निशाणी
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 145/2009
तक्रार पंजीबध्द करण्यात आले तारीखः - 03/02/2009
सा.वा. यांना नोटीस लागल्याची तारीखः- 26.03.2009
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 01/08/2009
1. श्री.भदाणे आत्माराम हिलाल,
उ.व. 66 वर्षे, धंदाः काहीनाही,
रा.प्लॉट नं.47, लक्ष्मी नगर, ढेकु रोड,
अंमळनेर, जि.जळगांव. .......... तक्रारदार
विरुध्द
1. मुख्य शाखा-
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
जळगांव रा. 69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड,
जळगांव तर्फे व्यवस्थापक.
2. शाखा व्यवस्थापक, अंमळनेर,
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
जळगांव रा.कोर्टासमोर, अंमळनेर, जि.जळगांव.
3. सौ.किल्पना शेखर लंके, मुख्य व्यवस्थापक,
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
रा.69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव.
4. सेक्रेटरी,
पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
जळगांव रा.69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव.
5. श्री.सत्यशील अविनाश अकोले,
चेअरमन, रा.पूर्णवाद नगर, पुर्णवाद भवन, रिंगरोड,जळगांव,
ता.जि.जळगांव.
6. डॉ.अशोक गणपती रावेरकर, संचालक,
रा.वाघुळदे नगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
7. श्री.शाम अविनाश अकोले, संचालक,
रा.संभाजी चौक, सावदा, ता.रावेर,जि.जळगांव.
8. श्री.नामदेव पांडुरंग कोळी, संचालक,
रा.कांचन नगर, जळगांव, ता.जि.जळगांव.
9. श्री.प्रदीप रावसाहेब पाटील, संचालक,
रा.शिरसोली प्र.बो.जळगांव, ता.जि.जळगांव.
10. श्री.गणेश विष्णुपंत पारनेरकर, संचालक,
रा.पारनेर, ता.पारनेर, जि.अहमदनगर.
11. श्री.सौ.विजया अशोक रावेरकर, संचालिका,
रा.व्दाराः पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
रा.69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव.
12. स्वरुपकुमार भागचंद लुंकड, संचालक,
रा.व्दाराः पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
रा.69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव.
13. सौ.उषा यशवंत चौधरी, संचालिका,
रा.जयकिसनवाडी, जळगांव, ता.जि.जळगांव.
14. श्री.मुरलीधर केशव ढेंगळे, संचालक,
रा.शिरसोली प्र.बो.ता.जि.जळगांव.
15. श्री.शिरीषकुमार जयवंतराव भामरे, संचालक,
रा.व्दाराः पूर्णवाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शिरसोली,
रा.69-72, युनीटी चेंबर्स, गणेश कॉलनी रोड, जळगांव.......... सामनेवाला
न्यायमंच पदाधिकारीः-
श्री. बी.डी.नेरकर अध्यक्ष.
अड. श्री.चंद्रकांत मोहन येशीराव सदस्य.
अंतिम आदेश
( निकाल दिनांकः 01/08/2009)
(निकाल कथन न्याय मंच सदस्य श्री.चंद्रकांत मोहन येशीराव यांचेकडून )
तक्रारदारा तर्फे श्री.आर.बी.कुलकर्णी वकील हजर
सामनेवाला क्रं.1 व 5 तर्फे श्री.लक्ष्मण व्ही.वाणी वकील हजर.
सामनेवाला क्रं.2,3,4,6 ते 15 एकतर्फा.
सदर प्रकरण तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे दाखल तक्रारीची संक्षिप्त हकिकत खालीलप्रमाणे आहेः-
1. सामनेवाला ही महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह सोसायटी अक्ट 1960 चे कायद्यान्वये स्थापन झालेली एक नोंदणीकृत नामांकीत पतसंस्था आहे. वेगवेगळया प्रकारच्या व्याजावर ठेवी स्विकारणे, कर्ज वाटप करणे इत्यादी सामनेवाला या पतसंस्थेचे कार्य आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाला या पतसंस्थेत पुढील प्रमाणे रक्कम गुंतविलेल्या आहेत, त्याचा तपशील पुढील प्रमाणेः-
अ.क्र. | पावती क्रमांक | ठेव दिनांक | रक्कम रुपये | देय तारीख |
1 | ए 04577 | 11/04/2007 | 50,000/- | 11/05/2008 |
2 | ए 04535 | 07/04/2007 | 1,00,000/- | 07/05/2008 |
तक्रारदार यांनी वरील ठेव ठेवलेल्या मुदत ठेव पावत्यांची मुदत संपलेली असल्याने व तक्रारदार यांना आर्थिक गरज असल्याने, तक्रारदार हे त्यांची मुदत ठेवीची रक्कम सामनेवाला यांचेकडे व्याजासह मागणेसाठी गेले असता सामनेवाला यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन व पैसे देण्यास टाळाटाळ करुन रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे तक्रारदार यास शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रास झालेला आहे. म्हणून तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेवीची रक्कम व्याजासह परत मिळणेकामी व त्रासापोटी नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाला यांचेविरुध्द सदरील तक्रार दाखल केलेली आहे.
2. सदरची तक्रार पंजीबध्द करुन, सामनेवाला यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. सामनेवाला क्रमांक 2,3,4,6 ते 15 यांना तक्रारीची नोटीस लागूनही ते तक्रारीत गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश केला.
3. सामनेवाला क्रमांक 1 व 5 यांनी वकीलामार्फत हजर होऊन लेखी म्हणणे सादर केलेले असुन तक्रारदाराचे तक्रारीतील सर्व कथने बेकायदेशीर व खोटी असल्याने नाकारलेली आहेत. सामनेवाला संस्थेचे सर्वर व्यवहार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व त्याखालील नियमानुसार होत असतात त्यामुळे प्रस्तुतचा वाद हा सहकार न्यायालय अगर सक्षम सहकारी यंत्रणेमार्फत सोडविण्याचे स्पष्ट तरतुदी सहकार कायदयाअंतर्गत आहेत. तक्रारदार हा ग्राहक या संज्ञेखाली येत नाही तसेच तक्रारदार हा ग्राहक नसल्यामुळे व तो शेअरहोल्डर असल्यामुळे ग्राहक न्यायमंचास सदरचा अर्ज चालविण्याचा अधिकार नाही. गेल्या काही महीन्यापासुन जळगांव जिल्हयातील पतसंस्थेच्या सभासदांमध्ये संस्थेबाबत काही व्यक्ती व ठेवीदारांच्या अफवांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे नवीन ठेवी संस्थेत येणे कमी झाले असुन ठेव नुतनीकरणाचे प्रमाण घटलेले असुन तसेच संस्थेने दर्घ मुदतीची कर्ज दिलेली असुन ती वसुल हप्त्याव्दारे होत असल्याने संस्थेचे निधी व्यवस्थापन कोसळुन संस्थेस तिचे व्यवहार पुर्ण करणेस विलंब होत आहे. ज्या ठेव पावत्यांची मुदत संपलेली असेल त्या मुदत ठेव पावत्यांची रक्कम कर्ज वसुलीचे नियोजनानुसार देण्याचा ठराव संचालक मंडळाने केला असुन तो सर्व सभासदांवर बंधनकारक आहे. तक्रारदाराने या मंचासमोर तक्रार करणेअगोदर डी.डी.आर यांचेकडे तक्रार केली असुन ती प्रलंबीत आहे. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्य करण्यात यावी अशी विनंती सामनेवाला क्र. 1 व 5 यांनी केली आहे.
4. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला क्र. 1 व 5 यांचे म्हणणे, दाखल केलेले कागदपत्रे याचे सुक्ष्म अवलोकन केले असता तसेच तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 व 5 यांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकला असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतातः-
1. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना योग्य ती सेवा न
देऊन आपल्या सेवेत कसूर केला आहे काय ? ...... होय
म्हणून आदेश काय अंतिम आदेशाप्रमाणे
निष्कर्षाची कारणेः-
5. मुद्या क्रमांक 1 दुसरी बाब अशी की, सामनेवाला यांनी तक्रारदार यास सेवा देण्यास कसूर केला आहे काय याबाबत मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी सामनेवाला पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक केलेल्या पावतीकडे वेधले असता असे दिसून येते की, ठेवीची मुदत संपल्यानंतर किंवा मुदत संपण्याआधी ठेवीदाराने सदरील रक्कमेची मागणी केल्यास ग्राहकांना त्यांच्या ठेवीच्या रक्कमा त्यांचे मागणीनुसार न देणे किंवा टाळाटाळ करणे ही दोषपूर्ण सेवा आहे. सदरील मुदत ठेवीची रक्कमेची मागणी तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे केली असल्याचे तक्रारीतील कागदपत्रावरुन दिसून येते. परंतु सामनेवाला यांनी ती देण्यास वेळोवेळी नकार दिलेला आहे, सामनेवाला यांनी सदरील रक्कम तक्रारदार यांना नियमाप्रमाणे परत केलली नाही व सदरील रक्कम आपल्या फायद्याकरीता मुद्याम स्वतःकडे ठेऊन घेतली आहे. म्हणून तक्रारदार ठेवीची रक्कम व्यावरील व्याज व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. सबब मंच पुढील आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांची तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असे निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांच्या आदेश कलम 1 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमा त्या त्या पावतीवरील देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे . 9 टक्के व्याजासह तक्रारदार यांना आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( क ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास झालेल्या मानसिक, शरिरिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रुपये 1000/- नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.
( ड ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यास सदरील तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रुपये 1000/- देण्यात यावे.
( इ ) सामनेवाला क्रं.1 ते 15 यांना असेही निर्देशित करण्यात येते की, त्यांनी वरील सर्व रक्कमा तक्रारदार यांना सदरील आदेश पारीत केल्यापासून एक महिन्याच्या आत द्याव्यात अन्यथा वरील सर्व एकत्रित रक्कमेवर तक्रारदार यांना द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह संपूर्ण रक्कम फीटेपावेतो आदेश दिनांकापर्यंत देण्यात यावेत.
( ई ) उभयपक्षकारांना आदेशाची सही शिक्क्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
ज ळ गा व
दिनांकः- 01/08/2009
(श्री.चंद्रकांत मोहन येशीराव ) ( श्री.बी.डी.नेरकर )
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव