Maharashtra

Nagpur

CC/257/2019

VIKRANT PRADEEP KATEKAR - Complainant(s)

Versus

POONAM URBAN CREDIT CO-OPERATIVE SOCIETY THROUGH ITS PRESIDENT SHRI AURN PHALTANKAR - Opp.Party(s)

ADV PRAFFULLA KHUBALKAR

06 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/257/2019
( Date of Filing : 26 Apr 2019 )
 
1. VIKRANT PRADEEP KATEKAR
PLOT NO 160, NEA NIT GARDEN DATTATRAY NAGAR NAGPUR 440024
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. POONAM URBAN CREDIT CO-OPERATIVE SOCIETY THROUGH ITS PRESIDENT SHRI AURN PHALTANKAR
6, SIRSIKAR BHAVAN RESHIMBAGH, MAIN RAOD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR THROUGH SERCRATARY SHRI. DR PRIYADARSHAN MANDLEKAR
6, SIRSIKAR BHAVAN RESHIMBAGH, MAIN RAOD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD THROUGH MANAGER SMT NISHA JAGDALE
6, SIRSIKAR BHAVAN RESHIMBAGH, MAIN RAOD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 06 Jul 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्ता हा नागपूर येथील रहिवासी असून विरुध्‍द पक्ष ही पुनम अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लि. ही महाराष्‍ट्र को-ऑपरेटीव्‍ह अॅक्‍ट अंतर्गत नोंदणीबद्ध संस्‍था असून तिचा नोंदणी क्रमांक एन.जी.पी.(सी.टी.वाय.) आर.एस.आर./सी.आर. ४५६/९२९३ असा आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे सोसायटीचे सचिव आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक १६/८/२०१४ रोजी विरुध्‍द पक्षाचे सोसायटी मध्‍ये बचत खाते उघडले व त्‍याचा बचत खाता क्रमांक ४३१४० हा आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सोसायटीमध्‍ये खालिलप्रमाणे रक्‍कम मुदतीठेवमध्‍ये ठेवली.

अ.क्र.

मुदत ठेव खाते क्रमांक

मुदत ठेव रक्‍कम

मुदत ठेव दिनांक

परिपक्‍वता क्रमांक

व्‍याज दर

परिपक्‍वता रक्‍कम

1

9048

658000/-

16/08/2018

13/02/2019

8.50%

685732

2

9049

300000/-

16/8/2018

13/02/2019

8.50%

312645/-

 

     तक्रारकर्त्‍याला पैशाची गरज असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष सोसायटीशी दिनांक २२/११/२०१८ रोजी संपर्क साधला व मुदतीठेव मध्‍ये  ठेवलेल्‍या रकमेची परिपक्‍वता होण्‍यापूर्वी मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने रक्‍कम तक्रारकर्त्‍याला अदा केली नाही. त्‍याअनुषंगाने तक्रारकर्त्‍याने अनुक्रमे दिनांक २२/११/२०१८ व दिनांक २६/११/२०१८ रोजी मुदती ठेवीतील रक्‍कम मिळण्‍याबाबत पञ विरुध्‍द पक्षाला दिले.

  1. तक्रारकर्त्‍याची मुदती ठेव दिनांक १३/२/२०१९ रोजी परिपक्‍व झाल्‍यानंतर तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष सोसायटीला माहे फरवरी २०१९ मध्‍ये मुदतीठेवी मधील रक्‍कम काढण्‍याकरिता पोहचला व रकमेची मागणी केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील परिपक्‍वता रक्‍कम अदा केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष सोसायटीला दिनांक ७/३/२०१९ रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिली. परंतु विरुध्‍द पक्ष सोसायटीला नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मुदती ठेवीतील रक्‍कम अदा केली नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक ञास तसेच आर्थिक नुकसान झाले आहे करिता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे प्रार्थना केली आहे.
  1. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला परिपक्‍वता रक्‍कम रुपये ९,९८,३७७/- या रकमेवर द.सा.द.शे. २४ टक्‍के व्‍याज दिनांक १३/२/२०१९ पासून तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे.
  2. मानसिक व शारीरिक ञासाकरिता ३,००,०००/- व तक्रारीच्‍या खर्चाकरिता रुपये ५०,०००/- देण्‍याचे आदेशीत करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली.  सदरची नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ मंचात हजर झाले नाही. करिता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ११/९/२०१९ रोजी पारीत करण्‍यात आला.
  2. विरुध्‍द पक्ष  क्रमांक २ आणि ३ यांनी मंचाचे अभिलेखावर लेखी जबाब सादर न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे विरुध्‍द प्रकरण बिना लेखी जबाब चालविण्‍याचा आदेश दिनांक १/११/२०१९ रोजी पारीत करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

      अ.क्र.                     मुद्दे                                                                 निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                       होय
  3. काय आदेश ?                                                                       अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या पुनम अर्बन क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी लि. मध्‍ये दिनांक १६/८/२०१४ पासून बचत खाते होते व तक्रारकर्त्‍याचा बचत खाता क्रमांक ४३/१४० हा आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक १६/८/२०१८ रोजी मुदत ठेव खाते क्रमांक ९०४८ अन्‍वये रुपये ६,५८०००/- ही रक्‍कम द.सा.द.शे. ८.५० टक्‍के दराने मुदती ठेव मध्‍ये ठेवली होती. तसेच ठेव खाते क्रमांक ९०४९ अन्‍वये रुपये ३,००,०००/- ही रक्‍कम द.सा.द.शे. ८.५० टक्‍के दराने मुदती ठेव मध्‍ये ठेवली होती. हे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. त्‍यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे, हे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीची रक्‍कम परिपक्‍व होवून सुद्धा व मागणी करुनही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिली नाही. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. त्‍यामुळे मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, तक्रारकर्ता मुदत ठेवीची परिपक्‍व झालेली रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यास पाञ आहे. तसेच सदरची परिपक्‍व रक्‍कम तक्रारकर्त्‍याला न दिल्‍यामुळे तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक ञासापोटी  व नुकसान भरपाई  तसेच तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पाञ आहे व खालिलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की,  विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारकर्त्‍याला अनुक्रमे परिपक्‍वता रक्‍कम रुपये ६,८५७३२/-, रुपये ३,१२,६४५/- यावर दिनांक १४/०२/२०१९ पासून द.सा.द.शे. १० टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की,  विरुध्‍द पक्ष क्रमांक १,२ व ३ यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईबद्दल रुपये ५०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.