Maharashtra

Nagpur

CC/391/2020

DR. SHRI. VIJAYKUMAR RAMKISAN SHAHU - Complainant(s)

Versus

POONAM URBAN CO-OPERATIVE SOCIETY LTD. NAGPUR - Opp.Party(s)

ADV. SHARAD V. BHUSARI

20 Dec 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/391/2020
( Date of Filing : 08 Oct 2020 )
 
1. DR. SHRI. VIJAYKUMAR RAMKISAN SHAHU
R/O. 21, SHARVASHREE NAGAR, UMRED ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. POONAM URBAN CO-OPERATIVE SOCIETY LTD. NAGPUR
OFF.AT, 6 SIRSIKAR BHAVAN, SARVESHWAR MANDIR, RESHIMBAGH MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. POONAM URBAN CREDIT CO-OP. SOCIETY LTD., THROUGH PRESIDENT
OFF.AT, 6 SIRSIKAR BHAVAN, SARVESHWAR MANDIR, RESHIMBAGH MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
3. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR THROUGH SECRETARY
OFF.AT, 6 SIRSIKAR BHAVAN, SARVESHWAR MANDIR, RESHIMBAGH MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
4. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR THROUGH MANAGER
OFF.AT, 6 SIRSIKAR BHAVAN, SARVESHWAR MANDIR, RESHIMBAGH MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
5. POONAM URBAN CREDIT CO OP SOCIETY LTD NAGPUR THROUGH ADMINISTRATOR
OFF.AT, 6 SIRSIKAR BHAVAN, SARVESHWAR MANDIR, RESHIMBAGH MAIN ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHARAD V. BHUSARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 20 Dec 2022
Final Order / Judgement

                                          आदेश

 

मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल अळशी यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.      तक्रारकर्त्‍याची तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्या अंतर्गत पंजीबध्‍द संस्‍था असून ती ग्राहकांनकडून ठेवी स्‍वीकारणे, कर्ज देणे, मुदत ठेवीवर आकर्षक व्‍याज देणे इत्‍यादी कार्य करते.   तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाकडे बचत खाते असल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या संस्‍थेत ठेव खाते क्रं. 8865 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 95876/-  11 महिन्‍याकरिता मुदत ठेवीत गुंतविले होते व सदरच्‍या रक्‍कमेवर 8.50 टक्‍के दराने व्‍याज देण्‍यात येणार असून त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 असून परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,03,345/- रुपये मिळणार होते. तसेच ठेव खाते क्रं. 8866 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 1,47,684/-  11 महिन्‍याकरिता गुंतविले होते व त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 असून परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,59,190/- मिळणार होते. त्‍याचप्रमाणे ठेव खाते क्रं. 8867 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 1,57,186/- 11 महिन्‍याकरिता गुंतविले असून त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 अशी होती व परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,69,429/- इतके मिळणार होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेवीची परिपक्‍व झालेली रक्‍कम मिळण्‍याकरिता अनेक वेळा लेखी व तोंडी विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 27.07.2020 रोजी पोलिस स्‍टेशनला तक्रार नोंदविली. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची परिपक्‍वता रक्‍कम न दिल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत दि. 10.08.2020 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन आपल्‍या तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची मुदत ठेवीतील परिपक्‍तवा रक्‍कम रुपये 4,31,964/- परिपक्‍वता तिथीपासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्ष 1 व 5 यांना आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर न  झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 29.11.2021  रोजी आदेश पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवज, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

अ.क्र. मुद्दे उत्‍तर

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?           होय

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?   होय 
  2.  काय आदेश ?                                   अंतिम आदेशानुसार 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेव खाते क्रं. 8865 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 95876/-  11 महिन्‍याकरिता मुदत ठेवीत गुंतविले होते व सदरच्‍या रक्‍कमेवर 8.50 टक्‍के दराने व्‍याज देण्‍यात येणार असून त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 असून परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,03,345/- रुपये मिळणार होते. तसेच मुदत ठेव खाते क्रं. 8866 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 1,47,684/-  11 महिन्‍याकरिता गुंतविले होते व त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 असून परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,59,190/- मिळणार होते. त्‍याचप्रमाणे ठेव खाते क्रं. 8867 प्रमाणे दि. 31.07.2017 रोजी रुपये 1,57,186/- 11 महिन्‍याकरिता गुंतविले असून त्‍याची परिपक्‍वता तिथी दि. 30.06.2018 अशी होती व परिपक्‍वता तिथीनंतर रुपये 1,69,429/- इतके मिळणार होते. अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याला दि. 30.06.2018 नंतर तिन्‍ही मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम  म्‍हणून रुपये 4,31,964/- मिळणार होते. हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  
  2.      तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम मिळण्‍याकरिता दि. 18.02.2019,  29.07.2019 व 08.07.2020 रोजी लेखी निवेदन देऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची मुदत ठेवीची परिपक्‍वता रक्‍कम परिपक्‍वता तिथीनंतर ही परत न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 27.07.2020 रोजी आर्थिक गुन्‍हे शाखा नागपूर शहर यांच्‍याकडे तक्रार दिली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेव खाते क्रं. 8865, 8866 व 8867 मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथीनंतर ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या  सेवेतील त्रुटी   असल्‍याचे  स्‍पष्‍टपणे दिसून येते.

       बब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                    अंतिम आदेश

   

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍यानी विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेव खाते क्रं. 8865, 8866 व 8867 मध्‍ये गुंतविलेली रक्‍कम परिपक्‍वता तिथीनंतर होणारी एकूण रक्‍कम रुपये 4,31,964/- व त्‍यावर तक्रार दाखल दिनांक 15.10.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम द्यावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 5 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.  
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.