व्दारा श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे, अध्यक्षा.
1. तक्रारकर्ता श्री रामप्रसाद मनिराम नागपूरे यांनी सदर ग्राहक तक्रारीत म्हटले आहे की, विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी त्यांना रुपये 7,000/- घेवून एका स्किमचे सदस्य व्हावयास लावले व 6 महिणे त्यांचेकडून रुपये 1000/- ची खरेदी केल्यास त्यांना रुपये 57,000/- मिळतील असे सांगून फसविले व 6 महिणे झाल्यावरही रुपये 57,000/- ही रक्कम न दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून ही रक्कम व्याजासह परत मिळावी, शारीरिक व मानसिक त्रासाचे व ग्राहक तक्रारीचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 त्यांच्या लेखी जबाबात म्हणतात की, तक्रारकर्ता हे स्किमचे
..2..
..2..
सभासद होवून डिस्ट्रीब्युटर झाले आहे व त्यांनी या प्रकरणात कंपनीला पार्टी केलेले नाही
त्यामुळे तक्रारकर्ता यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
3. तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली शपथपत्रे, कागदपत्रे, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, आर.सी.एम.च्या स्किम प्रमाणे ग्राहक हा त्या कंपनीचा डिस्ट्रीब्युटर बनतो व ग्राहकाला जोपर्यंत रुपये 57,000/- मिळत नाही तो पर्यंत प्रत्येक महिण्यात रुपये 1,000/- ची खरेदी करावी लागते व ड्रॉ प्रमाणेच एखादया विशिष्ट ग्राहकाला रुपये 57,000/- ही रक्कम मिळत असते. तक्रारकर्ता यांनी 4 महिने 1,000/- रुपये भरुन विरुध्दपक्ष यांचेकडून खरेदी केली आहे.
4. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी आर.सी.एम. स्किमची पूर्ण माहिती तक्रारकर्ता यांना न देता फक्त 6 महिण्यात 57,000/- मिळू शकतील अशी खोटी माहिती त्यांना दिली व त्यांना आर.सी.एम. योजनेचे सभासद बनवून घेतले. योजनेची पुरेपेर माहिती न देता तक्रारकर्ता यांना योजनेचे सभासद बनवून व त्यांना कबूल केलेली रक्कम न देणे ही विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी अवलंबलेली अनुचीत व्यापार पध्दती आहे.
5. तक्रारकर्ता यांनी सुरवातीला दिलेल्या रुपये 7,000/- पैकी रुपये 1,000/- हे विरुध्दपक्ष क्रमांक 1 यांनी त्यांना दिले होते, तर रुपये 6,000/- हे त्यांनी सोने गहाण ठेवून व्याजावर घेतले होते. विरुध्दपक्ष क्रमांक 3 तर्फे त्यांना रुपये 1500/- चे किट देण्यात आले आहे व रु. 1000/- हे कमिशन म्हणून देण्यात आले होते म्हणजेच तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांचेकडून रुपये 3500/- ही रक्कम मिळावयास पाहिजे.
6. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना योजनेची पुर्ण माहिती न देता त्यांची फसगत केली आहे. त्यामुळे सदर प्रकरणात कंपनीला पार्टी न करणे हे आवश्यक नाही.
असे तथ्य व परीस्थिती असतांना खालिल आदेश पारी करण्यात येत आहे.
आदेश
1. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई म्हणून रुपये 3500/-, शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 1,000/- दयावेत.
2. विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी आदेशाचे पालन हे आदेशाच्या तारखेपासून एक महिण्याचे आत करावे.