(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 27 एप्रिल 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार त्यांनी विरुध्दपक्षाकडून पेस्ट कंन्ट्रोल आणि एन्टी टरमाईट ट्रीटमेंट बद्दलची सेवा (उदडी, दिमक रोधी उपाय योजना) त्यांच्या मराठा मंदीर झाशी राणी चौक, सिताबर्डी, नागपुर येथील कार्यालयाकरीता घेतली. त्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास रुपये 3,000/- दिले असून, रक्कम दिल्याबाबतची पावती क्रमांक पी.ओ.के./एटीटी/11-12/02, दिनांक 2.4.2011 रोजी दिली. विरुध्दपक्षाने भरोसा आणि आश्वासन दिले होते की, सदरची उपाय योजना केल्यानंतर 1 वर्षा पर्यंत तक्रारकर्तीच्या कार्यालयात उदडी किंवा डीमक लागणार नाही.
2. विरुध्दपक्षाने कार्यालयात एन्टी टरमाईटची सेवा दिल्यानंतर 6 महिण्याचे आतच तक्रारकर्तीच्या कार्यालयातील कॅबिनचे प्लायवुडला उदडी, दिमक लागल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे संपूर्ण फर्निचर खराब होऊन क्षतिग्रस्त होऊ लागले. विरुध्दपक्षाने ऑक्टोंबर 2011 मध्ये त्यांचे कर्मचारी तक्रारकर्तीच्या कार्यालयात पाठविले व क्षतिग्रस्त झालेल्या फर्निचरचे निरिक्षण केल्यानंतर दिमकने खराब झाले असे सांगितले व स्वतःच्या खर्चाने प्लॉयवुड बदलवून देण्याची हमी दिली. परंतु, तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाला वारंवार फोन करुन त्याच्या कार्यालयात भेट देवूनही विरुध्दपक्षाने जाणीवपूर्वक तक्रारकर्त्याची मागणीकडे दुर्लक्ष केले आणि आजपर्यंत प्लॉयवुड बदलवून दिले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीची फसवणूक व धोकाधाडी केली आहे. तक्रारकर्तीच्या प्रार्थने नुसार तक्रारकर्तीच्या कार्यालयातील कॅबिनचे संपूर्ण प्लॉयवुड स्वखर्चाने बदलवून द्यावे किंवा त्याकरीता लागणारा खर्च रुपये 1,00,000/- तक्रारकर्तीस द्यावा. सदर प्रकरणामुळे तक्रारकर्तीस व्यवसायात झालेल्या नुकसान भरपाई म्हणून 1,00,000/- रुपये 18 टक्के व्याजासह देण्याचा आदेश व्हावा. तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारीरीक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 15,000/- द्यावे.
3. तक्रारकर्तीचे तक्रारीनुसार विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली, विरुध्दपक्ष यांनी मंचात उपस्थित होऊन उत्तर सादर केले. विरुध्दपक्षाने उत्तरात नमूद केले की, तक्रारकर्तीच्या विनंतीवरुन विरुध्दपक्षाने अंदाजे 600 चौरस फुट च्या ऑफीसची एन्टी टरमाईडची ट्रीटमेंट 2011 साली करण्यात आली व ती संपूर्ण व्यवस्थितपणे व तक्रारकर्तीचे समाधान होईपर्यंत देण्यात आली. तक्रारकर्तीने रुपये 3000/- दिले नाही, ही बाब दिनांक 3.4.2011 चे बिलावरुन स्पष्ट होते. विरुध्दपक्ष हे पेस्ट कंट्रोल आणि एन्टी टरमाईड ट्रीटमेंट करण्याकरीता प्रसिध्द कंपनी आहे. तक्रारकर्तीकडून विरुध्दपक्षाने काम घेतले तेंव्हा तक्रारकर्तीच्या ऑफीसमध्ये असलेल्या प्लॉययवुडला अंदाजे 80 टक्के भागद उदडी लागलेली होती व प्लॉयवुड 80 टक्के डॅमेज झालेले होते. तसेच, तक्रारकर्तीस समजावून सांगितले की, एन्टी टरमाईड ट्रीटमेंट म्हणजे ऑफीसर प्लिन्थ मध्ये Inject औषधी टाकण्यात येते. (Inject chemical namely Chiaropyrieos) त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस स्पष्टपणे सांगितले की, डॅमेज झालेले प्लॉयवुडचा ईलाज ही ट्रीटमेंड करु शकत नाही. विरुध्दपक्षाने पूर्ण ऑफीसचे प्लिन्थमध्ये औषधी टाकून पूर्णपणे तक्रारकर्तीचे समाधान होईपर्यंत ट्रीटमेंट केली त्यात कोणताही दोष किंवा कमतरता केली नाही. परंतु, तक्रारकर्तीने एन्टी टरमाईडची ट्रीटमेंट झाल्यानंतर डॅमेज झालेले प्लॉयवुड बदलेले नाही, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एकदा डॅमेज किंवा उदडी लागलेल्या वस्तु दुरुस्त होत नाही, तर उदडी जी जमिनीमधून येते त्याची योग्य व पूर्णपणे ट्रीटमेंट करण्यात आली. पहिल्यापासून डॅमेज झालेले प्लॉयवुडसाठी विरुध्दपक्ष जबाबदार नाही. विरुध्दपक्षाच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता नाही तक्रारकर्तीच्या चुकीमुळे हा प्रकार घडलेला दिसून येतो, त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी विनंती केली.
4. विरुध्दपक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तक्रारकर्तीच्या वकीलांनी मौखीक युक्तीवादाकरीता पुरसीस दाखल केली. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांनी अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्तीने विरुध्दपक्षाकडून आपल्या ऑफीसमध्ये एन्टी टरमाईड ट्रीटमेंट (उदडी किंवा दिमक रोधी उपाय योजना) केली. त्याकरीता तक्रारकर्तीने विरुध्दपक्षास रुपये 3000/- नगदी दिले असे निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.1 बिल क्रमांक पी.ओ.के./एटीटी/11-12/02, दिनांक 2.4.2011 प्रमाणे दिसून येते. त्यात 1 वर्षाची गॅरंटी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.4 वरील फोटोग्राफमध्ये खराब झालेले डॅमेज प्लॉयवुड उदडीमुळे झाल्याचे दिसून येते. तक्रारकर्तीने निशाणी क्र.13 नुसार दिनांक 4.3.2015 ला रोजी आर्कीटेक्टचे फर्निचरची किंमत रुपये 1,20,000/- असल्याचे सर्टीफीकेट अभिलेखावर दाखल केले. विरुध्दपक्षाने आर्कीटेक्टची उलटतपासणी घेण्याकरीता अर्ज दाखल केला, परंतु मंचाने दिनांक 22.8.2016 रोजी अशा त-हेची उलटतपासणी घेण्याबाबत ग्राहक संरक्षण कायद्यात तरतूद नाही, त्यामुळे सदरचा अर्ज खारीज करण्यात आला. त्यानंतर, विरुध्दपक्षाने दिनांक 13.2.2017 रोजी शपथपञ दाखल केले, त्यात त्यांनी एन्टी टरमाईड ट्रीटमेंट प्लिन्थ लेवलमध्ये Inject केल्याचे सांगण्यात आले आहे, परंतु आधीच 80 टक्के डॅमेज असलेले प्लॉयवुड सदर ट्रीटमेंटव्दारे दोष रहीत होऊ शकत नाही. एन्टी टरमाईडची ट्रीटमेंट झाल्यानंतर तक्रारकर्तीने सदरचे प्लॉयवुड बदलावयास पाहिजे होते, परंतु तक्रारकर्तीने ते बदलविले नाही, त्याकरीता विरुध्दपक्ष जबाबदार नाही.
6. विरुध्दपक्षास रुपये 3000/- देवून एन्टी टरमाईडची ट्रीटमेंट केल्यानंतर उदडी किंवा दिमक प्लॉयवुड खराब होता कामा नये. परंतु, निशाणी क्र.3 नुसार दस्त क्र.4 वर दाखल केलेल्या फोटोग्रॉफ प्रमाणे आता प्लॉयवुडवर उदडी लागली असल्याचे दिसून येत आहे. याचाच अर्थ एन्टी टरमाईड ट्रीटमेंट विरुध्दपक्षाने व्यवस्थित केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत सेवेत ञुटी केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर होण्यास पाञ आहे असे मंचाला वाटते.
करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीस मानसिक व शारीरीक ञासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 7,000/- द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष यांनी तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 3,000/- तक्रारकर्तीला द्यावे.
(4) विरुध्दपक्ष यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 27/04/2017