जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/188 प्रकरण दाखल तारीख - 03/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 25/10/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.प्रभुदत्त नर्मदाप्रसाद उपाध्याय, वय वर्षे 58, धंदा व्यापार, रा.शशी प्लॉस्टीक उद्योग, अर्जदार. टी-14,एम.आय.डी.सी.नांदेड. विरुध्द. 1. मुख्य व्यवस्थापक, फिनोमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि, गैरअर्जदार 101 ए, दिव्या स्मृती टोयाटो शोरुम समोर, लिंक रोड, मलाड (वेस्ट) मुंबई -64. 2. शाखा व्यवस्थापक, फिनोमेनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि, गुरुनानक मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.शरद देशपांडे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड. पी.बी.आयाचीत. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील, अध्यक्ष) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, गैरअर्जदार क्र. 2 यांच्या एंजटने अर्जदारास पॉलिसीचे फायदे सांगीतल्या कारणांने अर्जदार दि.26 सप्टेंबर 2004 रोजी रु.770/- भरणा केला असून त्यानंतर प्रत्येक महिना रु.625/- अशा प्रकारे नियमाप्रमाणे 20 महिने पैसे भरले आहेत. गैरअर्जदार यांनी पॉलिसी क्र. जीएमए 191407 असे 2004 लिहीले आहे. कराराप्रमाणे मेडीक्लेम रु.15,000/- प्रत्येक वर्षी देय असते व बाकी फायदे असतात. अर्जदाराच्या डोळयाचे ऑपरेशन मार्च 2008 मध्ये डॉ.रवि के. अग्रवाल साई नेत्रालय, वजीराबाद नांदेड या ठिकाणी केले असता, त्या ठिकाणी अर्जदार यांना रु.6,756/- एवढा खर्च झाला होता. त्याबाबत अर्जदार संबंधीत गैरअर्जदार यांच्याकडे गेलो असता संबंधीत गैरअर्जदार यांनी अर्जदारास क्लेम देण्यास नकार दिला. माहे एप्रिल 2008 मध्ये अर्जदार पुन्हा दुस-या डोळयाचे ऑपरेशन करुन घेतले ते ऑपरेशन अर्जदार साई नेत्रालय वजीराबाद नांदेड या ठिकाणी केले आहे. त्यावेळी अर्जदारास रु.8,080/- एवढा खर्च आला. अर्जदारास गैरअर्जदार यांनी मेडीक्लेम देण्यास नकार दिला म्हणुन गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी झाली. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की,मार्च 2008 मध्ये झालेला खर्च रु.8,080/- व एप्रिल 2008 मध्ये ऑपरेशनबद्यल रु.6,756/- असे एकुण रु.14,836/- यावर राष्ट्रीयकृत बॅकेच्या व्याज दराने द्यावे. तसेच मानसीक त्रासापोटी रु.5,000/- व दावा खर्च म्हणुन रु.3,000/- गैरअर्जदाराकडुन मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची विमा पॉलिसी अर्जदाराच्या डोळयाच्या ऑपरेशन पर्यंत चालु नव्हती तर ती. दि.23/03/2008 पासुन खंडीत झाली होती त्यामुळे अर्जदाराला पॉलिसी प्रमाणे दवाखान्याचा खर्च देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. अर्जदार हे पुर्वीपासुनच त्यांच्या दोन्ही डोळयाच्या त्रासापासुन त्रस्त होते व भविष्यात दोन्ही डोळयाच्या ऑपरेशन करीता पैसा लागणार ही बाब जाणुन अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना स्वतःच्या आरोग्याची खोटी माहीती देऊन पॉलिसी काढल्याचे दिसून येते. अर्जदार यांनी मार्च 2008 व एप्रिल 2008 साली दोन्ही डोळयाच्या ऑपरेशन करीता झालेला खर्च व सादर केलेली बिले मान्य नाही. खरी गोष्ट म्हणजे अर्जदार यांनी त्यांचा मार्च 2008 मधील दावा नामंजुर केल्यानंतर गैरअर्जदार यांचे कार्यालयात एप्रिल 2008 मध्ये अर्जदार यांनी त्यांच्या दुस-या डोळयाचे ऑपरेशन बाबतचे कोणतेही वैद्यकिय बिल व इतर आवश्यक कागदपत्र सादर केली नाही. त्यावरुन असे दिसून येते की, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे पासुन काही तरी लपवून ठेवीत आहे. अर्जदार यांचे ऑपरेशन दोन वर्षापुर्वीचे असल्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24 ए प्रमाणे सदरील प्रकरण मुदतीबाहय आहे. गैरअर्जदार हे अर्जदार यांनी केलेली इतर विपरीत विधाने नाकबुल केली आणी असा उजर घेतला की, अर्जदाराचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदारांच्या सेवेतील त्रुटी सिध्द होते काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशाप्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे दि.26/09/2004 रोजी रु.770/- भरले व यानंतर प्रत्येक महीना रु.625/- याप्रमाणे 20 महिने रक्कम भरले व गैरअर्जदाराकडुन पॉलिसी मेंबरशिप क्र.जीएमए191407 ही घेतली आहे. गैरअर्जदारांना ही पॉलिसी मान्य आहे, याबद्यल वाद नाही व गैरअर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे दि.23/03/2008 पासुन ही पॉलिसी खंडीत झालेली आहे म्हणजे अर्जदाराच्या डोळयाचे ऑपरेशन झाले त्या वेळेस ही पॉलिसी लॅप्स झालेली होती. त्यामुळे क्लेम देण्याचा प्रश्नच येत नाही, असा उजर घेतला आहे. गैरअर्जदार असेही म्हणतात की, अर्जदारांना आधी पासुन डोळयाचा त्रास होता त्यासाठी पैसा लागणार ही बाब जाणून स्वतःच्या आरोग्याची खोटी माहीती देऊन पॉलिसी काढली. अर्जदाराने वर प्रतीउत्तर देतांना 20 हप्ते भरले आहेत तेंव्हा पुढील हप्ते जरी नाही भरले तरी त्यांना मेडीक्लेम मागता येतो, असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पॉलिसी दाखल केलेली नाही परंतु रु.770/- ही रक्कम भरल्या संबंधीची पावती व याप्रमाणे त्यांना दिलेले मेंबरशिप क्रमांक एवढे अर्धवट दाखल केले असून त्याखाली पॉलिसीचे काय काय बेनिफिट आहे याचे झेरॉक्स त्याखाली दाखल केले आहे. यामुळहे गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी सिंगल इकानॉमी पॉलिसीमध्ये रु.145/- व रेजीस्ट्रेशन चार्जेस रु.625/- हप्ता त्यांना एकुण रु.12,500/- भरणे होते. नऊ वर्षानंतर रु.25,000/- ही रक्कम मिळणार होती. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीत जो उल्लेख केला आहे ते महिन्यास रु.625/- भरले आहे असा उल्लेख केलेला आहे व ही पॉलिसी बॉशर पाहीले असता, सिंगल इकॉनामी पॉलिसीसाठी रु.600/- दर वर्षी असे म्हटलेले आहे इथे अर्जदारांनी संभ्रमात टाकले आहे की, त्यांनी महिना रक्कम भरले की, दर वर्षी भरले व दर वर्षी जर असे हप्ते भरले तर 2004 पासुन 2010 पर्यंत 16 हप्ते होतात. अर्जदाराचे म्हणणे की, त्यांनी 20 हप्ते भरले आहे, यात काहीही ताळमेळ दिसुन येत नाही. अर्जदाराने पॉलिसी दाखल न केल्यामुळे व हप्ता भरल्याचे पावत्या दाखल न केल्यामुळे नक्की किती त्यांनी हप्ते भरले या विषयी स्पष्ट असा पुरावा उपलब्ध नाही. अर्जदाराच्या डोळयाचे ऑपरेशन हे दि.20/03/2008 रोजी झाले. यानंतर दुस-या डोळयाचे ऑपरेशन हे एक महिन्याच्या आंत म्हणजे दि.04/04/2008 रोजी झाले या विषयी साई नेत्रालयचे डीस्चार्ज कार्ड दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदारांना या आधी डोळयाचा त्रास होता व त्यांनी तो लपविला म्हणजे सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट हा मुद्या यात आला. गैरअर्जदारांनी क्लेम कधी नाकारला हे स्पष्ट नाही. त्यामुळे लिमीटेशनचा मुद्या उपस्थित होणार नाही परंतु पॉलिसी अस्तित्वात नाही. पत्रकाप्रमाणे जो हप्ता दर वर्षाला भरावयाचा होता असे 2004 पासुन 2010 पर्यंतचे हप्ते ते 20 हप्ते होऊ शकत नाही. यात अर्जदारांनी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दाखल केले यातील 24 क्रमांकावर कॉपी ऑफ लॉस्ट अमाऊंट रिसीप्ट दि.28/02/2006 असे म्हटले आहे हे पत्रकाशी टॅली होत नाही. नि.24 वरील शेवटचा हप्ता फेनोमेनल हेल्थ केअर सेंटर यावर रु.12,500/- लिहीलेले आहे व तारीख दि.28/02/2006 अशी आहे. 2006 नंतर 2010 पर्यंत कुठलीही रक्कम भरलेली नाही. अर्जदाराने पत्रकाप्रमाणे जे पॉलिसीचे फायदे आहेत ते दाखवलेले आहे परंतु त्यांनी उल्लेख केलेले जे फायदे ते पॉलिसीला असले तरच मिळते. त्यामुळे याचे सविस्तर उल्लेख करण्याची गरज नाही. अर्जदाराने आपली तक्रार ही व्यवस्थीतपणे व स्पष्टपणे मांडली नाही व संदीग्ध निर्माण करणारी आहे. गैरअर्जदार यांचा पॉलिसी खंडीत झाल्याचा आक्षेप आम्ही मान्य करतो. वरील सर्व बाबींवरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्यात येतो. 2. संबंधीतांनी आपापला खर्च सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |