- निकाल पञ -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 22 डिसेंबर 2015)
अर्जदार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने पाल्य रुचिरा पेटकर हिचे ग्रामीण डाक जिवन विमा क्र.R-MH-NR-Child-EA 632012 ची काढली होती. गैरअर्जदार क्र.1 ने दि.21.9.2007 चे पॉलिसी प्रपञासह अर्जदार क्र.2 चे मासीक हप्ता पावती बुक देवून, डाक जिवन विमा पॉलिसी हप्ता कपात सुरु करण्यास सांगीतले. परंतु, पॉलिसी पावती बुक पडताळणी केली असता मासीक कपात व इतर ञुट्या लक्षात आल्यामुळे सदर प्रस्ताव आवश्यक सुचनेसह दि.12.10.2007 ला गैरअर्जदार क्र.1 चे मार्फतीने गैरअर्जदार क्र.2 कडे परत करण्यात आले. गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 चे मार्फतीने पावती बुक दि.30.11.2007 ला दुरुस्त्यासह विवरणपञ दि.21.9.2007 चे कु.रुचिरा भारत पेटकर पाल्यांचे डाकजिवन विमा पावती बुक व विवरणपञ प्राप्त झाले. पॉलिसीची रक्कम रुपये 50,000/- असून विवरण पञातील अनु.क्र.5 नुसार विमा तात्काळ पाठविण्यात येईल असे नमूद असल्याने मासीक हप्ता पावती बुक नुसार अर्जदार क्र.2 चे रुपये 504/- प्रमाणे दरमहा पोष्ट ऑफीस घोट येथे अर्जदार क्र.1 व्दारा स्वहस्ते भरणा करण्यात येवून, ग्रामीण डाक जिवन विमा पॉलिसीचे मुळ दस्ताऐवज मिळण्याबाबत दि.12.5.2012 ला गैरअर्जदार क्र.1 चे मार्फतीने प्रवर डाक अधिक्षक, चांदा विभाग, चंद्रपूर यांना विनंती अर्ज सादर केला. परंतु, कार्यवाही झाली नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.2 चे कार्यालयात प्रत्यक्ष वारंवार भेट दिली, परंतु कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे अर्जदारास ञास सहन करावा लागला. अर्जदारास पॉलिसी क्र.R-MH-NR-Child-EA 632012 चे ग्रामीण डाकजीवन विमा पॉलिसीचे मुळविमा रक्कम रुपये 50,000/- असून माहे जुलै पर्यंत एकूण रुपये 52,416/- प्रत्यक्ष भरण्यात आलेली आहे. परंतु, मळ दस्ताऐवज अजुनही प्राप्त झाले नाही, तरी मिळण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास प्रवास खर्च, मानसिक व शारिरीक ञासापोटी एकूण रुपये 40,000/- मिळण्याची कृपा व्हावा, तसेच प्रकरणाचा खर्च रुपये 5000/- मिळण्यात यावी अशी प्रार्थना केली आहे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 10 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नि.क्र.8 नुसार लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्या त्यांचे लेखी उत्तरातील विशेष कथनात असे नमूद केले आहे की, सदरहू विमा पॉलिसी जारी करण्याचे अधिकार हे पोस्ट मास्तर जनरल नागपूर या कार्यालयाकडून देण्यात येते. सदर पॉलिसी क्र.आरएमएच-एनआर-ईए-चाईल्ड-632012 उशिरा मिळण्याचे कारण गैरअर्जदाराचे विभागात मॅक केमीस नविन सॉप्टवेअर आल्याने सगळे पॉलिसींचे फिडींग करण्याचे काम सुरु होते व माहिती अद्यायावत करुन सदर सॉप्टवेअर मध्ये मायग्रेशन करायचे असल्याने पॉलिसी मिळण्यास उशिर झाला. झालेला उशिर हा तांञिक कारणाने झालेला आहे व त्याबाबत अर्जदारांना वारंवार सांगीतले आहे. अर्जदारास तक्रार निवारण न्यायमंचात जाण्यास कोणतेही कारण घडलेली नाही. सदर पॉलिसीची परिपक्वता ही दि.4.11.2016 असून अर्जदारांना कोणताही विशेष ञास घेण्याची गरज नव्हती. अर्जदाराच्या मुलांच्या नावे असलेली पॉलिसी ही तीचे मुळ दस्ताऐवज न प्राप्त होता सुध्दा अर्जदारांना परिपक्वता रक्कम व फायदा देण्यात आला. त्यामुळे अर्जदाराला मानसिक व शारीरिक ञासापोटी नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उरत नाही.
