याची तक्रार व दाखल सर्व दस्‍तऐवज तसेच तक्रारकर्ते यांचा युक्तिवाद यावरुनच मंचाने निर्णय पारित केला. कारण विरुध्‍द पक्षाला नोटीस प्राप्‍त होवूनही ते मंचासमोर उपस्थित झाले नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षातर्फे तक्रारकर्ते यांच्‍या तक्रारीतील कथनाला कोणतेही नकारार्थी कथन उपलब्‍ध झाले नाही.  

     तक्रारकर्त्‍याचा युक्तिवाद व दाखल दस्‍त मंचाने काळजीपूर्वक तपासले असता असे दिसते की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे Product :- Bajaj Allianz Capital Unit Gain ही पॉलिसी ज्‍याची प्रिमीयम रक्‍कम 10,000/- होती व प्रिमीयम राशी भरण्‍याची पध्‍दत वार्षीक होती. तसेच पॉलिसी प्रिमीयम भरण्‍याचा कालावधी एकूण 16 वर्ष होता व सदर पॉलिसी दिनांक 07/09/2007 रोजी सुरु होवून त्‍याची मॅच्‍युरिटी हेट ही दिनांक 07/09/2023 होती. तक्रारकर्ता यांनी एकंदर तिन वार्षीक प्रिमीयम जसे की, रक्‍कम रुपये 30,000/- म्‍हणजे तिन वार्षीक प्रिमीयम भरले होते, असे दाखल दस्‍तावरुन दिसून येते.  सदर प्रकरणात तक्रारकर्ते यांनी या पॉलिसी बद्दलचे कोणतेही दस्‍तऐवज दाखल केले नाही. परंतु तक्रारकर्ते यांनी दाखल केलेले दस्‍त            ‘ Indemnity Bond for Surrender ’ या प्रतिज्ञालेखातील मजकूरावरुन असा बोध होतो की, तक्रारकर्ते यांना ही पॉलिसी, त्‍यांनी सदर पॉलिसी बद्दलचे कोणतेही डिटेल्‍स न दिल्‍यामुळे सरेन्‍डर करायची होती. त्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठवून पॉलिसीचा क्‍लेम रुपये 1,20,000/- व नुकसान भरपाई मिळण्‍याकरिता मागणी केली होती. सदर नोटीस विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त होवूनही विरुध्‍द पक्षाने त्‍यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.  सदर प्रकरणात दाखल दस्‍तऐवजावरुन तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे, हे मंचाने ग्राह्य धरले आहे. परंतु या पॉलिसी क्‍लेमपोटी तक्रारकर्त्‍याने रक्‍कम रुपये 1,20,000/- ची मागणी कशावरुन केली, याचा बोध, रेकॉर्डवर सदर पॉलिसी प्रत दाखल नसल्‍यामुळे, मंचाला होत नाही. याबद्दल तक्रारकर्त्‍यानेच पॉलिसी सरेन्‍डर करण्‍याबद्दलचे दाखल केलेले प्रतिज्ञालेखात - दस्‍त क्र. 22 मधील अनक्रमांक-2 मध्‍ये म्‍हटल्‍याप्रमाणे, ‘‘ That as per the terms and conditions of the policy, I have made a request before the Company for surrender of the said policy No. 0064890285 without the original policy documents as issusd by the Company since the same has misplaced. ’’ असा मजकूर आढळतो.

     म्‍हणजे तक्रारकर्त्‍याकडून सदर पॉलिसीचे अस्‍सल दस्‍त गहाळ झालेले दिसतात. त्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे असे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते की, ते किंवा त्‍यांच्‍यातर्फे ईतर कोणीही भविष्‍यात या पॉलिसीतील लाभासाठी कोणत्‍याही ऑथरिटी पुढे विरुध्‍द पक्षाविरुध्‍द क्‍लेम करणार नाही. तक्रारकर्ता यांनी या सर्व बाबींचा ऊहापोह तक्रारीत केला नाही. परंतु तक्रारकर्ते यांनी सदर पॉलिसी त्‍यांना सरेन्‍डर करायची आहे व त्‍यामुळे त्‍यांनी भरलेली रक्‍कम सर्व लाभासह त्‍यांना विरुध्‍द पक्षाने अदा करावी असे विरुध्‍द पक्षाला कळवून देखील विरुध्‍द पक्षाने त्‍यावर कोणतेही ऊत्‍तर पत्राव्‍दारे पाठवले नाही. तसेच मंचाची नोटीस प्राप्‍त होवूनही विरुध्‍द पक्ष मंचासमोर कोणताही खुलासा करण्‍यासाठी हजर झाले नाही, ही विरुध्‍द पक्षाची सेवा न्‍युनता आहे. म्‍हणून तक्रारकर्ते विरुध्‍द पक्षाकडून पॉलिसी प्रिमीयम पोटी भरलेली रक्‍कम रुपये 30,000/- सव्‍याज व इतर नुकसान भरपाई तसेच प्रकरण खर्च मिळण्‍यास पात्र आहे,  असे मंचाचे मत आहे.

सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यांत येतो. 

                 अंतिम आदेश

1.  तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.

   2.  विरुध्द पक्षाने, तक्रारकर्ते यांना रक्‍कम रुपये 30,000/- दरसाल, दरशेकडा 9 % व्‍याजदराने दिनांक 30/08/2007 पासून ते प्रत्‍यक्ष         

         रक्‍कम अदायगीपर्यंत व्‍याजासहीत    द्यावी. तसेच शारीरिक,  मानसिक, आर्थिक नुकसान भरपाईपोटी, प्रकरण खर्चासह एकंदर

       रक्‍कम रुपये 20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्‍त ) द्यावी.

   3.   विरुध्‍द पक्ष यांनी ऊपरोक्‍त आदेशातील क्‍लॉज नं. 2 ची पुर्तता, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाच्‍या आत करावी.

   4.   उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

                     ( श्री. कैलास वानखडे )     ( सौ. एस.एम. उंटवाले )  

                                          सदस्‍य.               अध्‍यक्षा.

  Giri           जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, वाशिम,(महाराष्‍ट्र).

svGiri

 
 
[HON'BLE MRS. Smt. S.M.Untwale]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Shri.Kailas Wankhede]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.