जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.173/2008. प्रकरण दाखल दिनांक – 09/05/2008. प्रकरण निकाल दिनांक – 23/07/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. श्री.ज्ञानोबा पि.गणपतराव सोळुंके, अर्जदार. वय वर्षे 52, व्यवसाय नौकरी, मराठवाडा खादीग्रामोद्योग समीती, हिंगोली गेट जवळ, नांदेड. विरुध्द. प्रो.प्रा.पॉवर बॅटरीज, गैरअर्जदार. सेल्स अन्ड सर्व्हीसेस, घर नं5-13-54,राम मंदीर समोर, पदमपुरावा, रेल्वेस्टेशन रोड, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे. - अड.व्ही.एन.गिरवलकर. गैरअर्जदार तर्फे - अड. एकतर्फा. निकालपत्र (द्वारा,मा.श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार यांची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हे मराठवाडा खादीग्रामोद्योग समीतीचे अधिक्षक आहेत. त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात विज भार नियमाची समस्या असल्यामुळे त्यांच्या कार्यालयाकरीता त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडुन दि.07/03/2007 रोजी औरंगाबाद येथुन एक प्रोव्हीत मंक 1800 व्ही.ए. कंपनीचा इनर्व्हटर रु.18,000/- ला घेतला. ज्याचा मॉडेल नंबर 100 आणि त्याची वॉरंटी एक वर्षाची आहे आणि त्याची पावती गैरअर्जारांनी दिलेली आहे. आणि फिटींग पोटी रु.1,000/- दिलेले आहे. इनर्व्हटर खरेदी केल्यानंतर तीनच दिवसा चालला आणि तो आज पावेतो बंद आहे. अर्जदाराने त्यांना वेळोवेळी कळविल्यानंतर पाटील नांवाचा एक गृहस्थास दि.19/12/2007 राजी अर्जदाराच्या कार्यालयात इनर्व्हटर मधील बीघाड दुरुस्त करण्यासाठी पाठविले त्यांनी बॅटरीतील एसीड चार्ज करुन रु.500/- घेतले त्याची पावती दिलेली आहे आणि इनर्व्हटरमधील बीघाड दुरुस्त झाला नाही. यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास अनेक वेळा कळवूनही इनर्व्हटरमधील बीघाड दुरुस्त केला नाही म्हणुन अर्जदाराने दि.12/01/2008 व दि.08/02/2008 रोजी पोष्टाने पत्र पाठविले त्याचे त्यांनी उत्तर दिले नाही आणी शेवटी दि.29/03/2008 रोजी वकीला मार्फत रजिस्टर पोष्टोन नोटीस पाठविली त्यावर दुकान बंद आहे म्हणुन परत आले. इनर्व्हटर बंद असल्यामुळे अर्जदाराच्या कार्यालयीन कामकाजमध्ये ब-याच प्रमाणात व्यत्यय आलेला व त्यांचे कार्यालयीन कामे वेळेत करता आली नाही. त्यामुळे अर्जदारास प्रचंड आर्थीक व मानसिक त्रास झालेला आहे व नुकसान झालेला आहे. म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल करुन तीद्वारे अर्जदारास नविन बीघाड नसलेले इनर्व्हटर द्यावे. इनर्व्हटर मधील झालेल्या बिघाडामुळे झालेले नुकसानी म्हणुन रु.50,000/- मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्चा पोटी रु.5,000/- द्यावे अशा मागण्या केल्या आहेत. गैरअर्जदार यांन रजिष्टर पोष्टाद्वारे पाठविलेली नोटीस परत आली म्हणुन गैरअर्जदार यांना स्थानिक वृत्तपत्रातुन जाहीर समन्स द्वारे नोटीस देण्यात आली परतु ते हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत शपथपत्र,इनर्व्हटरची पावती, फीटींग चार्जेसची पावती,वॉरंटी कार्ड,कंपनीचे वॉरंटी कार्ड, एजंटला दिलेले रु.500/- ची पावती, गैरअर्जदारांना पाठविलेली नोटीस व पोच पावती, चेकची झेरॉक्स पावती इ.दस्तऐवज दाखल केलेले आहेत. अर्जदारा तर्फे वकीला श्री.व्ही.एन.