निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 993/2008
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः- 11/08/2008
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 11/09/2008
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 13/07/2009
1. श्री.तेजु पितांबर वाघ,
वय-सज्ञान,धदा- व्यापार,
2. सौ.रेखाबाई तेजु वाघ,
वय-सज्ञान,धदा- घरकाम,
सर्वर राहणार वाडी चौक, अमळनेर,
ता.अंमळनेर, जिल्हा जळगाव .......... तक्रारदार
विरुध्द
1. दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा
2. दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, शाखा कार्यालय अमळनेर,
3. श्री.सुनिल दत्तात्रय चोपडे
वय-सज्ञान,धंदा-चेअरमन,
राहणार दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव
4. श्री.नंदकीशोर हिरालाल अकोले,
वय-सज्ञान,धंदा- व्हा. चेअरमन,
राहणार संभाजी चौक,सावदा तालुका रावेर,
जिल्हा जळगाव
5. सुनिल शांताराम बारी,
वय-सज्ञान,धंदा-मॅनेजर,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, शाखा कार्यालय अमळनेर,
6. श्री.रविंद्र रमेश वाणी,
वय-सज्ञान,धंदा’
जनरल मॅनेजर,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव
7. सक्रेटरी,
वय-सज्ञान,धंदा-नोकरी,
दि. सावदा मर्चंट को-ऑप. क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा, मुख्य कार्यालय सावदा संभाजी चौक,सावदा तालुका
रावेर जिल्हा जळगाव
8. श्री.भाऊलाल गंभीर चौधरी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
9. श्री.अरुण रघुनाथ कासार,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
10. श्री.शेखर गजानन वानखेडे,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
11. श्री.विनोद मधुकर अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
12. श्री.विकास अविनाश अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
13. श्री.नितीन रामचंद्र खरे,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
14. सौ.लिलाबाई रमेश वाणी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
15. सौ.अलका नंदकिशोर अकोले,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
16. श्री.योगेश अशोक वाणी,
वय-सज्ञान, धंदा- संचालक,
दि.सावदा मर्चंट को.ऑप.क्रेडीट सोसायटी मर्या.
सावदा मुख्य कार्यालय, सावदा, संभाजी चौक, सावदा,
जि.जळगांव.
17. निर्मल उज्वल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
नागपूर, मुख्य शाखाः नागपूर.
18. चेअरमन,
वय-सज्ञान,
निर्मल उज्वल नागरी सह.पतसंस्था मर्या.
नागपूर, मुख्य शाखाः नागपूर. .......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 13/07/2009 )
( निकाल कथन न्याय मंच अध्यक्ष श्री.बी.डी.नेरकर यांचेकडून )
तक्रारदार तर्फे श्री.आर.बी.कुळकर्णी वकील हजर
सामनेवाला क्रं. 1 व 6 तर्फे श्री. दत्तात्रय विनायक भोकरीकर वकील हजर
सामनेवाला क्र. 4,8 व 15 स्वतः हजर.
सामनेवाला क्रं. 2,3,5,7,9 ते 14 व 16 गैरहजर
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | 002150 | 06.02.2004 | 25,000/- | 06.02.2008 |
2 | 002149 | 06.02.2004 | 25,000/- | 06.02.2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावतीची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने , तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी तसेच त्यांना झालेल्या त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रं. 2,3,5,7,9 ते 14 व 16 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला. त्याचप्रमाणे सामनेवालाक्रं. 1 व 6 यांनी तक्रारीतहजरहोऊनखुलासादाखलकरण्यासत्यांनी मुदतमागीतलेलीआहेपरंतुमुदतीअंतीतेआपलाखुलासादाखलकरुशकलेलेनाहीतम्हणूनमंचाने त्यांचेविरुध्द नो सेचा आदेशकेला.
3. सामनेवाला क्रमांक 4,8 व 15 यांनी वकीलामार्फत हजर होऊन प्रस्तुत प्रकरणी त्यांचे लेखी म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाला यांनी पतसंस्थेचा संचालक होताच त्वरीत वसुलीसाठी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तथापी संस्थेचे मॅनेजर, सहायक निबंधक व त्यांचे वरीष्ठ अधिकारी यांनी आजअखेर वसुलीसाठी काहीएक कारवाई केलेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्रमांक 4 व 15 दि.7/11/2007 रोजी संचालक पदाचा राजीनामा दिलेला असुन तो पतसंस्थेने ठराव क्रमांक 4 अन्वये दि.29/12/2007 रोजी स्विकारलेला आहे. तसेच सामनेवाला क्रमांक 8 यांनी देखील जून,2008 मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसेच सामनेवाला क्रमांक 4 व 15 यांनी कोणतेही बंधपत्र सहायक निबंधकाकडे दिलेले नाही. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन सामनेवाला क्रमांक 4,8 व 15 यांचे नांव तक्रारीतुन वगळण्यात यावे अशी विनंती सामनेवाला यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तक्रारदार यांचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार यास नाईलाजास्तव सदरील तक्रार दाखल करणे भाग पडले आहे तसेच सदरील तक्रार दाखल केल्यानंतर व तक्रारदार यांनी तक्रारीत त्यांचे शपथपत्र दाखल केल्यानंतरही सदरील रक्कम तक्रारदार यास परत न करुन सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन आपल्या सेवेत कसूर केलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास विनाकारण शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागलेले आहे म्हणून तक्रारदार हा सामनेवाला यांचेकडून त्यांची ठेव रक्कम व्याजासह परत मागणेस व नुकसान भरपाईची रक्कम मागणेस हक्कदार आहे.
सामनेवाला क्रमांक 4 व 15 यांनी सामनेवाला पतसंस्थेचे संचालक पदाचे राजीनामा दिलेचे पत्र सादर केलेले असुन सदरचे राजीनामे सामनेवाला पतसंस्थेचे मंजुर केलेबाबतचे पतसंस्थेचे पत्राची प्रतही दाखल केलेली आहे. सबब सामनेवाला क्रमांक 4 व 15 यांना तक्रारीतुन वगळण्यात येते.
सामनेवाला क्रं. 17 व 18 यांनी आपल्या खुलाश्यात म्हटले आहे की, सामनेवाला पतसंस्थेच्या विनीकरणास मा. उच्च न्यायालय यांनी स्थगिती दिलेली आहे व त्याबाबत त्यांनी तक्रारीत कागदपत्रेही दाखल केलेली आहे सबब सामनेवाला क्रं.17 व 18 यांचेविरुध्दची तक्रार फेटाळण्यात येते. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं. 1,2,3,5 ते 14 व 16 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमूद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं. 1,2,3,5 ते 14 व 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं. 1,2,3,5 ते 14 व 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं. 1,2,3,5 ते 14 व 16 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 13/07/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव