Maharashtra

Satara

CC/13/201

RAJANY VASANTRAO BHOSALE - Complainant(s)

Versus

PHALAN TREDERS NAGARI SAHKARI PATHSANSTHA PHALTAN - Opp.Party(s)

16 Apr 2015

ORDER

सातारा जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर

 

उपस्थिती -  मा.सौ.सविता भोसले,अध्‍यक्षा

             मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्‍य.

                                                                                           मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या.

 

                              तक्रार क्र. 201/2013.

                                                                                                        तक्रार दाखल दि.30-11-2013.

                                                                                                     तक्रार निकाली दि.16-4-2015. 

सौ. रजनी वसंतराव भोसले.

रा.स.नं.172/5/3, प्‍लॉट क्र.1,

हॉटेल मोनार्कजवळ, एस.टी.कॉलनी मागे,

गोडोली, जि.सातारा.                                                                 ....  तक्रारदार

  

         विरुध्‍द

1. फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्‍था मर्या, फलटण, 

  करिता श्री.दुर्योधन दत्‍तात्रय रणनवरे

  (फाऊंडर चेअरमन)

2. श्री.शंतनु दुर्योधन रणनवरे (माजी चेअरमन)

   क्र.1 व 2 रा.दत्‍तकृपा, गोळीबार मैदान,

   फलटण, ता.फलटण, जि.सातारा.

3. श्री.सुधाकर गजानन कांबळे, माजी व्‍हा.चेअरमन,

   रा.संभाजीनगर, ता.फलटण, जि.सातारा.

4. श्री.सचिन सुधाकर कांबळे,  

   रा.संभाजीनगर, फलटण,

   ता.फलटण, जि.सातारा.

5. श्री.हिंदुराव निलकंठराव नाईक-निंबाळकर.  

6. श्री.समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर,

   रा.विजय विहार अपार्टमेंट, फ्लॅट नं.13,

   कोळकी, ता.फलटण, जि.सातारा.

7. श्री.प्रसन्‍न जनार्दन भागवत- व्‍यवस्‍थापक,

   रा. विजयविहार अपार्टमेंट, फ्लॅट नं.13, कोळकी,

   ता.फलटण, जि.सातारा.

8. श्री.रविंद्र औदुंबर पवार.

   रा.महतपुरा पेठ, फलटण, ता.फलटण,

   जि.सातारा.

9. श्री.रविंद्र निवृत्‍ती शिंदे,

   रा.महतपुरा पेठ, ता.फलटण, जि.सातारा.                                 ....  जाबदार

 

                  तक्रारदारातर्फे अँड.जे.वाय.पिसाळ.

                  जाबदार 1 तर्फे- अँड.एम.एस.इनामदार.  

                 जाबदार क्र.4 ते 9 तर्फे- अँड.ए.आर.कदम.

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्‍या यानी पारित केला

                       

1.         तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986च्‍या कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

     तक्रारदार या वरील पत्‍त्‍यावर रहात असून जाबदार संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी कायदयानुसार नोंदणी झालेली पतसंस्‍था आहे.  जाबदार क्र.1 हे फाऊंडर चेअरमन व जाबदार क्र.2 हे माजी चेअरमन आहेत.  सध्‍या जाबदार क्र.5 हे चेअरमन असून जाबदार क्र.4 हे व्‍हाईस चेअरमन आहेत.  जाबदार क्र.3 हे माजी व्‍हाईस चेअरमन असून जाबदार क्र.8 हे संचालक आहेत तर जाबदार क्र.7 हे व्‍यवस्‍थापक म्‍हणून फलटण येथे काम पहात होते.  अशा रितीने जाबदार हे फलटण ट्रेडर्स नागरी सह.पतसंस्‍था मर्या.फलटण येथे संचालक म्‍हणून काम करीत आहेत. 

         जाबदार संस्‍थेचा उद्देश ठेवी स्विकारणे, त्‍यावर व्‍याज देणे, लोकांना वेगवेगळया प्रकारची कर्जे देणे तसेच ठेवीदाराना त्‍यांच्‍या ठेवीसंदर्भात सेवा देणे असा आहे.  जाबदारानी आकर्षक व्‍याजदराचे अमिष दाखवलेमुळे तक्रारदारानी स्‍वतःचे उत्‍पन्‍नातून बचत करुन स्‍वतःचे नावे खालीलप्रमाणे ठेव ठेवलेली आहे-

ठेवीचा प्रकार

पावती क्र.

रक्‍कम रु.

ठेव ठेवलेची तारीख

मुदत संपलेची तारीख

व्‍याजदर टक्‍के

मुदतठेव

8586

40,000/-

29-8-08

29-8-09

13%

 

   वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदारांनी जाबदार संस्‍थेत ठेवलेली रक्‍कम हवी होती म्‍हणून सातारा येथील पतसंस्‍थेच्‍या शाखेत जाऊन दि.23-1-09 रोजी संस्‍थेतील कर्मचारी व पदाधिका-यांना ठेवपावतीवरील रक्‍कम परत मागितली.  त्‍यावेळी कर्मचारी म्‍हणाले की, आता मध्‍येच कशाला ठेव मोडता, मुदत संपली की या, तुम्‍हाला त्‍याचे व्‍याज मिळेल.   परंतु तक्रारदारानी रकमेची वारंवार मागणी केली असता तक्रारदाराना रक्‍कम परत देणेची जाणीवपूर्वक टाळाटाळ केली व आज देतो, उदया देतो असे म्‍हणून ठेवपावतीवरील रक्‍कम परत मिळणेसाठी दि.23-1-09 रोजी तक्रारदारानी तसे पत्र जाबदारांचे सातारा येथील शाखेत जाऊन दिले होते व ठेवींच्‍या रकमेची मागणी केली होती.  परंतु आजअखेर जाबदार संस्‍थेने तक्रारदाराना ठेवीची रक्‍कम दिली नाही.  तसेच तक्रारदारानी वकीलांतर्फे दि.1-3-13 रोजी रजि.नोटीस देऊन रकमेची मागणी केली.  परंतु तक्रारदाराना आजअखेर सदर रक्‍कम मिळालेली नाही. जाबदार पतसंस्‍थेच्‍या तक्रारदार या ग्राहक आहेत.  पैसे स्विकारलेवर तक्रारदार मागतील त्‍यावेळी अगर मुदत संपलेनंतर परतफेड करणेची नैतिक व कायदेशीर जबाबदारी जाबदारांवर येते व ती पार पाडणेस जाबदारानी कसूर केलेने तक्रारदारांचे आर्थिक नुकसान होऊन तक्रारदाराना वेळेवर पैसे न मिळाल्‍याने त्‍यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे व त्‍यास जाबदार संस्‍थाच जबाबदार आहे. मुदत संपलेनंतरही ठेव रक्‍कम देणेची व्‍यवस्‍था केली नाही. त्‍यानंतर स्‍वतः समक्ष दोन तीनदा संस्‍थेत जाऊन रकमेची मागणी केली परंतु जाबदारानी रक्‍कम देणेस कुचराई केली तेव्‍हापासून तक्रारीस कारण घडले व घडत आहे.  या कोर्टाशिवाय अन्‍य कोणत्‍याही कोर्टात अर्ज दाखल केलेला नाही.  जाबदार हे या मे.कोर्टाचे स्‍थळसीमेत रहाणारे असून सदरचा अर्ज चालवणेचा अधिकार या मे.कोर्टास आहे.    तक्रारदारानी जाबदार संस्‍थेकडे दि.29-8-08 रोजी मूळ ठेवपावती क्र.8586, रक्‍कम रु.40,000/- अधिक ठेवपावतीवरील मुदत संपलेनंतर मिळणारी रक्‍कम तसेच सदर रकमेवर आजपर्यंत द.सा.द.शे.13 टक्‍क्‍याने होणारे व्‍याज तक्रारदाराना जाबदाराकडून वसूल होऊन मिळावे, तसेच तक्रारदाराना झालेल्‍या मानसिक त्रास व आर्थिक नुकसानीपोटी रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- जाबदाराकडून तक्रारदारास मिळणेचे आदेश व्‍हावेत अशी विनंती तक्रारदारानी केली आहे.  येणेप्रमाणे तक्रारअर्ज असे.   

2.        जाबदार क्र.4 ते 9 यांनी त्‍यांचे म्‍हणणे नि.11 कडे पुढीलप्रमाणे दाखल केले आहे-

       तक्रारदारानी दाखल केलेल्‍या तक्रारीतील संपूर्ण मजकूर खोटा, लबाडीचा व वस्‍तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, तो जाबदारांना मान्‍य व कबूल नाही.  तक्रार कलम 1 ते 4 मध्‍ये नमूद केलेला सर्व मजकूर खोटा, लबाडीचा व बनावट आहे, तो जाबदाराना मान्‍य व कबूल नाही.  तक्रारकलम 5 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नाही.  तक्रारीतील कारण खोटे व बनावट स्‍वरुपाचे आहे.   तक्रारकलम 6 मध्‍ये नमूद केलेप्रमाणे तक्रारअर्ज दाखल करणेस तक्रारदाराना कोणताही कायदेशीर हक्‍क व अधिकार नव्‍हता व नाही.  तक्रारदार या जाबदार संस्‍थेच्‍या ग्राहक नसून सभासद आहेत.  सहकारी संस्‍थेचा सभासद हा संस्‍थेचा भागधारक असतो.  त्‍यामुळे तो मालक आहे.  तरी तक्रारदार व जाबदारांचे संबंध हे ग्राहक व मालक असे नाहीत.  सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा.  तक्रारअर्ज कलम 7 अ ते 7 ड मध्‍ये तक्रारदारानी केलेली मागणी चुकीची आहे.   

       जाबदार संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा 1960 चे तरतुदीप्रमाणे नोंदलेली सहकारी संस्‍था असून तिचा कारभार सदर कायदयाच्‍या तरतुदीनुसार चालतो.  संस्‍थेच्‍या व्‍यवसायासंबंधी काही तक्रार वा वाद निर्माण झालेस ते सदर कायदयाच्‍या कलम 91 प्रमाणे सहकारी कोर्टामार्फत निवारण केले जातात.  तक्रारदार जाबदार संस्‍थेचे सभासद असल्‍यामुळे तक्रारदारांचा वाद हा कलम 91 चे कक्षेत येतो.  त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार या मे.मंचासमोर चालू शकत नाही. 

     तक्रारदारानी अर्ज कलम 2 मध्‍ये वर्णन केलेली ठेव ही संस्‍थेचे तेव्‍हाचे चेअरमन शंतनु दुर्योधन रणनवरे म्‍हणजेच जाबदार क्र.2 व त्‍यावेळच्‍या संचालक मंडळातील सदस्‍य व व्‍यवस्‍थापक यांचेबरोबर विचारविनिमय करुन ठेवली होती.  संस्‍थेच्‍या तेव्‍हाच्‍या चेअरमन, व्‍यवस्‍थापक व संचालक मंडळ यानी संस्‍थेचे कामकाज नीट पाहिले नाही, ठेवीदारांच्‍या मोठया रकमेचा अपहार केला. त्‍यामुळे संस्‍थेची आर्थिक स्थिती पूर्ण कोलमडली त्‍यामुळे संस्‍थेचे सर्व आर्थिक व्‍यवहार ठप्‍प झाले व संस्‍था आर्थिक अडचणीत येऊन बंद पडली.    जाबदार संस्‍थेची महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थांचा कायदा 1960 चे कलम 88 नुसार दि.3-7-09 ते दि.27-6-11 चे दरम्‍यान चौकशी अधिकारी श्रीमती जयश्री जाधव, निवृत्‍त सहकारी न्‍यायाधीश यांचेतर्फे चौकशी होऊन संस्‍थेच्‍या संपूर्ण व्‍यवहारास जबाबदार असणारे त्‍यावेळचे चेअरमन, व्‍हा.चेअरमन म्‍हणजेच जाबदार क्र.1 ते 3, त्‍यावेळचे संस्‍थापक व संचालक मंडळातील सदस्‍य यांचेवर रक्‍कम रु.35 कोटी 23 लाख इतक्‍या रकमेची आर्थिक जबाबदारी निश्चित करणेत आलेली आहे.    संस्‍थेच्‍या संचालक मंडळाचा पदभार स्विकारलेनंतर संस्‍थेचे थकीत कर्जदार व त्‍यांचे जामीनदार यांचेविरुध्‍द महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थांचा कायदा 1960 चे कलम 101 अन्‍वये वसुली दाखले मिळवलेले आहेत.  तसेच काही थकीत कर्जदारांविरुध्‍द कलम 101 अन्‍वये वसुली दाखले मिळवणेची कारवाई चालू आहे, त्‍यातच काही वसुली दाखल्‍यांविरुध्‍द विभागीय सहनिबंधक सहकारी संस्‍था कोल्‍हापूर यांचेकडे रिव्‍हीजन अर्ज दाखल झाले आहेत व काही संस्‍थेस दाखल करावी लागली आहेत. सदर जाबदार हे तक्रारदारांनी ज्‍यावेळी ठेव ठेवली त्‍यावेळी संचालक मंडळाचे सदस्‍य नव्‍हते.  तक्रारदारानी ज्‍यावेळी ठेवी ठेवल्‍या त्‍यावेळचे चेअरमन, व्‍यवस्‍थापक व संचालक मंडळ म्‍हणजेच जाबदार क्र.1 ते 3 हेच तक्रारदारांचे ठेवी देणेस कायदयाने जबाबदार आहेत.  संस्‍थेची थकीत कर्जाची वसुली करत असताना बरेच कर्जदार हे कर्ज निल झालेचे बोगस दाखले सादर करीत आहेत, त्‍यामुळे संस्‍थेला सदर व्‍यवहाराची शहानिशा करणेसाठी न्‍यायालयीन प्रक्रीयेत जावे लागत आहे. सदरची प्रक्रीया ही खूप वेळखाऊ व खर्चिक असलेमुळे कर्जवसुली करताना अडचणी निर्माण होतात.    कर्जदारांमध्‍ये तत्‍कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व संचालकांकडून जवळजवळ 15 कोटीपेक्षा जास्‍त रक्‍कम येणे आहे.  त्‍यामुळे सदर कर्जाची वसुली करणे ही अशक्‍यप्राय बाब आहे व सदर कर्जदारांचे वसुली दावे न्‍यायप्रविष्‍ट असलेमुळे वसुली प्रक्रीया प्रलंबित आहे.    महाराष्‍ट्र शासनाने संस्‍थेस दि.31 मार्च 2010 रोजी रु.1,55,13,742/- इतक्‍या रकमेची बिनव्‍याजी कर्जरुपाने एक वर्ष मुदतीसाठी मदत केलेली आहे.  महाराष्‍ट्र शासनाचे आदेशाप्रमाणे  रक्‍कम रु.10,000/- पेक्षा कमी ठेव असणारे ठेवीदारांना वरील रकमेचे संस्‍थेने वाटप केलेले आहे.  महाराष्‍ट्र शासनाची वर नमूद रक्‍कम 31 मार्च 2011 पर्यंत परत करणेची होती.  संस्‍थेने थकीत कर्जदारांकडून वसुली करुन मार्च 2011 अखेर रक्‍कम रु.2 लाख परतफेड केलेली होती व आजअखेर जवळजवळ रक्‍कम रु.32,31,521/- इतकी रक्‍कम परतफेड केलेली आहे.  महाराष्‍ट्र शासनाची अजून रक्‍कम रु.1,29,00,000/- इतकी कर्जरक्‍कम देणे बाकी आहे. 

3.       नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे अँड.पिसाळ यांचे वकीलपत्र, नि.5 कडे कागदयादी, नि.5/1 कडे दि.29-8-08 ची तक्रारदाराचे नावे असलेली मूळ ठेवपावती क्र.8586 जिचा खाते क्र.36/74 असून रक्‍कम रु.40,000/- आहे. नि.5/2 कडे तक्रारदारानी जाबदार संस्‍थेचे चेअरमन/मॅनेजर याना दिलेल्‍या दि.23-1-09 रोजीच्‍या पत्राची स्‍थळप्रत, नि.5/3 कडे अँड.वसंतराव भोसले यानी जाबदाराना पाठवलेल्‍या नोटीसची स्‍थळप्रत, नि.5/4 कडे पोस्‍टाच्‍या पावत्‍या, नि.5/5 कडे जाबदार क्र.7 यांचे सहीची पोहोचपावती, नि.5/6 कडे जाबदार क्र.1 चा लेफ्ट शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/7 कडे जाबदार क्र.2 चा लेफ्ट शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/8 कडे जाबदार क्र.3 चा अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/9 कडे जाबदार क्र.4 चा अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/10 कडे जाबदार क्र.5 चा अँबसेंट शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/11 कडे जाबदार क्र.6 चा अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/12 कडे जाबदार क्र.8 चा अनक्‍लेम्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.5/13 कडे जाबदार क्र.9 चा अपु-या पत्‍त्‍याच्‍या शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.6 कडे तक्रारदाराचा पत्‍तामेमो, नि.6/1 कडे मंचाने जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि.10 कडे जाबदार क्र.3 ते 9 यांचा वकीलपत्र देणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.9 कडे अँड.इनामदार यांचे वकीलपत्र, नि.11 कडे जाबदार क्र.4 ते 9 यांचे म्‍हणणे, नि.11/1 कडे प्रतिज्ञापत्र, नि.12 कडे जाबदार क्र.1 च्‍या सहीची पोहोचपावती, नि.12/1 कडे जाबदार क्र.2 चे सहीची पोहोचपावती, नि.12/2 कडे जाबदार क्र.6 ची पोहोचपावती, नि.12/3 कडे जाबदार क्र.6 चे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.12/4 कडे जाबदार क्र.5 चे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला नोटीस लखोटा, नि.12/5 कडे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला जाबदार क्र.8 चा नोटीस लखोटा, नि.12/6 कडे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला जाबदार क्र.4 चा नोटीस लखोटा, नि.12/7 कडे लेफ्ट शे-याने परत आलेला जाबदार क्र.9 चा नोटीस लखोटा, नि.12/8 कडे रिफ्यूज्‍ड शे-याने परत आलेला जाबदार क्र.3 चा नोटीस लखोटा, नि.12/9 कडे तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.13 कडे तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद, नि.14 कडे जाबदार क्र.4 ते 9 यांचेतर्फे अँड.कदम यांचे वकीलपत्र, नि.15 कडे जाबदारांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल करणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.16 कडे जाबदार क्र.4 ते 9 चे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र दाखल करणेसाठी अर्ज, अर्ज मंजूर. नि.17 कडे जाबदार क्र.4 यांचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र, नि.18 कडे जाबदारांचा लेखी युक्‍तीवाद, नि.19 कडे जाबदार क्र.4 ते 9 तर्फे कागदपत्रे दाखल करणेसाठी परवानगीचा अर्ज, अर्ज मंजूर. नि.20 कडे कागदयादी, नि.20/1 कडे जाबदार पतसंस्‍थेची कलम 88 अन्‍वये झालेल्‍या चौकशीचा अहवाल दाखल.

 

4.      तक्रारदारांची तक्रार, त्‍यासोबतचे प्रतिज्ञापत्र, पुरावे, जाबदारांनी दाखल केलेले म्‍हणणे व कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद व उभय विधिज्ञांचा युक्‍तीवाद यांचा विचार करुन सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                                          निष्‍कर्ष

 

 1.  तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये ग्राहक व

     सेवापुरवठादार असे नाते आहे काय?                             होय.   

 

 2.  जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय?      होय.

 

 3.  जाबदार हे तक्रारदारांच्‍या रकमा देणे लागतात काय?                होय.

 

 4.  अंतिम आदेश काय?                              तक्रारअर्ज अंशतः मंजूर.

 

विवेचन-

5.         मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.  जाबदार पतसंस्‍था ही लोकांचे पैसे विविध खात्‍यांवर ठेवून घेते व त्‍यावर ठेवीदारास व्‍याज देते.  तसेच ती लोकांना कर्जरुपाने पैसे देते व त्‍यावर व्‍याज घेते अशा प्रकारे जाबदारांचा व्‍यवहार-व्‍यापार चालतो.  तक्रारदारांनी जाबदार पतसंस्‍थेत ठेवपावती ठेवलेली होती.  यावरुन तक्रारदार जाबदार पतसंस्‍थेचे ग्राहक असून त्‍यांचा व जाबदार पतसंस्‍थेचा व्‍यवहार होता हे सिध्‍द होते. तसेच जाबदार पतसंस्‍था रकमा ठेवून घेते व त्‍यावर व्‍याज देते त्‍यामुळे जाबदार पतसंस्‍था ही ग्राहकाना सेवा पुरवठा देणारी संस्‍था ठरते.  तक्रारदारानी जाबदारांकडे वारंवार रकमेची मागणी करुनही आजपावेतो जाबदारांनी तक्रारदारांची रक्‍कम सव्‍याज परत केलेली नाही यावरुन जाबदारानी तक्रारदाराना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केलेली आहे हे सिध्‍द होते.

 

6.       नि.11 कडे जाबदार क्र.4 ते 9 यांनी म्‍हणणे दाखल केलेले आहे.  जाबदार क्र.1,2,3 यांना नोटीसा मिळूनही ते मंचात गैरहजर राहिलेमुळे त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारित करणेत आले आहेत.  जाबदारानी तक्रारदाराना त्‍यांची रक्‍कम सव्‍याज परत केली पाहिजे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.  म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.  जाबदार हेच संस्‍थेचे सर्वेसर्वा असतात व सर्व कारभार तेच पहात असतात म्‍हणूनच तक्रारदारांचे पैसे परत करणेस co-operate corporate veil नुसार जाबदार क्र.1 पतसंस्‍था व जाबदार क्र.2 ते 13 यांना हे मंच वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरु शकते परंतु सदर कामी जाबदार क्र.4 ते 9 यानी नि.20/1 कडे जाबदार पतसंस्‍थेचा कलम 88 खालील झालेल्‍या चौकशीचा अहवाल दाखल केला असल्‍याने तो विचारात घेणे मे.मंचास आवश्‍यक आहे.  त्‍यामुळे दाखल केलेला 88 चा अहवाल विचारात घेऊन हे मंच जाबदार क्र.4 ते 9 यांना कोणत्‍याही प्रकारे जबाबदार धरीत नाही व जाबदार क्र.1 ते 3 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदार धरीत आहे.

7.      सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-

                             आदेश

1.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2.  तक्रारदारांची मुदतठेव पावती क्र.8586, खाते क्र.36/74 वरील रक्‍कम रु.40,000/- व त्‍यावर दि.29-8-2008 पासून आदेश पारित तारखेपर्यंत जाबदार पतसंस्‍थेच्‍या नियमाप्रमाणे होणारे व्‍याज अशी एकूण सव्‍याज रक्‍कम जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदारास अदा करावी.

 

3.   तक्रारदाराना जाबदार क्र.1 ते 3 यानी आर्थिक, मानसिक त्रासापोटी रु.8,000/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.4,000/- वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावेत.

 

4.   वरील आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या 45 दिवसांचे आत करणेचे आहे.  तसे न केलेस तक्रारदाराच्‍या हाती रक्‍कम पडेपर्यंत होणा-या रकमेवर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज अदा करावे लागेल.

 

5.  वरील आदेशाचे पालन जाबदारानी विहीत मुदतीत न केलेस तक्रारदारांना त्‍यांचेविरुध्‍द कलम 25 व 27 नुसार मंचाकडे दाद मागणेची मुभा राहील.

 

6.   सदर न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

 

7.  सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत याव्‍यात.

 

 

ठिकाण- सातारा.

दि.  16– 4-2015.

 

 

       (सौ.सुरेखा हजारे)   (श्री.श्रीकांत कुंभार)    (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या            सदस्‍य            अध्‍यक्षा

                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.