नि.24 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 242/2010 नोंदणी तारीख – 14/10/2010 निकाल तारीख – 29/1/2011 निकाल कालावधी – 109 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ अरुण बाबूराव पवार रा.प्लॉट नं.13, शाहुनगर, गोडोली, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री ए.आय.खान) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण तर्फे अध्यक्ष प्रशासकीय एस.ए.धुमाळ डेक्कन चौक, लक्ष्मीनगर, ता.फलटण ----- जाबदार क्र.1 जि. सातारा (अभियोक्ता श्री एस.डी.शिंदे) 2. व्यवस्थापक प्रसन्न जनार्धन भागवत फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण, डेक्कन चौक, लक्ष्मीनगर, ता.फलटण जि. सातारा 3. शाखा व्यवस्थापक, व्ही.व्ही.घाडगे फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शाखा सातारा, पोवई नाका, मरीआई कॉप्लेक्स जवळ, ता.जि. सातारा ----- जाबदार क्र.2 व 3 (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत रक्कम रु.25,000/- मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेली आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 2 व 3 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र. 2 व 3 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.1 यांनी नि.13 कडे लेखी म्हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत 2009 मध्ये संपली आहे. त्यानंतर संचालक मंडळाने राजीनामे दिले. त्यामुळे अप्पर निबंधक, सहकारी संस्था यांनी जनकल्याण पतसंस्था लि. कराडचे प्रशासक मंडळाची नेमणूक केली. त्यानंतर पुन्हा अप्पर निबंधक, सहकारी संस्था यांनी एस.जी.गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था यांची आश्रयाखाली प्रशासकीय मंडळाची नेमणुक केली. परंतु सदरचे मंडळास जाबदार संस्थेच्या दफतराचा चार्ज न मिळाल्याने त्यांनी फलटण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी खटला दाखल केला आहे. त्यानंतर अप्पर निबंधक, सहकारी संस्था यांनी श्री एस.ए.ढमाळ यांचे अध्यक्षतेखाली प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. या मंडळासही संस्थेच्या दफतराचा चार्ज मिळालेला नाही. अर्जदार यांनी ठेव ठेवली त्या कालावधीतील कार्यरत असलेले संचालक मंडळ हे ठेव परतीस जबाबदार आहेत. सबब जाबदार क्र.1 विरुध्द तक्रार रद्द व्हावी असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.1 यांनी नि.13 कडे म्हणणे देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.1 यांचे कथनानुसार जाबदार क्र.1 प्रशासकीय अध्यक्ष आहेत परंतु अद्याप संस्थेने रेकॉर्ड त्यांचे ताब्यात दिले नाही. सबब अर्जदारचे ठेवीबाबत माहिती नाही त्यांचेकडे अर्जदारने कधीही मागणी केली नाही, तक्रार मुदतीत नाही सबब फेटाळून लावावी असे कथन केले आहे. 5. निर्विवादीतपणे नि.16 सोबत दाखल कागदपत्रांनुसार जाबदार क्र.1 प्रशासकीय अध्यक्ष आहेत हे स्पष्ट आहे. तसेच अर्जदारने प्रतिशपथपत्र देवून जाबदार क्र.1 चे कथन नाकारले नाही तसेच जाबदार क्र.2 व्यवस्थापक व जाबदार क्र.3 शाखा व्यवस्थापक यांनीही हजर होवून जाबदार क्र.1 चे कथन नाकारले नाही. अर्जदारचा तक्रारअर्ज पाहता अर्जदारने जाबदार क्र.1 म्हणून प्रशासकीय अध्यक्ष, जाबदार क्र.2 म्हणून व्यवस्थापक व जाबदार क्र.3 म्हणून शाखा व्यवस्थापक यांना पक्षकार म्हणून सामील केले आहे. जाबदार क्र.2 व 3 हे संचालक नाही, जाबदार संस्थेतर्फे केवळ प्रशासकीय अध्यक्षांना पक्षकार केले आहे, सबब केवळ प्रशासकीय अध्यक्ष यांनी प्राधान्याने अर्जदार यांची रक्कम देणेबाबत प्रयत्न करावेत असा आदेश होणे न्याय होणार आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.5 सोबत नि.6 कडे ठेव पावतीची मूळ प्रत दाखल केली आहे. प्रस्तुत ठेव पावतीचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि.5/1 कडील ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार संस्थेने ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 5 सोबतच्या नि.6 कडील ठेवीची रक्कम पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी व ठेवीची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 यांनी प्राधान्याने तक्रारदार यांचे ठेवीची रक्कम देणेसाठी प्रयत्न करावेत तसेच या अर्जाचा खर्च रु.1,000/- ही देणेत यावा. जाबदार क्र.2 व 3 यांनी जाबदार क्र.1 यांना सहकार्य करावे. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 29/1/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |