श्री.बलराम दत्त, रा.फात्माबाई चाळ, पाहिला मजला, रुम क्र.6, जंगल मंगल रोड,सर्वोदया नगर, भांडूप मुंबई 400 078 ----- ----------- तक्रारदार विरुध्द 1. पेप्सीको इंडिया होल्डींगझ्र प्रा.लि., सुंदरबाग इस्टेट, सायन ट्रॉम्बे रोड, देवनार, चेंबुर मुंबई 400 088 ------------ सामनेवाला क्र.1 2. संचालक, तनुश्री हेमा पेप्सीको इंडिया होल्डींगझ्र प्रा.लि. निशांत एन्टरप्रायजेस, देवेीदयाळ स्टेनलेसस्टील प्रा.लि. कांजुरमार्ग ( पूर्व ) मुंबई 400 078 ------------ सामनेवाला क्र.2 मंच:- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा श्री.ग.ल.चव्हाण, सदस्य निकालपत्र तक्रारदारातर्फे ऍड.श्री.मदनानी. सामनेवालेसाठी -- ऍड. श्री.तळाशीकर. मा. अध्यक्षानुसार दिलेले निकाल पत्र. ग्राहक वाद संक्षिप्त स्वरुपात खालील प्रमाणे. 1. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी की, सामनेवाले कंपनीने ’ है कोई जवाब ’ ही एक योजना जाहीर केली होती. प्रत्येक पेप्सीकोलाच्या बाटलीच्या बिल्याच्या आतील बाजूस टोकन नंबर दिलेले होते. या योजनेनुसार सामनेवाले कंपनी त्या बाबतीत लकी ड्रॉ काढणार होती, व त्यात जो लकी टोकन नंबर निघेल त्या टोकन नंबरच्या बाटलीतील पेप्लीकोला पिणा-याला रुपये 10,00,000/- किंवा 2 किलो सोने येवढे बक्षीस सामनेवाले कंपनी देणार होती. सदर योजनेची जाहीरात दूरदर्शनवरही जाहीर केली होती. तसेच ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. 2. तक्रारदार याचे म्हणणे असे की, त्याने भांडूप येथील श्री.सुग्रीव गुप्ता या विक्रेत्याकडून तारीख 1/08/2002 रोजी पेप्सीकोलाची बाटली विकत घेतली होती. त्या बाटलीच्या आतील बाजूचा टोकन नंबर 609 होता. व तो लकी टोकन नंबर होता . त्याने तो बिल्ला सांभाळून ठेवला. मात्र त्या पेप्सीतील पेप्सी पिल्यानंतर त्याला समजले की, ती पेप्सी दुषीत आहे, कारण त्यामुळे त्याची तब्बेत बिघडली व त्याला औषोधोपचार घ्यावा लागला. 3. तक्रारदार याचे म्हणणे असे की, त्याने सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेशी संपर्क साधुन त्या लकी टोकन नंबर बाबत कळविले. त्यांनी त्यांच्या एजन्सीकडे संपर्क साधुन श्री.आकाश किंवा श्री.प्रशांत गोयल यांना भेटावयास सांगीतले. त्याने फोनवरुन त्यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतू ते भेटले नाही. त्याने सामनेवाले क्र.2 शी संपर्क साधला. परंतु तीने बोलण्यास नकार दिला. त्याने सामनेवाले यांचेशी पत्रव्यवहार केला व नोटीसही पाठविली. परंतु सामनेवाले यांनी त्याला प्रतिवाद दिला नाही. तक्रारदार याचे म्हणणे असे की, सामनेवाले कंपनीने ग्राहकाची फसवणूक केली. सामनेवाले यांनी जाहीर केलेल्या योजनेनुसार ते त्याला 10,00,000/- रुपये किंवा 2 किलो सोने, देण्यास जबाबदार आहेत. परंतु त्यांनी ते दिले नाही ही त्यांच्या सेवेत न्युनता आहे. म्हणून तक्रारदार यांनी सदरहू तक्रार दाखल करुन रुपये 10,00,000/- किंवा 2 किलो सोने तसेच