Maharashtra

Nagpur

CC/27/2017

Arun S Botare - Complainant(s)

Versus

Potential Builders & Developers & Through Acting Partner - Opp.Party(s)

Adv. MANOJ JOSHI

20 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/27/2017
( Date of Filing : 19 Jan 2017 )
 
1. Arun S Botare
R/o. B/3, Kusum Mani Layout, Cement Road, Peratap Nagar, Nagpur 440022
Nagpur
Maharashtra
2. Mrs. Jassi S. Gupta
R/o. B/3, Kusum Mani Layout, Cement Road, Pratap Nagar, Nagpur 440022
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Potential Builders & Developers & Through Acting Partner
R/o. 101, Snehal Apartment, Gopal Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Sanjay Pande, Partner - Potential Builder & Developers
R/o. 101, Snehal Apartment, Gopal Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Dhirendra Ramsunder Shukla, Partner - Potential Builder & Developers
R/o. 101, Snehal Apartment, Gopal Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Harshwardhan Gwande, Potential Builders & Developers
R/o. 101, Snehal Apartment, Gopal Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
5. Ramesh Vidani, Partner - Potential Builders & Developers
R/o. 101, Snehal Apartment, Gopal Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Dec 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्री सुभाष आर. आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकत्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे मौजा किन्‍ही, तहसिल हिंगना, जिल्‍हा  नागपूर येथील पटवारी हलका नंबर ५९ या लेआऊट मधील प्‍लॉन नंबर २२ व २३ क्षेञफळ ११५७.१ चौ.मी. (१२४५५.०२ चौ.फु.) रुपये ११,२०,९५२/- इतक्‍या रकमेत स्‍वतःचे कुटुंबाकरीता विकत घेण्‍याचा करार १०० रुपयाचे स्‍टॅम्‍प पेपरवर विरुध्‍द पक्षाशी दिनांक ०४/१०/२००९ रोजी केला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला कराराचे दिवशी रुपये २,८०,२३७/-  इतकी रक्‍कम अदा केली व उर्वरीत रक्‍कम रुपये ७०,०६०/- प्रति महिण्‍याप्रमाणे १२ महिण्‍यांत विरुध्‍द पक्षाला अदा केली. कराराचे दिवशी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदणी करुन देण्‍याचे मान्‍य केले होते.
  3. कराराप्रमाणे विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यास Landscaping, Natural Water Body Swimming Pool, Entrance Gate, Echo Friendly Road, Chen Link Facing to entire project, Temple, Children play Area, Restaurant & Electricity इत्‍यादी सोयी उपलब्‍ध करुन देणार होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन वादातील प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुन सुद्धा तक्रारकर्त्‍याला करारानूसार प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुन दिले नाही तसेच करारात नमुद केल्‍याप्रमाणे इतर सोयी उपलब्‍ध करुन दिले नाही. विक्री करारनामा होऊन ७ वर्षे लोटुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटचे विक्रीपञ करुन दिले नाही. तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍द पक्षाचे कार्यालयाला व स्‍वतः प्रत्‍यक्ष विरुध्‍द पक्षाला भेटला परंतू त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १०/१२/२०१६ ला कायदेशीर नोटीस बजावली व ती विरुध्‍द पक्षाला दिनांक १३/१२/२०१६ ला प्राप्‍त झाली. विरुध्‍द पक्षाने त्‍यास प्राप्‍त झालेल्‍या नोटीस उत्‍तरात तक्रारकर्त्‍याला कळविले की, सदर पञ मिळाले तारखेपासून तक्रारकर्त्‍याने प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुन घेतले नाही तर विरुध्‍द पक्षकार सदर प्‍लॉट दुस-याला विकेल व त्‍याकरीता तक्रारकर्ता स्‍वतः जबाबदार राहील परंतू विरुध्‍द पक्षाने करारात नमुद केल्‍याप्रमाणे कोणत्‍याही सोयी तक्रारकर्त्‍याने घेतलेल्‍या प्‍लॉटवर उपलब्‍ध करुन न दिल्‍यामुळे  व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा वापर केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर प्रकरण दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश द्यावे की, त्‍याने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट नंबर २२ व २३ चे विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये ११,२०,९५२/- २४ टक्‍के व्‍याजासह विक्री करारणाम्‍याच्‍या तारखेपासून तक्रारकर्त्‍याला अदा करावी.
  2. मानसिक व शारिरीक ञासापोटी व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये २,००,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे.
  3. तक्रारीचा खर्च रुपये ५०,०००/- तक्रारकर्त्‍याला अदा करावा.
  1.  विरुध्‍द पक्षाचे कथनानूसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडुन प्‍लॉट नंबर २२ व २३, क्षेञफळ ११५७.१ चौ.मी. मौजा किन्‍ही, पटवारी हलका नंबर ५९, गुंतवणुकीद्वारे नफा मिळण्‍याकरीता विकत घेतला आहे. तक्रारकर्त्‍याला त्‍याचे स्‍वतःचे राहते घर नागपूर शहरामध्‍ये आहे. तक्रारकर्त्‍याने वरील नमुद मालमत्‍ता व्‍यापारी दृष्‍टीकोणातून विकत घेतले आहे त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे तरतुदीनूसार तक्रारकर्ता हा ०४/१०/२००९ ला करारनामा करण्‍यात आला व त्‍यामधील शर्ती व अटी तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्षकार या दोघांना बांधील आहे. सदर करारातील अट क्रमांक १६ बाबतीत असे म्‍हणावयाचे आहे की, विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला सदर लेआऊट मधील अट क्रमांक १६ मध्‍ये नमुद सोयी सुविधा कोणतेही शुल्‍क न आकारता देणार होता.
  2. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याकडुन दिनांक ०४/१०/२००९ ला रुपये २,८०,२३७/-  प्राप्‍त झाले व उर्वरीत रक्‍कम रुपये ७०,०६०/- प्रती महा प्रमाणे १२ हप्‍त्‍यात प्राप्‍त झाले. करारानुसार संपूर्ण रक्‍कम विरुध्‍द पक्षाला प्राप्‍त  झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला विक्रीपञ नोंदणी तक्रारकर्त्‍याचे नावे करुन देण्‍यास तयार होता तसेच विरुध्‍द पक्षकार तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट चा ताबा विक्रीपञ नोंदणीच्‍या वेळेस देणार होता. संपूर्ण रक्‍कम अदा केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विक्रीपञ नोंदणी दस्‍ताऐवज तयार करण्‍यास सांगितले. त्‍यानंतर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडे नोंदणी फी घेऊन आला नाही. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने अनेक वेळा तक्रारकर्त्‍याला दुरध्‍वनी द्वारे प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुण घेण्‍याबाबत कळविले परंतू तक्रारकर्त्‍याकडुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यामुळे प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी होवू शकले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याप्रती कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत सादर केलेले छायाचिञ बोगस आहे व ते विरुध्‍द पक्षकाराचे लेआऊट शी संबंधीत नाही आहे. विरुध्‍द पक्षाने संपूर्ण मोठी कामे पूर्ण केली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये रक्‍कम परत मिळण्‍याची मागणी केली आहे. परंतू ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनूसार तक्रारकर्ता  विरुध्‍द पक्षाकडुन रक्‍कम परत मागू शकत नाही. जर विरुध्‍द पक्षाने सेवेत कोणतेही दोषपूर्ण सेवा दिली नसेल तर विक्री करारातील अट क्रमांक ११ अन्‍वये तक्रारकर्त्‍याने दिवाणी न्‍यायालयात ‘Specific Performance’ करीता दावा दाखल करावयास पाहिजे होता.
  3. तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍याच्‍या तारखेपासून दोन वर्षाच्‍या आत प्रकरण मंचात दाखल करावयास पाहिजे होते. करारनामा दिनांक ०४/१०/२००९ ला करण्‍यात आला. करारानुसार शेवटची हप्‍त्‍याची रक्‍कम मिळाल्‍या  तारखेपासून १२ महिण्‍यांच्‍या आत विक्रीपञ करावयास पाहिजे होते. तक्रारकर्त्‍याने ५ वर्षापर्यंत काहीच हालचाल केली नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक २६/०८/२०१४ ला किंवा त्‍यापूर्वी मंचात तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. त्‍यामुळे सदर मुदतबाह्य तक्रार ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत खारीज करण्‍यात यावी.
  4. उभयपक्षाने दाखल केलेले दस्‍ताऐवज, लेखी जबाब व लेखी युक्‍तीवाद तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नोंदविले आहे.

  अ.क्र.                           मुद्दे                                                         उत्‍तर

I.      तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय

II.     विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

              दिली काय ?                                                                       होय

III.   काय आदेश ?                                                      अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकत्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे कडुन मौजा किन्‍ही, तहसिल हिंगना, जिल्‍हा नागपूर येथील पटवारी हलका नंबर ५९ या लेआऊट मधील प्‍लॉट नंबर २२ व २३, क्षेञफळ ११५७.१ चौ.मी. (१२४५५.०२ चौ.फु.) रुपये ११,२०,९५२/- इतक्‍या रकमेत स्‍वतःचे कुटुंबाकरीता विकत घेण्‍याचा नोटराईज करारनामा रुपये १०० रुपयाचे स्‍टॅम्‍प पेपरवर विरुध्‍द पक्षाशी दिनांक ०४/१०/२००९ रोजी केला. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन रुपये २,८०,२३७/- इतकी रक्‍कम करारनाम्‍याचे दिवशी स्विकारली व उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला अदा केली. त्‍याबाबतच्‍या पावत्‍या अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिद्ध होते. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन वादातील प्‍लॉट विक्रीपोटी संपूर्ण रक्‍कम स्विकारुन करारातील नमुद अट क्रमांक १६ नूसार Landscaping, Natural Water Body Swimming Pool, Entrance Gate, Echo Friendly Road, Chen Link Facing to entire project, Temple, Children play Area, Restaurant & Electricity इत्‍यादी सोय उपलब्‍ध करुन देणार होते परंतू विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला वरील नमुद सोयी उपलब्‍ध करुन दिल्‍या नाही. तसेच प्‍लॉट चे विक्रीपञ करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक १०/१२/२०१६ रोजी कायदेशीर नोटीस बजावून विरुध्‍द पक्षाला प्‍लॉट खरेदीपोटी दिलेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍याबाबत मागणी केली. विरुध्‍द पक्षाने आपले जबाबात नमुद केले आहे की, करारानुसार तक्रारकर्त्‍याला करारातील नमुद अट क्रमांक १६ नूसार सर्व सोयी मोफत पूरवीनार होता परंतू करारातील अट क्रमांक १६ मध्‍ये सोयी मोफत पूरवीणार होता असे नमुद नाही आहे. करारातील अट क्रमांक १६ खालिलप्रमाणे आहे.

(16) THAT the vendor will be provide some features that is Landscaping, Natural Water Body, Swimming Pool, Entrance Gate, Eco Friendly Road, Chain Link, Facing to entire project, Temple, Children’s Play Area, Restaurant & Electricity whereof is hereby acknowledged by the vendor.

      तसेच विरुध्‍द पक्षाने  तक्रारकर्त्‍याला प्‍लॉट चे विक्रीपञ नोंदणी करुन घेण्‍याबाबतचे कुठलाही पुरावा/दिलेले पञ अभिलेखावर दाखल केले नाही आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडुन प्‍लॉट चे विक्रीपोटी तसेच करारातील अटी व शर्तीनूसार एकूण रक्‍कम ११,२०,९५२/- इतकी रक्‍कम स्विकारल्‍यानंतरही खरेदी विक्रीचा व्‍यवहार पूर्ण केला नाही आणि म्‍हणून दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब केल्‍याचे सिद्ध होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता वादातील प्‍लॉट खरेदीपोटी विरुध्‍द पक्षाला दिलेली रक्‍कम रुपये ११,२०,९५२/- व्‍याजासह करारनामा दिनांक ०४/१०/२००९  पासुन घेण्‍यास पाञ आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, त्‍याने तक्रारकर्ता कडुन वादातील प्‍लॉट विक्रीपोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये ११,२०,९५२/- तक्रारकर्त्‍याला त्‍वरीत द्यावी आणि सदरहु रकमेवर करारणामा  दिनांक ०४/१०/२००९ पासुन १० टक्‍के दराने रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरीक  व आर्थिक ञासापोटी रुपये २०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.