सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 04/2014
तक्रार दाखल झाल्याचा दि. 29/01/2014
तक्रार निकाल झाल्याचा दि. 19/11/2014
लक्ष्मी पेपर बॅग्स इंडस्ट्रीज लिमिटेड
द्वारा प्रोप्रायटर
श्री सोमदत्त शिवाजी चव्हाण
वय – 28 वर्षे, धंदा- व्यापार,
रा. प्लॉट नं.बी/24, एम.आय.डी.सी. एरिया,
कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
पायोनियर पेपर प्रॉडक्टस अॅंड मशीन
द्वारा प्रोप्रायटर
श्री कन्नान
कार्यालय- 220, लिंगाप्पा चेट्टी स्ट्रीट,
कोईंबतूर, तामिळनाडू - 641 001 ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री एस.एन. भणगे, श्री जी.टी. पडते.
विरुद्धपक्षातर्फे विधिज्ञ – श्री एस.जी. सामंत, श्री जी.एस. वारंग
निकालपत्र
(दि. 19/11/2014)
द्वारा : मा. प्रभारी अध्यक्ष, श्री कमलाकांत धर्माजी कुबल.
1) तक्रारदार यांस विरुध्द पक्ष यांनी सदोष व जुन्या पेपर बॅग्स मशीन नवीन म्हणून पुरविल्या तसेच रक्कम स्वीकारुनही एक मशीन पाठविली नाही. तसेच तक्रारदारास सदोष सेवा दिल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी स्वीकारलेली पूर्ण रक्कम परत मिळावी म्हणून सदरची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
2) सदर तक्रार दाखल झाल्यावर विरुध्द पक्ष यांना नोटीस बजावण्यात आली. विरुध्द पक्ष यांनी आपले म्हणणे नि.10 वर दाखल केलेले आहे.
3) दरम्यान तक्रारदार यांनी नि.17 वर पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष यांचेकडून रु.30,000/- (तीस हजार मात्र) मिळाल्याचे तसेच पेपर मशीन्सचे रोल्स मिळाल्याचे कथन केले आहे. तसेच तक्रारदार यांस विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ही तक्रार पुढे चालवायची नाही त्यामुळे तक्रार निकाली काढणेबाबत विनंती केलेली आहे. सदर पुरसीसला अनुसरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार यांनी दिलेल्या नि.17 वरील पुरसीसला अनुसरुन तक्रारदाराची तक्रार निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 19/11/2014
Sd/- Sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
दुरुस्ती पत्रक
तक्रारदार यांने दि.27/11/2014 वर अर्ज देऊन तक्रारदार याचे नाव ‘शिवाजी सोमदत्त चव्हाण’ ऐवजी ‘सोमदत्त शिवाजी चव्हाण’ आहे, असे नमूद करुन बदलासाठी अर्ज दाखल केला आहे. सदर अर्जावरील आदेशाप्रमाणे दि.19/11/2014 रोजीच्या नि.1 वरील तक्रारदार यांच्या नावामध्ये ‘श्री सोमदत्त शिवाजी चव्हाण’ अशी दुरुस्ती करणेत येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 27/11/2014
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग