निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 1658/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः – 15/12/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 03.02.2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/10/2009
मनोहर हरी फीरके,
उ.व.65 वर्षे, धंदाः सेवानिवृत्त,
रा.गणपती नगर, जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. पुर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, शिरसोली,जळगाव.
तर्फे चेअरमन श्री.सत्यशील अविनाश अकोले,
रा. 69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड,जळगांव.
2. श्री.गुणेश विष्णुपंत पारनेरकर (संचालक)
रा.पारनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर.
3. श्री.जगतरावआप्पा बारकु पाटील (उपाध्यक्ष)
रा.शिरसोली प्र.बो.ता.जि.जळगांव.
4. डॉ.अशोक गणपती रावेरकर (सचिव)
रा.वाघुळदे नगर, ता.जि.जळगांव.
5. श्री.शाम अविनाश अकोले (संचालक)
रा.संभाजी चौक, सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
6. श्री.नामदेव पांडूरंग कोळी (संचालक)
रा.कांचननगर, ता.जि.जळगांव.
7. श्री.प्रदीप रावसाहेब पाटील (संचालक)
रा.शिरसोली प्र.बो.ता.जि.जळगांव.
8. सौ.विजया अशोक रावेरकर (संचालिका)
रा.वाघुळदे नगर, ता.जि.जळगांव.
9. श्री.स्वरुपकुमार भागचंद लुंकड (संचालक)
रा.प्रोप्रा.धनलक्ष्मी ज्वेलर्स, सुभाष चौक, जळगाव.
10. श्री.राजेश प्रभाकर रडे (संचालक)
11. सौ.उषा यशवंत चौधरी (संचालिका)
12. श्री.मुरलीधर केशव ढेंगळे (संचालक)
13. श्री.शिरिषकुमार जयवंतराव भामरे (संचालक)
14. श्री.राजेश बाबुराव डोळे (संचालक)
15. श्री.अविनाश शंशिकांत कुलकर्णी (संचालक)
16. श्री.रविंद्र प्रभाकर सोनार (संचालक)
17. श्री.मनोहर मधुकर बारी (संचालक)
18. कल्पना शेखर लंके (व्यवस्थापक)
सामनेवाला क्र. 1 ते 18 यांना पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था
मर्यादीत शिरसोली, जळगांव.
रा.69-72, युनिटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव,
ता.जि.जळगांव या पत्यावर नोटीस काढण्यात यावी. ........ सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 07/10/2009)
(निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.अयाज एम.खान वकील हजर
सामनेवाला क्रं.1,4 व 18 तर्फे श्री.लक्ष्मण व्ही.वाणी वकील हजर.
सामनेवाला क्रं.3 व 11 तर्फे श्री.मोहन एस.पाटील वकील हजर.
सामनेवाला क्र.2,5 ते 9,10,12,13,14,15,16,17 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | जे 13603 | 10/12/2007 | 73,025/- | 10/01/2008 |
2 | जे 13605 | 10/12/2007 | 73,025/- | 10/12/2007 |
3 | जे 13606 | 10/12/2007 | 73,026/- | 10/01/2008 |
4 | जे 13616 | 11/12/2007 | 58,047/- | 10/01/2008 |
5 | जे 25758 | 28/12/2007 | 20,000/- | 08/01/2008 |
6 | जे 25771 | 28/12/2007 | 75,288/- | 10/01/2008 |
7 | जे 25772 | 28/12/2007 | 75,288/- | 10/01/2008 |
8 | जे 25773 | 28/12/2007 | 75,288/- | 10/01/2008 |
9 | जे 25774 | 28/12/2007 | 75,288/- | 10/01/2008 |
10 | जे 25775 | 28/12/2007 | 75,288/- | 10/01/2008 |
11 | जे 20910 | 05/03/2007 | 23,100/- | 05/04/2008 |
12 | जे 21033 | 08/03/2007 | 29,443/- | 25/02/2008 |
13 | जे 21034 | 08/03/2007 | 27,474/- | 06/04/2008 |
14 | जे 21035 | 08/03/2007 | 27,474/- | 06/04/2008 |
15 | जे 21036 | 08/03/2007 | 28,726/- | 08/04/2008 |
16 | जे 21103 | 12/03/2007 | 53,247/- | 10/04/2008 |
17 | जे 21295 | 19/03/2007 | 6,500/- | 19/04/2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्र. 2,5 ते 9,10,12,13,14,15,16,17 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला.
