नि.47 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 264/2010 नोंदणी तारीख – 18/11/2010 निकाल तारीख – 14/07/2011 निकाल कालावधी – 241 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री. जगन्नाथ भिवा अहिवळे, रा. महतपुरा पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा 2. श्री. रविंद्र जगन्नाथ अहिवळे, रा.. महतपुरा पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता आर.सी. कोरडे) विरुध्द 1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण ता.फलटण जि. सातारा तर्फे अकौंटंट श्री. प्रसन्ना जगन्नाथ भागवत, रा. विजयविहार अपार्टमेंट, कोंळकी, फलटण (संस्थेच्या वतीने अकौंटंट श्री. प्रसन्ना जगन्नाथ भागवत, यांना या कामी समन्स काढणेत यावे ) 1. जाबदार क्र. 1 तर्फे अध्यक्ष श्री शंतनु दुर्योधन रणनवरे 1. 2. जाबदार क्र. 1 तर्फे उपाध्यक्ष श्री. सुधाकर गजानन कांबळे 3. जाबदार क्र. 1 तर्फे जनरल मॅनेजर कु. विजया नामदेव खेडकर 4. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. दुर्योधन दत्तात्रय रणनवरे 5. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. आण्णा बाळू शिदे, 6. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. अजितसिंह लालासो माने, 7. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. श्रीपाद लक्ष्मण बक्षी, 8. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. नौशाद अलिखान पठाण 9. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री राजेंद्र महादेव पवार 10. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री हणमंत महादेव गोरे 11. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक सौ. ईला उदयसिंह भोसले 12. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक कांचनमाला शंकर जाधव 13. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी, 14. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक श्री. लक्ष्मण शामराव बक्षी, ---- जाबदार क्र. 1 ते 15 ( एकतर्फा ) 15. जाबदार क्र. 1 तर्फे प्रशासक श्री. सतिश धुमाळ, सहायक निबंधकसो, फलटण ---- जाबदार क्र. 16 नं 2 व 5 रा. व्दारा. डॅ. निलेश आर. जगताप रॉयल हॉस्पिटल, अनुप मार्केट, पुणे-सातारा रोड, सर्प उद्यानाच्यामागे, कात्रज, पुणे 48. नं.12 रा. कुमार परिसर, कोथरुड, पुणे. नं. 7 रा. माळशिरस, जि. सोलापूर, नं. 11 रा. पाली खंडोबाची, ता. कराड, जि. सातारा इतर सर्व रा. फलटण, ता. फलटण, जि. सातारा न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे – 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजासहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.25/10/10 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु. 1,30,000/- व त्यावरील व्याज तसेच नुकसानभरपाई व मानसिक त्रासापोटी एकूण रक्कम रु.50,000/- , जाणेयेणेचा खर्च रु. 2,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. जाबदार क्र. 16 यांनी नि. 42 कडे म्हणणे देवून तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तसेच फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्था लि. फलटण या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट 2009 मध्ये संपली आहे. संस्थेचे सर्व संचालक मंडळाने राजीनामे दिल्यामुळे संस्थेचा कारभार पाहणेसाठी अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे अप्पर निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी श्री. ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे प्रशासकीय मंडळाची नेमणूक करणेत आली. प्रशासकीय मंडळास संस्थेचे रेकॉर्ड न मिळालेने मे. ज्युडि. मॅजि.वर्ग 1 यांचे कोर्टात फौजदारी खटला दाखल करुन त्याचे कामकाज चालू आहे परंतु अद्यापही दप्तराचा चार्ज मिळाला नाही. जाबदार क्र. 1 ते 15 यांनी संस्थेचा कारभार कायदेशिर तरतुदीनुसार पाहीला नसल्यामुळे संस्था आर्थिक अडचणित आली आहे. त्यामुळे जाबदार क्र. 1 ते 15 हेच अर्जदारांचे ठेवी देणेस जबाबदार आहेत. जाबदार हे शासकीय अधिकारी आहेत. त्यांचेकडील महाराष्ट्र शासनाचे व्यतिरिक्त संस्थेचे कामकाजाकरिता नेमणूक केलेली आहे. तक्रारदार यांच्या ठेव पावतीच्या रकमांशी जाबदार क्र. 16 यांचा कांहीही संबंध येत नाही व त्या देणेस हे जाबदार जबाबदार नाहीत तरी तक्रारदारांचा तक्रार प्रस्तुत जाबदारांचे विरुध्द खर्चासह नामंजूर करावी. 3. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र. 1 ते 15 यांना जाहीर नोटीसीने करणेत आली. परंतु जाबदार क्र.1 ते 15 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत केला आहे. 4 अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 6 सोबत दाखल केलेल्या 6/1 ते 6/9 कडील अर्जदार यांनी जाबदार यांना पाठविलेली नोटीस व नि. 7 ते 13 कडील दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या पाहिल्या. 5. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्कम व त्यावर ठेव पावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे होणा-या व्याजाची रक्कम देण्याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर व्याजासहित देय झालेली रक्कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार क्र. 1 ते 16 यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6. एक गोष्ट नमूद करणे जरुरीचे आहे की, अर्जदार यांनी याकामी जाबदार क्र.1 संस्थेतर्फे अकौंटंट श्री. प्रसन्न जगन्नाथ भागवत यांना जाबदार म्हणून सामील केले आहे. तथापि अकौंटंट हे संचालक नसलेने त्यांच्या अर्जदारांची ठेवीची रक्कम देणेची कायदेशीर जबाबदारी येत नाही. अकौंटंट हे संस्थेचे कर्मचारी आहेत सबब त्यांचेविरुध्द तक्रार रद्द करणे न्याय होणार आहे. तथापि अर्जदार यांनी जाबदार नं 16 म्हणून जाबदार संस्थेवर नेमणूक करण्यात आलेले प्रशासक पक्षकार म्हणून सामील केलेले आहे सबब जाबदार क्र. 1 संस्थेतर्फे जाबदार नं. 16 प्रशासक यांना जबाबदार धरणेत येत आहे. जाबदार क्र.16 यांना अर्जदारची ठेव रक्कम परत करण्यास वैयक्तिक जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 2 ते 16 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 2 ते 15 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या तसेच जाबदार नं. 16 यांनी जाबदार क्र.1 संस्थेकरिता प्राधान्याने अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 62980, 62981, 62982, 62983, 62984, 37605 व 37606 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. क. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 14/07/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |