Maharashtra

Satara

CC/15/20

shri Aknath narayan sans - Complainant(s)

Versus

phaltan nagari sah patsnstha - Opp.Party(s)

inamdar

03 Feb 2016

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

            मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                                       मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

                     तक्रार क्र. 20/2015.

                            तक्रार दाखल दि.2-2-2015.

                                    तक्रार निकाली दि.3-2-2016. 

 

  1. श्री.एकनाथ नारायण सणस.

2. कै. द्रौपदा नारायण सणस मयत-

  तर्फे- वारस तक्रारदार क्र.1.

  रा.वासोळे, पो.वाढे, जि.सातारा.        ....  तक्रारदार

         विरुध्‍द

1. फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्‍था मर्या.

   फलटण तर्फे अध्‍यक्ष- श्री.हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर,  

2. चेअरमन- श्री.हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर.

3. व्‍हा.चेअरमन श्री.सचिन सुधाकर कांबळे.

   रा.संभाजीनगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.

4. संचालक- श्री.समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर,

   क्र.1,2, व 4 रा.गोळीबार मैदान, संभाजीनगर,फलटण,

   ता.फलटण, जि.सातारा.

5. संचालक- रविंद्र औंदुबर पवार,

 रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.

6. संचालक- श्री.सदाशिव मारुती गुरव,

   रा.वडुज, ता.खटाव, जि.सातारा.

7. संचालक- श्री.हणमंत विठ्ठल कणसे,

   मु.पो.पिंपरद, ता.फलटण, जि.सातारा.

8. संचालक- श्री.ज्ञानेश्‍वर गणपत पिसे,

   रा.करकंब, ता.पंढरपूर, जि.सोलापूर.

9. संचालक- श्री.राजेंद्र किसन ननावरे,

   रा.महतपुरा पेठ, फलटण, जि.सातारा.

 

10. संचालक- श्री.नानासो पोपट इवरे,

    रा.टाकळवाडी, पो.फलटण, जि.सातारा.

11. संचालक- श्री.रविंद्र निवृत्‍ती शिंदे,

   रा.महतपुरा पेठ, फलटण, जि.सातारा.

12. संचालक- श्री.शिवाजीराव आण्‍णासो फडतरे,

    रा.फडतरवाडी, ता.फलटण, जि.सातारा.       

13. संचालक- श्री.सविता संतोष शिंदे,

    रा.पिंपरद, ता.फलटण, जि.सातारा.

14. संस्‍थापक-चेअरमन- दुर्योधन दत्‍तात्रय रणनवरे.

    रा.रॉयल हॉस्पिटल, कमिन्‍स कंपनीचे मागे,

    कोथरुड, पुणे.   

15. माजी चेअरमन- शंतनु दुर्योधन रणनवरे.

    रा.सहजानंद सोसायटी, अनुपम आर्केड,

    कात्रज सर्पोद्यानासमोर, कात्रज पुणे.

16. माजी व्‍हा.चेअरमन- श्री.सुधाकर गजानन कांबळे.

    रा.माई बाजार, गोळीबार मैदान, फलटण, जि.सातारा.   ....  जाबदार

                तक्रारदारातर्फे अँड.पी.आर.इनामदार. 

               जाबदार क्र.- 1 ते 5,7,9 व 10 ते 13- नो से.

               जाबदार क्र.6,8 व 14 ते 16- एकतर्फा.                                               

                              न्‍यायनिर्णय  

(सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्‍या यानी पारित केला)

                                                     

1.       तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-

      तक्रारदार हे अर्जातील नमूद पत्‍त्‍यावर रहाणेस असून तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 चे वारस आहेत.  तक्रारदार क्र.2 यांचे दि.13-11-14 रोजी निधन झाले आहे.  तक्रारदार क्र.1 यांनी स्‍वतःसाठी व तक्रारदार क्र.2 यांचेसाठी सदरची तक्रार दाखल केली असून तक्रारदार क्र.2 यांचे नावावर असणारी रक्‍कम वारस या नात्‍याने मिळणेसाठी तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. 

         जाबदार पतसंस्‍था ही कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी संस्‍था असून ग्राहकाकडून ठेवी स्‍वरुपात रकमा स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतपूर्व ग्राहकानी रकमा मागितलेस त्‍यांना रक्‍कम परत करणे अशा स्‍वरुपाचे हेतूने जाबदार पतसंस्‍था स्‍थापन झालेली आहे.  जाबदार क्र.1 व 2 संस्‍थेचे चेअरमन आहेत.  तर जाबदार क्र.3 ते 13 सध्‍याचे संचालक आहेत.  जाबदार क्र.14 हे संस्‍थापक-चेअरमन असून जाबदार क्र.15 हे माजी चेअरमन आहेत.   जाबदार क्र.16 हे माजी व्‍हा.चेअरमन आहेत.  तक्रारदारांनी (क्र.1 व 2) पतसंस्‍थेच्‍या सातारा येथील शाखेत मुदतठेवीपोटी, बचत व रिकरिंग खात्‍यावर रकमा ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत.   तसेच सातारा येथील शाखेत व्‍यवहार केलेला आहे.  कालांतराने सातारा शाखा ही बंद पडलेने मुख्‍य कार्यालयामार्फत व्‍यवहार झालेले आहेत.   तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत रकमा ठेवलेल्‍या असून त्‍याचे वर्णन खालीलप्रमाणे-             

                         कोष्‍टक क्र.1

       तक्रारदार क्र.1- श्री.एकनाथ नारायण सणस-  मुदतठेवीचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

मुदत ठेव रक्‍कम रु.

देय दिनांक

1

7215

7-6-2007

55,000/-

7-6-2013

2

5446

19-7-2006

30,000/-

19-1-2013

3

9332

22-9-2005

50,000/-

22-9-2008

4

8264

24-4-2008

 5,000/-

24-7-2008

5

8432

24-6-2008

25,000/-

24-9-2012

                            

                           कोष्‍टक क्र.2

    जाबदार पतसंस्थेने कोष्‍टक क्र.1 मध्‍ये दाखविलेल्‍या मुदतठेवीपोटी चेक्‍स दिले.

   

अ.क्र.

चेक क्र.

दिनांक

रक्‍कम रु.

1

302592

13-1-2009

9,770/-

2

302593

8-2-2009

51,882/-

3

302594

9-3-2009

95,535/-

 

 

                           कोष्‍टक क्र.3

    तक्रारदार क्र.1- श्री.एकनाथ नारायण सणस बचत खाते व रिकरिंग खात्‍याचा तपशील

     

अ.क्र.

खाते प्रकार

खाते क्र.

रक्‍कम रु.

तारखेअखेर जमा रक्‍कम

1

रिकरिंग

453/3/56

26,000/-

दि.8-8-2008

2

सेव्‍हींग

342/4/121

16,240/-

दि.14-1-2009

 

     

           तक्रारदार शेतकरी कुटुंबातील असून गरीब आहेत.  त्‍यांनी मुंबई येथे असताना त्‍यांची खोली विकून गावी येणेचे ठरवले, त्‍यामुळे खोली विकून आलेल्‍या रकमेचा मुलांचे शिक्षणासाठी व भवितव्‍यासाठी उपयोग होईल या विचाराने व विश्‍वासाने त्‍यानी जाबदार पतसंस्‍थेत ठेवी ठेवल्‍या.  परंतु मुदत संपणेपूर्वीच जाबदारानी सदरच्‍या मुदतठेवी जमा करुन घेतल्‍या व त्‍याचे बदल्‍यात चेक देऊन तक्रारदारांची फसवणूक केली कारण जाबदारानी दिलेले चेक हे वटलेले नाहीत.  खोटे न वटणारे चेक देऊन जाबदारांनी तक्रारदाराना शारिरीक व मानसिक त्रास दिलेला आहे.  तक्रारदारांची देय असणारी रक्‍कम अद्यापही त्‍यांना मिळालेली नाही.  त्‍यामुळे त्‍याना आर्थिक त्रास सोसावा लागत आहे तसेच तक्रारदार वयस्‍कर झालेने सततच्‍या आजारपणामुळे दवाखान्‍याचाही खर्च करावा लागत आहे.  तक्रारदारानी जाबदार संस्‍थेकडे देय असणा-या रकमेची लेखी व तोंडी मागणी करुनही जाबदारानी टोलवाटोलव करणेशिवाय आजपर्यंत काहीही केलेले नाही.  या सर्वांस कंटाळूनच तक्रारदारानी दि.22-12-14 रोजी वकीलांतर्फे जाबदाराना नोटीस पाठवून रकमांची मागणी केली.  परंतु सदरची नोटीस काही जाबदारांनी स्विकारली व काहीनी न स्विकारलेने त्‍या परत आल्‍या आहेत.  याचवेळी तक्रारअर्जास कारण घडले आहे.  तक्रारदारानी ठेवलेल्‍या रकमा त्‍यांना वेळेवर परत मिळाल्‍या नाहीतच  परंतु आजपावेतो त्‍यांना काहीही रक्‍कम मिळालेली नाही.  तक्रारदारांच्‍या रकमा वेळेत परत करणे हे जाबदारांचे कर्तव्‍य होते.  त्‍यांनी तक्रारदाराना द्यावयाची सेवा होती परंतु त्‍यानी ती न दिल्‍याने त्‍यांच्‍या सेवेत अक्षम्‍य त्रुटी निर्माण झाली आहे.   तक्रारदारानी ठेवी ठेवलेने ते पतसंस्‍थेचे ग्राहक ठरतात.  जाबदारांचे मुख्‍य कार्यालय फलटण, सातारा येथे असून सातारा शाखेत सदर मुदतठेवी ठेवल्‍याने या मंचाचे अधिकारक्षेत्रात व स्‍थळसीमेत कारण घडले आहे.   तक्रारदारानी खालीलप्रमाणे विनंती केली आहे-   तक्रादारांच्‍या बचत व रिकरिंग खात्‍यावरील ठेवी जमा करुन घेऊन त्‍याबाबत दिलेले चेक रक्‍कम रु.1,99,427/- व त्‍यावरील नियमाप्रमाणे होणारे व्‍याज जाबदारानी एक महिन्‍याचे आत तक्रारदारास अदा करावे.   प्रत्‍यक्ष रक्‍कम वसूल होईपर्यंत 15 टक्‍के व्‍याज मिळावे.  तक्रारदारास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी व नुकसानभरपाईपोटी रक्‍कम रु.2,00,000/-, तसेच अर्जाचे खर्चाचे रु.25,000/- मिळणेबाबत विनंती केली आहे. 

2.     सदर कामी जाबदाराविरुध्‍द एकतर्फा व नो से आदेश पारित झालेने जाबदारांतर्फे म्‍हणणे नाही.

      नि.3 कडे तक्रारदारांचा वकील नियुक्‍तीसाठी अर्ज, अर्ज मंजूर.  नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे तक्रारदारातर्फे अँड.पी.आर.इनामदार यांचे वकीलपत्र, नि.5 कडे तक्रारदारातर्फे कागदयादीने नि.5/1 ते 5/10 पर्यंत कागद दाखल, नि.6 कडे तक्रारदाराची पत्‍तापुरसीस, नि.7 कडे मंचाकडून जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसा, नि.8 ते 10 कडे जाबदार क्र. 1 ते 4 यांची अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेली पाकिटे, नि.11 ते 13 कडे जाबदार क्र.5,6 व 9 यांची रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेली पाकिटे, नि.14 ते 16 कडे जाबदार क्र.14 ते 16 यांची अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेली पाकिटे, नि.17 कडे जाबदार क्र.1 ते 5, 9,7 व 10 ते 13 तर्फे वकीलांचा वकीलपत्र व म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.18 कडे वकीलपत्र दाखल, नि.19 कडे अँड.कदम यांचा जाबदार क्र.1 ते 5,7,9 ते 13 तर्फे म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.20 कडे जाबदारांचा कागदपत्रे दाखल करणेसाठी परवानगी अर्ज, अर्ज मंजूर.  नि.21 कडे कागद दाखल, नि.21/1 कडे जाबदार पतसंस्‍थेचा ठराव क्र.6 चा उतारा, नि.22 कडे म्‍हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज नामंजूर व नो से चा आदेश पारित. नि.23 कडे तक्रारदाराचा जाबदार क्र.8,14 व 15 यांना फेरनोटीसीसाठी अर्ज, अर्ज मंजूर, नि.24 कडे जाबदाराना नोटीसा, नि.25 कडे जाबदार क्र.14 ची पोहोचपावती, नि.26 कडे जाबदार क्र.15 ची पोहोच, नि.27 कडे जाबदार क्र.8 चे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेले पाकिट, नि.28 कडे तक्रारदाराची पुरसीस की, अर्जासोबत दाखल केलेले कागद व प्रतिज्ञापत्र हाच पुरावा समजावा व याशिवाय पुरावा देणेचा  नाही, नि.29 कडे जाबदार क्र.1 ते 5, 7,9 व 10 ते 13 तर्फे युक्‍तीवाद दाखल, नि.30 कडे संचालक मंडळाची यादी दाखल करणेस परवानगी अर्ज, अर्ज मंजूर.  नि.31 चे कागदयादीने नि.31/1 व 31/2 कडे संचालक मंडळाची यादी, नि.32 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.33 कडे जाबदारांचा महत्‍वाचा आदेश घेणेसाठी तक्रार अर्ज बोर्डावर घेणेचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.34 कडे जाबदारांचा कागद दाखल करणेसाठीचा अर्ज, अर्ज मंजूर.  नि.35 चे यादीने जाबदार पतसंस्‍थेचा 88 खालील अहवाल दाखल.   

 

3.      तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेले पुरावे, जाबदारांचा लेखी युक्‍तीवाद तसेच लेखी व तोंडी युक्‍तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-    

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार

     असे नाते आहे काय?                                         होय.                          

 

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?       होय.

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 4.  अंतिम आदेश काय?                                तक्रार अंशतः मंजूर. 

 

विवेचन-  मुद्दा क्र.1-

 

4.         तक्रारदार क्र.1 हे वर नमूद पत्‍त्‍यावर रहात असून त्‍यांनी स्‍वतःचे व तक्रारदार क्र.2 (मयत) यांचे नावावर जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये मुदतठेवी तसेच बचत खाते रिकरिंग खाते यावर रकमा ठेवलेल्‍या होत्‍या.  तक्रारदार क्र.1 हे तक्रारदार क्र.2 चे कायदेशीर वारस आहेत.  सदर रकमांचा व्‍यवहार हा सातारा येथील शाखेत झाला आहे परंतु कालांतराने ती बंद पडलेने मुख्‍य कार्यालयामार्फत व्‍यवहार होऊ लागले.   

         जाबदार पतसंस्‍था ही लोकांकडून ठेवी ठेवून घेते, त्‍यावर त्‍यांना व्‍याज देते,  लोकांना कर्जे देते व त्‍यावर व्‍याज घेते तसेच लोकांचे बचत खाते काढते, त्‍यावरील त्‍यांच्‍या रकमांवर त्‍यांना व्‍याज देते अशा प्रकारे जाबदार क्र.1 पतसंस्‍थेचा व्‍यवहार आहे व या स्‍वरुपात ती लोकांना सेवा देते.  त्‍यामुळे लोकांमध्‍ये व जाबदार क्र.1 पतसंस्‍थेमध्‍ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण होते.  तक्रारदारानी जाबदार पतसंस्‍थेत मुदतठेवी ठेवलेने तक्रारदार हे ग्राहक ठरतात व जाबदार पतसंस्‍थेने त्‍या ठेवून घेतलेने व त्‍यावर व्‍याज दयावयाचे ठरविलेने  जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  म्‍हणून मुद्दा क्र.1चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

5.  विवेचन मुद्दा क्र.2-     तक्रारदार हे गरीब शेतकरी कुटुंबातील असून त्‍यांनी मुंबईतील त्‍यांची खोली विकून आलेल्‍या रकमेतून गावी आलेवर मुलांचे शिक्षण व भवितव्‍याचा विचार करुन जाबदार पतसंस्‍थेत ठेवी ठेवल्‍या.  परंतु ठेवींच्‍या मुदती संपणेपूर्वीच जाबदारानी मुदतठेवी जमा करुन घेतल्‍या व त्‍याबदल्‍यात चेक देऊन तक्रारदारांची फसवणूक केली कारण जाबदारांतर्फे दिलेले चेक हे बँकेत न वटल्‍याने तक्रारदारास रकमा मिळू शकल्‍या नाहीत.   खोटे न वटणारे चेक देऊन जाबदारानी तक्रारदारांची फसवणूक केलेमुळे तक्रारदारास शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे.  तक्रारदारानी वारंवार जाबदार पतसंस्‍थेतील ठेवींच्‍या रकमेची जाबदारांकडे मागणी केली.  जाबदारानी रकमा देणेस टाळाटाळ केलेमुळे दि.22-12-14 रोजी वकीलांतर्फे जाबदाराना नोटीस पाठवून रकमेची मागणी केली.  परंतु आजपावेतो तक्रारदारास रकमा मिळालेल्‍या नाहीत त्‍यामुळे तक्रारदारास सदर अर्ज दाखल करावा लागला आहे.  तक्रारदारांच्‍या मुदतठेवीच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत.     जाबदारानी तक्रारदारांच्‍या रकमा परत केल्‍या नसल्‍यामुळेच जाबदारांच्‍या कर्तव्‍यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्‍यांचेकडून दयावयाच्‍या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. म्‍हणून मुद्दा क्र.2चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

6.   विवेचन मुद्दा क्र.3-    जाबदार क्र.1 पतसंस्‍था ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली आहे.   ग्राहकाकडून ठेवीस्‍वरुपात किंवा बचत खात्‍याद्वारे रकमा स्विकारुन ग्राहकानी रक्‍कम मागितलेस त्‍यांच्‍या रकमा त्‍यांना सव्‍याज परत देणे तसेच ग्राहकांना कर्ज दिले असलेस त्‍यावर व्‍याज आकारणे या हेतूने स्‍थापन झालेली आहे.  तक्रारदारांनी जाबदार संस्‍थेकडे मुदतठेवी ठेवलेल्‍या आहेत. तक्रारदारांची मुदतठेवीची रक्‍कम जाबदारांनी ठेवून घेतली.  परंतु तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम परत मागितलेवर ती परत करणे ही जाबदारांची जबाबदारी असूनही जाबदारानी तक्रारदाराना रकमा परत न देता न वटणारे चेक देऊन त्‍यांची फसवणूक केली व अनुचित व्‍यापारी प्रथेचा पायंडा पाडला आहे.   जाबदार पतसंस्‍था ही साता-यातील असल्‍याने मे.मंचाचे अधिकारक्षेत्रात व स्‍थळसीमेतच कारण घडले आहे.  जाबदारांनी आजपावेतो तक्रारदारांच्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत व यास जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 हे वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार आहेत व जाबदार क्र.6 ते 18 हे संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार आहेत असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  जाबदारानी तक्रारदारांच्‍या  रकमा वेळेत सव्‍याज परत करावयास हव्‍या होत्‍या परंतु रकमा परत न करता त्‍याबदली न वटणारे चेक्‍स देणेत आले व त्‍यामुळेच तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होऊन त्‍यांना मानसिक त्रासही झालेला आहे.  या सर्वांस जाबदारच जबाबदार आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.   जाबदारांनी मुदतठेवीपोटी तक्रारदारांना चेक्‍स दिले परंतु ते न वटता परत आले.   म्‍हणून न वटलेल्‍या चेकवर  चेक दिलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.14 टक्‍के दराने व्‍याज देणे न्‍यायोचित ठरेल असे मे.मंचाचे मत आहे म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र. 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

       परंतु सदर कामी नि.35 कडे जाबदारांतर्फे पतसंस्‍थेचा 88 खाली झालेला चौकशीचा अहवाल कामात दाखल आहे व नि.31/1 कडे दाखल केलेली दि.31-3-2005 अखेरची व 31/2 कडे दाखल केलेली सन 2011-12 ते 2016-17 ची संचालक मंडळाची दाखल केलेली यादी विचारात घेता मे.मंचास जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2 ते 16 यांना जबाबदार धरणे न्‍यायोचित वाटते.

 

7          सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे, व जाबदार क्र.2,3 व 5 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे व जाबदार क्र.6 ते 16 यांना संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.  सदर बाबतीत आम्‍ही मे. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे.

 

8.         सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                             आदेश

1.  तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.

                           कोष्‍टक क्र.1

       तक्रारदार क्र.1- श्री.एकनाथ नारायण सणस-  मुदतठेवीचा तपशील

अ.क्र.

पावती क्र.

ठेव दिनांक

मुदत ठेव रक्‍कम रु.

देय दिनांक

1

7215

7-6-2007

55,000/-

7-6-2013

2

5446

19-7-2006

30,000/-

19-1-2013

3

9332

22-9-2005

50,000/-

22-9-2008

4

8264

24-4-2008

 5,000/-

24-7-2008

5

8432

24-6-2008

25,000/-

24-9-2012

                             

                        

                            कोष्‍टक क्र.2

    जाबदार पतसंस्थेने कोष्‍टक क्र.1 मध्‍ये दाखविलेल्‍या मुदतठेवीपोटी चेक्‍स दिले.

   

अ.क्र.

चेक क्र.

दिनांक

रक्‍कम रु.

1

302592

13-1-2009

9,770/-

2

302593

8-2-2009

51,882/-

3

302594

9-3-2009

95,535/-

 

 

                           कोष्‍टक क्र.3

    तक्रारदार क्र.1- श्री.एकनाथ नारायण सणस बचत खाते व रिकरिंग खात्‍याचा तपशील

     

अ.क्र.

खाते प्रकार

खाते क्र.

रक्‍कम रु.

तारखेअखेर जमा रक्‍कम

1

रिकरिंग

453/3/56

26,000/-

दि.8-8-2008

2

सेव्‍हींग

342/4/121

16,240/-

दि.14-1-2009

                              

2.    कोष्‍टक क्र.2 मध्‍ये दर्शविले अ.क्र.1 ते 3 वरील चेक क्र.302592, 302593 व 302594 वरील रकमांवर चेकवरील दर्शविले तारखेपासून  आदेश पारित तारखेपर्यंत द.सा.द.शे.14 टक्‍के दराने होणा-या सव्‍याज रकमा  जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकपणे तक्रारदार क्र.1 याना अदा कराव्‍यात. 

 

3.     कोष्‍टक क्र.3 मधील अ.क्र.1 मध्‍ये दर्शवले रिकरिंग क्र.453/3/56 वरील जमा असणा-या रक्‍कम रु.26,000/-वर दि.8-8-2008 पासून आदेश पारित तारखेपर्यत जाबदार पतसंस्‍थेच्‍या रिकरिंग खात्‍यावरील नमूद व्‍याजदराप्रमाणे होणारी सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी. 

 

 

4.    कोष्‍टक क्र.3 मध्‍ये दर्शविले अ.क्र.2 वरील बचत खाते क्र.342/4/121 वरील जमा रक्‍कम रु.16,240/-वर दि.14-1-2009 पासून आदेश पारित तारखेपर्यत जाबदार पतसंस्‍थेच्‍या नियमाप्रमाणे बचत खात्‍यावरील नमूद व्‍याजदराप्रमाणे होणारी सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार क्र.1 यांना अदा करावी. 

 

      

5.    जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदार यांस मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.12,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.6,500/-अदा करावेत.

 

6.    वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाचे आत जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकरित्‍या करावयाचे आहे.   तसे न केलेस आदेश पारित तारखेपर्यंत होणा-या एकूण सव्‍याज रकमेवर तक्रारदाराचे हाती रक्‍कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे लागेल.   

 

7.    वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाचे आत जाबदार क्र.1 पतसंस्‍था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तसेच जाबदार क्र.6 ते 16 यांनी संयुक्‍तीकरित्‍या करावयाचे आहे.   तसे न केलेस तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्‍वये दाद मागू शकतील.   

 

8.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला. 

 

9.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि. 3-2-2016.

 

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)  (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.