Maharashtra

Kolhapur

CC/10/176

Smt. Malati Madhav Kulkarni - Complainant(s)

Versus

Paschim Bhudargad Nag.Sah.Pat Sanstha Ltd.Kadgaon - Opp.Party(s)

Sandeep Jadhav

30 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/176
1. Smt. Malati Madhav Kulkarni 1126, E Ward, Vijita Complex, Sykes Extention, kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Paschim Bhudargad Nag.Sah.Pat Sanstha Ltd.Kadgaon Kadgaon Tal. Bhudargad Dist. Kolhapur2. Chairman, Dhanaji Ramchandra Desai, Paschim Bhudargad Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit Kadgaon. At Post Kadgaon, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur3. Vice Chairman, Vitthal Ramchandra SathePaschim Bhudargad Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit Kadgaon. At Post Kadgaon, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur4. Manager, Vilas Pandurang Desai,Paschim Bhudargad Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit, Kadgaon, Tal.Bhudargad, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Sandeep Jadhav, Advocate for Complainant

Dated : 30 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.30.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीसा लागू झालेल्‍या आहेत. परंतु, सामनेवाला हे प्रस्‍तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत अगर त्‍यांचेतर्फे म्‍हणणे दाखल झालेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात  रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
1.
10085
10000/-
16.10.2001
16.10.2004
2.
10086
10000/-
16.10.2001
16.10.2004
3.
11481
10000/-
12.09.2002
12.11.2005
4.
11482
10000/-
12.09.2002
12.11.2005
5.
11019
10000/-
17.04.2002
17.04.2005

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 ते 4 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 3 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 हे सामनेवाला संस्‍थेचे अधिकारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(6)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. तसेच, सदर पावत्‍यांवरील दि.30.09.2003 रोजीअखेरचे व्‍याज तक्रारदारांना मिळालेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा दि.01.10.2004 रोजीपासून संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तसेच, तक्रार क्र.109/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 1189 व 1655 वर दि.05.04.2006 रोजीअखेर अनुक्रमे रुपये 7,242/- व 6,420/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांच्‍या तक्रारी मंजूर करणेत येतात.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदतबंद ठेव  रक्‍कमा द्याव्‍यात.  सदर रक्‍कमांवर दि.01.10.2004 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
10085
10000/-
2.
10086
10000/-
3.
11481
10000/-
4.
11482
10000/-
5.
11019
10000/-

 
 
 
 
 
 
 
 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.4 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना प्रत्‍येक तक्रारीकरिता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER