Maharashtra

Satara

CC/14/166

kusum wamnrao gindge - Complainant(s)

Versus

phaltan nagari sah patsnstha - Opp.Party(s)

blip

17 Nov 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

           मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                                  मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

             तक्रार क्र. 166/2014.

                                                                                                         तक्रार दाखल दि.10-10-2014.

                                                                                                          तक्रार निकाली दि.17-11-2015. 

1. कुसुम वामनराव गुंडगे

2. श्री. विवेक वामनराव गुंडगे,

   स्‍वतःसाठी व अ.क्र.1 करीता मुखत्‍यार,

   रा. दहिवडी,ता.माण,जि.सातारा.                   ....  तक्रारदार  

         विरुध्‍द

1. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,

   फलटण,ता. फलटण, जि.सातारा, तर्फे चेअरमन

   श्री. हिंदूराव निलकंठराव नाईक निंबाळकर

   गोळीबार मैदान, संभाजीनगर, फलटण,

   ता. फलटण, जि.सातारा

2. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,

   फलटण,ता. फलटण, जि.सातारा, तर्फे चेअरमन

   श्री. हिंदूराव निलकंठराव नाईक निंबाळकर

   फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,फलटण

3. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,

   फलटण,ता. फलटण, जि.सातारा, तर्फे  व्‍हा.चेअरमन

   श्री. सचिन सुधाकर कांबळे,

   रा. संभाजीनगर, फलटण

   फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,फलटण

 

4. फलटण ट्रेडर्स नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या.,

   फलटण, शाखा दहिवडी तर्फे शाखाधिकारी- साबळे

   ता. फलटण, जि.सातारा.                            ....  जाबदार

                      तक्रारदारातर्फेअँड.दादासो एस. बळीप.

                      जाबदार क्र.1 ते 3 तर्फे-अँड.ए.आर.कदम.

                      जाबदार क्र.4 तर्फे अँड.एस.एस.शिंदे.                                                              

 

                        न्‍यायनिर्णय 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.   तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हे दहिवडी, ता.माण, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत. तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेत खालील कोष्‍टकात नमूद केलेप्रमाणे मुदत ठेव योजनेत ठेवी ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत.

 

अ.क्र.

ठेव

पावती क्र.

खातेदाराचे नांव

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

1

5264

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  35,000/-

21/05/2008

21/05/2009

2

4988

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

22/09/2007

22/09/2009

3

5019

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  45,000/-

30/10/2007

30/10/2009

4

5276

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

28/05/2008     

28/05/2009

5    

5286

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

6

5291

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

7

5280

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

8

5281

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

9

खाते पान नं. 11/125

5343

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

23/06/2008     

23/06/2009

10

5283

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

11

5282

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

12

5009

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009     

13

5332

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  42,000/-

12/06/2008     

12/06/2009     

14

2897

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  16,000/-

01/08/2008     

01/02/2012     

15

5284

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009     

16

5253

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  70,000/-

13/05/2008     

13/05/2009     

17

3207

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

   9,000/-

13/12/2005

13/06/2012     

18

5376

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  65,000/-

10/07/2008     

10/07/2009     

 

 

     वर नमूद तपशिलाप्रमाणे जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना ठेवींची एकूण रक्‍कम रु. 12,83,248/- (रुपये बारा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस मात्र) व त्‍यावरील आजअखेरचे व्‍याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत.  प्रस्‍तुत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर तक्रारदारांनी ठेवीच्‍या रकमांची मागणी केल्‍यास व्‍याजासह रक्‍कम जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे. परंतू तक्रारदाराने वरील कोष्‍टकातील प्रस्‍तुत ठेवीच्‍या मुदती संपलेनंतर ठेवीच्‍या रकमेची व्‍याजासह जाबदार यांचेकडे वारंवार मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्‍कम अदा केलेली नाही.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. म्‍हणून सदर ठेवीच्‍या सर्व रकमा व्‍याजासह  मिळाव्‍यात व तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रास झालेला असलेने जाबदार यांचेकडून नुकसानभरपाई मिळावी म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे. 

2.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4 यांचेकडून तक्रार अर्जात नमूद सर्व ठेवपावत्‍यांची एकूण रक्‍कम रु. 12,83,248/- (रुपये बारा लाख त्र्याऐंशी हजार दोनशे अठ्ठेचाळीस मात्र)  त्‍यावरील व्‍याजासहीत जाबदार यांचेकडून वसूल होऊन मिळावी, तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- अशी एकूण रक्‍कम रु.13,33,248/- (रुपये तेरा लाख तेहतीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस मात्र) जाबदार यांचेकडून वसूल होवून मिळावी अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

3.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी नि. 2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते 5/9 कडे अनुक्रमे ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती, नि.5/10 कडे तक्रारदाराने जाबदारांना पाठवलेली नोटीस, नि.5/11 कडे जाबदाराला पाठवले नोटीसच्‍या पोष्‍टाच्‍या पावत्‍या, नि.20 कडे पुराव्‍याचे शपथपत्र, नि. 21 कडे तक्रारदार क्र. 1 मयत असलेने सदर तक्रार अर्ज तक्रारदार क्र. 2 यांचे नावाने चालविणेसाठी पुरसीस, नि.23 कडे लेखी युक्‍तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.

4.   प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3  यांनी नि.22 कडे म्‍हणणे, नि. 22/1 कडे म्‍हणण्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि. 27 चे कागदयादीसोबत जाबदार पतसंस्‍थांचा सहकार कायदा कलम 88 चा चौकशी अहवाल, नि.25 कडे जाबदार क्र. 4 ने प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 3 यांनी दिलेले म्‍हणणे हेच जाबदार क्र.4 चे म्‍हणणे समजणेत यावे म्‍हणून पुरसीस, वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.

 i             तक्रारदाराचा तक्रार अर्ज मान्‍य व कबूल नाही, तक्रारदार व जाबदार यांचे दरम्‍यान कोणताही व्‍यवहार झालेला नाही.  त्‍यामुळे  तक्रारदार व जाबदार यांचेदरम्‍यान कोणताही व्‍यवहार झालेला नाही.  त्‍यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक होत नाहीत.  सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.

ii   तक्रारदाराने जाबदार पतंस्‍थेत कधीही ठेव ठेवलेली नव्‍हती व नाही.  तसेच तक्रारदाराने जाबदारांकडे कधीही ठेवीच्‍या रकमेची मागणी केली नव्‍हती व नाही.  मुळातच तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक नसलेने तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.

Iii  जाबदार ही पतसंस्‍था महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थांचा कायदा,1960 चे तरतूदीनुसार नोंदवलेली सहकारी संस्‍था असून सहकार कायद्याच्‍या तरतूदीप्रमाणे जाबदार संस्‍थेचा कारभार चालतो. त्‍यामुळे संस्‍थेबाबत काही तक्रारी असल्‍यास त्‍या महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 91 प्रमाणे सहकारी कोर्टामार्फत निवारण केल्‍या जातात त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज या मे मंचात चालणेस पात्र नाही.

iv        तक्रारदाराने प्रस्‍तुत संस्‍थेचे ठेव ठेवली त्‍यावेळीचे चेअरमन शंतनू रणवरे, दुर्योधन रणवरे व त्‍यावेळचे संचालक मंडळतील सदस्‍य व व्‍यवस्‍थापक यांचेबरोबर चर्चा करुन ठेवल्‍या होत्‍या.  त्‍यावेळचे संचालक मंडळाने संस्‍थेचे कामकाज व्‍यवस्थितपणे पाहीले नाही, चेअरमन, संचालक व व्‍यवस्‍थापक यांनी अपहार केल्‍याने संस्‍थेची आर्थीक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली.  तसेच त्‍यामुळे जाबदार पतसंस्‍थेची महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थांचा कायदा, 1960 कलम 88 नुसार दि.3/7/2009 ते दि.27/6/2011 चे दरम्‍यान चौकशी अधिकारी  श्रीमती जयश्री अरविंद जाधव, निवृत्‍त सहकारी न्‍यायाधिश यांचेमार्फत चौकशी होऊन संस्‍थेच्‍या संपूर्ण गैरकारभारास व अपहारास त्‍यावेळचे सन 2007 सालचे चेअरमन, व्‍हा.चेअरमन, संचालक मंडळातील सदस्‍य यांचेवर रक्‍कम रु.35 कोटी 23 लाख एवढया रकमेची आर्थिक जबाबदारी निश्चित करणेत आली आहे.  प्रस्‍तुत चौकशी अहवाल याकामी दाखल केला आहे.  त्‍यामुळे तक्रार अर्जात नमूद  जाबदार यांचेवर तक्रारदाराचे ठेवीची रक्‍कम अदा करणेची जबाबदारी येत नाही.  प्रस्‍तुत जाबदार यांचेविरुध्‍द सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. प्रस्‍तुत जाबदार यांचेविरुध्‍द सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. प्रस्‍तुत जाबदार हे मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय, औरंगाबाद खंडपीठ यांचेकडील रिटपिटीशन नं.5222/2009 तसेच रिटपिटीशन नं.5223/2009 यामधील निकालाप्रमाणे जाबदार हे तक्रारदाराची कोणतीही ठेव देणेस जबाबदार नाहीत.  प्रस्‍तुत जाबदार यांनी सामाजिक बांधीलकीतून ठेवीदारांची कष्‍टाची ठेव बुडू नये तसेच सामान्‍य ठेवीदारांवर अन्‍याय होवू नये या एकमेव धोरणांवरुन सदरची बुडीत गेलेली पतसंस्‍था चालविण्‍यास घेतली आहे.  त्‍यामुळे पूर्वी झालेले व्‍यवहार व पूर्वी ठेवलेल्‍या ठेव रक्‍कम परत करण्‍याची कायदेशीर जबाबदारी ही चेअरमन शंतनू रणनवरे व त्‍यांचे संचालक मंडळावर येते.  परंतू तक्रारदाराने प्रस्‍तुत शंतनू रणनवरे, चेअरमन व त्‍यांचे संचालक मंडळास याकामी पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही तर जाबदारांना केवळ त्रास देणेसाठी सदर जाबदारांविरुध्‍द ही तक्रार दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा.  सदर संस्‍था अडचणीत असल्‍याने   ठेवीदारांना रक्‍कम रु.10,000/- चे आत ज्‍यांच्‍या ठेवी आहेत त्‍या ठेवीदारांना मूळ रक्‍कम देणेकरीता महाराष्‍ट्र शासनाने संस्‍थेस दि. 31 मार्च 2010 रक्‍कम रु.1 कोटी 55 लाख 33 हजार 742 एवढया रकमेचे बिनव्‍याजी कर्ज, एक वर्ष मुदतीकरीता महाराष्‍ट्र शासनाने दिले आहे व महाराष्‍ट्र शासनाने रक्‍कम रु.10,000/- पेक्षा कमी ठेव असलेल्‍या ठेवीदारांना वरील रकमेचे  वाटप केले आहे.  आजअखेर जाबदार संस्‍था महाराष्‍ट्र शासनाचे रक्‍कम रु.1 कोटी 29 लाख देणे आहे.  त्‍यामुळे कर्जदाराकडून वसूल झालेनंतर प्रथम महाराष्‍ट्र शासनाची रक्‍कम प्राधान्‍याने द्यावी लागते.

v    तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्जामध्‍ये ठेव ठेवलेली रक्‍कम रु.11,40,245/- दिसून येते.  तसेच तक्रारदाराने याच मे. मंचात जाबदारांविरुध्‍द तक्रार अर्ज क्र. 166/2014 हा दाखल केला आहे.  सदर तक्रार अर्जात सुध्‍दा रक्‍कम रु.11,40,245/- एवढी ठेव वसूल होऊन मागीतली आहे.  सदर तक्रार अर्ज क्र.. 166/2014 व 167/2014 या दोन्‍ही तक्रार अर्जातील तक्रारदार हे एकच आहेत व जाबदारही एकच आहेत.  प्रस्‍तुत दोन्‍ही तक्रारीमध्‍ये एकूण मिळून रक्‍कम रु.22,80,490/- (रुपये बावीस लाख ऐंशी हजार चारशे नव्‍वद मात्र) होते व प्रस्‍तुत रकमेचे आर्थीक कार्यक्षेत्र या मे मंचास नसलेने जाणीवपूर्वक तक्रारदाराने वेगळे तक्रार अर्ज मे मंचात दाखल केले आहेत.  त्‍यामुळे हे दोन्‍ही तक्रार अर्ज मे. मंचाचे आर्थिक कार्यक्षेत्राबाहेरील असलेने फेटाळणेत यावेत.  तसेच प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे कामी आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केले नसलेने Non Joinder of Necessary Parties  या तत्‍वाची बाधा येते.  तसेच तक्रारदार क्र. 1 चे मृत्‍यूनंतर तक्रारदाराने कायदेशीर वारस रेकॉर्डवर घेतलेले नाहीत.  सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्‍हणणे दिले आहे.  जाबदार क्र. 4 ने जाबदार क्र. 1 ते 3 चे म्‍हणणे अँडॉप्‍ट केले आहे.

5.   वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.

अ.क्र.            मुद्दा                                      उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2.  तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज

    तत्‍वाची बाधा येते काय?                                   होय.

3. जाबदाराने यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

                                                   जाबदार क्र.4 यांनी 

4.  अंतिम आदेश काय?                                  खालील नमूद

                                                       केलेप्रमाणे.

विवेचन

मुद्दा क्र.1 -

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-

प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेत खालील परिशिष्‍टात नमूद केलेप्रमाणे रक्‍कम मुदतठेव योजनेत गुंतविली होती व आहे.  

अ.क्र.

ठेव

पावती क्र.

खातेदाराचे नांव

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

1

5264

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  35,000/-

21/05/2008

21/05/2009

2

4988

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

22/09/2007

22/09/2009

3

5019

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  45,000/-

30/10/2007

30/10/2009

4

5276

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

28/05/2008     

28/05/2009

5    

5286

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

6

5291

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

7

5280

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

8

5281

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

9

खाते पान नं. 11/125

5343

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

23/06/2008     

23/06/2009

10

5283

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

11

5282

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009

12

5009

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009     

13

5332

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  42,000/-

12/06/2008     

12/06/2009     

14

2897

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  16,000/-

01/08/2008     

01/02/2012     

15

5284

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008     

28/05/2009     

16

5253

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  70,000/-

13/05/2008     

13/05/2009     

17

3207

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

   9,000/-

13/12/2005

13/06/2012     

18

5376

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  65,000/-

10/07/2008     

10/07/2009     

 

   प्रस्‍तुत ठेवपावत्‍यांच्‍या व्‍हेरिफाईड प्रती याकामी तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/9 कडे दाखल केल्‍या आहेत. सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत हे स्‍पष्‍ट होत आहे. म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

मुद्दा क्र.2 व 3-

7.  वर नमूद मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे. कारण- तक्रारदाराने सदर कामी जाबदार पतसंस्‍थेत ठेवीच्‍या रकमा सन 2006, 2007, 2008 या कालावधीत ठेवलेचे ठेवपावत्‍यांवरुन स्‍पष्‍ट होते.  परंतू सन 2006 ते 2008 या कालावधीत जाबदार पतसंस्‍थेवर कार्यरत असणा-या संचालक मंडळास याकामी जाबदाराने आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील करणे आवश्‍यक होते व कायदेशीर होणार होते.  परंतु प्रस्‍तुत तक्रारदार यांनी सदर कालावधीत जाबदार पतसंस्‍थेवर कार्यरत असणा-या संचालक मंडळास आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही.  सदरची बाब जाबदाराने नि. 27 चे कागदयादीसोबत दाखल केले जाबदार पतसंस्‍थेच्‍या चौकशी अहवालातील आदेशावरुन स्‍पष्‍ट होते.  प्रस्‍तुत आदेशात यादी क्र. ब कडे दि. 31/3/2008 अखेर अस्तित्‍वात असले संचालक मंडळाची यादीवरुन स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराने प्रस्‍तुत दि. 31/3/2008 अखेर कार्यरत असले संचालक मंडळास याकामी आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील करणे कायदेशीर व आवश्‍यक असतानाही तक्रारदाराने प्रस्‍तुत संचालक मंडळास याकामी आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले नसलेने प्रस्‍तुत तक्रार अर्जास नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्‍वाची बाधा येते.  तसेच प्रस्‍तुत तक्रार अर्जातील नमूद जाबदार यांचेविरुध्‍द प्रस्‍तुत नि. 27 कडील चौकशी अहवालात कोणतीही जबाबदारी बसविलेली नसून प्रस्‍तुत जाबदार यांना कुठलीही रक्‍कम देणेकरीता जबाबदार धरलेले नाही असे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे जाबदार क्र. 1 ते 3 यांनी प्रस्‍तुत तक्रारदार यांना कोणतीही सदोष सेवा देणेचा प्रश्‍नच उदभवत नाही.  मात्र जाबदार क्र. 4 पतसंस्‍थेने तक्रारदाराचे ठेवी स्विकारुनदेखील तक्रारदार यांना मुदतीनंतर वारंवार मागणी करुनही तक्रारदारांचे ठेवीची रक्‍कम परत अदा केलेली नाही.  त्‍यामुळे जाबदार क्र. 4 संस्‍थेने तक्रारदार यांना सदोष सेवा दिली आहे असे म्‍हणणे न्‍यायोचीत होणार आहे.  सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

8.   वर नमूद कागदपत्रे नि. 27 चे कागदयादीकडील चौकशी अहवाल यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता, सदर तक्रार अर्जातील जाबदार क्र. 1 ते 3 यांचेवर कोणतीही जबाबदारी बसविलेली नाही व सदर जाबदार प्रस्‍तुत जाबदार क्र. 4 संस्‍थेच्‍या अपहारास व गैरकारभारास जबाबदार नाहीत असे स्‍पष्‍ट होत आहे.  प्रस्‍तुत नि. 27 सोबत दाखल संस्‍थेच्‍या चौकशी अहवालात दि.31/3/2008 अखेर कार्यरत असलेल्‍या संचालक मंडळास जबाबदार धरलेचे स्‍पष्‍ट होते.  परंतू प्रस्‍तुत सन 2008 अखेर कार्यरत असणारे संचालक मंडळास तक्रारदाराने याकामी आवश्‍यक पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही.  सबब सदर जाबदार क्र. 1 ते 3 यांना या जबाबदारीतून मुक्‍त करणे न्‍यायोचीत होणार आहे.  मात्र जाबदार क्र. 4 पतसंस्‍थेस प्रस्‍तुत तक्रारदारांची ठेवीची रक्‍कम व्‍याजासह अदा करणेस जबाबदार धरणे न्यायोचित होईल असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  प्रस्‍तुत कामी तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केले नि. 5/1 ते नि. 5/9 कडी सर्व ठेवपावत्‍यांवर कुसुम वामनराव गुंदगे किंवा विवेक वामनराव गुंदगे अशी ठेवीदारांचे नावाची नोंद आहे.  त्‍यामुळे कुसूम गुंदगे यांचे वारसदार विवेक गुंदगे हे नाव पूर्वीपासूनच तक्रार अर्जात नमूद असलेने पुन्‍हा वारस रेकॉर्डवर घेणेची गरज नाही असे या मे. मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.         

    सबब वरील सर्व कागदपत्रे, विवेचन यांचा सविस्‍तर उहापोह करता, प्रस्‍तुत तक्रारदार यांची तक्रार अर्जात नमूद कोष्‍टकातील ठेवपावत्‍यांवरील सर्व ठेवींच्‍या रकमा प्रस्‍तुत ठेवपावतींवरील नमूद व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जाबदार क्र. 1 ते 3 यांना जबाबदार धरणे न्‍यायोचीत होणार नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.  परंतू जाबदार क्र. 4 पतसंस्‍थेस प्रस्‍तुत तक्रारदाराचे वर नमूद कोष्‍टकांतील सर्व ठेवींच्‍या रकमा ठेवपावतीवर नमूद व्‍याजासह परत करणेसाठी जबाबदार धरणे न्‍यायोचीत होणार आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. 

8. सबब  आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

आदेश

1.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. तक्रारदाराने जाबदार क्र. 4 पतसंस्‍थेत मुदत ठेव योजनेत गुंतविलेल्‍या खालील

   नमूद कोष्‍टकातील ठेवींची संपूर्ण रक्‍कम प्रस्‍तुत ठेवपावतीवर नमूद केले

   व्‍याजदाराने होणा-या व्‍याजासह तक्रारदार यांना अदा करणेसाठी जाबदार क्र. 4

   पतसंस्‍थेस जबाबदार धरणेत येते.

 

अ.क्र.

ठेव

पावती क्र.

खातेदाराचे नांव

ठेव रक्‍कम

ठेव ठेवली तारीख

मुदत संपते तारीख

1

5264

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  35,000/-

21/05/2008

21/05/2009

2

4988

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

22/09/2007

22/09/2009

3

5019

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  45,000/-

30/10/2007

30/10/2009

4

5276

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  40,000/-

28/05/2008    

28/05/2009

5   

5286

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

6

5291

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

7

5280

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

8

5281

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

9

खाते पान नं. 11/125

5343

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

23/06/2008    

23/06/2009

10

5283

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

11

5282

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009

12

5009

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009    

13

5332

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  42,000/-

12/06/2008    

12/06/2009    

14

2897

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  16,000/-

01/08/2008    

01/02/2012    

15

5284

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

1,00,000/-

28/05/2008    

28/05/2009    

16

5253

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  70,000/-

13/05/2008    

13/05/2009    

17

3207

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

   9,000/-

13/12/2005

13/06/2012    

18

5376

कुसुम वामनराव गुंडगे

विवेक वामनराव गुंडगे

  65,000/-

10/07/2008    

10/07/2009    

3.  जाबदार क्र. 1 ते 3 यांना प्रस्‍तुत तक्रारदाराचे ठेवीची रक्‍कम अदा करणेच्‍या      

    जबाबदारीतून वगळणेत येते/मुक्‍त करणेत येते.

4.  जाबदार क्र. 4 संस्‍थेने तक्रारदार यांची वर नमूद कोष्‍टकातील ठेवींची सर्व

    रक्‍कम प्रस्‍तुत ठेवपावतीवरील नमूद केले व्‍याजदाराने होणा-या व्‍याजासह

    तक्रारदार यांना अदा करावी.

5.  प्रस्‍तुत ठेवींच्‍या एकूण व्‍याजासह रकमेवर ठेवीची मुदत संपले तारखेपासून

    रक्‍कम प्रत्‍यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजाने

    होणारी सर्व रक्‍कम जाबदार क्र. 4 पतसंस्‍थेने तक्रारदार यांना अदा करावी.   

6.  तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-(रुपये दहा हजार

    मात्र)  जाबदार क्र. 4 यांनी तक्रारदारांना  अदा करावेत

7.  वर नमूद सर्व आदेशाची पूर्तता जाबदार क्र. 4 यांनी आदेश पारित

   तारखेपासून 45 दिवसात करावी.

8.  आदेशाचे पालन जाबदार यांनी विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक

    संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची

    मुभा राहील.

9.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

10. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत

    याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.17-11-2015.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.