Maharashtra

Jalgaon

CC/08/873

Pundlik Kadu Patil - Complainant(s)

Versus

Poornawad Urban co.opsociety - Opp.Party(s)

Adv. Mohite

09 Jul 2009

ORDER

 
Complaint Case No. CC/08/873
 
1. Pundlik Kadu Patil
Jalgaon
Jalgaon
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Poornawad Urban co.opsociety
Jalgaon
Jalgaon
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. B.D. Nerkar PRESIDENT
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                      निशाणी
 
 जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
                        तक्रार क्रमांक 873/2008
                        तक्रार पंजीबध्‍द करण्‍यात आले तारीखः - 21/07/2008
                        सा.वा. यांना नोटीस लागल्‍याची तारीखः- 19.08.2008
                        तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 09/07/2009
 
श्री.पुंडलीक कडू पाटील,
उ.व. सज्ञान, धंदाः सेवानिवृत्‍त,
रा.प्‍लॉट क्र.4, चंद्रप्रभा कॉलनी, ख्‍वॉजामियाजवळ,
जळगांव, ता.जि.जळगांव.                            ..........      तक्रारदार
            विरुध्‍द
1.     पुर्णवाद नागरी सहकारी पत.मर्यादीत, शिरसोली,जळगांव.
पत्‍ताः 71, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड,जळगांव
ता.जि.जळगांव.
2.    श्री. सत्‍यशिल अविनाश अकोले (चेअरमन )
रा.गणपती अपार्टमेंट, पूर्णवाद नगर, जळगांव.
3.    श्री.प्रदीप रावसाहेब पाटील (उपाध्‍यक्ष)
रा.शिरसोली, ता.जि.जळगांव.
4.    डॉ.अशोक गणपती रावेरकर (संचालक)
रा.शनीपेठ, जळगांव, ता.जि.जळगांव.
5.    श्री.स्‍वरुपकुमार भागचंद लुंकड (संचालक)
रा.सराफ बाजार, भवानी पेठ, जळगांव.
6.    श्री.राजेंद्र प्रभाकर गडे, (संचालक)
7.    (श्री.राज बाबुराव डोळे (संचालक) ) ( तक्रारदाराचे दि.17/4/09 चे अर्जान्‍वये वगळले)
रा.फारचेस, लक्ष्‍मी अपार्टमेंट, गारखेडा, जि.औरंगाबाद.
8.    श्री.शाम अविनाश अकोले (संचालक)
रा.कलावैभव मोटर्स, युनीटी चेंबर, जळगांव.
9.    (मनोहर मधुकर बारी (संचालक)) ( तक्रारदाराचे दि.17/4/09 चे अर्जान्‍वये वगळले)
रा.21 अ, सचिननगर, जळगांव.
10.   (श्री.शिरीषकुमारजयंतराव भामरे (संचालक)( तक्रारदाराचे - -  चे अर्जान्‍वये वगळले)
रा.शिरसोली, नागरी पतपेढी मर्यादीत,शाखाःऔरंगाबाद.
11.    रविंद्र प्रभाकर सोनार (संचालक)
रा.कांचन नगर, जळगांव.
12.   सौ.विजया अशोक रावेरकर (संचालीका)
रा.शनिपेठ, जळगांव.
13.   मुरलीधर केशव ढेंगळे (संचालक)
रा.मु.पो.शिरसोली, ता.जि.जळगांव.
14.   श्री.नामदेव पांडूरंग कोळी (संचालक)
रा.मु.पो.शिरसोली, ता.जि.जळगांव.
15.   (श्री.गुणेश विष्‍णुपंत पारनेरकर(संचालक)(तक्रारदाराचेदि.17/4/09चे अर्जान्‍वये वगळले)
रा.पूर्णवाद भवन, तहसिल पारनेर, जि.अहमदनगर.
16.   शांताराम लक्ष्‍मण राऊत (संचालक)
रा.पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्‍था, अहमदनगर,
जि.अहमदनगर.
17.   सौ.कल्‍पना शेखर लंके (संचालक)
रा.पूर्णवाद ना.सह.पतपेढी मर्या., शिरसोली,
71, युनीटी चेंबर, जळगांव.                     ......... सामनेवाला
 
 
                       
न्‍यायमंच पदाधिकारीः- 
                        श्री. बी.डी.नेरकर                       अध्‍यक्ष.
                        अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव           सदस्‍य.
 
 
                        अंतिम आदेश
                   ( निकाल दिनांकः 09/07/2009)
(निकाल कथन न्‍याय मंच अध्‍यक्ष श्री. बी.डी.नेरकर यांचेकडून   )
 
 
            तक्रारदारा तर्फे श्री.आर.सी.मोहीते वकील हजर
            सामनेवाला क्रं.3 व 14 तर्फे श्री.मोहन एस.पाटील वकील हजर.
            सामनेवाला क्र. 2 तर्फे श्री.लक्ष्‍मण व्‍ही.वाणी.
            सामनेवाला क्रं.1,3ते 6,8,11 ते 14, 16,व 17 एकतर्फा.
 
 
                        सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्‍त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
                        1.         सामनेवाला ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी अक्‍ट 1960 चे कायद्यान्‍वये स्‍थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्‍था आहे.    वेगवेगळया प्रकारच्‍या व्‍याजावर  ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्‍यादी सामनेवाला या पतसंस्‍थेचे कार्य आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्‍थेत पुढील प्रमाणे रक्‍कम गुंतविलेल्‍या आहेत, त्‍याचा तपशील पुढील प्रमाणेः-
           

अ.क्र.    
पावती क्रमांक
 ठेव दिनांक
रक्‍कम रुपये
देय तारीख
1
  जे 19516
05.01.2007
45,000/-
05.02.2008
2
 जे 19525
06.01.2007
12,000/-
06.02.2008
3
 जे 19526
06.01.2007
45,000/-
06.02.2008
4
 जे 19528
06.01.2007
45,000/-
06.02.2008

 
                  तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्‍या मुदत ठेव पावत्‍यांची मुदत संपलेली असल्‍याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्‍याने , तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेवीची रक्‍कम सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्‍तरे देऊन व पैसे देण्‍यास टाळाटाळ करुन   रक्‍कम देण्‍यास नकार दिलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यास  शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्‍हणून तक्रारदार  यांनी त्‍यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम व्‍याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्‍द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.      
            2.    सदरची तक्रार पंजीबध्‍द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे  नोटीसा काढण्‍यात आल्‍या. सामनेवाला क्रमांक 1,3ते 6,8,11 ते 14, 16,व 17 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्‍हणून मंचाने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश केला. तसेच सामनेवाला क्रमांक 2 हे वकीलामार्फत हजर होऊन लेखी म्‍हणणे सादर केलेले आहे.
            3.     सामनेवाला कं.2 यांनी आपल्‍या खुलाश्‍यात तक्रारदार यांनी ठेवलेल्‍या ठेवीबाबत कबूल केलेले आहे परंतु तक्रारदार यांनी केलेले इतर कथन फेटाळलेले आहे.   सामनेवाला यांनी आपल्‍या खुलाश्‍यात पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांनी तक्रार करण्‍याअगोदर सहा. निबंधक यांचेकडे अर्ज करावयास हवा होता तसेच सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस द्यावयास पाहीजे होती तसे तक्रारदार यांनी केलेले नाही. म्‍हणून तक्रारी कारण घडलेले नाही.   तसेच सोसायटी संबंधी कोणत्‍याही प्रकारचा वाद उपस्थित झाल्‍यास सहकार न्‍यायालयाला सदर वाद चालवीणेचा अधिकार आहे,ग्राहक न्‍यायालयास याबाबतीत अधिकार नाही त्‍यामुळेही सदरील तक्रार रद्य होणेस पात्र आहे. तसेच तक्रारदार हा त्‍यांचा ग्राहक नाही.
            सामनेवाला यांनी आपल्‍या खुलाश्‍यात पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदार यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल करणचे आधी डी.डी.आर.कडे तक्रार दाखल केलेली आहे व ती चौकशीसाठी प्रलंबित आहे. सबब एकाचवेळी दोन ठिकाणी तक्रारदार यांची तक्रार चालु शकत नाही. सबब ती रद्द होणेस पात्र आहे. 
            4.          तक्रारदार यांची तक्रार, त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्रे    याचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता तसेच तक्रारदार व सामनेवाला क्र. 2 यांचे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकला असता न्‍यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
            1.     तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1)
                  प्रमाणे ग्राहक आहे काय ?                     .......होय
 
            2.    सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्‍य ती सेवा न
                  देऊन आपल्‍या सेवेत कसूर केला आहे काय       ?     ...... होय
 
      म्‍हणून आदेश काय                 अंतिम आदेशाप्रमाणे
निष्‍कर्षाची कारणेः-
             5.  मुद्या क्रमांक 1 तक्रारदार यांनी तक्रारीत निशाणी 3 अंतर्गत दाखल केलेल्‍या पावतीचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदार यांनी काही रक्‍कम सामनेवाला यांचे पतसंस्‍थेत ठेव म्‍हणून ठेवलेली आहेत. सबब सदरील कागदपत्रावरुन दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2(1) ड नुसार ग्राहक आहे.
            6.    मुद्या क्रमांक 2   दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्‍यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्‍थेत रक्‍कम  गुंतवणूक  केलेल्‍या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्‍यानंतर किंवा मुदत संपण्‍याआधी ठेवीदाराने सदरील रक्‍कमेची मागणी केल्‍यास ग्राहकांना त्‍यांच्‍या ठेवीच्‍या रक्‍कमा त्‍यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्‍कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्‍याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्‍यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्‍कम आपल्‍या फायद्याकरीता मुद्याम स्‍वतःकडे ठेऊन घेतली आहे.  म्‍हणून तक्रारदार ठेवीची रक्‍कम व्‍यावरील व्‍याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
                              आ    दे    श 
            ( अ )       तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
            ( ब )       सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असे निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यांच्‍या आदेश कलम 1 मध्‍ये नमुद केलेल्‍या मुदत ठेव पावत्‍या मॅच्‍युअर्ड झालेल्‍या असल्‍याने त्‍यावरील मुदती अंती देय असलेल्‍या रक्‍कमा त्‍या त्‍या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्‍यापासून ) एकत्रित रक्‍कमेवर द.सा.द.शे . 9 टक्‍के व्‍याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( क )       सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही  निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास झालेल्‍या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्‍हणून देण्‍यात यावे.
             ( ड )      सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी   रक्‍कम रुपये 1000/-   देण्‍यात यावे. 
            ( इ )             सामनेवाला क्रं.1 ते 17 यांना असेही निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी वरील सर्व रक्‍कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्‍यापासून एक महिन्‍याच्‍या आत द्याव्‍यात अन्‍यथा वरील सर्व एकत्रित रक्‍कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे . 6 टक्‍के व्‍याजासह संपूर्ण रक्‍कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्‍यात यावेत.
            ( ई )       उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्‍क्‍याची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  गा 
दिनांकः- 9/07/2009                 
                                          (श्री.चंद्रकांत मोहन येशीराव )    ( श्री.बी.डी.नेरकर )
                            सदस्‍य                       अध्‍यक्ष 
                                         जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍याय मंच,जळगाव   
 
 
 
[HON'ABLE MR. B.D. Nerkar]
PRESIDENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.