नि.39 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 137/2010 नोंदणी तारीख – 13/5/2010 निकाल तारीख – 28/4/2011 निकाल कालावधी – 350 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री किसन दादासो शिंदे 2. सौ संध्या किसन शिंदे रा.कृष्णा कॉम्प्लेक्स, तेली गल्ली, महादेव मंदिराशेजारी समोर, फलटण ता.फलटण जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता ए.ए. राशीनकर) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा तर्फे समन्सची बजावणी चेअरमन श्री शंतनु दुर्योधन रणनवरे 2. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता चेअरमन श्री शंतनु दुर्योधन रणनवरे 3. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता माजी चेअरमन श्री दुर्योधन दत्तात्रय रणनवरे नं.2 व 3 द्वारा डॉ निलेश आर.जगताप रॉयल हॉसपीटल, अनुपम आर्केड, पुणे-सातारा रोड, कात्रज सर्प उद्यानाच्या मागे, पुणे-46 4. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता शाखा प्रमुख कु.विजया नामदेव खेडकर रा.कसबा पेठ, शिंपी गल्ली, फलटण ता.फलटण जि. सातारा 5. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता अकाऊटंट श्री प्रसन्न जनार्दन भागवत रा.विजय विहार अपार्टमेंट, कोळकी, ता.फलटण जि. सातारा 6. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता प्रशासक श्री सुनिल जे. गावडे रा.सहायक निबंधक सो कार्यालय, मार्केट कमिटी कंपाऊंड, फलटण ता. फलटण जि. सातारा 7. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री सुधाकर गजानन कांबळे, रा.माई बझार, गोळीबार मैदान, फलटण ता. फलटण जि. सातारा 8. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री नौशाद अलिखान पठाण रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण जि. सातारा 9. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता संचालक श्री राजेंद्र महादेव पवार रा. विवेकानंद नगर, हॉटेल रायगडजवळ, फलटण ता.फलटण जि. सातारा 10. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता सौ इला उदयसिंह भोसले रा. कुमार परिसर, कोथरुड, पुणे 11. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री श्रीपाद लक्ष्मण बक्षी, रा.बिरदेवनगर, जाधववाडी, ता.फलटण जि. सातारा 12. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री आण्णा बाळु शिंदे रा.ठाकुरकी (वाठार मळा) ता.फलटण जि. सातारा 13. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री अजितसिंह लालासो माने रा.माळशिरस, ता.माळशिरस, जि.सोलापूर 14. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री हणमंत महादेव गोरे रा.मु.पो. पाली, ता.कराड जि. सातारा 15. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री सुभाष यशवंत जाधव रा.मु.पो. कसबा पेठ, फलटण ता.फलटण जि. सातारा 16. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा करिता श्री सुरेश बापूराव कदम मु.पो. रहिमतपुर, ता.कोरेगाव जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.13/11/09 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 1,08,000/- व त्यावरील व्याज तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.1 ते 9, 11, 12, 14 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती प्रस्तुतकामी दाखल आहे. जाबदार क्र. 10, 13, 15 व 16 यांना प्रस्तुतकामी जाहीर नोटीस काढण्यात आली. परंतु जाबदार क्र.1 ते 16 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या तसेच नि. 5/1 ला अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस पाहिली. 4. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र.1 ते 5 व जाबदार क्र.7 ते 16 यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 5. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, अर्जदार यांनी याकामी जाबदार क्र.6 म्हणून जाबदार संस्थेवर नेमणूक करण्यात आलेल्या प्रशासकांना पक्षकार म्हणून सामील केलेले आहेत. परंतु अर्जदार हे सदरचे प्रशासकांचे ग्राहक कसे होतात याबाबत कोणताही सविस्तर खुलासा अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जात केलेला नाही. तसेच प्रशासकांची नेमणूक ही शासनाचे संबंधीत खात्याकडून संस्थेवर केली जाते. संस्थेच्या संचालक मंडळाकडून केल्या जाणा-या आर्थिक व्यवहाराशी प्रशासकांचा काहीही संबंध नसतो. सबब जाबदार क्र.6 यांना अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यास जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 6. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 ते 5 व जाबदार क्र.7 ते 16 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 5 व जाबदार क्र.7 ते 16 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 60800, 60802, 60803, 60804, 60810, 60809 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.6 यांचेविरुध्द नामंजूर करणेत येत आहे. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 28/4/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |