Maharashtra

Nagpur

CC/247/2019

SHRI ASHOK BHAIYYAJI BANTE - Complainant(s)

Versus

POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR - Opp.Party(s)

ADV S. S. THAVKAR

03 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/247/2019
( Date of Filing : 23 Apr 2019 )
 
1. SHRI ASHOK BHAIYYAJI BANTE
PLOT NO 71, MAULI, NEAR INDIRA GANDHI PRATHMIK SCHOOL, JAWAHAR NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR
PLOT NO 107, SARVESHWAR HANUMAN MANDIR, RESHIMBAG, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
2. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR THROUGH SECRETARY/ PRESIDENT
PLOT NO 107, SARVESHWAR HANUMAN MANDIR, RESHIMBAG, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
3. MANAGER, POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR
PLOT NO 107, SARVESHWAR HANUMAN MANDIR, RESHIMBAG, NAGPUR 440009
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Mar 2020
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

 

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही रजिस्‍टर्ड क्रेडीट को-ऑपरेटीव्‍ह सोसायटी असुन  संस्‍थेचा रजि. नं. एन.जी.पी./सी.टी.वाय/आर/एस/आर/सी.आर/४५६/९२-९३ असा आहे. संस्‍थेचे मुख्‍य कार्यालय रे‍शीमबाग, नागपूर येथे आहे.  विरुध्‍दपक्ष हे खातेदारकांना/ग्राहकांना दैनिक बचत ठेव गुंतवणूक, कर्ज सुविधा व मुदत ठेव यासारख्‍या सेवा विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍या  कार्यालयातून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ संस्‍थेचे अध्‍यक्ष/सचिव व विरुध्‍द  पक्ष क्रमांक ३ संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक/मॅनेजर मार्फत देतात. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ या संस्‍थेचा फार जुने खातेदारक/ग्राहक आहे. त्‍यांचे संस्‍थेकडे बचत ठेव खाते असून त्‍याचा खाता क्रमांक २५५९ असा आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द  पक्षाकडे त्‍यांच्‍या गोड बोलण्‍यावर व आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून विरुध्‍द  पक्ष क्रमांक १ यांच्‍याकडे आयुष्‍यभर कमावलेली रक्‍कम १८१ दिवसांकरीता मियादी जमा (Fixed Deposit) म्‍हणून गुंतवणूक करण्‍याचे ठरविले व त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने खालिलप्रमाणे रक्‍कम विरुध्‍द पक्षाच्‍या संस्‍थेत जमा केली.

परिशिष्‍ट अ

 

  1.  

मुदत ठेव खाते क्र.

ठेवीची तारीख

  •  

ठेव परतीची तारीख

मुदती अखेर रक्‍कम

  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
  •  
  •  
  •  

१८१ दिवस

  •  
  •  
 

 

अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास वर नमुद ठेवीच्‍या रकमेपैकी ठेवी क्रमांक १ ते ४ यांची मुदत दिनांक २/११/२०१७ रोजी संपल्‍याकारणाने सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास व्‍याजासहीत परत करण्‍याची विनंती केली होती. परंतू विरुध्‍द पक्षांनी सदरची रक्‍कम देण्‍यास ते असमर्थ असल्‍याचे सांगून सदरच्‍या रकमेपैकी काही किरकोळ रक्‍कम तक्रारकर्त्‍यास देऊन उर्वरीत रक्‍कम ४,६१,२५९/- तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यामध्‍ये जमा ठेवली आहे. त्‍याचप्रमाणे परिशिष्‍ट अ मधील मुदत ठेव क्रमांक ५ ते ८ या जमा ठेवींची मुदत ७/२/२०१८ रोजी संपलेली आहे. तक्रारकर्त्‍यास ही रक्‍कम त्‍वरील पाहिजे असल्‍याकारणाने त्‍याने विरुध्‍दपक्षांना कळकळीची विनंती केली परंतू विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी त्‍यांची दखल न घेता विरुध्‍द पक्षास धमकावले व सदरची जमा ठेवीची रक्‍कम परत करण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक २२/१२/२०१७ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांच्‍याकडे त्‍यांच्‍या बचत खात्‍यात व इतर जमा असलेली रक्‍कम परत मिळण्‍याकरीता सविस्‍तर लेखी अर्ज केला व विरुध्‍दपक्षाच्‍या  कार्यालयात जाऊन अनेकदा विनंती केली परंतू विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीची दखल न घेता आजपर्यंत तक्रारकर्त्‍याची रक्‍कम परत करण्‍यास कोणत्‍याही प्रकारचे सहकार्य दाखविले नाही. तक्रारकर्ते हे ज्‍येष्‍ठ नागरीक असुन त्‍यांना त्‍यांच्‍या नोकरीतून निवृत्‍त झाल्‍यानंतर मिळालेली सर्व रक्‍कम त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांच्‍याकडे जमा ठेवीच्‍या स्‍वरुपात ठेवलेली होती. तक्रारकर्ता पुढे नमुद करतो की त्‍यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्‍याचप्रमाणे उतारवयातील शारिरीक दुखन्‍यावर औषधोपचार करण्‍याइतका पैसा सुद्धा तक्रारकर्त्‍याकडे उपलब्‍ध नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याला चार मुली आहेत. त्‍यापैकी एका मुलीचे लग्‍न होणे बाकी आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या अशा सर्व वागण्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास आर्थिक शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास जिल्‍हा ग्राहक मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले व त्‍यांनी आपल्‍या तक्रारीत पुढीलप्रमाणे मागण्‍या केलेल्‍या आहेत.

  1. न्‍यायमंचाने विरुध्‍द पक्षास असे निर्देश द्यावे की, तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेव केलेली रक्‍कम व बचत खात्‍यात जमा असलेली अशी एकूण रक्‍कम रुपये ९,२१,०१९/-, द.सा.द.शे. १८ टक्‍के व्‍याज दराने परत करावे. त्‍याचप्रमाणे मानसिक शारिरीक व आर्थिक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावे.
  1.  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना मंचाव्‍दारे रजिस्‍टर्ड पोस्‍टाने पाठविलेली नोटीस ‘घेण्‍यास नकार’ या शे-यासह परत आली. त्‍यामुळे दिनांक ४/९/२०१९ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने निशानी क्रमांक २ वर दाखल दस्‍ताऐवजामध्‍ये मुदत ठेव पावत्‍या, तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या संस्‍थेमध्‍ये खाते असल्‍याचे पासबुक त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेवीची रक्‍कम परत मिळण्‍याकरीता दिलेले पञ इत्‍यादी संलग्नित आहे. तसेच तक्रारकर्त्‍याचा लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे 

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ या संस्‍थेचा फार जुने खातेदारक/ग्राहक आहे. त्‍यांचे संस्‍थेकडे बचत ठेव खाते असून त्‍याचा खाता क्रमांक २५५९ असा आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे त्‍यांच्‍या गोड बोलण्‍यावर व आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांच्‍याकडे आयुष्‍यभर कमावलेली रक्‍कम १८१ दिवसांकरीता मियादी जमा (Fixed Deposit)  म्‍हणून गुंतवणूकर करण्‍याचे ठरविले व त्‍यानूसार तक्रारकर्त्‍याने वरील  परिशिष्‍ट ‘अ’ प्रमाणे  एकूण रक्‍कम रुपये ८,३३,८५२/- विरुध्‍द पक्षाच्‍या  संस्‍थेत जमा केली. सदरची रक्‍कम तक्रारकर्त्‍यास व्‍याजासहीत परत करण्‍याची विनंती केली होती. परंतू विरुध्‍द पक्षांनी सदरहु रक्‍कम देण्‍यास ते असमर्थ असल्‍याचे सांगून सदरच्‍या रकमेपैकी काही किरकोळ रक्‍कम तक्रारकर्त्‍यास देऊन उर्वरीत रक्‍कम ४,६१,२५९/- तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यामध्‍ये जमा ठेवली आहे. त्‍याचप्रमाणे परिशिष्‍ट मधील मुदत ठेव क्रमांक ५ ते ८ या जमा ठेवींची मुदत ७/२/२०१८ रोजी संपलेली आहे. तक्रारकर्त्‍यास ही रक्‍कम त्‍वरील पाहिजे असल्‍याकारणाने त्‍याने विरुध्‍दपक्षांना विनंती केली होती. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांनी त्‍यांची दखल न घेता विरुध्‍द पक्षास धमकावले व सदरची जमा ठेवीची रक्‍कम परत करण्‍यास नकार दिला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक २२/१२/२०१७ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांच्‍याकडे त्‍यांच्‍या बचत खात्‍यात व इतर जमा असलेली रक्‍कम परत मिळण्‍याकरीता सविस्‍तर लेखी अर्ज केला व विरुध्‍दपक्षाच्‍या कार्यालयात जाऊन अनेकदा विनंती केली परंतू विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीची दखल न घेता आजपर्यंत तक्रारकर्त्‍याची रक्‍कम परत करण्‍यास कोणत्‍याही प्रकारचे सहकार्य दाखविले नाही. तक्रारकर्ते हे ज्‍येष्‍ठ नागरीक असुन त्‍यांना त्‍यांच्‍या नोकरीतून निवृत्‍त झाल्‍यानंतर मिळालेली सर्व रक्‍कम त्‍यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांच्‍याकडे जमा ठेवीच्‍या स्‍वरुपात ठेवलेली होती. तक्रारकर्ता पुढे नमुद करतो की त्‍यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे त्‍याचप्रमाणे उतारवयातील शारिरीक दुखन्‍यावर औषधोपचार करण्‍याइतका पैसा सुद्धा तक्रारकर्त्‍याकडे उपलब्‍ध नाही. विरुध्‍द पक्षाच्‍या अशा सर्व वागण्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास आर्थिक शारिरीक व मानसिक ञास सहन करावा लागला  ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती सेवेतील ञुटी आहे. सबब खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची एकूण जमा रक्‍कम रुपये ८,३३,८५२/- परत करावे.
  3. विरुध्‍दपक्षाने प्रत्‍येक मुदत  ठेवीच्‍या परिपक्‍व दिनांक संपल्‍यापासुन ते तक्रारकर्त्‍याच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. १२ टक्‍के व्‍याज दराने तक्रारकर्त्‍यास द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञासाकरीता रुपये २५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  5. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  6. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.