गिरवलकर यांनी युक्तीवाद केला. गैरअर्जदार एकतर्फा. या प्रकरणांत गैरअर्जदारांना नोटीस पाठविलेली घर कायम राहते करीता परत अशा शेरासह मंचास परत आले पुढे त्यामुळे गैरअर्जदारास वृत्तपत्रातुन जाहीर समन्स काढण्यात आले, त्यासंबधीचे वृत्तपत्र अंक रेकॉर्डवर आहे. सदर नोटीस प्रकाशीत झाल्यानंतर सुध्दा गैरअर्जदार हे या प्रकरणांत उपस्थित झाले नाही म्हणुन प्रकरण् एकतर्फी चालविण्या बाबतचा आदेश दि.15/07/2008 रोजी पारीत करण्यात आला. वरील परिस्थितीत गैरअर्जदार या प्रकणांत उपस्थित होऊन आपला बचाव केलेला नाही व कोणत्याही प्रकारे आपले म्हणणे मांडले नाही. यातील अर्जदारांनी इनर्व्हटर विकत घेतल्याचे बिल त्यासोबतची पावती रु.19,000/- ची आहे ती रेकॉर्डवर दाखल आहे. सदर बिलात इनर्व्हटरची वॉरंटी ही दोन वर्षाची देण्यात आलेली आहे. या प्रकरणांत अर्जदार यांचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे व्यवसायीक स्वरुपाचे हे प्रकरण ठरते, असे असले तरी सदर प्रकरण हे वॉरंटी संबंधीचे असल्यामुळे आणि दोन वर्षाची वॉरंटी दिलेली असतांना त्या पुर्वीच इनर्व्हटर खराब झाले असल्यामुळेअर्जदार हे ग्राहक ठरतात व हे प्रकरण चालविण्याचा अधिकार न्यायमंचास प्राप्त होतो. सदर प्रकरणांत अर्जदाराकडील इनर्व्हटर तीन महिन्यात खराब झाले म्हणुन त्यांनी गैरअर्जदाराशी संपर्क साधला त्यानंतर ब-याच कालावधीनंतर गैरअर्जदारांनी एक व्यक्तिस पाठवून बॅटरीमधील असिड बदलून दिले परंतु इनर्व्हटर मात्र दुरुस्त झाले नाही, संबंधीत व्यक्तिने अर्जदाराकडुन रु.500/- घेतले व त्याचा उपयोग काहीच झाला नाही व अर्जदाराचे इनर्व्हटर सुरु न झाल्यामुळे त्यांनी दि.10/01/2008 आणि दि.08/02/2008 रोजी पोष्टाद्वारे पत्र पाठविली आहेत त्यांचीही दाखल गैरअर्जदारांनी घेतलेली दिसत नाही व अर्जदारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी नोटीस पाठविलेली नोटीसचा उपयोग झाला नाही. थोडक्यात गैरअर्जदारांनी अयोग्य प्रकारचा माल पुरविला, वॉरंटी प्रमाणे त्या मालाची देखभाल कले नाही आणि अर्जदारास कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही हे उघड उघड दिसुन येते. या प्रकरणांत केवळ इनर्व्हटरची वॉरंटी नाही तर बॅटरीजची सुध्दा वॉरंटी आहे ही दोन वर्षाची आहे आणि त्यासंबंधीचे दस्तऐवज अर्जदाराने दाखल केलेले आहे. गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी ठेवेली आहे ही उघउ आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये राष्ट्रीय ध्वज स्वातंत्र दिन,प्रजासत्ताक दिन वापरले जातात ते मोठया प्रमाणावर तयार करावे लागतात आणि त्या संबंधी गैरअर्जदारांनी अयोग्य सेवा दिल्यामुळे त्यांना बराच आर्थिक त्रास सहन करावा लागला आणि त्यांची व्यवसायीक कुचंबना झालेली आहे. अर्जदारांनी या प्रकरणा एकुण रु.50,000/- नुकसान भरपाई मागितलेली आहे मात्र ती संबंधी योग्य असा निश्चित पुरावा मंचा समक्ष दाखल केलेले नाही असे म्हटले तरी गैरअर्जदारांनी वरील बाब नाकारलेली नाही. वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदारांनी अर्जदाराकडील इनर्व्हटर बँटरी फिटींगसाठी त्यांनी घेतलेली शुल्क रु.19,000/- आणि बॅटरीवर अर्जदारास करावा लागलेला रु.500/- खर्च या पोटी एकुण रु.19,500/- अर्जदारास परत करावे आणि सदरचे साहीत्य परत घ्यावे. 3. अर्जदारास झालेल्या आर्थीक हानी गैरसोय व त्रासाबद्यल गैरअर्जदारांनी रु.20,000/- नुकसानी दाखल द्यावे. सदर रक्कम आदेश प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याच्या आंत द्यावे न पेक्षा त्यावर गैरअर्जदार हे तक्रार दाखल दि.29/05/2008 पासुन ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12 टक्के व्याज देणे लागतील. 4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार. लघुलेखक. |