तक्रार क्र. 114/2015.
तक्रार दाखल दि.13-05-2015.
तक्रार निकाली दि.25-01-2016.
श्री. सुरेश चंदु नलवडे,
रा. मु.पो. विरळी, ता. माण, जि.सातारा .... तक्रारदार
विरुध्द
1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,
फलटण,ता. फलटण, जि.सातारा, तर्फे चेअरमन
श्री. हिंदूराव निलकंठराव नाईक निंबाळकर
2. श्री. हिंदूराव निलकंठराव नाईक निंबाळकर, चेअरमन
रा. गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण,
ता. फलटण, जि.सातारा.
3. श्री. सचिन सुधाकर कांबळे, व्हा.चेअरमन
रा. संभाजीनगर, फलटण,ता. फलटण, जि.सातारा.
4. श्री. समशेरसिंग हिंदूराव नाईक निंबाळकर, संचालक
रा. गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण,
ता. फलटण, जि.सातारा.
5. श्री. रविंद्र औदुंबर पवार, संचालक
रा. महतपुरा पेठ, फलटण, ता. फलटण जि.सातारा
6. श्री. सदाशिव मारुती गुरव, संचालक
रा. मु.पो. वडुज, ता. खटाव, जि.सातारा
7. श्री. दुर्योधन दत्तात्रय रणनवरे, संस्थापक/चेअरमन,
रा. रॉयल हॉस्पिटल, कमिन्स कंपनीच्या मागे,
कोथरुड, पुणे
8. श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे, माजी चेअरमन,
रा. सहजानंद सोसायटी, अनुपम आर्केड,
कात्रज सर्पोदयासमोर, पुणे
9. श्री. सुधाकर गजानन कांबळे, माजी व्हा.चेअरमन,
रा. माई बाजार, गोळीबार मैदान, फलटण,
ता. फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे–अँड.पी.आर.इनामदार.
जाबदार क्र.1 ते 6 तर्फे-अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र.7, 8 व 8 –एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे मु.पो.विरळी, ता.माण, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी आहेत. जाबदार क्र.1 पतसंस्था ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा अधिनियम, 1960 अन्वये नोंदणीकृत पतसंस्था असून सदर पतसंस्थेचा बँकींग हा व्यवसाय आहे. सदर व्यवसायाचे अनुषंगे विविध रकमा मुदतठेव म्हणून स्विकारलेल्या आहे. तसेच संस्थेच्या इतरही अनेक शाखा आहेत. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेच्या म्हसवड शाखेत खालील कोष्टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत ठेवी तसेच सेव्हींग खाते व रिकरिंग ठेव खातेमध्ये ठेवी ठेवलेल्या होत्या व आहेत.
1. तक्रारदार सुरेश चंदु नलवडे यांचे नावे ठेवलेल्या मुदतठेवींचा तपशील
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 3408 | 25,000/- | 11/08/2004 | 11/02/2011 |
2 | 3885 | 15,000/- | 21/12/2004 | 21/06/2011 |
3 | 4322 | 15,000/- | 15/06/2005 | 15/12/2011 |
4 | 6774 | 55,000/- | 13/12/2007 | 13/01/2009 |
5 | 7081 | 50,000/- | 02/07/2008 | 02/08/2009 |
2. रिकरिंग ठेव खाते क्र. 1/54 वरील रक्कम रु.12,000/-
3. सेव्हींग ठेव खाते क्र. 278 वरील रक्कम रु.3,457/-
वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना ठेवींची एकूण रक्कम रु. 1,75,457/- (रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न मात्र) व त्यावरील आजअखेरचे होणारे व्याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत. प्रस्तुत ठेवीची मुदत संपल्यानंतर तक्रारदारांनी ठेवीच्या रकमांची मागणी केल्यास व्याजासह रक्कम जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे. परंतू तक्रारदाराने वरील कोष्टकातील प्रस्तुत ठेवीच्या मुदती संपलेनंतर सदरचे मुदतठेवींचे नुतनीकरण करणेसाठी व ठेवीच्या रकमेची व्याजासह जाबदार यांचेकडे वारंवार मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्कम अदा केलेली नाही. प्रस्तुतच्या ठेवी या भविष्यातील उतार वयातील उदरनिर्वाहासाठी, भविष्यातील उपयोगासाठी ठेवलेल्या होत्या. ठेवींच्या मुदती संपलेनंतर मुलांच्या शिक्षणासाठी रकमेची अत्यंत आवश्यकता असतानाही सदरची रक्कम जाबदारांकडून मिळालेली नाही जाबदारांनी रक्कम आज देतो उद्या देतो म्हणून रक्कम देणेस टाळाटाळ केली व रकमा परत केल्या नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्हणून सदर ठेवीच्या सर्व रकमा व्याजासह मिळाव्यात व तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झालेला असलेने जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळावी म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 9 यांचेकडून तक्रार अर्जात नमूद सर्व ठेवपावत्यांची तसेच रिकरिंग ठेव व सेव्हींग खात्यातील ठेव अशी एकूण रक्कम रु. 1,75,457/- (रुपये एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न मात्र) त्यावरील व्याजासहीत जाबदार यांचेकडून वसूल होऊन मिळावी, सदर रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत सदर व्याजासह रकमेवर द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज, तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च रक्कम रु.25,000/- जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/5 कडे अनुक्रमे ठेवपावत्यांच्या व्हेरिफाईड प्रती, नि.5/6 कडे रिकरिंग ठेव खाते क्र.1/54 पासबुकाची व नि. 5/7 कडे सेव्हींग खाते क्र.278 पुस्तकाची व्हेरिफाईड प्रती, नि.5/8 कडे तक्रारदाराने जाबदारांना पाठवलेली नोटीस, नि.5/9 कडे दि. 31/32005 अखेर संचालक मंडळाची यादी, नि 5/10 कडे जिल्हा उपनिबंधकांचे आदेशाची प्रत, नि. 5/11 कडे जाबदाराला पाठवलेली नोटीस ‘Insufficient Address’ या पोष्टाचे शे-याने परत आलेला लखोटा, नि.26 कडे तक्रार अर्जाचे पृष्ठयर्थ्य दिलेले अँफीडेव्ही व कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा अशी पुरसीस, नि. 27 कडे लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 ते 6 यांनी नि.24 कडे म्हणणे, नि. 25 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि.28 कडे जाबदार क्र. 1 ते 6 यांनी दाखल केलेले म्हणणे, अँफीडेव्हीट व दाखल केलेली कागदपत्रे हेच पुराव्याचे अँफीडेव्हीट व लेखी युक्तीवाद समजणेत यावा अशी पुरसीस, नि.30 चे कागदयादीसोबत नि.30/1 कडे जाबदार पतसंस्थांचा सहकार कायदा कलम 88 चा चौकशी अहवाल, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.
i तक्रारदाराचा तक्रार अर्ज मान्य व कबूल नाही, तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान कोणताही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होत नाहीत. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
ii तक्रारदाराने जाबदार पतंस्थेत कधीही ठेव ठेवलेली नव्हती व नाही. तसेच तक्रारदाराने जाबदारांकडे कधीही ठेवीच्या रकमेची मागणी केली नव्हती व नाही. मुळातच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक नसलेने तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.
Iii जाबदार ही पतसंस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा,1960 चे तरतूदीनुसार नोंदवलेली सहकारी संस्था असून सहकार कायद्याच्या तरतूदीप्रमाणे जाबदार संस्थेचा कारभार चालतो. त्यामुळे संस्थेबाबत काही तक्रारी असल्यास त्या महाराष्ट्र सहकारी कायदा कलम 91 प्रमाणे सहकारी कोर्टामार्फत निवारण केल्या जातात त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज या मे मंचात चालणेस पात्र नाही.
iv तक्रारदाराने प्रस्तुत संस्थेचे ठेव ठेवली त्यावेळीचे चेअरमन शंतनू रणवरे, दुर्योधन रणवरे व त्यावेळचे संचालक मंडळतील सदस्य व व्यवस्थापक यांचेबरोबर चर्चा करुन ठेवल्या होत्या. त्यावेळचे संचालक मंडळाने संस्थेचे कामकाज व्यवस्थितपणे पाहीले नाही, चेअरमन, संचालक व व्यवस्थापक यांनी अपहार केल्याने संस्थेची आर्थीक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली. तसेच त्यामुळे जाबदार पतसंस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा, 1960 कलम 88 नुसार दि.3/7/2009 ते दि.27/6/2011 चे दरम्यान चौकशी अधिकारी श्रीमती जयश्री अरविंद जाधव, निवृत्त सहकारी न्यायाधिश यांचेमार्फत चौकशी होऊन संस्थेच्या संपूर्ण गैरकारभारास व अपहारास त्यावेळचे सन 2007 सालचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य यांचेवर रक्कम रु.35 कोटी 23 लाख एवढया रकमेची आर्थिक जबाबदारी निश्चित करणेत आली आहे. प्रस्तुत चौकशी अहवाल याकामी दाखल केला आहे. त्यामुळे तक्रार अर्जात नमूद जाबदार यांचेवर तक्रारदाराचे ठेवीची रक्कम अदा करणेची जबाबदारी येत नाही. प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. प्रस्तुत जाबदार यांचेविरुध्द सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. प्रस्तुत जाबदार हे मा. मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेकडील रिटपिटीशन नं.5222/2009 तसेच रिटपिटीशन नं.5223/2009 यामधील निकालाप्रमाणे जाबदार हे तक्रारदाराची कोणतीही ठेव देणेस जबाबदार नाहीत. प्रस्तुत जाबदार यांनी सामाजिक बांधीलकीतून ठेवीदारांची कष्टाची ठेव बुडू नये तसेच सामान्य ठेवीदारांवर अन्याय होवू नये या एकमेव धोरणांवरुन सदरची बुडीत गेलेली पतसंस्था चालविण्यास घेतली आहे. त्यामुळे पूर्वी झालेले व्यवहार व पूर्वी ठेवलेल्या ठेव रक्कम परत करण्याची कायदेशीर जबाबदारी ही चेअरमन शंतनू रणनवरे व त्यांचे संचालक मंडळावर येते. परंतू तक्रारदाराने प्रस्तुत शंतनू रणनवरे, चेअरमन व त्यांचे संचालक मंडळास याकामी पक्षकार म्हणून सामील केलेले नाही तर जाबदारांना केवळ त्रास देणेसाठी सदर जाबदारांविरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा. सदर संस्था अडचणीत असल्याने ठेवीदारांना रक्कम रु.10,000/- चे आत ज्यांच्या ठेवी आहेत त्या ठेवीदारांना मूळ रक्कम देणेकरीता महाराष्ट्र शासनाने संस्थेस दि. 31 मार्च 2010 रक्कम रु.1 कोटी 55 लाख 33 हजार 742 एवढया रकमेचे बिनव्याजी कर्ज, एक वर्ष मुदतीकरीता महाराष्ट्र शासनाने दिले आहे व महाराष्ट्र शासनाने रक्कम रु.10,000/- पेक्षा कमी ठेव असलेल्या ठेवीदारांना वरील रकमेचे वाटप केले आहे. आजअखेर जाबदार संस्था महाराष्ट्र शासनाचे रक्कम रु.1 कोटी 29 लाख देणे आहे. त्यामुळे कर्जदाराकडून वसूल झालेनंतर प्रथम महाराष्ट्र शासनाची रक्कम प्राधान्याने द्यावी लागते.
v तक्रारदाराने वैयक्तिकरित्या या जाबदार यांचेकडे कोणतीही ठेव ठेवलेली नाही, त्यामुळे तक्रारदार व सदर जाबदार यांचेमध्ये मुळातच ग्राहक व विक्रेता हे नाते निर्माण होत नाही. तसेच तक्रारदार यांनी वर नमूद केल्याप्रमाणे या तक्रार अर्जाचे कामी आवश्यक पक्षकार सामील केलेले नसल्यानेदेखील Non Joinder of Necessary Parties या तत्वाची बाधा येते. या सर्व बाबींवरुन तक्रारदा यांची तक्रार खोटी व लबाडीची आहे. सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे दिले आहे. तर जाबदार क्र. 7 ते 9 यांना तक्रार अर्जाची नोटीस मिळूनही प्रस्तुत जाबदार हे मे. मंचात हजर राहीलेले नाहीत. तसेच त्यांनी तक्रार अर्जावर कोणतेही म्हणणे/कैफीयत दाखल केलेली नाही. सबब जाबदार क्र. 7 ते 9 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहे. म्हणजेच जाबदार क्र.7 ते 9 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. त्यामुळे प्रस्तुतचे प्रकरण या जाबदारांविरुध्द एकतर्फा चालविणेत आले.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय? होय.
2. तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज
तत्वाची बाधा येते काय? होय.
3. जाबदाराने यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय? होय.
जाबदार क्र.7 ते 9 यांनी
4. अंतिम आदेश काय? खालील नमूद केलेप्रमाणे.
विवेचन
मुद्दा क्र.1 –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-
प्रस्तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेत खालील परिशिष्टात नमूद केलेप्रमाणे रकमा मुदतठेव योजनेत तसेच रिकरिंग खाते ठेव व सेव्हींग खाते ठेवींमध्ये रकमा गुंतविल्या होत्या व आहेत.
1. तक्रारदार सुरेश चंदु नलवडे यांचे नावे ठेवलेल्या मुदतठेवींचा तपशील
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 3408 | 25,000/- | 11/08/2004 | 11/02/2011 |
2 | 3885 | 15,000/- | 21/12/2004 | 21/06/2011 |
3 | 4322 | 15,000/- | 15/06/2005 | 15/12/2011 |
4 | 6774 | 55,000/- | 13/12/2007 | 13/01/2009 |
5 | 7081 | 50,000/- | 02/07/2008 | 02/08/2009 |
2. रिकरिंग ठेव खाते क्र. 1/54 वरील रक्कम रु.12,000/-
3. सेव्हींग ठेव खाते क्र. 278 वरील रक्कम रु.3,457/-
प्रस्तुत ठेवपावत्यांच्या व्हेरिफाईड प्रती याकामी तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/5 कडे दाखल केल्या आहेत. तसेच नि. 5/6 कडे रिकरिंग ठेव खाते क्र. 1/54 ची व नि. 5/7 कडे सेव्हींग खाते क्र. 278 ची सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. यावरुन तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे स्पष्ट होत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
मुद्दा क्र.2 व 3-
7. वर नमूद मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे. कारण- तक्रारदाराने सदर कामी जाबदार पतसंस्थेत ठेवीच्या रकमा सन 2007, 2008 या कालावधीत ठेवलेचे ठेवपावत्यांवरुन स्पष्ट होते. परंतू सन 2006 ते 2008 या कालावधीत जाबदार पतसंस्थेवर कार्यरत असणा-या संचालक मंडळास याकामी जाबदाराने आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते व कायदेशीर होणार होते. परंतु प्रस्तुत तक्रारदार यांनी सदर कालावधीत जाबदार पतसंस्थेवर कार्यरत असणा-या संचालक मंडळास आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नाही. सदरची बाब जाबदाराने नि. 30 चे कागदयादीसोबत दाखल केले जाबदार पतसंस्थेच्या चौकशी अहवालातील आदेशावरुन स्पष्ट होते. प्रस्तुत आदेशात यादी क्र. ब कडे दि. 31/3/2008 अखेर अस्तित्वात असले संचालक मंडळाची यादीवरुन स्पष्ट होते. तक्रारदाराने प्रस्तुत दि. 31/3/2008 अखेर कार्यरत असले संचालक मंडळास याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील करणे कायदेशीर व आवश्यक असतानाही तक्रारदाराने प्रस्तुत संचालक मंडळास याकामी आवश्यक पक्षकार म्हणून सामील केलेले नसलेने प्रस्तुत तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्वाची बाधा येते. तसेच प्रस्तुत तक्रार अर्जातील नमूद जाबदार क्र. 2 ते 6 यांचेविरुध्द प्रस्तुत नि. 30 सोबतचे नि.30/1 कडील चौकशी अहवालात कोणतीही जबाबदारी बसविलेली नसून प्रस्तुत जाबदार यांना कुठलीही रक्कम देणेकरीता जबाबदार धरलेले नाही असे स्पष्ट होते. त्यामुळे जाबदार पतसंस्था व जाबदार क्र.2 ते 6 यांनी प्रस्तुत तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा देणेचा प्रश्नच उदभवत नाही. मात्र जाबदार पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी तक्रारदाराचे ठेवी स्विकारुनदेखील तक्रारदार यांना मुदतीनंतर वारंवार मागणी करुनही तक्रारदारांचे ठेवीची रक्कम परत अदा केलेली नाही. त्यामुळे जाबदार संस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. वर नमूद कागदपत्रे नि. 30 चे कागदयादीकडील चौकशी अहवाल यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, सदर तक्रार अर्जातील जाबदार क्र. 2 ते 6 यांचेवर कोणतीही जबाबदारी बसविलेली नाही व सदर जाबदार प्रस्तुत जाबदार संस्थेच्या अपहारास व गैरकारभारास जबाबदार नाहीत असे स्पष्ट होत आहे. प्रस्तुत नि. 30 सोबत दाखल संस्थेच्या चौकशी अहवालात दि.31/3/2008 अखेर कार्यरत असलेल्या संचालक मंडळास म्हणजेच जाबदार क्र. 7 ते 9 यांना जबाबदार धरलेचे स्पष्ट होते. सबब सदर जाबदार क्र. 2 ते 6 यांना या जबाबदारीतून मुक्त करणे न्यायोचीत होणार आहे. मात्र जाबदार क्र.1 पतसंस्थेस व जाबदार क्र. 7 ते 9 यांना प्रस्तुत तक्रारदारांची ठेवीची रक्कम व्याजासह अदा करणेस जबाबदार धरणे न्यायोचित होईल असे या मे. मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच जाबदार क्र. 2 ते 6 यांना प्रस्तुत ठेवींच्या रकमा देणेच्या जबाबदारीसाठी जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. सबब जाबदार क्र. 2 ते 6 यांना जबाबदारीतून वगळणेत येते.
सबब वरील सर्व कागदपत्रे, विवेचन यांचा सविस्तर उहापोह करता, प्रस्तुत तक्रारदार यांची तक्रार अर्जात नमूद कोष्टकातील ठेवपावत्यांवरील सर्व ठेवींच्या रकमा प्रस्तुत ठेवपावतींवरील नमूद व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी तसेच रिकरिंग ठेव व सेव्हींग ठेव खात्यांवरील रकमा नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह देणेस जाबदार क्र. 2 ते 6 यांना जबाबदार धरणे न्यायोचीत होणार नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. परंतू जाबदार क्र. 1 पतसंस्थेस व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी प्रस्तुत तक्रारदाराचे वर नमूद कोष्टकांतील सर्व ठेवींच्या रकमा ठेवपावतीवर नमूद व्याजासह तसेच रिकरिंग खाते व सेव्हींग खाते मधील ठेवीच्या रकमा नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह परत करणेसाठी जबाबदार धरणे न्यायोचीत होणार आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
9. सबब आम्ही प्रस्तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदाराने जाबदार क्र. 1 पतसंस्थेत मुदत ठेव योजनेत गुंतविलेल्या खालील नमूद कोष्टकातील ठेवींची संपूर्ण रक्कम प्रस्तुत ठेवपावतीवर नमूद केले व्याजदाराने होणा-या व्याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जाबदार क्र. 1 पतसंस्थेस व जाबदार क्र. 7 ते 9 यांना जबाबदार धरणेत येते.
अ.क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव ठेवली तारीख | मुदत संपते तारीख |
1 | 3408 | 25,000/- | 11/08/2004 | 11/02/2011 |
2 | 3885 | 15,000/- | 21/12/2004 | 21/06/2011 |
3 | 4322 | 15,000/- | 15/06/2005 | 15/12/2011 |
4 | 6774 | 55,000/- | 13/12/2007 | 13/01/2009 |
5 | 7081 | 50,000/- | 02/07/2008 | 02/08/2009 |
| एकूण | 1,60,000/- | | |
3. जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी वर नमूद काष्टकातील मुदत ठेवींची सर्व रक्कम ठेव ठेवले तारखेपासून प्रस्तुत ठेवपावतीवर नमूद केले व्याजदाराने होणा-या व्याजासह तक्रारदार यांना अदा करावी.
4. प्रस्तुत ठेवींच्या एकूण व्याजासह रकमेवर ठेवीची मुदत संपले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने होणारी सर्व रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी तक्रारदार यांना अदा करावी.
5. जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी रिकरिंग ठेव खाते क्र. 1/54 वरील रक्कम रु.12,000/- प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत रिकरिंग खात्याच्या व्याजदराच्या नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह रक्कम अदा करावी.
6. जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी सेव्हींग ठेव खाते क्र. 278 वरील रक्कम रु.3,457/- प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत सेव्हींग खात्याच्या व्याजदराच्या नियमाप्रमाणे होणा-या व्याजासह रक्कम अदा करावी.
7. जाबदार क्र. 2 ते 6 यांना प्रस्तुत तक्रारदाराचे ठेवीची रक्कम अदा करणेच्या जबाबदारीतून वगळणेत येते/मुक्त करणेत येते.
8. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी तक्रारदारांना अदा करावेत.
9. वर नमूद सर्व आदेशाची पूर्तता जाबदार क्र. 1 पतसंस्था व जाबदार क्र. 7 ते 9 यांनी आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात करावी.
10. आदेशाचे पालन जाबदार यांनी विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.
11. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
12. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण-सतारा.
दि.25-01-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.