निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 10.11.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 15.11.2010 तक्रार निकाल दिनांकः- 21.03.2011 कालावधी 4 महिने 06 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ प्रेमलता हरीकीशन अग्रवाल अर्जदार वय 60 वर्षे धंदा घरकाम रा.शिवम, ( अड शिरीष वेलणकर ) डॉ.कालेश्वरकर यांचे दवाखान्यासमोर, नवा मोंढा, परभणी. विरुध्द पोस्टमास्तर गैरअर्जदार पोस्ट ऑफीस सेलू ता.सेलू ( स्वतः ) जि.परभणी -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या -------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा सौ. सुजाता जोशी सदस्या. ) अर्जदारानी गैरअर्जदाराकडे गुंतवलेल्या रक्कमेवरी कमी व्याज देवून अर्जदाराला गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिल्याबददल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदाराने 2004 मध्ये गैरअर्जदाराकडे रुपये सहा लाख सहा वर्षासाठी MIS योजनेत गुंतवले त्या रक्कमेवर दरमहा रुपये 4000/- अर्जदार पती पत्नीना त्यांच्या संयुक्त खात्यात मिळतील व कालावधी संपल्यावर मुळ रक्कम अधिक त्यावर 10 % प्रमाणे बोनस मिळेल असे सांगण्यात आले . दिनांक 09.04.2004 रोजी अर्जदार व तिच्या पतीने रुपये 600000/- गुंतवले अर्जदाराच्या पतीचे दिनांक 02.04.2009 रोजी अकस्मिक निधन झाले. त्यानंतर गेरअर्जदाराने कोणतेही कारण न देता दरमहा व्याज देणे बंद केले. त्याबाबत गैरअर्जदाराकडे विचारण केली असता मुदत संपल्यानंतरच आता पैसे मिळतील असे सांगितले. अर्जदारानी सतत पाठपुरावा केल्यानंतर दिनांक 09.10.2010 रोजी रुपये 6,62,000/- चा चेक अर्जदाराला दिला. व्याज व बोनस सहीत रुपये 1,24,000/- द्यावयास हवे असताना रुपये 62,000/- का दिले अशी गैरअर्जदाराना विचारणा केली असता मयताच्या रक्कमेवर व्याज देता येत नाही व नियमाप्रमाणेच सर्व रक्कम दिलेली आहे असे तोंडीच सांगितले. अर्जदाराला गैरअर्जदाराने कमी व्याज देवून त्रूटीची सेवा व मानसिक त्रासाबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे आहे व रुपये 68610/- दिनांक 09.10.2010 पासून द.सा.द.शे. 8 % व्याजाने मिळावेत मानसिक त्रासाबअद्यल रुपये 10,000/- व नोटीसचे रुपये 1500/- आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 3500/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने आपल्या तक्रारीसोबत नि. 2 वर शपथपत्र, पावती, पासबुक, मृत्यू प्रमाणपत्र, चेकची छायाप्रत, गैरअर्जदाराला वकिलामार्फत पाठवलेली नोटीस इत्यादी कागदपत्रे कागदपत्रे दाखल केले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात अर्जदार व तिच्या पतीने एजंटमार्फत रुपये 600000/- संयुक्तीकरित्या गैरअर्जदाराकडे गुंतवणूक केली हे मान्य करुन त्या रक्कमेवर दरमहा रुपये 4000/- व्याज मुदत संपेपर्यत मिळते मात्र संयुक्त खातेदारापैकी एका खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या दिनांकापासून सदरील संयुक्त खाते जिंवत असणा-या खातेदाराच्या नावे वैयकितक खाते म्हणून गणले जाते अशा बाबतीत संबधीत पोस्टमास्तर जिवंत असणा-या खातेदाराला मर्यादेपेक्षा जास्त असणारी रक्कम उचल करण्यास सुचना करतील व त्यानुसार खातेदाराने मर्यादेपेक्षा जास्त असणारी रक्कम उचल करणे आवश्यक आहे . अन्यथा मर्यादेपेक्षा जास्त असणा-या रक्कमेवर कोणत्याही एका खातेदाराच्या मृत्यू झालेल्या दिनांकापासून व्याज मिळत नाही.
अर्जदाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर व्याज रुपये 2000/- त्याना देय नाही व अर्जदाराला रुपये 662000/- दिनांक 09.10.2010 रोजी देण्यात आले व त्यावरील चार महिन्याचे व्याज रुपये 3194/- ही देण्यात आले आहे. त्यामुळे अर्जदाराला गैरअर्जदाराने योग्य तीच रक्कम दिलेली आहे म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराविरुध्द केलेली तक्रार अमान्य करण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र , पोष्ट ऑफीस सेव्हींग बॅकचा रुल 168 (18) विथड्रावल व्हाउचरस व रुल 8,9,9 A ही कागदपत्र दाखल केली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदारांच्या लेखी युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 -
अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिनांक 07.07.2004 रोजी रुपये 600000/- नवीन MIS मध्ये एकत्रीत “ Joint B “ खाते क्रमांक 210809 मध्ये चेकव्दारे गुंतविल्याचे नि.4/1 वरील पावतीवरुन सिध्द होते. चेक रिअलायझेशन नंतर दिनांक 09.07.2004 रोजी अर्जदार व तिच्या पतीच्या खात्यात प्रत्येकी दरमहा रुपये 2000/- व्याज 6810242 व 681043 ( नि. 4/3 व नि.4/4 ) मध्ये जमा करत.
अर्जदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 02.04.2009 रोजी झाला हे नि. 4/5 वरील मृत्यू प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. जुलै 2004 ते मार्च 2009 पर्यंत गैरअर्जदाराने अर्जदार व तिच्या पतीस दरमहा एकूण रुपये 4000/-- व्यवस्थित दिले मात्र अर्जदाराच्या पतीच्या मृत्यूनंतर म्हण्ंजे एप्रील 2009 पासून सोळा महिने अर्जदारास व्याज दिले नाही. गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार Joint B प्रकारच्या New MIS च्या खातेदारापैकी एका खातेदाराचा मृत्यू झाल्यास संबधीत पोस्टमास्तर जिवंत असणा-या खातेदाराला मर्यादेपेक्षा जास्त असणारी रक्कम उचल करण्याची सुचना करतील व त्यानुसार खातेदाराने मर्यादेपेक्षा जास्त असणारी रक्कम उचल करणे आवश्यक आहे. अन्यथा मर्यादेपेक्षा जास्त असणा-या रक्कमेवर कोणत्याही एका खातेदाराच्या मृत्यू झालेल्या दिनांकापासून व्याज मिळत नाही परंतू सदरील तक्रारीत पोस्ट मास्तरांनी रक्कम उचल करण्याची सुचना खातेदाराला दिली होती असा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही तसेच अर्जदाराच्या खात्यावर सुध्दा 16 महिने व्याज जमा केलेले दिसत नाही कारण दिनांक 09.10.2010 रोजी अर्जदारास डिपॉझीट रुपये 600000/- अधिक 16 महिन्याचे व्याज रुपये 32000/- व बोनस रुपये 30,000/- दिले आहेत हे नि. 10/2 वरील विथड्रॉवल फॉर्म वरुन सिध्द होते. अर्जदाराच्या पतीच्या नावावरील रुपये 300000/- उचलून घेण्याची सुचनाही दिली नाही व त्यावर व्याज देणेही गैरअर्जदाराने बंद करुन व अंतिम रक्कम देताना त्या रक्कमेवर बोनस न देवून गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते तसेच गैरअज्रदारानी दाखल केलेल्या नि. 10/4 वरील Monthly income Account Rules 1987 नुसार “ The deposit made at the time of opening of account shall be paid by the post Office at which the account stands to depositor on or after expiry of 6 years from the date of the opening of the account along with bonus equal to 10 % of the amount deposited “ असे म्हटलेले आहे म्हणजे 13 फेबृवारी 2006 पूर्वी ठेवलेली रक्कम तिची मुदत संपल्यानंतर 10 % बोनस मिळण्यास पात्र आहे असे स्पष्ट म्हटले आहे. अर्जदाराने तिचे व तिच्या पतीचे असे एकूण रुपये 600000/- संपूर्ण 6 वर्षे गैरअर्जदाराकडे New MIS मध्ये ठेवलेले आहेत त्यापैकी रुपये 3000002- वरच तिला बोनस मिळालेला आहे उर्वरीत रुपये 300000/- वर ही बोनस मिळणेस ती पात्र आहे असे आम्हास वाटते म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत रक्कमेवरील 16 महिन्याचे व्याज रुपये 32000/- बोनसची रक्कम रुपये 30,000/- व तसेच 16 महिने दरनमहा न दिलेल्या रुपये 4000/- व्याजाच्या रक्कमेवरी आवर्ती ठेव खात्याच्या नियमानुसार व्याज रुपये 3200/- असे एकूण रुपये 65200/- ( रुपये पासष्ट हजार दोनशे फक्त ) दयावेत रुपये 65200/- हया रक्कमेवर दिनांक 09.10.2010 पासून संपूर्ण रक्कम देय होइपर्यत द.सा.द.शे 9 % दराने व्याज गैरअर्जदाराने दयावे. 3 गैरअर्जदाराने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रुपये 3000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2000/- आदेश मुदतीत दयावे. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |