जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/124. प्रकरण दाखल तारीख - 22/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 30/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमूख, - सदस्या प्रज्ञा पि. गंगाधरराव पंचमहालकर वय, 47 वर्षे, धंदा नौकरी, रा. फलॅट क्र.1, दत्त विहार, सरपंच नगर, तरोडा खुर्द, नांदेड अर्जदार विरुध्द. पाटील कन्स्ट्रक्शन अन्ड डेव्हलपर्स, तर्फे, मुख्य भागीदार, श्री. दत्ता पि. नारायणराव गैरअर्जदार पाटील, दांडेगावंकर, रा. स्वयंवर मंगल कार्यालय रोड, सरपंच नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.प्रवीण अग्रवाल. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.रशिद अहमद. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार यांनी ञूटीची व अनूचित सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी आपली तक्रार नोंदविली आहे ती खालील प्रमाणे आहे. अर्जदार यांनी दि.25.7.2008 रोजी गैरअर्जदार यांचेकडून मौजे तरोडा खुर्द ता.जि. नांदेड येथील गट नंबर 141,142 पैकी प्लॉट क्र.110, 111,112, व 113 वर उभारण्यात आलेल्या दत्त विहार अपार्टमेंट या संकूलनातील फलॅट क्र.1 बददल गैरअर्जदारासोबत दि.13.12.2007 रोजी एकूण 1150 चौरस फूट प्रति चौरस रु.800/- चे फूटा प्रमाणे रु.9,19,800/- मध्ये सौदा केला होता. अर्जदाराने खालील प्रमाणे वेळोवेळी एकूण रु.,8,90,000/- गैरअर्जदार यांना दिले आहेत. ------------------------------------------------------------------------ 1. विक्री खतापूर्वी सौदाचिठठीच्या वेळेस रु.2,00,000/- 2. विक्रीखतापूर्वी दि.05.03.2008 रोजी चेकने रु. 50,000/- 3.विक्रीखतापूर्वी दि.05.03.2008 रोजी चेकने रु. 50,000/- 4.विक्रीखताच्या वेळेस दि.25.07.2008 रोजी डीडी द्वारे रु.2,75,000/- 5.विक्रीखताच्या वेळेस दि.25.07.2008 रोजी डीडी द्वारे रु.2,75,000/- 6.विक्रीखतानंतर दि.27.12.2008 चेक द्वारे रु. 10,000/- 7.विक्रीखतानंतर दि.29.12.2008 रोजी चेक द्वारे रु. 10,000/- 8. विक्रीखतानंतर मिटरसाठी दि.30.10.2008 रोजी नगदी रु. 20,000/- --------------------------------------------------------------------------- एकूण रु.8,90,000/- --------------------------------------------------------------------------- यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या हक्कात नोंदणीकृत विक्री खत नंबर 5647 दि.25.07.2008 रोजी एकूण रक्कम रु.7,50,000/- मध्ये 1000 चौरस फूट एवढया क्षेञफळाचा करुन दिले. त्यांचे रु.800/- चौरस फूटा प्रमाणे एकूण किंमत रु.8,00,000/- होत असताना गैरअर्जदाराने अर्जदाराकडून रु.,8,90,000/- वसूल केले. म्हणजे विनाकारण रु.90,000/- जास्तीचे वसूल केले. ती जास्तीची वसूल केलेली रक्कम अर्जदारास वापस मिळावी. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सदनिकेला त्यांचेकडील विज मिटर मधून विज पूरवठा करण्याचे मान्य केले होते. तसेच सदरहू कॉम्पलेक्स करिता स्वतंञ डिपी बसविण्याचे मान्य केले होते. अर्जदार हा सदनिकेत राहण्यास आल्यानंतर गैरअर्जदार यांचे विज मिटर मधून विज पूरवठा घेतला परंतु सदरहू विज पूरवठयासाठी व्यावसायीक दराने विज बिलाची मागणी केली, अर्जदारास ही बाब मान्य नाही. कारण ते घरगूती वापरासाठी विज वापरतात. त्यामूळे त्यांना घरगूती दर लावला पाहिजे. गैरअर्जदाराने ही विनंती अमान्य केली आहे. दि.16.05.2009 रोजी गैरअर्जदाराने सदनिकेचा विज पूरवठा खंडीत केला आहे. तसेच अर्जदाराशी भांडण करुन सदनिकेचा नळ पूरवठा व ड्रेनेज पूरवठा तोडून देण्याची धमकी दिली व कोणतेही कारण नसताना रु.50,000/- ची मागणी केली. या बाबत अर्जदाराने दि.18.05.2009 रोजी भाग्य नगर पोलिस स्टेशन नांदेड यांचेकडे गैरअर्जदारा विरुध्द रितसर तक्रार करुन गून्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच अर्जदाराने गैरअर्जदारा विरुध्द महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचेकडे ही दि. 18.05.2009 रोजी रितसर तक्रार दाखल केलेली आहे. परंतु दोघानीही अर्जदाराच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. अर्जदाराने डिपी बसवण्यासाठी लागणारा सामाईक खर्च रु.15,000/- नगदी स्वरुपात दिलेला आहे व आणखी काही रक्कम ते देण्यास तयार आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, ते राहत असलेल्या सदनिकेची नळ जोडणी व ड्रेनेज लाईन तोडू नये, तसेच विज पूरवठा पूर्नस्थापीत करावा, जास्त घेतलेली रक्कम, मानसिक ञास व दाव्याचा खर्च यापोटी रु.1,90,000/- मिळण्याचे आदेश करावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार यांनी आपले लेखी म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. याप्रमाणे सदरची तक्रार खोटी असून, खोटे कागदपञ व बॅंकेचे स्टेटमेंट दाखल केलेले आहेत. वादग्रस्त सदनिका/फॅमिली युनिट विक्री करण्याचा करार केला होता. सौदा चिठठी प्रमाणे सूपर बिल्टअप क्षेञफळ एकञित करुन विक्री करण्याचा करार करण्यात आला होता. परंतु सदरील फॅमिली यूनिटचे विक्री खत करतेवेळेस अर्जदार यांनी बिल्टअप एरिया प्रमाणे फॅमिली युनिट विक्री करावे असे गैरअर्जदार यांना सांगितले होते. अर्जदाराच्या सूचनेवरुनच गैरअर्जदार यांनी बिल्टअप एरिया म्हणजे 1000 चौ. फूट रु.800/- प्रति चौरस फूटाप्रमाणे सदर फॅमिली युनिटचे विक्रीखत क्रमांक 5647/2008 याप्रमाणे अर्जदार यांना विक्री केलेले आहे. सदर विक्री खतामध्ये फॅमिली यूनिटचे क्षेञफळ 1000 चौ. फूट लिहीण्यात आलेले आहे ज्यांची किंमत रु.7,50,000/- अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दिलेली आहे. त्यामूळे फॅमिली यूनिटची किंमत ठरल्याप्रमाणे रु.8,00,000/- होते तेव्हा रु.50,000/- अर्जदार यांचेकडून येणे बाकी आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी रु.8,90,000/- जी किंमत दाखवलेली आहे त्यात रु.50,000/- दि.5.3.2008, व रु.50,000/- दि.5.3.2008 रोजी, तसेच रु.10,000/-दि.27.12.2008, रु.10,000/- दि.29.12.2008 व रु.20,000/- दि.30.10.2008 ही सर्व खोटी असून गैरअर्जदार यांना सदर रक्कम अर्जदार यांनी कधीही दिलेली नाही. याउलट विक्री खतात रु.2,00,000/- रोख व दोनदा रु.2,75,000/- चा डि.डि.क्र.125965 व 125966 असे एकूण रु. 7,50,000/- गैरअर्जदार यांना अर्जदाराकडून फॅमिली युनिट संबंधी प्राप्त झालेले आहेत व या व्यतिरिक्त कोणतीही रक्कम गैरअर्जदार यांना प्राप्त झालेली नाही. गैरअर्जदार यांना अर्जदार यांचेकडून येणे असलेली रक्कम रु.50,000/- बूडविण्याच्या हेतूने अर्जदार यांनी खोटी तक्रार दाखल केलेली आहे. विक्री खतात उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांचेकडून ट्रान्संफॉर्मर चार्जेस भरण्याची जबाबदारी अर्जदार यांची आहे व ते भरल्यानंतर विद्यूत मिटर अर्जदार हे आपल्या खर्चाने घेऊ शकतील. परंतु अर्जदार यांनी सामाईकरित्या एम.एस.ई.बी. मध्ये ट्रान्सफार्मर चार्जेस दिलेले नाहीत व सदर रक्कम न देताच त्यांनी विज मिटर घेतलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांचेकडून सेवेत कोणतीही ञूटी झालेली नाही. त्यामूळे खर्चासह तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ,तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी किंवा अनूचित प्रकार आढळतो काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदारांनी गैरअर्जदार यांना लिहून दिलेले दि.13.12.2007 रोजीची सौदाचिठठी यात दाखल केलेली असून याप्रमाणे गैरअर्जदार यांचे सदनिकेत फलॅट नंबर 1 ज्यांचे क्षेञफळ 1150 चौरस फूट आहे हे रु.800/- प्रति चौरस फूट याप्रमाणे रु.9,18,800/- देण्याचे ठरलेले होते. गैरअर्जदार यांचे मूळ मालकाशी असलेले डेव्हलपमेट करार कंपनीतर्फे मूख्यातरनामा या बददल वाद नाही. परंतु विक्री खत करतेवेळेस दि.22.7.2008 रोजीच्या विक्री खतामध्ये फलॅटचे क्षेञफळ सूपरबिल्टच्या 1000चौ. फूट असे धरलेले असून त्यांची एकूण किंमत रु.7,50,000/- सौदाचिठठीवर रु.2,00,000/- व रु.2,75,000/- चे दोन डि.डि. नंबर 125965 आणि 125966 विक्री खताचे वेळेस असे एकूण रु.7,50,000/- दिल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. विक्री खताप्रमाणे अर्जदाराने आक्षेप घेतला आहे की, सौदाचिठठी मध्ये 1150 चौ. फूट क्षेञफळ देण्याचे कबूल केले असताना विक्री खतामध्ये सूपर बिल्टअप एरिया म्हणून 1000 चौ. फूट चा ताबा दिला आहे. गैरअर्जदाराने 1000 चौ. फुट मान्य ही केले आहे. पण तो एरिया सूपट बिल्टअप नसून बिल्टअप आहे असे लेखी म्हणण्यात स्पष्ट केलेले आहे. अर्जदाराचा फलॅटचा उपयोग घेत आहेत त्यांना गैरअर्जदार यांनी जर अर्जदार जास्त रक्कम दिल्याचे म्हणत असतील तर मग सौदाचिठठी प्रमाणे सूपर बिल्टअप क्षेञफळ वाढू शकते व किंमतही वाढू शकते परंतु विक्री खतात जो उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांना रक्कमही कमी मिळाली आहे. सौदाचिठठीच्या हीशोबाने 1000 चौ. फूट ठरवलेला रेट रु.800/- धरला तर त्यांना रु.800,000/- याप्रमाणे किंमत होते विक्री खताप्रमाणे रु.7,50,000/- दिले आहेत याप्रमाणे रु.50,000/- अर्जदाराकडेच शिल्लक राहतात असा उजर गैरअर्जदार यांनी घेतला आहे. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात दि.5.3.2008 रोजी दोन चेकने रु.50,000/- व रु.50,000/- दिलेले आहेत व दि.27.12.2008 व दि.29.12.2008 रोजीला रु.10,000/- व रु.10,000/- चे चेक दीलेले आहेत. या बददल अर्जदाराने त्यांना त्यांचे बँकेचे खात्याचे अकाऊट स्टेटमेंट दाखल केलेले आहे. हा उतारा पाहिला असता दि.5.3.2008 रोजीला दिलेले दोन चेक हे दिंगबर यांचे नांवाने दिलेले आहेत. गैरअर्जदार हे दोन्ही चेक नंबर 86750 व 86749 त्यांना मिळालेच नाहीत ते दूसरे ट्रान्जेक्शन असावे असे सांगतात. तसेच दि.27.12.2008 रोजी व दि.29.12.2008 रोजीचे रु.10,000/- व रु.10,000/- चे दोन चेक पंडितराव यांचे नांवाने दिलेले आहेत. म्हणजे पाटील कन्स्ट्रक्शंन यांना दिलेले हे चेक नाहीत. हया सर्व रक्कमेचा विचार केला तर रु.1,20,000/- ची रक्कम ही विक्री खताच्या आधी दिलेली आहे व विक्री खताच्या दिवशी विक्री खतामध्ये या रक्कमेचा उल्लेख केलेला नाही. यावर अर्जदार यांच्या सहया आहेत. फलॅटची किंमत पण रु.7,50,000/- दाखवलेली आहे. म्हणजे विक्री खताच्या वेळी सर्व काही बदलेले आहे. यात यूक्तीवादाचे नंतर गैरअर्जदारांनी अर्जदाराने दिलेले चेक रु.25,000/- चे या प्रकरणात दाखल केलेले आहेत तो चेक दि.2.8.2009 चा आहे. बँकेला सूचना देऊन चेकचे पेमेंट थांबवलेले आहे. जर अर्जदाराने आधी जास्तीची रक्कम दिली असेल तर हे चेक नंतर गैरअर्जदार यांना कशासाठी दिले ? या मागचा उददेश काय तर यावर अर्जदाराच्या वकिलांनी यूक्तीवाद करताना हे ट्रान्जेक्शन या प्रकरणातील नसून वेगळे आहे असा बचाव केलेला आहे. यांची प्लीडिंग तक्रार अर्जात जरी नसली तरी चेक हा उपलब्ध लेखी पूरावा आहे. हे ट्रान्जेक्शन दूसरे असेल तर मग रु.1,20,000/- चे चेक जे दिंगबर व पंडितरावाचे नांवावर आहे हे पण ट्रान्जेक्शन दूसरे असेल असा अर्थ काढण्यास हरकत नाही. त्यामूळे विक्री खतामध्ये जे काही झाले ते अंतिम राहील. सौदाचिठठी मध्ये किंमतही कमी दाखवलेली आहे व क्षेञफळ ही कमी दाखवलेले आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी रु.50,000/- ची मागणी करणे व अर्जदाराने ही काही रक्कम वापस मागणे या गोष्टी उलगडण्यासारख्या नाहीत. म्हणून विक्री खत हे अंतीम दस्ताऐवज मानण्यात येते व याद्वारे झालेला व्यवहार हा अंतीम ठरविण्यात येतो. त्यामूळे आता कोणीही एक दुस-यास पैसे मागू नयेत. विक्री खतानंतर दि.30.10.2008 रोजी मिटरसाठी रु.20,000/- ची रक्कम दिली असे म्हटले आहे पण यांचा पूरावा किंवा पावती क्र. 25,26,27 नोव्हेंबर 07 चा उल्लेख तक्रार अर्जात नाही. पावती अर्जदार दाखल करु शकलेले नाहीत व गैरअर्जदारांनी ही रक्कम नाकारलेली आहे. तक्रार अर्जात अर्जदाराने ट्रान्सफॉरमर व डिपी साठी सामूहीक रक्कम देणची तयारी दर्शविलेली आहे. रु.15,000/- अर्जदारांनी दिले हे गैरअर्जदार नाकारतात, म्हणजे गैरअर्जदारांना ही रक्कम मिळाली नाही. त्यामूळे ती रक्कम ग्राहय धरता येणार नाही. अर्जदार व गैरअर्जदार यांचेतील नक्की व्यवहार ब्लॅक आणि व्हाईट मध्ये वेगळा असू शकतो व ती सत्य परिस्थिती दोघेही समोर आणत नाहीत. त्यामूळे अर्जदाराची ही मागणी मान्य करण्यासारखी नाही. गैरअर्जदारांनी एम.एस.ई.बी.कडे ट्रान्सफॉरमर अजून उपलब्ध नसल्याकारणाने अर्जदारांना त्यांचा प्राथमिक गरज भागविण्यासाठी त्यांचेकडे असलेले कन्स्ट्रक्शन मिटरमधून विज पूरवठा दिलेला आहे म्हणजे अर्जदार यांना अडचण भासू दिलेली नाही. या कन्स्ट्रक्शन मिटरचा टेरिफ व्यावसायीक आहे. त्यामूळे अर्जदार यांना त्यांचे टेरिफ व्यावसायीक स्वरुपाचा दयावा लागेल परंतु गैरअर्जदार यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी या सदनिकेसाठी स्वतंञ अशी डिपी व ट्रान्सफॉरमर ताबडतोब उपलब्ध करुन यासाठी येणारा खर्च सामूहीकरित्या सर्व फलॅट धारकाकडून ठरल्याप्रमाणे घेऊन गरज भागवावी व यातून सर्वाना व्यक्तीगत मिटर देऊन विज पूरवठा करावा व त्या वेळेस सर्व फलॅट धारकांना निवासी दराप्रमाणे विजेचे बिल उपलब्ध होईल तोपर्यत अर्जदार यांना व्यवसाईक रेटने विजेचे बिल भरावे लागेल. अर्जदाराची दूसरी मागणी ही त्यांचे ड्रेनेज कनेक्शन व नळ बंद करण्यात येऊ नये. ही त्यांची मागणी मान्य करीत आहोत. कारण हे मूलभूत हक्क आहे. ड्रेनेज लाईन व नळ हे गैरअर्जदार यांना बंद करता येणार नाही, चालूच ठेवावी लागेल. सद्य परिस्थितीत या प्रकरणात हे प्रकरण चालू असताना अर्जदाराचा विज पूरवठा सूरु आहे व ड्रेनेज लाईन तसेच नळ देखील सूरु आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला किंवा सेवेत ञूटी केली असेही म्हणता येणार नाही. या बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. दि.25.7.2008 या विक्री खता प्रमाणे दोन्ही पक्षाचा आर्थिक व्यवहार अंतीम समजण्यात यावा. 3. गैरअर्जदार यांनी या पूढे देखील अर्जदाराचा मूलभूत हक्क विजेचा पूरवठा व ड्रेनेज लाईन व पाणी पूरवठा अव्याहत चालू ठेवावी. 4. गैरअर्जदारांनी ट्रान्सफॉरमर व डिपी चे एम.एस.ई.बी. कडून मंजूर इस्टीमेट घेऊन त्याप्रमाणे सर्व फलॅट धारकाकडून सामाईक रक्कम घेऊन लवकरात लवकर त्यांना डिपी व ट्रान्सफॉर्मर उभा करुन दयावा व त्यातून घरगूती वैयक्तीक विज मिटर उपलब्ध करुन दयावे. 5. दावा खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 6. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील सौ.सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर, लघुलेखक. |