निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 13/07/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 14/07/2011
तक्रार निकाल दिनांकः- 10/07/2013
कालावधी 01 वर्ष. 11 महिने. 26 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
कल्याण सुधाकरराव वसेकर. अर्जदार
वय 41 वर्षे. कामधंदा.नौकरी. अड.एस.एन.वेलणकर.
रा.गणेश नगर, मानवत.ता.मानवत जि.परभणी.
विरुध्द
1 पाटील ट्रेडिंग कंपनी लि. व्दारा प्रोप्रायटर गैरअर्जदार.
अधिकृत विक्रेता – सिन्टेक्स सोलार वॉटर हिटर अड. डि.आर.काठूळे.
नवा मोंढा कॉर्नर.श्री एजन्सी समोर,परभणी.
2 अधिकृत प्रतिनिधी / सहयाधिकारी
सिन्टेक्स इंडस्ट्रीज लि.,प्लास्टीक डिव्हीजन
(सिन्टेक्स ग्लास ट्युब सिस्टीम – सोलार वॉटर हिटर) कलोल- 382721
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची व निष्काळजीपणाची सेवा दिल्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे पुढील प्रमाणे आहे, अर्जदार हा मानवत येथील रहिवासी असून अर्जदाराने 2009 मध्ये गरमपाणी मिळण्याकरीता त्याच्या घरी Solar water heater system बसवण्याचे ठरवले. गैरअर्जदार क्रमांक 2 ही पाण्याच्या प्लॅस्टीकच्या टाक्या बनवणारे ख्यातनाम कंपनी आहे. व Solar water heater system चे उत्पादक असल्याने व सदर कंपनीचे अधिकृत विक्रेते परभणी येथील गैरअर्जदार क्रमांक 1 हे असल्याने अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे जावुन सदर system बद्दल चौकशी केली व गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिलेल्या माहिती नुसार अर्जदाराने 200 लिटर क्षमतेची SEGT-20-01 Sintex make Evacuated Glass Tube System- Overall capacity 200 liters दिनांक 12/09/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना 29000/- चा धनादेश देवुन विकत घेतले. व ते बसवण्या करीता अर्जदारास रु.11,000/- खर्च आला. अशा प्रकारे रु.40,000/- खर्च करुन बँकेकडून कर्ज घेवुन सप्टेंबर 2009 मध्ये सिस्टीम कार्यान्वित केली.
नंतर सदर सिस्टीम 4 ते 5 महिने व्यवस्थित चालली नंतर जानेवारी 2010 मध्ये सदरच्या टँकचा जॉंईंट ओपन होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लिकेज चालू झाले व गरम पाणी मिळणे बंद झाले.
अर्जदाराने सदरची गळती दोरी बांधून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु लिकेज थांबले नाही शेवटी अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यास तक्रार दिली व गैरअर्जदार क्रमांक 1 ने सदरची समस्या बघीतली व सिस्टीम बदलणे आवश्यक आहे, असे मान्य केले व कंपनीस कळवतो. असे सांगीतले, परंतु गैरअर्जदार 1 ने अर्जदारास प्रतीसाद दिला नाही सदर सिस्टीमची वॉरंटी कालावधी 1 वर्षाचा असल्याने गैरअर्जदाराने अर्जदारास सदरची सिस्टीम बदलुन देणे आवश्यक होते, परंतु गैरअर्जदाराने तसे केले नाही, शेवटी अर्जदाराने 05/07/2010 रोजी कंपनीस आर.पी.ए.डी.व्दारे नोटीस पाठवली. ते कंपनीस 10/07/2010 रोजी मिळाली, परंतु नंतरही दोन्ही ही गैरअर्जदारांनी कोणतीही उपाययोजना केली नाही. व सदर वॉरंटी पिरीयेड मध्ये अर्जदारास गैरअर्जदाराने योग्य सेवा दिली नाही,त्यामुळे सदरची तक्रार दाखल करुन अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, गैरअर्जदाराने सदरचे वॉटर हिटर सिस्टीम निकामी झालेले परत घेवुन अर्जदारास 40,000/- रुपये 12 टक्के व्याजासह द्यावे. व मानसिकत्रासापोटी 10,000/- रुपये व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रुपये गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. नि.क्रमांक 4 वर 5 कागदपत्रांच्या यादीसह 5 कागदपत्रे दाखल केली.ज्यामध्ये 4/1 वर सदर सिस्टीमचे बिल, 4/2 वर 29,000/- रुपये मिळाल्याची पावती, 4/3 वर अर्जदाराच्या बँकचा खाते उतारा, 4/4 वर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 ला केलेला तक्रार अर्ज, 4/5 वर आर.पी.ए.डी.ची पावत्या ई. चा समावेश आहे.
गैरअर्जदारांना आपले म्हणणे दाखल करण्याकरीता मंचातर्फे नोटीसा काढण्यांत आल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु अनेक संधी देवुनही गैरअर्जदार क्रमांक 1 ने मुदतीत लेखी जबाब दाखल केला नाही,म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे विरुध्द दिनांक 04/06/2012 रोजी विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांस मंचाची नोटीस मिळून देखील मंचासमोर हजर होवुन लेखी जबाब सादर न केल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 विरुध्द 02/04/2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदारानी अर्जदाराचे सोलार वॉटर हिटर सिस्टीम
दुरुस्त न करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1
अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 चा ग्राहक आहे, हि बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडून सोलार वॉटर हिटर सिस्टीम SEGT-20-01 Sintex make Evacuated Glass Tube System-overall capacity 200 liters अर्जदाराने दिनांक 22/08/2009 रोजी 29,000/- रुपयांचा धनादेश देवुन खरेदी केले होते. ही बाब नि.क्रमांक 4/1 व 4/2 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते. सदरच्या वॉटर सिस्टीम मध्ये बिघाड झाली होती ही बाब अर्जदाराने 4/4 वरील दाखल केलेल्या कागदपत्रा वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यास संधी देवुनही लेखी जबाब दाखल केला नाही. या वरुन गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने अर्जदारास सदरची सिस्टीम दुरुस्त न करुन सेवेत त्रुटी केल्याचे दिसते. व सदरची सिस्टीम दुरुस्त करुन देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. व तसा कोणताही पुरावा मंचा समोर आणला नाही.
अर्जदारास जानेवारी 2010 पासून गरम पाणी मिळणे बंद झाले म्हणून अर्जदारास मानसिकत्रास झाला असे मंचास वाटते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच पूढील प्रमाणे आदेश करीत आहे.
आ दे श
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वयक्तिक व संयुक्तिकरित्या ( Joint & severally)
सदरचे अर्जदाराची सोलार वॉटर हिटर सिस्टीम आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या
आत दुरुस्त करुन द्यावी.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी वयक्तिक व संयुक्तिकरित्या ( Joint & severally)
अर्जदारास झालेल्या मानसिकत्रासापोटी रु.4,000/- फक्त (अक्षरी रु.चारहजार
फक्त) व तक्रार खर्चापोटी रु. 2,000/-फक्त (अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश
तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास द्यावे.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री.पी.पी.निटूरकर. मा.सदस्य मा.अध्यक्ष