नि.18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 272/2010 नोंदणी तारीख – 13/12/2010 निकाल तारीख – 7/3/2011 निकाल कालावधी – 84 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ सतिश हणमंत महाडीक रा.3/2, करंजे पेठ, सातारा महानुभव मठाशेजारी, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री पी.आर.इनामदार) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा तर्फे श्री शंतनू दुर्योधन रणनवरे, चेअरमन 2. श्री शंतनू दुर्योधन रणनवरे, चेअरमन, फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या.फलटण ता.फलटण जि.सातारा द्वारा रा.डॉ निलेश आर.जगताप, रॉयल हॉस्पीटल, अनुपम आर्केड, पुणे-सातारा रोड, कागल सर्पउद्यानाच्या मागे, पुणे-46 3. श्री सुधाकर गजानन कांबळे व्हाईस चेअरमन, फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि.सातारा माई बाजार, गोळीबार मैदान, फलटण जि.सातारा 4. मॅनेजर, विजया नामदेव खेडकर फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण, डेक्कन चौक, लक्ष्मीनगर, ता.फलटण जि. सातारा ----- जाबदार क्र.4 (वगळणेत आले) 5. व्यवस्थापक, श्री विकास घाडगे फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. प्रेस्टी चेंबर्स, 3 रा मजला, आय.डी.बी.आय.बँकेसमोर, पोवई नाका, सातारा ----- जाबदार क्र.1 ते 3 व 5 (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव ठेवलेली आहे. सदरच्या ठेवीची मुदत सन 2013 मध्ये संपणार आहे. परंतु अर्जदार यांना मुलीच्या लग्नासाठी व शिक्षणासाठी रकमेची आवश्यकता असलेने त्यांनी जाबदार यांचेकडे ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 3 व 5 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.4 यांना अर्जदारचे नि.16 चे अर्जावरील आदेशानुसार प्रस्तुत कामातून वगळण्यात आले. 4. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 5 सोबत नि.6 कडे ठेव पावतीची मूळ प्रत दाखल केली आहे. प्रस्तुत ठेव पावतीचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. सदर ठेवपावतीची मुदत संपलेली नाही. परंतु मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेवपावतीची रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. सबब, नि. 2 कडील अर्जदार यांचे शपथपत्र व नि.5/1 कडील ठेव रक्कम मागणीबाबतची अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवीची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदार यांनी अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि.5 सोबतची नि.6 कडील ठेवीची रक्कम पावतीवरील मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 5. जाबदार क्र. 5 हे व्यवस्थापक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र. 5 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र. 1 ते 3 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 5 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 6. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 3 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 5 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.6479 कडील रक्कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 7/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| | Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |