जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –168/2010 तक्रार दाखल तारीख –06/12/2010
गोपीनाथ पि.विनायक तिडके
वय 26 वर्षे,धंदा शिक्षण .तक्रारदार
रा.भोगलवाडी ता.धारुर जि.बीड
विरुध्द
1. पोस्ट मास्तर,
पोस्ट ऑफिस, धारुर ता.धारुर जि.बीड ..सामनेवाला
2. अध्यक्ष निवड समिती तथा सह संचालक,
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, 694/1, प्लॉट नं.2,
सहकार भवन, आदर्श नगर, पुणे-सातारा रोड, पुणे- 411037.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एन.एम.कुलकर्णी
सामनेवाले क्र. 1 तर्फे :- अँड.आर.जी. जंनजिरे
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- कोणीही हजर
निकालपत्र
( श्री.अजय भोसरेकर, सदस्य )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा भोगलवाडी ता.धारुर येथील रहीवासी असून तक्रारदार हा दि.07.02.2010 रोजी सामनेवाला क्र.2 यांचेकडे टंकलेखक या परिक्षेमध्ये अर्हता प्राप्त ठरला होता. त्यानुसार तक्रारदारास सामनेवाला क्र.2 कडून मुलाखतीसाठी पत्र पाठविले गेले होते. ते सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत असे म्हटले आहे. सदर मुलाखतीची दि.05.03.2010 रोजी सकाळी 11 वाजता सामनेवाला क्र.2 यांचे कार्यालयामध्ये ठरली होती. परंतु तक्रारदारास सदर पाकीट हे मुलाखतीच्या मुदतीनंतर प्राप्त झाले त्यामुळे तक्रारदाराचे कधीही भरुन न येणारे नूकसान झाले आहे असे म्हटले आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 व 2 यांना चौकशीसाठी दि.07.03.2010 रोजी पत्र पाठवीले होते. त्यानुसार त्यांचे उत्तर प्राप्त झाले होते व त्यात त्यांनी सामनेवाला क्र.1 यांनी लेखी उत्तर दि.24.2.2010 रोजी रजिस्ट्रर पत्र नंबर 2337 हे सामनेवाला क्र.2 यांना पूणे येथील सामनेवाला क्र.1 यांचे कार्यालयात बूकींग केल्याचे म्हटले आहे परंतु सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे पत्र दि.5.3.2010 रोजी तक्रारदारास सदर पत्र दिल्याचे म्हटले आहे व सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दिलेल्या उत्तरात दि.4.3.2010 रोजी तक्रारदारास मिळाल्याचे म्हटले आहे व त्यासोबत त्यांनी परत पावतीची सत्यप्रत जोडली आहे. त्या सत्यप्रति वरील सही तक्रारदाराने नाकारलेली आहे. म्हणून तक्रारदाराने सामनेवाला यांचे विरोधात दि.6.8.2010 रोजी कायदेशीर नोटीस पाठवून रु.2,00,000/- ची मागणी व त्यावर 18 टक्के व्याज मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपल्या म्हणण्याचे पूष्टयर्थ एकूण 10 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारास दि.4.3.2010 रोजी ते 5.3.2010 या दरम्यानचे कालावधीत पाकीट पोहच केल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारचा सेवेत कसूर केलेला नाही म्हणून आमचे विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करावी अशी मागणी केली आहे.
सामनेवाला क्र.2 यांना मंचाची नोटीस पाठवली परंतु त्यांची पोहच अप्राप्त असल्यामुळे तक्रारदाराने त्यांचे विरोधात कोणतीही योग्य ती कारवाई केली नाही त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांची गैरहजेरी या प्रकरणात दिसून येते.
तक्रारदाराची तक्रार व सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे आणि तोंडी यूक्तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन व तक्रारदारास पुर्वी दिलेल्या उत्तरावरुन कोणतीही एकवाक्यता दिसून येत नाही. तक्रारदाराच्या मूलाखतीच्या दिनांकाच्या दिवशी तक्रारदारास पत्र देऊन सेवेत कसूर केला आहे हे दिसून येते.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशत मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारास रक्कम रु.10,000/- (अक्षरी रु.दहा हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,आदेश क्र.2 चे पालन मूदतीत न केल्यास दि.06.08.2010 पासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज तक्रारदाराच्या पदरीपडेपर्यत देण्यास सामनेवाले क्र.1 हे जबाबदार राहतील.
4. सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्यात येतो की,,मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तिन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- (अक्षरी रु.दोन हजार फक्त) आदेश प्राप्तीपासून 30 दिवसांचे आंत तक्रारदारास दयावेत.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड