1. तक्रारदार हे आदिवाशी समाजाचे असुन त्यांचे जिवन चरितार्थ मोल मजुरी करुन चालते. त्यांनी हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालील प्रमाणेः-
तक्रारदाराची मुलगी कु.शुभांगी हि सोलापुर (महाराष्ट्र) येथे वैद्यकिय शिक्षण घेत आहे. तिच्या अत्यंत तातडीच्या शैक्षणिक कामाच्या निमित्ताने पैश्याची आवश्यकता असल्यामुळे तक्रारदाराने दि. 12/12/2008 रोजी EMO रु.1000/- पाठविली व त्याप्रित्यर्थ विरुध्द पक्षकाराने रु.50/- कमिशन चार्ज घेतला. परंतु तक्रारदाराच्या मुलीस पोष्ट ऑफीसच्या नियमाप्रमाणे वरील मनिऑर्डर 6 दिवसाचे आत तांत्रीक बिघाड झाल्यामुळे मिळाली नाही. ती मनिऑर्डर दि.19/12/2008 रोजी तब्बल 9 व्या दिवशी मिळाल्याळे तक्रारदार व त्यांच्या वैद्येकिय शिक्षण घेणा-या मुलीला
.. 2 ..
मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास झाले. वरील गोष्टींची तक्रार दि.16/12/2008 रोजी मे.चिफ पोष्ट मास्तर जनरल पोष्ट ऑफिस, मुबई येथे केली व त्या तक्रारीची प्रत पोष्ट मास्तर ठाणे मुख्य कार्यालय, ठाणे यांना दिली. परंतु विरुध्द पक्षकाराने तक्रारीची कोणतीहि दखल न घेता उडवा उडवीची उत्तरे देऊन तक्रारदाराचा व त्यांच्या मुलीचा मनस्ताप जास्तच वाढविला. त्यामुळे दुःखी होऊन तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल कली. तक्रार ही ठाणे मंचाचे कार्यक्षेत्राचे सिमेत आहे व 2 वर्षाचे कालावधी चे आत आहे व या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा अधिकार आहे असे कथन केले. तक्रारदाराची प्रार्थना खालील प्रमाणेः-
1.EMO ची रक्कम रु.1,000/- रु.50/- कमिशन चार्ज एकुण रु.1050/- परत करणे.
2.मानसिक नुकसानीपोटी रु.7,000/- द्यावे.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटीस विरुध्द पक्षकारास निशाणी 4 वर विरुध्द पक्षकारास पाठविली. तक्रारदाराने निशाणी 5 वर लेखी युक्तीवाद दाखल केले. विरुध्द पक्षकाराने अनुक्रमणिका निशाणी 6 वर व लेखी जबाब निशाणी 7 वर व लेखी युक्तीवाद निशाणी 8 वर दाखल केला.
विरुध्द पक्षकाराने त्यांचे लेखी जबाब व लेखी युक्तीवादातील कथन खालील प्रमाणेः-
तक्रार खोटी, खोडसाळ व तापदायक आहे. तक्रारदाराने दि.12/12/2008 रोजी 11.29 वाजता मनिऑर्डर केली हे मान्य. परंतु मशिनमध्ये Technical fault was logged in Error log files in the EMO या कारणासाठी म्हणजे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे EMO 17/12/2008 रोजी मिळाल्यास पाहिजे होती परंतु दिनांक 14/12/2008 रोजी रविवार असल्यामुळे सुट्टी असल्याने व दि.18/12/2008 रोजी त्यांचे पत्र क्र.SOM/ CDRF/585/09 दि.20/01/2009 नुसार सोलापुर पोष्ट ऑफिसच्या साईटवर दि.17/12/2008 व 18/12/2008 रोजी 16.00 वाजेपर्यंत EMO दाखविण्यातच आली नाही. त्यामुळे दिनांक 18/12/2008 रोजी 16.00 वाजता EMO पाठविण्यात आली. परंतु ज्या व्यक्तिला EMO पाठविण्याची होती ति मिळुन आली नाही. त्यामुळे दिनांक 19/12/2008 रोजी EMO आवेदकास मिळाली. त्यामध्ये विरुध्द पक्षकाराची कोणतीच चुक किंवा बेजबाबदारपणा नव्हता म्हणुन तक्रारदाराची तक्रार रद्द ठरवावी.
.. 3 ..
3. सदर तक्रारीसंबंधी तक्रारदाराने खालील कागदपत्रे दाखल केली. उदाः EMO ची पावती मुख्य पोष्ट मास्तर मुंबई, पोष्ट मास्तर ठाणे याना दाखल केलेली तक्रार, जातीचा दाखला व लेखी युक्तीवाद तसेच विरुध्द पक्षकाराने लेखी जबाब, लेखी युक्तीवाद पोष्ट मास्तर ठाणे कडुन मिळालेला अहवाल सोलापुर डिव्हिजनकडुन मिळालेला अहवाल गॅझेट नोटिफिकेशन व इंडियन पोष्ट ऑफिसचे कलम 48(C) चे स्पष्टिकरण व डिलिव्हरी नॉर्मस इत्यादी.
