Maharashtra

Nanded

CC/09/108

Rajesh Gopinathrao Jadhav - Complainant(s)

Versus

Post Office Pune. - Opp.Party(s)

31 Jul 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/108
1. Rajesh Gopinathrao Jadhav NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Post Office Pune. nandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 31 Jul 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/108
                    प्रकरण दाखल तारीख -   05/05/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    31/07/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती सुजाता पाटणकर              -  सदस्‍या
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
राजेश गोपिनाथराव जाधव,
वय वर्षे 32, व्‍यवसाय वकिली,                            अर्जदार.
रा. येडशी ता.कळमनुरी जि.हिंगोली.
 
      विरुध्‍द.
 
1.   हेड पोस्‍ट मास्‍तर,
हेड पोस्‍ट ऑफिस, नांदेड.                          गैरअर्जदार.
    
2.   हेड पोस्‍ट मास्‍तर,
     हेड ऑफिस, पुणे.
 
अर्जदारा तर्फे वकील        - अड.आर.जी.जाधव.
गैरअर्जदार 1 ते 4         -   अड.बी.एन.शिंदे.
 
निकालपञ
(द्वारा-मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्‍या)
 
                    अर्जदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी की, दि.11/02/2009 च्‍या दैनिक लोकमत व दैनिक सकाळ या वृत्‍तपत्राच्‍या जाहीरातुनसार समाज कल्‍याण संचालनालय व त्‍यांच्‍या अधिनस्‍त कार्यालयातील वीधी अधिकारी गट अ वीधी अधिकारी गट ब वीधी सहायक, जनसंपर्क अधिकारी, उच्‍चश्रेणी लघुलेखक व संगणक ऑपरेटर हे रिक्‍त पदे कंत्राटी पध्‍दतीने भरण्‍यास्‍तव पात्र उमेदवारांकडुन दि.25/02/2009 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत अर्ज मागविण्‍यात आले होते. अर्जदाराने उपरोक्‍त जाहीरातीनुसार समाजकल्‍याण संचालनालय पुणे येथे दि.23/02/2009 रोजी जनसंपर्क अधिकारी या पदाकरीता पोस्‍ट ऑफिस नांदेड मार्फत स्‍पीड पोस्‍ट केले होते. स्‍पीड पोस्‍ट चा क्रमांक एस.पी.पीओडी. ईएम 416480288 इन असा होता, स्‍पीड पोस्‍ट केलेल्‍या डाकुमेंटचे पत्रासह वजन 50 ग्रॅम होते. त्‍या करीता अर्जदाराने स्‍पीड पोस्‍ट ची रक्‍कम म्‍हणुन रु.36/- व टॅक्‍स म्‍हणुन रु.4/- पोस्‍टास दिले आहे. अर्जदाराच्‍या शैक्षणीक गुणपत्रकानुसार अर्जदाराने चांगले गुण प्राप्‍त केले होते म्‍हणुन अर्जदाराची नियुक्‍ती निश्‍चीत होती. अर्जदार हा‍ विमुक्‍त जाती या प्रवर्गातील असुन त्‍याची हलाखीची परिस्‍थीती आहे. अर्जदार अगोदरच एजबार होण्‍याच्‍या मार्गावर असुन पोस्‍ट ऑफिसला काही एक अडचण नसतांना किंवा कोणतीही शासकीय सुटटी नसतांना जाणुन बुजून दुर्लक्षीने/हलगर्जीपणामुळे निष्‍काळजीपणाने सेवा खंडीत केली आहे, त्‍यास पोस्‍ट ऑफिस पुर्णतः जबाबदार आहे आणि अर्जदाराचा फॉर्म समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांनी रिजेक्‍ट केल्‍यामुळे रु.100/- चा बॉण्‍ड व्‍यर्थ गेला. समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांच्‍या क्र.सकस/आस्‍था-1/कंत्राटी पदे/जाहिरात/2009-10/888 या पत्रान्‍वये अर्जदाराचा फॉर्म रिजेक्‍ट करण्‍यात आला असुन समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांचा आवक क्र.2506 याप्रमाणे अर्जदाराचे पत्र (कागदपत्रासह) अर्ज समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांना दि.27/02/2009 रोजी मिळाले असुन पोस्‍ट ऑफिस च्‍या हलगर्जीपणामुळे अर्जदाराचे अर्ज (कागदपत्रासह) मुदत पुर्व समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांना मिळु शकले नाही. त्‍यामुळे अर्जदाराचे जिवन पुर्ण अंधकारमय झालेले आहे. दि.23/02/2009 रोजी अर्जदाराने पाठविलेले अर्ज त्‍यांना वापस दि.20/03/2009 रोजी