4. अर्जदाराने नि.क्र.9 नुसार शपथपञ तसेच नि.क्र.15 नुसार तक्रार व शपथपञाचा भाग हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदारांनी नि.क्र.13 नुसार शपथपञ तसेच नि.क्र.16 नुसार दाखल केलेले उत्तर व शपथपञ हाच लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसीस दाखल केली. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ व दाखल पुरसीस वरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्रामीण डाक जिवन विमा पॉलिसी हप्ते भरुन घेतली ही बाब दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्रामीण डाक जिवन विमा पॉलिसी हप्ते भरुन घेतली होती, तसेच गैरअर्जदारांनी सुध्दा याबाबत कुठलाही वाद निर्माण केलेला नाही, परंतु गैरअर्जदारांनी सदर पॉलिसीचे मुळ दस्ताऐवज अर्जदाराव्दारे वारंवार मागणी करुन सुध्दा गैरअर्जदारांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्यामुळे अर्जदारास नाहक मानसिक ञास सहन करावा लागला व सदर दस्ताऐवजासाठी ग्राहक न्यायमंचात दाद मागण्यासाठी यावे लागले.
7. अर्जदाराने गैरअर्जदाराकाडून पाल्य रुचिरा पेटकर हिचे ग्रामीण डाक जिवन विमा क्र.RMH-NR-Child-EA 632012 ची काढली होती. सदर पॉलिसीचे मुळ दस्ताऐवजासाठी अर्जदाराने वारंवार गैरअर्जदारांना भेटून व पञव्यवहार करुन सुध्दा गैरअर्जदारांनी कुठलिही कार्यवाही केलेली नाही, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन सिध्द होते. तसेच गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या आपल्या लेखीउत्तरातील विशेष कथनात मान्य केलेले आहे की, सदर पॉलिसी मुळ दस्ताऐवज देण्यामध्ये कार्यालयातील तांञिक कारणाने उशिर झालेला आहे.
8. गैरअर्जदारांनी अर्जदाराव्दारे ग्राहक न्यायमंचात दाद मागीतल्यानंतर सदर अर्जदाराचे तक्रारीतील पॉलिसीचे मुळ दस्ताऐवज अर्जदारास परत केलेले आहे. यावरुन असे सिध्द होते की, जर अर्जदार न्यामंचात दाद मागण्यासाठी आले नसते तर कदाचीत गैरअर्जदारांनी आजपावेतो अर्जदारास पॉलिसीचे मुळ दस्ताऐवज परत केले नसते.
9. वरील विवेचनावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदारांनी अर्जदारास त्यांचे कार्यालयातील तांञिक अडचणीचे कारण पुढे करुन अर्जदारास नाहक ञास दिलेला आहे व ही बाब गैरअर्जदाराचे न्युनतापूर्ण सेवासाठी कारणीभुत आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास वेळेवर/मागणी करुन सुध्दा पॉलिसीचे मुळ दस्ताऐवज न देवून अर्जदारास मानसिक व शारिरीक ञास दिलेला आहे. सबब गैरअर्जदारांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली असल्याचे सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
10. मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी प्रत्येकी रुपये 2000/- असे एकूण रुपये 4000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रुपये 1000/- असे एकूण रुपये 2000/- अर्जदारास आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 22/12/2015