तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* निकालपत्रः- श्री.एस.आर.सानप, सदस्य ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
एकतर्फा
1. सामनेवाले 1 हे दुरदर्शन संचाचे विक्रेते आहेत. सामनेवाले क्र 2 हे सामनेवाले 3 हयांचे उत्पादकाचे, अधिकृत दुरूस्ती करणारे आहेत. (Authorised Philips Service Centre ) तर सामनेवाले क्र 3 हे सदर दुरदर्शन संचाचे उत्पादक आहेत. तक्रारदार हे गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील रहिवासी आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्रमांक 1 यांचे कडून 34 inch flat Screen digital T.V(model No.34 PT 8322/69) फिलीप (इंडिया) अंधेरी (पूर्व), मुंबई यांचेकडून फेब्रृवारी 2006 मध्ये विकत घेतला होता. सदर दुरदर्शन संचास 1 वर्षाची वारंटी घेतलेली होती.
2. तक्रारदार यांचे कथनानूसार,2. तक्रारदार यांचे कथनानूसार, सप्टेंबर 2009 मध्ये सदर दुरदर्शन संचात बिघाड निर्माण झाला जसे विद्रृप चित्र दिसणे.( Distorted Picture) अतएव, तक्रारदारांनी सदर बिघाड दुरूस्तीसाठी, सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडे विनंती केली. त्यानंतर सामनेवाले क्रमांक 2 यांचे (दुरूस्ती करणारे) सेवा देणारे अभियंता (Service Engineer) हयांनी दिनांक 18.09.2009 रोजी सदर दुरदर्शन संचाची दुरूस्ती केली. यांचेकडून रू. 1,070/- सेवाप्रित्यर्थ सेवा शुल्क महणून घेतले व रितसर त्याची पावती दिली तक्रारदार (निशाणी अ पृ.क्र 8) त्यानंतर दुसरे दिवशी दुपारी 4 वाजता दुरदर्शन संच चालु केला असता, त्यातुन पडदा कोरा दिसु लागला त्यामूळे लागलीच तक्रारदारांनी सदर दुरदर्शन संच बंद केला व सदर बिघाडा बाबतची हकीकत सामनेवाले यांना कळविली व सामनेवाले यांनी तक्रारदाराना आशवस्त केले की, तक्रारदाराना आशवस्त केले की, दुरूस्तीसाठी आमचे सेवा देणारे अभियंता लवकरच दुरूस्तीसाठी पाठवू. परंतू वारंवार विनंत्या करूनही तक्रारदारास सामनेवाले क्रमांक 2 यांचेकडून दुरूस्तीची सेवा देण्यात आली नाही त्यामुळे तक्रारदारांना अशी खात्री झाली की, की, सामनेवाले क्रमांक 2 यांनी केलेली दुरूस्ती अयोग्य होती व तसेच सामनेवाले 2 हयांनी केलेली दुरूस्ती चुकीची होती म्हणुन संचात मोठा बिघाड झाला आहे तसेच सामनेवाले क्रमांक 2 हयांनाही ही गोष्ट त्यांचे लक्षात आली. म्हणुन सामनेवाले हे सेवा देण्याचे टाळाटाळ करू लागले परंतू सततच्या पाठपुरावामुळे सामनेवाले क्रमांक 2 हयांचे अभियंत्याने दिनांक 24.09.2009 रोजी संचाचे निरीक्षण केले आणि घोषीत केले की,केले की, संचातील पिक्चर टयुब (Picture Tube) पूर्णतः खराब झाली आहे व ती बदलावी लागेल. त्यानंतर तक्रारदारांना अभियंत्याच्या कथनाबाबत आश्चर्य वाटले. परंतू तरीही तक्रारदार हयांनी सामनेवाले क्रमांक 2 व सामनेवाले क्रमांक 3 यांचेकडेही वारंवार विनंत्या केल्या परंतु त्यांनी तक्रारदार यांना तेच तेच छापील साच्यातील उत्तरे देण्यात येत होती. तरीही तक्रारदारांचा सदर उत्पादकावर असलेला विश्वास हा डगमगु न देता, सामनेवाले क्रमांक 2 हयांना प्रतिपादन केले की, सदरची पिक्चर टयूब ही आपल्या अभियंत्याच्या चुकीच्या दुरूस्ती मुळे खराब झाली आहे. असे समजाऊन सांगीतले व त्यानंतर सामनेवाले क्रमांक 2 हयांचे प्रमुख श्री. रामस्वामी हयांनाही सदरच्या अभियंत्याच्या चुकीच्या दुरूस्तीबद्दल अवगत केले तरीही, त्यांनी समोपचाराने प्रकरण मिटवून दुरूस्ती करून देऊ अशी अपेक्षा व कथन तक्रारदारांकडे केले हयावरूनच त्यांनी त्यांच्या अभियंत्याची चूक होती हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केले. म्हणून तक्रारदार यांनी तात्काळ सदर सेवा अभियंत्याच्या ( Service Engineer) च्या चुकीच्या दुरूस्तीमुळे पिक्चर टयुब नादुरूस्त झाली हयाबाबतचे पत्रे सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांना लिहीली. त्याबाबतच्या पोचपावत्या पृ.क्र 1 ते 11 वर आहेत. उत्तरादाखल म्हणुन फक्त सामनेवाले क्रमांक 2 हयांनी सदर पत्रास उततर दिले पृ.क्र. 12 व त्यात विषद केले की, दररोजच्या वापरामुळे (Wear& Tear) संचाची पिक्चर टयुब खराब झाली आहे. शिवाय सदरचा संच हा 4 वर्षापूर्वीचा जुना संच आहे दुरूस्ती ही वारंटीच्या नंतरची असून मोफत दुरूस्ती होणार नाही व सदरचा खर्च नविन संचापेक्षा जास्त होईल असे सांगुन सामनेवाले क्रमांक 2 यांनी पूढे असेही कथन केले की, आपण एक प्रामाणिक ग्राहक आहात व सर्व बाबीचा विचार करता सामनेवाले क्रमांक 2 हयांनी तक्रारदारांना असे आशवस्थ केले की व अशी तयारी दर्शविली की जर आपली तयारी असेल तर सामनेवाले क्रमांक 2 हे आपणास एल सी डी टी.व्ही मॉडेल क्र. 32 PFL 5409 खास आपल्या साठी सवलतीच्या, किंमतीत, किंमत कमी करून रू. 40,000/-हजारा ऐवजी रू. 23,000/-, त्या संचाच्या बदल्यात देऊ असे सांगीतले. कारण त्या संचाचे सुटे भाग सध्या उपलब्ध नाहीत म्हणून खास सवलत देत आहोत. वरील प्रस्ताव तक्रारदारांना मान्य नसल्याने तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली व तक्रारीत अशी मागणी केली की-
(i) सदर दुरदर्शन संच कोणत्याही खर्चाविना मायक्रो सर्व्हिसेस हयांनी
दुरूस्त करून दयावा.
(ii) अथवा तसाच संच मिळावा जर दुरूस्त होत नसेल तर
(iii) नुकसान भरपाई पोटी, व मानसिक त्रासापोटी रू.40,000/-
मिळावे.
(iv) इतर आवश्यक ती भरपाई मिळावी.
3. सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांना तक्रारीच्या नोटीसा मिळाल्या असून पोचपावत्या प्राप्त आहेत सामनेवाले क्र 1,2 व 3 हयांनी आपली कैफियत दाखल करण्याचे टाळले आहे त्यामूळे सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांचे विरूध्द प्रकरण एकतर्फा निकाली करण्यात आले.
4. तक्रारदारानी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले व तोंडीयुक्तीवादही केला
4. प्रस्तुत मंचाने तक्रार, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, 5. प्रस्तुत मंचाने तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार, पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रेयांचे वाचन केले तसेच तक्रारदारांचा तोंडी युक्तीवादही ऐकण्यात आला. त्यानुसार तक्रार एकतर्फा निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 यांनी तक्रारदाराना दुरदर्शन संच दुरूस्तीची रक्कम स्विकारूनही दुरदर्शन संच व्यवस्थीत दुरूस्त केला नाही हया बाबी सामनेवाले यांच्या सेवासुविधा पूरविण्यामध्ये कसूर केली असल्याचे तक्रारादार सिध्द करतात काय ? | होय. | 2. | तक्रारदार हे सामनेवाले 1,2 व 3 हयांचे कडून दुरूस्तीची रक्कम, नुकसान भरपाईसह संचाची दुरूस्ती अथवा तसा दुसरा दुरदर्शन संच अथवा त्याच संचामध्ये नविन पिक्चर टयुब बसवून दुरूस्त करून मिळण्यास पात्र आहेत काय ? | तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. |
3 | अंतिम आदेश | तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
(अ) तक्रारदारानी आपल्या तक्रारीसह पुराव्याचे शपथपत्र व इतर कागदपत्रे दाखल केली. त्यावर सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 यांनी आपले म्हणणे दाखल करणेकामी नोटीस बजावणी होऊन सुध्दा सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हजर झाले नाही व आपली कैफियत ही दाखल केली नाही
(ब) तक्रारदारानी सामनेवाले क्र 2 हयांनी दुरूस्ती खर्चाचे रू 1,070/-,अदा केले होते. व तक्रारदाराची चुक नसतांनाही पुन्हा दुरूस्ती खर्चास त्यांनी मान्यता दिली होती असे कागदपत्रावरून दिसते.
(क) दुरूस्त केलेला दुरदर्शन संचाची पिक्चर टयुब ही दुरूस्ती करणा-या अभियंत्याच्या चुकीच्या दुरूस्तीमुळे खराब झाली आहे. त्यामुळे पिक्चर टयुबचा खर्च तक्रारदारानी सोसण्याचा प्रश्नच उदभवत नाही. फक्त पुन्हा दुरूस्ती खर्च मान्य केला होता तसेच संचाचे नविन सुटे भाग बदलण्याच्या खर्चास नकार कळविलेला होता.
(ड) तक्रारदारानी दुरूस्तीचा खर्च देण्याचे (Service charges) मान्य करूनही सामनेवाले क्रमांक 2 हयांनी पिक्चर टयुब खर्चाचा आग्रह धरून
(ज्या खर्चास तक्रारदार जबाबदार नाही, सामनेवाले क्रमांक 2 जबाबदार आहेत.) दुरूस्ती करण्याचे टाळाटाळ केली ही सिध्द झाली आहे.
(इ) सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांना वारंवार विनंत्या करून, पत्रव्यवहार करून, नोटीसा पाठवून ते हजर झाले नाहीत व आपली कैफियत दाखल करण्याची संधी मिळूनही सुध्दा त्यांनी ती टाळली असल्याने तक्रारदाराचे कथने अबाधीत राहतात. त्यामुळे सामनेवाले हयांनी सेवासुविधा पुरविणेकामी कसुर केली असल्याचे तक्रारदार सिध्द करतात.
(ई) अतएव, तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून सदरचा दुरदर्शन संच नविन पिक्चर टयूब बसवून व दुरूस्त करून मिळण्यास पात्र आहेत.
6. वरील सविस्तर चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 229/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांनी वैयक्तिक अथवा संयुक्त रित्या सदरचा दुरदर्शन संच नविन पिक्चर टयुब बसवून दोन महिण्याचे आत दुरूस्त करून दयावा.
3. सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली आहे असे जाहीर करण्यात येते.
4. सामनेवाले क्रमांक 1,2 व 3 हयांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रू. 5,000/-, तीन महिण्याचे आत दयावे अन्यथा दिनांक 18.09.2009 पासून 9% व्याजदराने व्याज दयावे लागेल असा आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.