मानसीक त्रासाबाबत रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई व या तक्रारीचा खर्च सामनेवाले यांचेकडून मिळावा अशी विनंती केली आहे. त्यानंतर तक्रारदार याने त्याच्या क्लेमच्या रक्कमेत वाढ करुन Statement of Claim तारीख 9/11/2009 रोजी दाखल केले. नविन क्लेम प्रमाणे त्याने 2 किलो सोन्याची किंमत रु.12,30,000/-, त्यावर व्याज, वकीलाची फी रुपये 50,000/- मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.50,000/- अनुषंगीक खर्च रुपये 50,000/- व कन्व्हेअन्सचा खर्च रुपये 20,000/- असे एकूण 14,75,000/- मागणी केलेली आहे. 4. सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे म्हणणे देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले आहेत. त्यांचे म्हणणे की, तक्रारदार याने पेप्सीकोलाची बाटली विकत घेतली होती हे दाखविण्यासाठी बिल किंवा कॅश मेमो दाखल केला नाही. त्यामुळे ते त्यांचे ग्राहक आहेत असे म्हणता येणार नाही. 5. सामनेवाले क्र.1 यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी केव्हाही अशी योजना जाहीर केली नव्हती की, टोकन नंबर 609 असलेल्या पेप्सीच्या बाटलीच्या ग्राहकाला रुपये 10,00,000/- किंवा 2 किलो सोने येवढे बक्षीस दिले ेजाईल. तक्रारदार याने ’ है कोई जवाब ’ या योजने बाबतचे कागदपत्र दाखल केले आहेत. सदरहू योजना 300 एम.एल., 250 एम.एल., 200 एम.एल.च्या ज्या पेप्सीच्या बाटलीत रेड रिंगचा बिल्ला असेल अशा बाटल्यांना लागू होती. पहीली पाच बक्षीसं प्रत्येकी रुपये 5,00,000/-ची दुसरी 250 बक्षीसं प्रत्येकी रुपये 10,000/-ची तिसरं बक्षीसं 300 एम.एल. बाटलीतील फक्त पेय फुकट अशी बक्षीसं होती. तसेच ड्रॉ प्रत्येक 15 दिवसानंतर काढावयाचा असे होते. सदरहू योजना 8 पंधरवडयासाठी होती. ती फक्त 31/7/2001 च्या 5 वाजेपर्यत होती. सदरहू योजनेकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी मे.एम.बी.बिलीमोरया आणि कंपनी यांना नेमले होते. ज्या ग्राहकाच्या बाटलीचा नंबर लकी निघाला त्यांना फोन नंबर 9622-099099 यावर संपर्क करावयाचा होता. हया योजनेच्या शर्ती व अटी वर्तमान पत्रात त्यांनी जाहीर केल्या होत्या. 6. हया योजनेच्या कालावधीत नकी नंबर (Wining Number) 420,747,007 व 206 हे जाहीर केले होते. टोकन नंबर 609 हा प्राईज विनींग नंबर जाहीर केला नव्हता. त्यामुळे तक्रारदाराला Claim (बक्षीस ) मागण्याचा अधिकार नाही. म्हणून सदर तक्रार रद्द करावी व त्यांचा खर्च देलवावा. 7. आम्ही तक्रारदार यांच्यातर्फे वकील श्री.मदनानी, सामनेवाले यांच्यातर्फे वकील श्री.तळाशीकर यांचा तोंडी युक्तीवाद व कागदपत्रं वाचली. 8. तक्रारदार याने ’ है कोई जवाब ’ या योजनेची वर्तमान पत्रात जी जाहीरात आली होती त्याच्या संबंधीत कात्रण दाखल केले आहे. त्यात त्या योजनेखाली रुपये 10,00,000/- किंवा 2 किलो सोन्याचे बक्षीस असल्याबाबत नमुद नाही. त्यात उल्लेख आहे की, पहिली 5 बक्षीसं प्रत्येकी रुपये 5 लाखाची, 250 बक्षीसं प्रऱ्येकी रुपये 10,000/- ची व तीसरे बक्षीस 300 mL च्या पेप्सीच्या बाटलीतील पेप्सी विनामुल्य. लकी ड्रॉ प्रत्येक 15 दिवसानंतर काढणार होते. जाहीरातीत स्पष्टपणे नमुद आहे की ’ Date for receiving entries is July-31, 2001 " Ÿ#141;θ#164;¸µ“ ´Æ#157;#157; , Ã#164;#184;#198; Ÿ¸ ô#173;¾»#8250;¾œ¾#157;µŸ†#187; Æ#376;. ´¡Ÿµ ²#167;#187;#8220; ¯¸¾ Ÿ#141;θ#164;¸µ ¤#187;»» Æ. 9. सामनेवाले यांनी या योजनेची जाहीरात दिलेल्या वर्तमानपत्राचे संबंधित कात्रण दाखल केले आहे. त्यात रु. 10,00,000/- रुपये किंवा 2 किलो सोने हि योजनेखाली बक्षीस होती असे नमुद केलेले नाही. मात्र सामनेवाले यांनी त्यांच्या कैफियत मध्ये नमुद केलेल्या वरील बक्षीसांचा उल्लेख आहे. यामध्ये असे नमुद आहे की, या योजनेचा कालावधी 31/07/2001 च्या 5 वाजेपर्यत होता. सामनेवाले यांनी या योजनेबाबत M/s Billimoria & Co., Auditors यांना नेमले होते. त्यांच्याच देखरेखीखाली सदरहू योजनेची कार्यवाही होणार होती. सामनेवाले यांनी M/s Billimoria & Co., यांनी घोषित केलेल्या विनर लकी टोकन नंबरची यादी दाखल केली आहे व त्या यादीमध्ये संबंधित तारखाही दिलेल्या आहेत. सामनेवाले यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन असे स्पष्ट आहे की, सदरहू ’ है कोई जवाब ’ ही योजना 31/07/2001 च्या 5 वाजेपर्यत होती. तक्रारदार याने त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याने पेप्सी कोलाची बाटली 1/8/2002 रोजी विकत घेतली. म्हणजेच त्या दिवशी सदरहू योजना अस्तित्वात नव्हती. तसेच विनींग टोकन नंबर 609 होता या बद्दल ही तक्रारदार याने लेखी पुरावा दिलेला नाही. तक्रारदार याने सदरहू बाटली विकत घेतली होती या बद्दल पूरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तो सामनेवाल्यांचा ग्राहक होता असा निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारदार याने जे बिल दाखल केलेले आहे ते त्याच्या नांवावर नाही. त्यामधील ग्राहकाचे नांव खोडून टाकलेले आहे. तक्रारदाराचे म्हणणे की सदरहू बिल हे मे.विजय कोल्डड्रिक्स यांनी मे.गुप्ता स्टोअर्स यांना दिलेले आहे. सदरहू बिलावरुन तक्रारदार सामनेवाले यांचा ग्राहक होत नाही. 10. वरील विवेचनावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदाराने तो सामनेवाले यांचा ग्राहक होता व सामनेवाले त्यास बक्षीस देण्यास जबाबदार होते परंतु दिले नाही व सेवेत न्यूनता केली हे सिध्द केलेले नाही. सदरहू तक्रार रद्द होण्यास पात्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करत आहे. †#164;¿/span> 1. Ÿ#141;θÎ#180;#141;129/2003 ¸#167;#178;Ÿ#187;#184;#157;µŸµŸ. 2. ˆ³#181;¯#129;#141;¸#173; †#175;¯#187; #8220; Ã#195;¾. 3. †#164;¿“µ ¯#207;´#157;#376;¯#207;Ÿ ¤#173;Æ ¯#129;#141;¸#173; #190;#173;´»µ¯š¾#157;µŸµ¾µŸ
| [HONORABLE G L Chavan] Member[HONORABLE S P Mahajan] PRESIDENT | |