वरील सर्व कागदपत्रांची सुक्ष्मरितीने अवलोकन व पडताळणी केली. त्यानुसार न्यायिक प्रकियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो येणेप्रमाणेः-
अ)विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी, न्यनता, बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – होय.
कारण मिमांसा
अ)स्पष्िटकरणाचा मुद्दाः- तक्रारदाराची मुलगी सोलापुर येथे वैद्यकिय शिक्षण घेत आहे. तिच्या वैद्यकिय शैक्षणिक गरजेपोटी पैश्याची तातडीने आवश्यकता असल्यामुळे तक्रारदाराने दि.12/12/2008 रोजी मुख्य पोष्ट ऑफिस ठाणे येथुन EMO PNR No.069436081212000004 नुसार रु.1,000/- पाठविले. त्या प्रित्यर्थ रु.50/- कमिशन चार्ज दिला. परंतु त्यांचे मुलीला नियमाप्रमाणे 5 ते 6 दिवसात पैसे न मिळाल्यामुळे व तेथे गरज भागविण्यासाठी कुणिही जवळचे नातेवाईक नसल्यामुळे व ठाणे व सोलापुर अंदाजे 500 किलो मिटरचे अंतर असल्यामुळे तिची आर्थिक गरज न भागल्यामुळे तिला किती मानसिक, शारिरीक, शैक्षणिक व आर्थिक त्रास झाला असेल याची कल्पनाही करवत नाही. तसेच पालक या नात्याने तक्रारदाराला किती मानसिक त्रास झाला असेल त्यांचे कोणतेही मोजमाप करता येत नाही. तक्रारदाराने मुख्य पोष्ट मास्तर जनरल पोष्ट ऑफिस मुंबई येथे दि.16/12/2006 रोजी तक्रार केली. व त्याची प्रत पोष्ट मास्तर ठाणे येथे दिली. तक्रारदार EMO बद्दल चौकशी करण्याकरिता गेले असता कोणतीहि सांत्वनात्मकपणे उत्तर न देता उडवा उडवीची उत्तरे देणे म्हणणे उघड उघड सेवेमध्ये त्रृटी, न्युनता बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा करणे होय.
विरुध्द पक्षकाराने खालील प्रमाणे लेखी जबाबात व लेखी युक्तीवाद दिले आहेः-
इंडियन पोष्ट ऑफिस नियम 1933 प्रमाणे मनिऑर्डर रु. 5,000/- च्या आतिल रकमेची असल्यामुळे व्यवहारिक दृष्टया तिला EMOम्हणत नाहित तर साधी मनिऑर्डर म्हणतात.
.. 4 ..
इंडियन पोष्ट ऑफिस अक्ट 1898 द्वारा कलम 48(C) नुसार अपघाती दुर्लक्ष, चुक किंवा गहाळ झाल्यास कोणत्याही सरकारी अधिका-यास जबाबदार धरता येणार नाही. तसेच नॉर्मस फॉर ट्रान्समिशन अन्ड डिलिव्हरी ऑफ मेलच्या तकत्यानुसारRegistered Mail & MO 1 2 दिवस जास्त अंतर आणि Points of handlings वर अवलंबुन आहे. साधारणपणे मनिऑर्डर 6 दिवसाचे आत मिळावयास पाहिजे परंतु EMOज्या व्यक्तिस मिळावयास पाहिजे होती ति 7 व्या दिवशी मिळुन आली नाही व 8 व्या दिवशी EMO मिळाली. त्यामध्ये विरुध्द पक्षकाराने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले व हलगर्जीपणा केला. कारण त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे TECHNICAL FAULT WAS LOGGED IN ERROR LOG FILES IN THE EMO. अशा प्रकारे तक्रारदाराच्या EMO उशिराने मिळाल्याने त्यांचे मानसिक, शारिरीक व आर्थिक नुकसान तर झालेच आहे त्याच बरोबर शैक्षणिक नुकसानही झाले आहे. त्याची नुकसान भरपाई करणे विरुध्द पक्षकाराचे कायदेशिर व नैसर्गिक न्यायाचे दृष्टिकोनातूनही कर्तव्य आहे. तक्रारदाराच्या मुलीस उशिराने का हाईना EMO रक्कम रु.1,000/-प्राप्त झाली आहे. त्यासंबंधी कोणतेही आदेश पारीत करण्यात येत नाही. तथापी मानसिक नुकसानीपोटी रु.1,000/-व न्यायिक खर्च रु.500/- तक्रारदारास देण्यास कोणतीही अडचण भासत नाही. त्याप्रित्यर्थ हे मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 584/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
2.मानसिक नुकसानीपोटी विरुध्द पक्षकाराने तक्रारदारस रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) द्यावे.
3.विरुध्द पक्षकाराने तक्रारदारास न्यायिक खर्च रु.500/-(रु. पाचशे फक्त) द्यावा.
4.वरील आदेशाची तामिली सहि शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी (Direct payment) अन्यथा अन्य दंडात्मक आदेश पारीत करण्याचे अधिकार या मंचास आहेत.
.. 5 ..
5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
6.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.