Maharashtra

Jalgaon

CC/08/1306

Kisan Vithoba Mali - Complainant(s)

Versus

Poornwad urban co.op credit society and others - Opp.Party(s)

Adv.Kasar

07 Jul 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/1306
 
1. Kisan Vithoba Mali
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Poornwad urban co.op credit society and others
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 1306/2008
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः - 14/10/2008
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 17.11.2008
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/07/2009
 
श्री.किसन विठोबा माळी,
उ.व.73 वर्षे, धंदाः पेन्‍शनर,
रा.8, योगेश्‍वरनगर, जुना नशिराबाद रोड,जळगांव,
ता.जि.जळगांव.                                    ..........      तक्रारदार
            विरुध्‍द
1.     पुर्णवाद नागरी सहकारी पत.मर्यादीत, शिरसोली,जळगांव.
पत्‍ताः 69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड,जळगांव
तर्फे व्‍यवस्‍थापिका सौ.कल्‍पना शेख लंके,
(समन्‍स व्‍यवस्‍थापीका यांचेवर बजवावेत)
2.    श्री. सत्‍यशिल अविनाश अकोले (चेअरमन )
रा.पूर्णवाद भवन, पूर्णवाद नगर, रिंगरोड,जळगांव.
3.    श्री.जगतराव बारकू पाटील (संचालक)
रा.शिरसोली प्र.बो., ता.जि.जळगांव.
4.    डॉ.अशोक गणपती रावेरकर (सचिव)
रा.वाघुळदे नगर, जळगांव.
5.    श्री.शाम अविनाश अकोले (संचालक)
रा.संभाजी चौक, सावदा, ता.रावेर, जि.जळगांव.
6.    श्री.नामदेव पांडूरंग कोळी (संचालक)
रा.कांचन नगर, जळगांव.
7.    श्री.प्रदीप रावसाहेब पाटील (संचालक)
रा.शिरसोली प्र.बो., ता.जि.जळगांव.
8.    गणेश विष्‍णुपंत पारनेरकर (संचालक)
रा.पारनेर, ता.पारनेर, जि.जळगांव.
9.    सौ.विजया अशोक रावेरकर (संचालक)
रा.वाघुळदे नगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
10.   श्री.स्‍वरुपकुमार भागचंद लुंकड (संचालक)
रा.धनलक्ष्‍मी ज्‍वेलर्स, सुभाष चौक,
सुभाष डेअरीच्‍या समोरच्‍या गल्‍लीत,
रतनलाल सी.बाफनाच्‍या मागील गल्‍लीत, जळगांव.
11    सौ.उषा यशवंत चौधरी (संचालक)
रा.जयकिसनवाडी, जळगांव, ता.जि.जळगांव.
12.   राजेश प्रभाकर रडे, (संचालक)
रा.यावल, ता.यावल,जि.जळगांव.
13.   मुरलीधर केशव ढेंगळे (संचालक)
रा.शिरसोली प्र.बो., ता.जि.जळगांव.
14.   (शिरीषकुमार जयवंतराव भामरे (संचालक))
      (वगळण्‍यात आले.)                                 ........ सामनेवाला
     
न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 07/07/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
            तक्रारदारा तर्फे श्री.दिपक एस.कासार वकील हजर
            सामनेवाला क्रं.1 व 2 तर्फे श्री.लक्ष्‍मण व्‍ही.वाणी वकील हजर.
            सामनेवाला क्रं.3 व 11 तर्फे श्री.मोहन एस.पाटील वकील हजर.
            सामनेवाला क्र.4 ते 10 व 12 ते 13 एकतर्फा.
 
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्‍त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या व्‍याजावर  ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           

अ.क्र.    
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
  जे 25867
31.12.2007
75,000/-
13.05.2008

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने , तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन   रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास  शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्‍हणून तक्रारदार  यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.      
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्‍यात आल्‍या. सामनेवाला क्र.4 ते 10 व 12 ते 13  यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश केला.  तसेच सामनेवाला क्रमांक 3 व 11 हे वकीलामार्फत हजर होऊन लेखी म्‍हणणे सादर केलेले असुन तक्रारदाराचे तक्रारीतील सर्वर कथने बेकायदेशीर व खोटी असल्‍याने नाकारलेली आहेत.     सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी सामनेवाला क्र. 1 पतसंस्‍थेचा राजीनामा दिलेला असुन तो पतसंस्‍थेने मंजुर केलेला असल्‍याचे कथन केलेले आहे तसेच सामनेवाला क्र. 3 व 11 हे पतसंस्‍थेचे रजिस्‍ट्रेशन झाल्‍यापासुन एकाही मिटींगला हजर नव्‍हते व त्‍यांनी कोणताही पत्रव्‍यवहार केलेला नाही.   सहकार कायदयातील तरतुदीनुसार सामनेवाला क्र. 3 व 11 यांचेकडुन कोणतेही बंधपत्रा तयार करुन घेण्‍यात आलेले नाही.   सामनेवाला क्र. 3 व 11 यांना संचालक या पदावरुन वगळण्‍यात आलेले असल्‍याने सामनेवाला हे कोणतीही रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाहीत सबब तक्रारीतुन सामनेवाला क्रमांक 3 व 11 यांना वगळण्‍यात यावे व तक्रारदाराची तक्रार रद्य करुन केसकामी आलेला खर्च तक्रारदाराकडुन मिळावा अशी विनंती सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी केली आहे.    
            सामनेवाला कं.1व 2 यांनी आपल्‍या खुलाश्‍यात तक्रारदार यांनी ठेवलेल्‍या ठेवीबाबत कबूल केलेले आहे परंतु तक्रारदार यांनी केलेले इतर कथन फेटाळलेले आहे.   सामनेवाला यांनी आपल्‍या खुलाश्‍यात पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांनी तक्रार करण्‍याअगोदर सहा. निबंधक यांचेकडे अर्ज करावयास हवा होता तसेच सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस द्यावयास पाहीजे होती तसे तक्रारदार यांनी केलेले नाही. म्‍हणून तक्रारी कारण घडलेले नाही.   तसेच सोसायटी संबंधी कोणत्‍याही प्रकारचा वाद उपस्थित झाल्‍यास सहकार न्‍यायालयाला सदर वाद चालवीणेचा अधिकार आहे,ग्राहक न्‍यायालयास याबाबतीत अधिकार नाही त्‍यामुळेही सदरील तक्रार रद्य होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार हा त्‍यांचा ग्राहक नाही.
            सामनेवाला पतसंस्‍थेने एकूण ठेवीच्‍या रक्‍कमेची कर्ज वाटप केलेली आहे. सदर कर्ज वसूल झालेवर पतसंस्‍था ठेवीदारांची रक्‍कम देण्‍यास आजही तयार आहे. सहकारी पतसंस्‍थाची परिस्थिती अफवांमुळे गंभीर झालेली आहे. ठेवीदारांनी एकत्र संपूर्ण ठेवींच्‍या रक्‍कमेंची मागणी केल्‍यामुळे आज तरी सदरील रक्‍कम देता येत नाही.   सबब सामनेवाला यांनी त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती त्‍यांनी आपल्‍या खुलाश्‍यात केलेली आहे.
            4.          तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे    याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता तसेच तक्रारदार व सामनेवाला   यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे.  म्‍हणून तक्रारदार ठेवीची रक्‍कम व्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं.1,2,4 ते 10,12 व 13 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांच्‍या आदेश कलम 1 मध्‍ये नमुद केलेल्‍या मुदत ठेव पावती मॅच्‍युअर्ड झालेली असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेली रक्‍कम त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे . 9 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं.1,2,4 ते 10,12 व 13 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं.1,2,4 ते 10,12 व 13  यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं.1,2,4 ते 10,12 व 13 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       सामनेवाला क्र. 3 व 11 यांनी राजीनामा दिल्‍यामुळे व त्‍यांचा राजीनामा मंजुर झालेबाबत त्‍यांनी तक्रारीत कागदपत्रे दाखल केलेमुळे त्‍यांचेविरुध्‍द तक्रार फेटाळण्‍यात येते.
(फ)         उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 7/07/2009           
                                          (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )    ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव   
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.