View 121 Cases Against Phaltan
mangal sdanad jagtap filed a consumer case on 28 Jan 2016 against phaltan nagari sah patsnstha in the Satara Consumer Court. The case no is CC/15/17 and the judgment uploaded on 22 Feb 2016.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 17/2015.
तक्रार दाखल दि. 29-1-2015.
तक्रार निकाली दि.28-1-2016.
मंगल सदानंद जगताप.
रा.गोंदवले खुर्द, ता.माण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्था मर्या.
फलटण तर्फे माजी चेअरमन-
श्री.शंतनु दुर्योधन रणनवरे.
2. संस्थेतर्फे संस्थापक माजी चेअरमन-
श्री.दुर्योधन दत्तात्रय रणनवरे.
क्र.1 व 2 रा.द्वारा डॉ.निलेश आर.जगताप,
रॉल हॉस्पिटल, अनुपम आर्केड, पुणे सातारा रोड,
कात्रज सर्पोद्यानाच्या मागे, पुणे 46.
3. माजी जनरल मॅनेजर-
कु.विजया नामदेव खेडकर.
रा.कसबा पेठ, शिंपी गल्ली, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
4. माजी मॅनेजर-
श्री.प्रसन्ना जनार्दन भागवत,
रा.विजय विहार, कोळकी, ता.फलटण,
जि.सातारा.
5. माजी व्हाईस चेअरमन-
श्री.सुधाकर गजानन कांबळे,
रा.माई बझार, गोळीबार मैदान, फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
6. चेअरमन- श्री.हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर,
रा.गोळीबार मैदान, संभाजीनगर,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
7. व्हाईस चेअरमन- श्री.हणमंत विठ्ठल कणसे,
रा.पिंपरद, ता.फलटण, जि.सातारा.
8. संचालक- श्री.समशेरसिंह हिंदुराव ना.निंबाळकर,
रा.गोळीबार मैदान, संभाजीनगर,फलटण,
ता.फलटण, जि.सातारा.
9. संचालक- रविंद्र औंदुबर पवार,
रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
10. संचालक- श्री.सचिन सुधाकर कांबळे,
रा.संभाजीनगर, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
11. संचालक- श्री.सदाशिव मारुती गुरव,
रा.वडुज, ता.खटाव, जि.सातारा.
12. संचालक- रिजवाना सज्जाद बारगीर,
रा.वानवडी, पुणे.
13. संचालक- श्री.ज्ञानेश्वर गणपत पिसे,
रा.करकंब, ता.पंढरपूर, जि.सोलापूर.
14. संचालक- श्री.सविता संतोष शिंदे,
रा.पिंपरद, ता.फलटण, जि.सातारा.
15. संचालक- श्री.रविंद्र निवृत्ती शिंदे,
रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
16. संचालक- श्री.नानासो.पोपट इवरे,
रा.टाकळवाड, ता.फलटण, जि.सातारा.
17. संचालक- श्री.राजेंद्र किसन ननावरे,
रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण, जि.सातारा.
18. संचालक- श्री.शिवाजीराव आण्णासो.फडतरे,
रा.फडतरवाडी, ता.फलटण, जि.सातारा. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.व्ही.पी.जगदाळे.
जाबदार क्र.- 1,2,3,5,11 ते 13- एकतर्फा.
जाबदार क्र.4,6 ते 10 व 14 ते 18 तर्फे- अँड. शर्मिला शिंदे. अँड.ए.आर.कदम.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे,सदस्या यानी पारित केला)
1. तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे दाखल केला आहे तो खालीलप्रमाणे-
तक्रारदार या वर नमूद पत्त्यावर रहात आहेत. जाबदार पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा कलम 1960 अन्वये रजिस्टर्ड झालेली पतसंस्था आहे. तिचे मुख्य कार्यालय फलटण येथे असून जाबदार पतसंस्थेचा सभासदांकडून ठेवी स्विकारणे, त्यावर कराराप्रमाणे व्याज देणे, तसेच गरजूंना कर्जाचा व्याजाने पुरवठा करणे असा व्यवसाय आहे. जाबदार क्र.1 ते 5 हे माजी चेअरमन, व्हा.चेअरमन व व्यवस्थापक आहेत. जाबदार क्र.6 ते 18 हे सद्यस्थितीत निवडून आलेले चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळ आहे. जाबदार पतसंस्थेचा पारदर्शी कारभार व ठेवींवरील आकर्षक व्याजदर यांचा विचार करुन भविष्यात आपणांस उपयोग होईल या दृष्टीकोनातून तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेच्या वडूज शाखेत मुदत ठेवी ठेवल्या. तसेच त्यांनी काढलेल्या त्यांच्या बचतखात्यावर काही रक्कम शिल्लक दर्शवते. तक्रारदारांच्या मुदतठेवी व बचतठेव खालीलप्रमाणे-
कोष्टक
अ.क्र. | पावती क्र. | ठेव दिनांक | रक्कम रु. | देय दिनांक |
1 | 13398 | 2-7-07 | 1,69,775/- | 2-7-2009 |
2 | 13397 | 2-7-07 | 1,69,775/- | 2-7-2009 |
3 | 5258 | 6-11-03 | 30,000/- | 6-11-2008 |
4 | 1278 | 14-11-03 | 25,000/- | 14-11-2008 |
5 | 13320 | 22-6-07 | 1,10,000/- | 22-6-2009 |
6 | बचत खाते क्र.714 | L.F.No.395 | 5,76,779/- | 25-10-08 रोजी शिल्लक
|
तक्रारदारास कौटुंबिक गरजेसाठी रकमेची नितांत गरज भासलेने तक्रारदार या जाबदार पतसंस्थेकडून मुदतठेवीच्या रकमा सव्याज परत मागणेसाठी जाबदार पतसंस्थेत गेल्या असता त्यांना मुदतठेवीची मुदत संपलेली असूनही पैसे मिळू शकले नाहीत. तक्रारदारानी वारंवार रकमेसाठी पतसंस्थेत चकरा मारल्या परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत. पैसे न मिळालेने त्यांचे कधीही भरुन न येणारे अपरिमित नुकसान झालेले असून त्याना शारिरीक व मानसिक त्रास झाला आहे व होत आहे. तसेच आर्थिक नुकसानही झाले आहे. त्यामुळे त्यांनी वकीलांतर्फे नोटीस पाठवून रकमेची मागणी केली परंतु त्यास कोणतेही उत्तर मिळाले नाही वा पैसेही परत मिळाले नाहीत. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले.
तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेत मुदतठेवी ठेवल्या व बचत खातेही काढले होते त्यामुळे त्या जाबदारांच्या ग्राहक आहेत. जाबदार हे त्यांच्या रकमेवर त्यांना व्याजासह पैसे मुदतपूर्तीनंतर परत करणार होते. त्यामुळे जाबदार हे तक्रारदाराना सेवापुरवठा देणारे ठरतात. तक्रारदार व जाबदारांमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण झाले आहे. जाबदारांनी दि.10-9-14 रोजी तक्रारदारांची नोटीस मिळूनही त्यास उत्तर दिले नाही वा पैसेही सव्याज परत दिले नाहीत, त्यावेळी प्रथम कारण घडले व घडतच आहे. जाबदार हे साता-यातील रहाणारे असल्याने सदरची तक्रार चालवणेचा मे.मंचास पूर्ण अधिकार आहे. तक्रारदारांची तक्रार मुदतीत असून सदरील मे.मंचाशिवाय अन्य कोठेही तक्रार दाखल केलेली नाही. तक्रारदारानी त्यांचे विनंतीमध्ये जाबदाराकडे ठेवलेल्या मुदतठेव रकमेवर व बचतठेव खात्यावरील रकमेवर 18 टक्के दराने व्याजासह रकमा मिळणेसाठीचे आदेश मे.मंचाने करणेबाबत विनंती केली आहे. तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत अशीही विनंती केलेली आहे. येणेप्रमाणे तक्रारअर्ज असे.
2. नि.31 कडे जाबदार क्र.4,6,7 ते 10 व 14 ते 18 यांनी खालीलप्रमाणे तक्रारदाराचे अर्जास म्हणणे दाखल केले आहे-
तक्रारदारानी सदर म्हणण्यामध्ये स्पष्ट रितीने मान्य केलेल्या बाबीशिवाय तक्रारदारांचे अर्जातील संपूर्ण मजकूर हा जाबदाराना अमान्य व नाकबूल आहे. तक्रारदारानी दाखल केलेल्या तक्रारअर्जातील संपूर्ण मजकूर हा खोटा, लबाडीचा व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे. सदर मजकूर जाबदाराना मान्य व कबूल नाही. अर्ज कलम 1 ते 6 व 7 ते 11 मध्ये नमूद केलेला सर्व मजकूर खोटा, लबाडीचा, बनावट आहे. अर्ज कलम 1 मध्ये तक्रारदारानी नमूद केलेला ठेवपावत्यांचा तपशील जाबदाराना मुळीच मान्य नाही. तक्रारदारानी जाबदारांकडे कधीही ठेव ठेवलेली नव्हती व नाही. जाबदार हे कधीही पतसंस्थेचे संचालक नव्हते व नाहीत. तक्रारदार हा संस्थेचा सभासद आहे. जाबदार क्र.4 हे वर नमूद पतसंस्थेचे व्यवस्थापक नव्हते व नाहीत. तक्रारदार व जाबदारांमध्ये कोणताही व्यवहार झालेला नाही, त्यामुळे सदर तक्रार तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होत नसल्याने खर्चासह फेटाळणेत यावी. तक्रारअर्ज दाखल करणेस कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रारदार व जाबदारांमध्ये ग्राहक व विक्रेता हे नाते निर्माण होत नाही.
जाबदार संस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे तरतुदीनुसार नोंदलेली संस्था असून तिचा कारभार सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार चालतो. संस्थेसंबंधी काही तक्रार वा वाद असलेस तो वाद सहकार कायदा कलम 91 प्रमाणे सहकारी कोर्टातर्फे निवारण केला जातो. तक्रारदार हे जाबदार संस्थेचे सभासद असलेने त्यांचा वाद हा 91 चे कक्षेत येतो त्यामुळे प्रस्तुत मंचासमोर ही तक्रार चालू शकत नाही. तक्रारदारांनी वर्णन केलेली वादातील ठेव ही त्यावेळचे चेअरमन शंतनु रणनवरे व संस्थापक दुर्योधन रणनवरे तसेच तेव्हाचे संचालक मंडळाचे सदस्य व व्यवस्थापक यांचेशी विचारविनिमय करुन ठेवलेली होती. तक्रारदारानी दाखल केलेल्या ठेवपावत्यावर जाबदारापैकी कोणाचीही सही नाही. जाबदार क्र.2 ची सही ठेवपावत्यांवर दिसून येते. जाबदार क्र.1 ते 3 यांचे कार्यकाळातील संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ व व्यवस्थापक यांनी संस्थेचे कामकाज नीट पाहिले नाही. संचालकांनी ठेवीदारांचे रकमेचा अपहार केला, योग्य गुंतवणूक केली नाही, त्यामुळे संस्थेची आर्थिक घडी कोलमडून व्यवहार ठप्प झाले व संस्था बंद पडली. जाबदार पतसंस्थेची सहकार संस्था कायदा 1960 चे कलम 88 नुसार चौकशी अधिकारी श्रीमती जयश्री जाधव निवृत्त सहकारी न्यायाधीशांमार्फत चौकशी होऊन संपूर्ण व्यवहारास जबाबदार असणारे त्यावेळचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळातील सदस्य यांचेवर आर्थिक जबाबदारी निश्चित करणेत आलेली आहे. म्हणजेच सदर कामातील जाबदार क्र.1 ते 3 यांना जबाबदार धरले गेले आहे. त्यामुळेच जाबदार क्र.1 ते 3 हेच तक्रारदारांचे ठेवी परत देणेस जबाबदार आहेत. तक्रारदारानी वैयक्तिकरित्या या जाबदारांकडे कोणतीही ठेव ठेवलेली नाही त्यामुळे तक्रारदार व सदर जाबदारांमध्ये ग्राहक व विक्रेता हे नाते निर्माणच होत नाही. त्यामुळे सदरची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी. येणेप्रमाणे जाबदाराचे म्हणणे आहे.
3. नि.3 कडे तक्रारदाराचा वकील नियुक्तीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे अँड.जगदाळे यांचे वकीलपत्र, नि.5 कडे तक्रारदारातर्फे कागदयादी दाखल, नि.5/1 ते नि.5/3 कडे मूळ मुदतठेव पावत्या व बचत खात्याचे पासबुक दाखल, नि.5/4 कडे तक्रारदाराचे वकीलांनी जाबदाराना पाठविलेल्या नोटीसची स्थळप्रत, नि.6 कडे तक्रारदाराचा अर्ज की, जाबदार क्र.1,2 व 12 हे पुण्यातील रहिवासी असून त्यांना या केसमध्ये पक्षकार करायचे आहे, सदरचा अपराध सातारा येथील कार्यक्षेत्रात घडला असल्याने जाबदार क्र.1,2 व 12 याना पक्षकार करणेस परवानगी मिळावी, अर्ज मंजूर. नि.7 कडे मंचाने पाठवलेल्या नोटीसा, नि.8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25 कडे जाबदार क्र. 13, 9,17,15,3,11,10,4,5,6,8,18,12,7,14,16,2,1 यांच्या रिफ्यूज्ड व अनक्लेम्ड शे-याने परत आलेले नोटीसचे लखोटे, नि.26 कडे जाबदार क्र.5,6,8 यांचा म्हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज मंजूर. नि.27 कडे जाबदारांचा मुदतीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.28 कडे जाबदार क्र.4,7,9,10,14 ते 18 तर्फे म्हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज मंजूर. नि.29 कडे जाबदार क्र.5,6,8 तर्फे म्हणणे देणेसाठी मुदत अर्ज, अर्ज मंजूर. नि.30 कडे अँड.शर्मिला शिंदे व अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.31 कडे जाबदार क्र.4,6,7 ते 10 व 14 ते 18 यांचे म्हणणे दाखल, नि.32 कडे प्रतिज्ञापत्र, नि.33 कडे जाबदार क्र.4,6,7 ते 10 व 14 ते 18 चा कागद दाखल करुन घेणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. जाबदार पतसंस्थेची ठरावाची प्रत व पतसंस्थेचा 88 खालील अहवाल दाखल, नि.34 कडे तक्रारदाराचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.35 कडे तक्रारदाराची पुरावा संपलेची पुरसीस, नि.36 कडे तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, नि.37 कडे जाबदाराचा त्यानी दाखल केलेल्या पुराव्याशिवाय जादा पुरावा देणेचा नाही व जाबदाराचे प्रतिज्ञापत्रातील मजकूर हाच लेखी युक्तीवाद समजणेबाबतची पुरसीस, नि.38 कडे जाबदारातर्फे अधिकृत इसम विक्रम साबळे यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.39 कडे तक्रारदारातर्फे कागदयादीने नि.39/ए कडे 31-3-2005 अखेरच्या संचालक मंडळाची यादी व नि.39/बी कडे 2011-12 ते 2016-17 च्या मुदतीसाठी निवडून आलेल्या संचालक मंडळाची यादी दाखल. इ.कागद दाखल आहेत.
3. तक्रारदारांची तक्रार, त्यासोबतचे प्रतिज्ञापत्र, दाखल केलेले पुरावे, तसेच जाबदारांचे म्हणणे, दाखल केलेले पुरावे, तक्रारदाराचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मे. मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे काय? होय.
3. जाबदार हे तक्रारदारांच्या रकमा देणे लागतात काय? होय.
4. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
विवेचन- मुद्दा क्र.1-
5. तक्रारदार हया वर नमूद पत्त्यावर रहात असून जाबदार पतसंस्थेचा पारदर्शक कारभार तसेच ठेवीवरील आकर्षक व्याजदर यांचा विचार करुन तक्रारदारांनी त्यांच्या स्वतःच्या नावे जाबदार पतसंस्थेच्या शाखा वडूज येथे मुदतठेवी ठेवलेल्या आहेत. तसेच त्यांच्या बचत खातेवरही काही रक्कम शिल्लक आहे.
जाबदार पतसंस्था ही लोकांकडून ठेवी ठेवून घेते, त्यावर त्यांना व्याज देते, लोकांना कर्जे देते व त्यावर व्याज घेते तसेच लोकांचे बचत खाते काढते, त्यावरील त्यांच्या रकमांवर त्यांना व्याज देते अशा प्रकारे जाबदार क्र.1 पतसंस्थेचा व्यवहार आहे व या स्वरुपात ती लोकांना सेवा देते. त्यामुळे लोकांमध्ये व जाबदार क्र.1 पतसंस्थेमध्ये ग्राहक व सेवापुरवठादार असे नाते निर्माण होते. तक्रारदारानी जाबदार पतसंस्थेत मुदतठेवी ठेवलेने तक्रारदार हे ग्राहक ठरतात व जाबदार पतसंस्थेने त्या ठेवून घेतलेने व त्यावर व्याज दयावयाचे ठरविलेने जाबदार पतसंस्था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्था ठरते. म्हणून मुद्दा क्र.1चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2- तक्रारदार हिला काही कौटुंबिक गरजा पूर्ण करणेसाठी रकमेची नितांत गरज लागलेने जाबदार पतसंस्थेतील ठेवींच्या रकमेची जाबदारांकडे मागणी केली. परंतु तक्रारदारास जाबदारांनी रक्कम दिली नाही व वेळोवेळी रक्कम देणेस टाळाटाळ केली. जाबदारानी रकमा देणेस टाळाटाळ केलेमुळेच तक्रारदारास सदर अर्ज दाखल करावा लागला आहे. तक्रारदारांच्या मुदतठेवीच्या मुदती संपलेल्या आहेत. तक्रारदारांनी पतसंस्थेत वारंवार हेलपाटे मारुनही आजपावेतो तक्रारदाराना आपल्या रकमा सव्याज परत मिळालेल्या नाहीत. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा परत केल्या नसल्यामुळेच जाबदारांच्या कर्तव्यात कसूर झाली आहे व ग्राहकाला त्यांचेकडून दयावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे. म्हणून मुद्दा क्र.2चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.3- जाबदार क्र.1 पतसंस्था ही सहकार कायद्याप्रमाणे स्थापन झालेली आहे. ग्राहकाकडून ठेवीस्वरुपात किंवा बचत खात्याद्वारे रकमा स्विकारुन ग्राहकानी रक्कम मागितलेस त्यांच्या रकमा त्यांना सव्याज परत देणे तसेच ग्राहकांना कर्ज दिले असलेस त्यावर व्याज आकारणे या हेतूने स्थापन झालेली आहे. तक्रारदारांनी जाबदार संस्थेकडे मुदतठेवी ठेवलेल्या आहेत. तक्रारदारांची मुदतठेवीची रक्कम जाबदारांनी ठेवून घेतली. परंतु तक्रारदारांनी त्यांची रक्कम परत मागितलेवर ती परत करणे ही जाबदारांची जबाबदारी असूनही जाबदारानी तक्रारदाराना आजपावेतो त्यांच्या रकमा परत दिल्या नाहीत व याची जबाबदारी जाबदार क्र.1 पतसंस्था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे, व इतर जाबदार यांचेवर वैयक्तिक व संयुक्तीक आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा वेळेत सव्याज परत करावयास हव्या होत्या परंतु आजपावेतो जाबदारानी तक्रारदारांच्या रकमा सव्याज परत केलेल्या नाहीत, त्यामुळेच जाबदारांकडून तक्रारदारास द्यावयाच्या सेवेत त्रुटी निर्माण झालेली आहे व तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होऊन त्यांना मानसिक त्रासही झालेला आहे. या सर्वांस जाबदारच जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र. 3 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
सदर तक्रारअर्जात cooperative corporate veil नुसार तक्रारदारांचे पैसे देणेस जाबदार क्र.1 पतसंस्था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदारांना हे मंच वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरीत आहे. परंतु नि.33 कडे जाबदारांतर्फे पतसंस्थेचा 88 खाली झालेल्या चौकशीचा अहवाल दाखल आहे व नि.39/बी कडे तक्रारदारानी दाखल केलेली सन 2011-12 ते 2016-17 या मुदतीसाठी निवडून आलेल्या संचालक मंडळाची दाखल केलेली यादी विचारात घेता मे.मंचास जाबदार क्र.1 पतसंस्था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांना वैयक्तिक व संयुक्तीकरित्या जबाबदार धरणे मे.मंचास न्यायोचित वाटते व जाबदार क्र.6 ते 18 यांना फक्त संयुक्तीकरित्या जबाबदार धरणेत येते. जाबदार क्र.4 यांना संस्थेच्या 88 खाली झालेल्या अहवालात दोषी धरलेले नाही व त्यांचा समावेश नवीन संचालक (2016-2017च्या) मंडळातही दिसून येत नसल्याने त्यांना जबाबदार न धरता सदर कामी जबाबदारीतून मुक्त करणे न्यायोचित वाटते. त्याप्रमाणे आम्ही जाबदार क्र.4 याना सदर कामी जबाबदारीतून मुक्त करीत आहोत. सदर बाबतीत आम्ही मे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रिट पिटीशन नंबर 117/2011 मंदाताई संभाजी पवार वि. स्टेट ऑफ महाराष्ट्र या न्यायनिवाडयाचा व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
6. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
- आदेश –
1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेत येते.
कोष्टक
अ.क्र. | पावती क्र. | ठेव दिनांक | रक्कम रु. | देय दिनांक |
1 | 13398 | 2-7-07 | 1,69,775/- | 2-7-2009 |
2 | 13397 | 2-7-07 | 1,69,775/- | 2-7-2009 |
3 | 5258 | 6-11-03 | 30,000/- | 6-11-2008 |
4 | 1278 | 14-11-03 | 25,000/- | 14-11-2008 |
5 | 13320 | 22-6-07 | 1,10,000/- | 22-6-2009 |
6 | बचत खाते क्र.714 | L.F.No.395 | 5,76,779/- | 25-10-08 रोजी शिल्लक
|
2. तक्रारदार हिस कोष्टकात दर्शविले अ.क्र.1 ते 5 मध्ये दर्शवले पावती क्र.13398, 13397,5258, 1278 व 13320 वरील मुदतठेव रकमेवर पावतीवरील नमूद व्याजदराप्रमाणे ठेव ठेवलेले तारखेपासून आदेश पारित तारखेपर्यंत होणारी एकूण सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.6 ते 18 यांनी संयुक्तीकरित्या अदा करावी.
3. तक्रारदार हिस कोष्टाकात दाखवले अ.क्र.6 बचत खाते क्र.714 LF No.395 वरील जमा असणा-या रक्कम रु.5,76,779/- वर दि.25-10-2008 पासून बचतखात्यावरील नमूद व्याजदराप्रमाणे आदेश पारित तारखेपर्यंत होणारी सव्याज रक्कम जाबदार क्र.1 पतसंस्था माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.6 ते 18 यांनी संयुक्तीकरित्या अदा करावी.
4. वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.1 पतसंस्था, माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.1 पतसंस्था माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.6 ते 18 यांनी संयुक्तीकरित्या अदा करावे. तसे केलेस आदेश पारित तारखेपर्यंत होणा-या एकूण
सव्याज रकमेवर तक्रारदारांचे हाती रक्कम पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्केप्रमाणे व्याज अदा करावे लागेल.
5. जाबदार क्र.1 पतसंस्था माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.6 ते 18 यांनी संयुक्तीकरित्या तक्रारदार हिस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.15,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-अदा करावेत.
6. वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 30 दिवसाचे आत जाबदार क्र.1 पतसंस्था माजी चेअरमन शंतनु रणनवरे व जाबदार क्र.2,3 व 5 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या व जाबदार क्र.6 ते 18 यांनी संयुक्तीकरित्या करावयाचे आहे. तसे न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
7. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
8. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 28-1-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.