Maharashtra

Gondia

CC/07/47

Gajannan Dharmaji Nimgade - Complainant(s)

Versus

Post office, Gondia - Opp.Party(s)

Adv. Mishra

20 Jul 2007

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGAON ROAD, GONDIA
 
Complaint Case No. CC/07/47
 
1. Gajannan Dharmaji Nimgade
Gautam Nagar, Bajpeyee Ward, Gondia, Tah- Gondia
Gondia
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Post office, Gondia
Head Post office, Gondia, (City post office), Behind B.G. W. Hospital, Tah- Gondia
Gondia
Maharastra
2. Post Master,
Post office, Digras,
Yawatmal
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Smt. Potdukhe PRESIDENT
 HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain Member
 HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR MEMBER
 
PRESENT:
MR. A. K. MISHRA, Advocate
 
 
MR. T. T. KATARE, Advocate
 
ORDER

 

 द्वारा- श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा –
 
            तक्रारकर्ता  गजानन धर्माजी निमगडे यांनी दाखल केलेल्‍या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,...........................
  1. त.क.यांनी रुपये 5000/- चे राष्‍ट्रीय बचत प्रमाणपत्र क्रं. 6 एनएससी-19डीडी/628218 दि. 24-03-1007 रोजी वि.प.क्रं. 2 यांच्‍याकडून खरेदी केले. सदर राष्‍ट्रीय बचत प्रमाणपत्र हे हरविले.दि. 30.05.2005 रोजी डुप्‍लीकेट प्रमाणपत्र मिळावे म्‍हणून त.क. यांनी वि.प.यांच्‍याकडे अर्ज दिला. तसेच दिग्रस पोलीस स्‍टेशन येथे तक्रार नोंदविली.
  2. वि.प.क्रं. 2 यांनी डुप्‍लीकेट प्रमाणपत्र न जारी केल्‍यामुळे त.क. यांनी दि. 17.01.2006 रोजी वि.प.यांना त्‍याबाबत दुसरा अर्ज दिला. तसेच या संदर्भात दि. 20.11.06 रोजी परत एक अर्ज देण्‍यात आला.
  3. वि.प.यांनी डुप्‍लीकेट प्रमाणपत्र जारी न करणे ही त्‍यांच्‍या सेवेतील न्‍यूनता आहे. त.क.यांनी मागणी केली आहे की, वि.प.क्रं. 1 व 2 यांनी सदर बचत प्रमाणपत्राची परिपक्‍वता रक्‍कम ही व्‍याजासह 30 दिवसाच्‍या आत देण्‍याचे आदेश व्‍हावेत, मानसिक त्रासाकरिता रुपये 5000/- मिळावेत व ग्राहक तक्रारीचा खर्च हा वि.प.यांच्‍यावर लादण्‍यात यावा.
  4. वि.प.क्रं. 1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी बयाण निशाणी क्रं. 8 वर दाखल केले आहे. वि.प.म्‍हणतात की, त.क. हा ग्राहक या व्‍याख्‍येत बसत नाही. त.क. यांनी दाखल केलेली तक्रार ही मुदतीच्‍या आत नाही. सदर तक्रार ही यवतमाळ मंच येथे दाखल करण्‍यास यावयास पाहिजे होती. त.क. यांनी योग्‍य त्‍यांना सदर प्रकरणात पार्टी बनविलेले नाही.
  5. वि.प.पुढे म्‍हणतात की, त.क.यांच्‍याकडून अर्ज प्राप्‍त झाल्‍यानंतर सब पोस्‍ट मास्‍टर, दिग्रस यांनी डुप्‍लीकेट प्रमाणपत्र जारी करण्‍यासाठी काही कोरे फॉर्म त.क.यांना भरुन देण्‍यासाठी दिले होते. ते त्‍यांनी साडेसात महिने भरुन दिले नाही.तसेच दिग्रस येथे जास्‍त काम असल्‍यामुळे व स्‍टाफ कमी असल्‍यामुळे त.क.यांच्‍या कामास उशीर लागला. त.क. यांनी भरुन दिलेल्‍या फॉर्म मध्‍ये त्रृटी होत्‍या , त्‍यामुळे त्‍यांना डुप्‍लीकेट प्रमाणपत्र जारी करता आले नाही. वि.प.म्‍हणतात की, त.क.यांची तक्रार ही खोटी व बनावट असल्‍यामुळे ती रुपये 10,000/- या खर्चासह खारीज करण्‍यात यावे.
 
      कारणे व निष्‍कर्ष
 
  1. त.क. व वि.प.यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, पुरावा व केलेला युक्तिवाद यावरुन असे निदर्शनास येते की, त.क. यांचे राष्‍ट्रीय बचत प्रमाणपत्र हे सन 2000 मध्‍ये दिग्रस येथे हरविले. त.क. यांनी दिग्रस पोलीस स्‍टेशनला दिलेल्‍या दि. 30.05.05 च्‍या पत्रात तसा उल्‍लेख आहे.
  2. त.क.यांनी डुप्‍लीकेट प्रमाणपत्रासाठी अर्ज हा दि. 30.05.05 रोजी दिला व वि.प.यांच्‍या तर्फे डुप्‍लीकेट प्रमाणपत्र जारी करण्‍यासाठी भरावयाचे फॉर्म सुध्‍दा त.क. यांनी साडेसात महिने भरुन दिलेले नव्‍हते. त.क. यांनी भरुन दिलेल्‍या फॉर्म मध्‍ये चुका होत्‍या. जसे ओळखकर्ता त्‍यांचा पत्‍ता नव्‍हता. तसेच हमी देणा-या  व्‍यक्तिची अन्‍डर टेकिंग नव्‍हती.
  3. वि.प.यांनी त.क.यांना पाठविलेले डुप्‍लीकेट प्रमाणपत्र हे त.क. यांनी दि. 22-06-07 रोजी घेण्‍यास इन्‍कार केला, म्‍हणून परत वि.प.कडे पाठविण्‍यात आले.
  4. त.क.यांचे प्रमाणपत्र हे सन 2000 मध्‍ये हरविले, त्‍यानंतर त्‍यांनी 5 वर्षांनी डुप्‍लीकेट प्रमाणपत्र मिळण्‍याकरिता अर्ज दिला व त्‍यांनतर साडेसात महिने वि.प.यांना संबंधित कागदपत्र भरुन दिलेले नाही. यावरुन ते स्‍वतः सुध्‍दा निष्‍काळजी असल्‍याचे दिसते.
 
तथापि न्‍यायाच्‍या दुष्‍टीने सदर आदेश पारित करण्‍यात येत आहे.
                                                                  आदेश
 
  1. वि.प.यांनी त.क.यांना डुप्‍लीकेट राष्‍ट्रीय बचत प्रमाणपत्र हे पोस्‍टाने पाठवावे व त.क. यांचा परिपक्‍वता रक्‍कम मिळण्‍यासाठीचा अर्ज आल्‍यानंतर ती रक्‍कम त.क. यांना अदा करावी.
  2. मानसिक त्रास व ग्राहक तक्रारीचा खर्च याबद्दल कोणताही आदेश नाही.
  3. आदेशाचे पालन वि.प.यांनी एक महिन्‍याच्‍या आत करावे.
 
 
[HON'ABLE MRS. Smt. Potdukhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Shri. Ajitkumar Jain]
Member
 
[HON'ABLE MRS. MOHINI BHILKAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.