Maharashtra

Nagpur

CC/10/182

Shri Arvind Vijay Nagrare - Complainant(s)

Versus

Pig Pros Enpet Agro India Pvt.Ltd. - Opp.Party(s)

Adv. S.M. Prasad

18 Aug 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/182
 
1. Shri Arvind Vijay Nagrare
Flat No. 305, 1271, Saibaba Apartment, Vaishali Nagar, Nagpur
...........Complainant(s)
Versus
1. Pig Pros Enpet Agro India Pvt.Ltd.
7, Ramkrushnanagar, Wardha Road, Nagpur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. S.M. Prasad, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक :18/08/2011)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 26.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          यातील सर्व प्रकरणात तक्रारकर्ते हे वेगवेगळे आहेत मात्र गैरअर्जदार समान आहे आणि तपशिल, वस्‍तुस्थिती, कायदे वषियक मुद्दे समान आहेत. त्‍यामुळे यात एकत्रीत निकाल देण्‍यांत येत आहे.
 
3.         यातील सर्व तक्रारकर्त्‍यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्र.1 ही एक कंपनी असुन इतर सर्व गैरअर्जदार हे संचालक आहेत. तक्रारकर्ते हे मध्‍यमवर्गीय सामान्‍य लोक आहेत, त्‍यांना गैरअर्जदारांनी भुलथापा देऊन गुंतवणूक केलेली रक्‍कम तीन पट करुन मिळेल, असे सांगून या योजनेत सहभागी करुन घेतले व त्‍यांना रक्‍कम गुंतवण्‍यांस सांगितले. गैरअर्जदारांनी यासंबंधी माहितीपत्रक वाटले ते अत्‍यंत आकर्षक होते. गैरअर्जदारांनी करारनामा करुन दिला आणि परताव्‍याकरता धनादेश सुध्‍दा दिले, मात्र प्रत्‍यक्षात दिलेले आश्‍वासना प्रमाणे व योजने प्रमाणे काहीही घडले नाही. योजना अशी होती की, तक्रारकर्त्‍यांनी गुंतवणूक करावी व त्‍याव्‍दारे विदेशात विकल्‍या जाणा-या डुक्‍करांची खरेदी करुन ते प्रत्‍यक्षात न देता त्‍यांचे गैरअर्जदार हे त्‍यांच्‍या आधुनिक फार्मवर पालन पोषण करणार होते. त्‍यांना वयस्‍क करुन त्‍यांची विदेशात विक्री करुन जवळपास तीनपट गुंतवणूकीपेक्षा जास्‍त देणार होते.
4.          तक्रारकर्त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, सदर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांची फसवणूक करुन त्‍यांनी नागपूरातील आपला व्‍यवसाय बंद करुन टाकला आणि तक्रारकर्त्‍यांसारख्‍या सामान्‍य नागरीकांची जवळपास 50 कोटी रुपयांची लुबाडणूक केली व तक्रारकर्त्‍यांची रक्‍कम परत केली नाही, तसेच गैरअर्जदारांनी दिलेले धनादेश वटल्‍या गेले नाही, अश्‍या प्रकारे तक्रारकर्त्‍यांची फसवणूक केल्‍यामुळे त्‍यांनी ही तक्रार मंचात दाखल केलेली. यातील तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारांकडे जमा केलेली रक्‍कम आणि इतर तपशिल व माहिती यासंबंधीचे विवरण खालिल प्रमाणे...

अ.क्र.
तक्रार.क्र.
तक्रारकर्त्‍याचे नाव
     गुंतवलेली रक्‍कम
दिनांक             रक्‍कम
मागणी केलेली रक्‍कम
 
1.
181/2010
विष्‍णूपंत उकंडराव वालवटकर
10.01.2009       
1,00,000/-
 
 
 
27.02.2009
 50,000/-      
 
 
एकूण रु. 
 1,50,000/-     
2,70,000/-
 
2.
182/2010
अरविंद विजय नगरारे      
12.02.2009
2,30,000/-
       
 
 
12.02.2009
 50,000/-      
 
 
एकूण रु. 
2,80,000/-
2,80,000/-
 
3.
183/2010       
सौ.शिल्‍पा भजनदास अंबादे  
06.04.2009       
 50,000/-
 50,000/-      
 
4.
201/2010       
मधुकर रामलाल ठाकरे
18.05.2009
 
 75,000/-
 
 
 
25.05.2009
 75,000/-
 
 
एकूण रु.
1,50,000/-
1,50,000/-
 
5.
202/2010
राजेंद्र गिरधारीलाल नागपूरे
31.01.2009
 45,000/-
       
 
 
11.04.2009       
 99,000/-      
 
 
एकूण रु.
 1,44,000/-     
1,44,000/-
 
6.
203/2010       
सुभाष चंदुलाल पटले
22.05.2009
 90,000/-
 
 
  
02.6.2009       
 25,000/-      
 
 
04.06.2009
 35,000/-      
 
 
एकूण रु.
 1,50,000/-
1,50,000/-
 
 
7.
295/2010
नत्‍थुजी अन्‍नाजी मडके
20.05.2009       
50,000/-
      
 
  
 
20.05.2009
 1,00,000/-     
 
 
एकूण रु.
 1,50,000/-     
1,50,000/-
 
8.
337/2010       
कु.पल्‍लवी कृष्‍णाजी सोनारे/ पल्‍लवी वजय बांगडे
 
 
2,50,000/-      
 
9.
338/2010
सौ. साधना कृष्‍णाजी सोनारे
 
 
2,50,000/-
 

 
            तक्रारकर्त्‍यांनी वरील प्रमाणे रकमेची मागणी द.सा.द.शे.24% व्‍याजासह व मानसिक त्रासापोटी प्रत्‍येकी नुकसान भरपाईपोटी रु.1,00,000/- व तक्रारीच्‍या खर्च मिळावा अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
5.          सदर प्रकरणात गैरअर्जदारांना पाठविण्‍यांत आलेल्‍या नोटीसेस परत आल्‍या म्‍हणून वर्तमान पत्रातून जाहीर नोटीस प्रकाशित करण्‍यांत आला. त्‍यानंतरही गैरअर्जदारांनी उपस्थित होऊन आपला लेखी जबाब दाखल केला नाही व कोणत्‍याही प्रकारे उत्‍तर दाखल केले नाही त्‍यामुळे मंचाने दि.09.02.2011 गैरअर्जदारांविरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केलेला आहे.
6.          सदर प्रकरणी तक्रारकर्त्‍याचा युक्तिवाद ऐकून निकालाकरीता नेमण्‍यांत आल्‍यानंतर प्रकरण क्रमांक 295/2010 मधे गैरअर्जदार क्र.3 व 7 तर्फे वकील उपस्थित झाले आणि तक्रारीची प्रत मिळावी यासाठी अर्ज केला व एकतर्फी आदेश रद्द करण्‍यासाठी स्‍वतःच्‍या सहीने अर्ज दाखल केला. मात्र कोणाचेही प्रतिज्ञालेख दाखल केले नाही त्‍यामुळे त्‍यांचा अर्ज नामंजूर करण्‍यांत आला
 
7.          तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात जाहीरातीचे बोशर, करारनामा, मिनीट्स ऑफ मिटींग व पावत्‍या या दस्‍तावेजाच्‍या छायांकित प्रती दाखल केलेल्‍या आहे.
 
8.          सदर तक्रार मंचासमक्ष दि.21.07.2011 रोजी युक्तिवादाकरीता आली असता तक्रारकर्ता हजर त्‍यांचा युक्तिवाद मंचाने ऐकला, गैरअर्जदार क्र.2 एकतर्फी. तक्रारीत दाखल दस्‍तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
 
                 -// नि ष्‍क र्ष //-
 
 
 
9.         सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍यांना गैरअर्जदारांनी दिलेल्‍या रकमेच्‍या पावत्‍या, करारनामा, वर्तमान पत्रातील जाहीरात पत्रक तसेच तक्रारकर्त्‍यांना दिलेले धनादेश आणि ते न वटता परत आले त्‍याबाबतच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍यातर्फे त्‍यांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकला, सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याला गैरअर्जदारांनी कोणत्‍याही प्रकारे खोडून काढले नाही वा कोणतेही बचावात्‍मक उत्‍तर किंवा दस्‍तावेज दाखल केले नाही. त्‍यामुळे सदर प्रकरणे गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केलेला आहे. सदर प्रकरणातील तक्रार क्र.337/2010 व 338/2010 मधील तक्रारकर्त्‍यांनी रक्‍कम जमा केल्‍याच्‍या पावत्‍या जोडलेल्‍या नाहीत व विवरणही दाखल केले नाही. त्‍यामुळे त्‍यांची तक्रार पुराव्‍या अभावी खारिज होण्‍यांस पात्र आहे.
 
10.         इतर तक्रारकर्त्‍यांनी आपल्‍या तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांव्‍दारे हे सिध्‍द केले आहे की, त्‍यांचेकडून प्रलोभन दाखवुन गुंतवणूक करुन घेण्‍यांत आली व कोणतीही सेवा दिली नाही वा त्‍यांनी गुंतवणूक केलेली रक्‍कम परत केलेली नाही, ही गैरअर्जदारांचे सेवेतील अनुचित व्‍यापार प्रथा असुन गैरअर्जदारांनी देऊ केलेली सेवेतील त्रृटी आहे. तसेच तक्रारकर्त्‍यांनी संबंधीत पोलिस स्‍टेशनला तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांविरुध्‍द फौजदारी प्रकरणे दाखल केलेली आहेत.
 
            प्रस्‍तुत प्रकरणात दाखल दस्‍तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परि‍स्थितीचा विचार करुन आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
      -// अं ति म आ दे श //-
 
1.    तक्रारकर्त्‍यांची तक्रारी अंशतः मंजूर करण्‍यांत येतात.
2.    तक्रार क्र.337/2010 व 338/2010 खारिज करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी एकलरित्‍या किंवा संयुक्‍तरित्‍या   तक्रार क्र. 181/2010 विष्‍णूपंत वालवटकर यांना रु.1,50,000/-, 182/2010     अरविंद नगरारे यांना रु.2,80,000/-, 183/2010 सौ. शिल्‍पा भजनदास अंबादे     यांना रु.50,000/-, 201/2010 मधुकर ठाकरे यांना रु.1,50,000/-, 202/2010       राजेंद्र नागपूरे यांना रु.1,44,000/-, 203/2010 सुभाष पटले यांना       रु.1,50,000/-, 295/2010 नत्‍थुजी मडके यांना रु.1,50,000/- गुंतवलेली      रक्‍कम जमा केल्‍याचे तारखांपासुन द.सा.द.शे.12% व्‍याजासह परत करावे.
3.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यांना प्रत्‍येकी मानसिक,  शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    गैरअर्जदारांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30       दिवसांचे आंत करावी अन्‍यथा गुंतवलेल्‍या रकमेवर द.सा.द.शे. 12% ऐवजी 15%      व्‍याज देय राहील.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.