तक्रारदार यांचे प्रतिनीधी श्री. अलोक सिंग हजर.
आदेशः-एम.वाय.मानकर अध्यक्ष द्वारा,
तक्रारदारांच्या प्रतिनीधींना तक्रार दाखलकामी ऐकण्यात आले.
तक्रार व त्यासोबतची दाखल करण्यात आलेली कागदपत्रे पाहण्यात आली.
तक्रारदार यांनी वाहन खरेदी करीता आय.सी.आय.सी.आय बँक कडून अंदाजे रू. 85,00,000/-,चे कर्ज घेतले होते. सदरहू वाहनामध्ये दोष निर्माण झाल्यामूळे तक्रारदार यांनी सा.वाले यांच्याकडे वेळोवेळी तक्रार केली व योग्य प्रतिसाद न मिळाल्यामूळे व समाधान न मिळाल्यामूळे ही तक्रार दाखल करून वाहनातील दोष दुरूस्त करून मिळण्याबाबत व रू. 6,72,404/-, नुकसान भरपाई मिळण्याकरीता मागणी केली. सदरहू वाहनाची किंमत ती रू. 20,00,000/-,पेक्षा जास्त आहे. सबब, ग्रा.सं.कायदयाच्या कलम 11 प्रमाणे ही तक्रार या मंचात चालु शकत नाही. त्याकरीता आम्ही मा. राष्ट्रीय आयोगानी प्रथम अपील क्र 1194/2016 संतोष आर्या विरूध्द इमार एम.जी.एफ लॅण्ड लि. निकाल तारीख 07/10/2016 चा आधार घेत आहोत. सबब खालील आदेश.
आदेश
1 तक्रार क्र 523/2016 ही पिक्युनरी अधिकार क्षेत्राअभावी तक्रारदार यांना परत करण्यात येते.
2. तक्रारदारानी लिमीटेशनच्या तरतुदींच्या अधीन राहून योग्य त्या मा.आयोगात/न्यायालयात तक्रार दाखल करावी.
3. खर्चाबाबत आदेश नाही.
4. आदेशाची प्रत उभयपक्षांना विनामुल्य पाठविण्यात यावे.
5. अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
npk/-