नि.29 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 110/2010 नोंदणी तारीख – 12/4/2010 निकाल तारीख – 1/7/2010 निकाल कालावधी – 79 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री रामचंद्र औदुंबर गानबोटे 2. सौ चंद्रकला रामचंद्र गानबोटे 3. शाम औदुंबर गानबोटे 4. सौ रंजना शाम गानबोटे 5. गोदावरी औदुंबर गानबोटे सर्व रा.प्लॉट नं.38, स्वामी विवेकानंदनगर, फलटण ता. फलटण जि. सातारा ----- अर्जदार (वकील श्री रामचंद्र घोरपडे) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण शाखा लक्ष्मीनगर, फलटण ता. फलटण जि. सातारा तर्फे प्रशासक सुनिल जे. गावडे, सहायक निबंधक कार्यालय, मार्केट कमिटी कंपाऊंड, फलटण ता. फलटण जि. सातारा 2. श्री शंतनु दुर्योधन रणनवरे, चेअरमन फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण द्वारा रा. डॉ निलेश आर. जगताप रॉयल हॉस्पीटल अनुपम आर्केड, पुणे-सातारा रोड, कात्रज, सर्प उद्यानाच्या मागे, पुणे-46 3. कु.विजया नामदेव खेडकर, शाखाप्रमुख फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा रा. कसबा पेठ, शिंपी गल्ली, फलटण जि. सातारा 4. श्री सुनिल जे. गावडे, प्रशासक फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता. फलटण जि. सातारा रा.सहायक निबंधक कार्यालय, मार्केट कमिटी कंपाऊंड, फलटण ता. फलटण जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. ठेवींची मुदत संपल्यानंतर अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.1 ते 4 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे नि. 18 ते 21 ला दाखल आहेत. जाबदार क्र. 1 ते 4 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 ते 6 कडे शपथपत्र दाखल केले असून नि.9 सोबत नि.10 ते 15 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. तसेच प्रस्तुत ठेवींची मुदत संपलेचेही स्पष्ट दिसत आहे. सबब, नि. 2 ते 6 कडील अर्जदार यांची शपथपत्रे पाहिली असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब ठेवींची मुदत संपलेनंतर अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 9 सोबतच्या नि. 10 ते 15 कडील ठेवींच्या रकमा पावत्यांवरील नमूद व्याजासह द्याव्यात व ठेवींची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 4. जाबदार क्र. 3 व 4 हे अनुक्रमे शाखाप्रमुख व प्रशासक असून संस्थेचे संचालक नाहीत किंवा ते संचालक असलेबाबतचा कोणताही पुरावा अर्जदारने दाखल केला नाही. सबब जाबदार क्र.3 व 4 यांना वैयक्तिक अर्जदारची ठेव रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत नसून संस्थेसाठी त्यांना रक्कम परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे. सबब जाबदार क्र.1 व 2 यांना स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र.3 व 4 यांना अर्जदारच्या रकमा परत करणेस जबाबदार धरणेत येत आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 5. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 व 2 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या व जाबदार संस्थेतर्फे जाबदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र. 7238, 013105, 13578, 7237, 013106, 013107 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 1/7/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| , | HONABLE MR. Mr. V.D.Deshmukh, PRESIDENT | , | |