प्राप्‍त झाले. त्‍यानंतर अर्जदाराने दि.30/03/2009 रोजी सदरील प्रकाराबाबत पोष्‍ट ऑफिस नांदेड यांना वारंवार विनंती करुन सुध्‍दा सदरील प्रकरणाचा खुलासा करण्‍यात आला नाही व कोणतेही उत्‍तर दिले नाही. सदर स्‍पीड पोस्‍ट 48 तासामध्‍ये समाज कल्‍याण संचालनालय पुणे येथे पोहोचविण्‍याची मुदत व सुवीधा असतांना सुध्‍दा सदरील अर्ज मुदतीत पोहचु शकले नाही. अर्जदाराने समाजकल्‍याण संचालनालय पुणे यांच्‍याकडे ज्‍या पदासाठी अर्ज दाखल केला होता ते पद प्रतिष्ठित व मानाचे अर्जदाराचे आयुष्‍य घडवीणारे व आयुष्‍याला कलाटनी देणारे होते. गट अ वगट ब वर्ग 2 चे होते व त्‍या पदावर एकावर्षापर्यंत रु.7,500/- व त्‍यानंतर वर्ग 2 ची श्रेणी लागु झाली असती व त्‍या प्रमाणे रु.8,000/- ते रु.13,000/- या वेतनश्रेंणीवर अर्जदार रुजू झाला असता व अर्जदाराचे मुळ पगार रु.20,000/- दरमहा मिळाले असते. परंतु पोष्‍ट खात्‍याच्‍या हलगर्जीपणामुळे व दिरंगाईमुळे कधीही न भरुन येणारे नुकसान झाले आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा फॉर्म वेळेत न पोहता करुन सेवेत कमतरता केली. त्‍यामुळे अर्जदारास नुकसान भरपाई व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,00,000/- व्‍याजासह गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे.
               गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, अर्जदाराची तक्रार या मंचात चालु शकत नाही. सदरच्‍य घटनेबद्यल त्‍यांना काहीही माहीत नाही. गैरअर्जदार हे पोस्‍टल ऑर्डरची रक्‍कम परत देण्‍यास तयार आहेत. नांदेड हेड पोस्‍ट ऑफिस येथुन दि.23/02/2009 रोजी पाठविण्‍यात आलेले पाकीट पुणे येथे दि.27/02/2009 रोजी मिळाले हे त्‍यांना मान्‍य आहे. त्‍यांच्‍याकडुन कोणताही उशिर झालेला नाही व सेवेत त्रुटी झालेली नाही.   गैरअर्जदार यांनी त्‍यांचे कार्यालयाचे नोटीफिकेशन दि.21/01/1999 दाखल केलेले आहे. त्‍यानुसार गैरअर्जदार हे अर्जदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाही. तसेच दि.30/07/2004 च्‍या पोस्‍ट मंत्रालय यांच्‍या पत्रानुसार ते कोणतेही नुकसान भरपाई देण्‍यास जबाबदार नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
               अर्जदार अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, खालील प्रमाणे मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
1.   अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय?      होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
कमतरता केली आहे काय    ?                         होय.
3.   काय आदेश?                                                अंतीम आदेशा प्रमाणे.
                                कारणे
मुद्या क्र. 1
          अर्जदार यांनी त्‍यांचा जनसंपर्क अधिकारी या पदाकरीता उमेदवारी अर्ज योग्‍य त्‍या सर्व प्रमाणपत्र, गुणपत्रिका व इतर सर्व आवश्‍यक त्‍या कागदपत्रासहीत समाज कल्‍याण संचालनालय पुणे येथे स्‍पीड पोस्‍टने दि.23/02/2009 रोजी पाठ‍वलेला आहे. सदर अर्ज स्‍पीड पोस्‍टने पाठविले बाबतचा पुरावा म्‍हणुन स्‍पीड पोस्‍टची पावती या अर्जाचे कामी अर्जासोबत या मंचामंध्‍ये दाखल केलेले आहे.   अर्जदार यांचा अर्ज शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली स्‍पीड पोस्‍टची पावती याचा विचार होता, अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे.
मुद्या क्र. 2
          अर्जदार यांनी त्‍यांचा उमेदवारी अर्ज दैनिक लोकमत व दैनिक सकाळ या वृत्‍तपत्रातील जाहीरातीनुसार आवश्‍यक त्‍या कागदपत्रासहीत दि.23/02/2009 रोजी नांदेड येथुन पाठवलेला आहे.   सदरचा अर्ज समाज कल्‍याण संचालनालय पुणे येथे जाहीरातीनुसार दि.25/02/2009 सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत पोहचणे आवश्‍यक व गरजेचे असे होते.   परंतु प्रत्‍यक्षात अर्जदार यांनी पाठविलेला त्‍यांचा अर्ज समाज कल्‍याणा संचालनायत पुणे येथे दि.27/02/2009 रोजी प्राप्‍त झालेने अर्जदार यांचा प्रस्‍तुतचा अर्ज समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांनी निर्धारीत मुदतीत न प्राप्‍त झाल्‍याने परत पाठवला आहे. याबाबतचे समाज कल्‍याण संचालनालय पुणे यांचे दि.12/03/2009 चे पत्र अर्जदार यांनी या अर्जासोबत या मंचामध्‍ये दाखल केलेला आहे. त्‍यानंतर अर्जदार यांनी सदरचे त्‍यांचा उमेदवारी अर्ज उशिरा का पोहचला याबाबत गैरअर्जदार यांचेकडुन खुलासा मागविला आहे. सदरच्‍या पत्रास गैरअर्जदार यांनी दि.02/04/2009 रोजी अर्जदार यांना खुलासा कळविलेला आहे. सदर पत्रामध्‍ये गैरअर्जदार यांनी delivered on 27/02/2009 inconvenience cause to you is regretted असे नमुद केलेले आहे.   अर्जदार यांनी सदर अर्जाचे कामी गैरअर्जदार यांचे आरटिकल उशिरा डिलीव्‍हर झाले बाबत डिटेल पत्र दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये आरटिकल किती तारखेला पुण्‍यामध्‍ये डिलीव्‍हर्ड झाले आहे, याबाबत माहीती नमुद केलेली आहे. गैरअर्जदार यांनी defending speed Post related cases in the consumer Forums या संदर्भाचे दि.30/07/2004 चे पत्र दाखल केलेले आहे. सदर पत्रामध्‍ये आरटिकलची डिलीव्‍हरी उशिरा झाली असेल अशा संदर्भात नुकसान भरपाई म्‍हणुन स्‍पीड पोस्‍टची चार्जेस देता येईल असे म्‍हटले आहे. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र व त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, अर्जदार यांनी स्‍पीड पोस्‍टने पाठवलेले आरटिकल निर्धारीत मुदतीत त्‍यांनी पाठवलेल्‍या पत्‍यावर पोहचले नाही. म्‍हणजेच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे, असे या मंचाचे मत आहे.
          गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यासोबत रिव्‍हीजन पीटीशन नं.15/97, राष्‍ट्रीय आयोग यांचे निकालपत्र या अर्जाचे कामी दाखल केलेले आहे. सदर निकालपत्रामध्‍ये पोस्‍टकडुन आरटिकल पोहचण्‍यामध्‍ये उशिर झाला असेल तर त्‍यांना स्‍पीड पोस्‍ट चार्जेस रिफंड करता येतील, असे म्‍हटलेले आहे. 
          अर्जदार यांचा उमेदवारी अर्ज समाज कल्‍याण संचालनाय पुणे येथे पाठविण्‍यासाठी पोस्‍टची रक्‍कम म्‍हणुन रु.36/- व टॅक्‍स रु.4/- असे एकुण रु.40/- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिलेले आहेत त्‍याबाबतची मुळ पावती या मंचामध्‍ये या अर्जासोबत दाखल आहे. गैरअर्जदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल झाल्‍यानंतरही आज अखेर अर्जदार यांना सदरची रक्‍कम दिलेली नाही अगर देणे बाबत कोणतेही प्रयत्‍न केल्‍याचे दिसुन येत नाही. अर्जदार यांना त्‍यांनी गैरअर्जदार यांचे मार्फत पाठवलेला उमेदवारी अर्ज वेळेत पोहचला नाही म्‍हणुन निश्चितच मानसिक त्रास झालेला आहे. त्‍यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडुन मानसिक त्रासापोटी रक्‍कम वसुल होऊन मिळणे पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे.
               अर्जदार यांचा अर्ज , शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्र, गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे व लेखी युक्‍तीवाद, याचा विचार होता, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.
                               आदेश
 
गैरअर्जदार यांनी अर्जदारास आज पासुन 30 दिवसांच्‍या आंत खालील प्रमाणे रक्‍कमा द्याव्‍यात.
1.   स्‍पीड पोस्‍टची रक्‍कम रु.36/- आणि टॅक्‍स रु.4/- अशी एकुण
रु.40/- द्यावेत.
2.   मानसिक त्रासापोटी रु.5,000/- द्यावे.
3.   संबधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते)     
       अध्‍यक्ष                                 सदस्‍या                      सदस्‍य
 
 
गो.प.निलमवार.
लघूलेखक.