3. सामनेवाला क्रमांक 3 व 11 हे वकीलामार्फत हजर होऊन लेखी
म्हणणे सादर केलेले असुन तक्रारदाराचे तक्रारीतील सर्वर कथने बेकायदेशीर व खोटी असल्याने नाकारलेली आहेत. सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी सामनेवाला क्र. 1 पतसंस्थेचा राजीनामा दिलेला असुन तो पतसंस्थेने मंजुर केलेला असल्याचे कथन केलेले आहे तसेच सामनेवाला क्र. 3 व 11 हे पतसंस्थेचे रजिस्ट्रेशन झाल्यापासुन एकाही मिटींगला हजर नव्हते व त्यांनी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. सहकार कायदयातील तरतुदीनुसार सामनेवाला क्र. 3 व 11 यांचेकडुन कोणतेही बंधपत्र तयार करुन घेण्यात आलेले नाही. सामनेवाला क्र. 3 व 11 यांना संचालक या पदावरुन वगळण्यात आलेले असल्याने सामनेवाला हे कोणतीही रक्कम देण्यास जबाबदार नाहीत सबब तक्रारीतुन सामनेवाला क्रमांक 3 व 11 यांना वगळण्यात यावे व तक्रारदाराची तक्रार रद्य करुन केसकामी आलेला खर्च तक्रारदाराकडुन मिळावा अशी विनंती सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी केली आहे.
4. सामनेवाला कं.1,4 व 18 यांनी आपल्या खुलाश्यात तक्रारदार यांनी ठेवलेल्या ठेवीबाबत कबूल केलेले आहे परंतु तक्रारदार यांनी केलेले इतर कथन फेटाळलेले आहे. सामनेवाला यांनी आपल्या खुलाश्यात पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांनी तक्रार करण्याअगोदर सहा. निबंधक यांचेकडे अर्ज करावयास हवा होता तसेच सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस द्यावयास पाहीजे होती तसे तक्रारदार यांनी केलेले नाही. म्हणून तक्रारी कारण घडलेले नाही. तसेच सोसायटी संबंधी कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित झाल्यास सहकार न्यायालयाला सदर वाद चालवीणेचा अधिकार आहे,ग्राहक न्यायालयास याबाबतीत अधिकार नाही त्यामुळेही सदरील तक्रार रद्य होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार हा त्यांचा ग्राहक नाही.
सामनेवाला पतसंस्थेने एकूण ठेवीच्या रक्कमेची कर्ज वाटप केलेली आहे. सदर कर्ज वसूल झालेवर पतसंस्था ठेवीदारांची रक्कम देण्यास आजही तयार आहे. सहकारी पतसंस्थाची परिस्थिती अफवांमुळे गंभीर झालेली आहे. ठेवीदारांनी एकत्र संपूर्ण ठेवींच्या रक्कमेंची मागणी केल्यामुळे आज तरी सदरील रक्कम देता येत नाही. सबब सामनेवाला यांनी त्यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती त्यांनी आपल्या खुलाश्यात केलेली आहे.
5. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे तसेच तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
6. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी
तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. म्हणून तक्रारदार ठेवीची रक्कम व्यावरील व्याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत.
सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी संचालक पदाचे राजीनामे दिलेबाबत त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये कथन केले आहे तथापी सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी त्याबाबत राजीनामा मंजुर झालेबाबतचे प्रोसेडींग बुक अगर कोणतेही कागदपत्री पुरावे सोबत सादर केलेले नसल्याने सामनेवाला क्र. 3 व 11 हे देखील तक्रारदाराची ठेव रक्कम देण्यास जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 18 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 18 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं.1 ते 18 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं.1 ते 18 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( इ ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 07/10/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव