Maharashtra

Kolhapur

CC/22/231

Nagesh Rajaram Devkar & Other - Complainant(s)

Versus

Parvati Builders & Builders Prop. - Opp.Party(s)

U.S.Mangave

19 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/22/231
( Date of Filing : 25 Apr 2022 )
 
1. Nagesh Rajaram Devkar & Other
Vishram BAg, Sangli
Sangli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Parvati Builders & Builders Prop.
2228, B Ward, Magalawar Peth, Kolhapur
Kolhapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Sep 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

 

व्‍दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्‍यक्षा 

 

1.     तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील कथन थोडक्‍यात पुढीलप्रमाणे—

      

      शहर कोल्‍हापूर येथील कोल्‍हापूर महानगरपालिका येथील ई वॉर्ड, राजारामपुरी, 7 वी गल्‍ली, येथील सि.स.नं. 1865/1 व सि.स.नं. 1865/2 या मिळकतींवर बांधलेल्‍या सृष्‍टी एन्‍क्‍लेव्‍ह या अपार्टमेंटमधील अप्‍पर ग्राऊंड फ्लोअरवरील दुकान गाळा नं. 1 याचे क्षेत्र 129.18 चौ.मी.कार्पेट व 135.68 चौ.मी. बिल्‍टअप हा दुकानगाळा हा या तक्रारअर्जाचा विषय आहे. सदर मिळकतीचे खरेदीपत्र दस्‍त अ.क्र.275/2015 अन्‍वये दि. 13/1/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांना लिहून दिले आहे.  त्‍यानुसार तक्रारदार हे सदर मिळकतीचे कायदेशीर मालक झाले असलेने तक्रारदारांचे नाव मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड पत्रकी मालक म्‍हणून नोंद होणे आवश्‍यक आहे.  त्‍याकरिता तक्रारदार यांनी सिटी सर्व्‍हे ऑफिस, कोल्‍हापूर येथे चौकशी केली असता सदर कार्यालयाने प्रथम घोषणापत्र प्रॉपर्टी कार्ड सदरी नोंद होणे आवश्‍यक आहे व तदनंतरच तक्रारदाराचे नांव सदर कार्डला नोंद होवू शकेल असे सांगितले. म्‍हणून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वारंवार विनंती केली परंतु वि.प. यांनी घोषणापत्राची नोंद प्रॉपर्टी कार्ड सदरी केलेली नाही.  अशा प्रकारे वि.प. यांनी सेवात्रुटी केली आहे.  म्‍हणून, तक्रारदाराने प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज या आयोगात दाखल केला आहे.    

 

2.    प्रस्‍तुतकामी तक्रारदाराने वि.प. यांचेकडून वादमिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड सदरी वि.प. यांनी घोषणापत्राची नोंद करुन द्यावी तसेच मानसिक त्रासापोटी रु.1,00,000/-,  तक्रारीचा खर्च रु. 50,000/-  वि.प. कडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.

 

3.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत डीड ऑफ अपार्टमेंटची प्रत, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, वि.प. यांनी नोटीस स्‍वीकारलेची पोहोच पावती वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

4.    प्रस्‍तुत कामी वि.प. यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे. 

     

5.   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.

 

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ?

 

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे  काय ?     

होय.

3

तक्रारदार हे वि.प. यांचेकडून प्रॉपर्टी कार्ड सदरी घोषणापत्र नोंद करुन मिळणेस व नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.  

4

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे.

 

 

वि वे च न

 

6.    वर नमूद मुद्दा क्र.1 ते 3 ची उत्‍तरे आम्‍ही होकारार्थी दिली आहेत कारण शहर कोल्‍हापूर येथील कोल्‍हापूर महानगरपालिका येथील ई वॉर्ड, राजारामपुरी, 7 वी गल्‍ली, येथील सि.स.नं. 1865/1 व सि.स.नं. 1865/2 या मिळकतींवर बांधलेल्‍या सृष्‍टी एन्‍क्‍लेव्‍ह या अपार्टमेंटमधील अप्‍पर ग्राऊंड फलोअरवरील दुकान गाळा नं. 1 याचे क्षेत्र 129.18 चौ.मी.कार्पेट व 135.68 चौ.मी. बिल्‍टअप हा दुकानगाळा ही मिळकत तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून खरेदी केली असून सदर मिळकतीचे खरेदीपत्र दस्‍त अ.क्र.275/2015 अन्‍वये दि. 13/1/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांना लिहून दिले आहे.  तक्रारदार यांनी याकामी डीड ऑफ अपार्टमेंटची प्रत दाखल केली आहे. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्‍तुत बाब नाकारलेली नाही.  सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्‍याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्‍पष्‍ट सिध्‍द झाली आहे.  सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी दिले आहे.

 

7.    तक्रारदारांचे तक्रारअर्जातील कथनानुसार, सदर मिळकतीचे खरेदीपत्र दस्‍त अ.क्र.275/2015 अन्‍वये दि. 13/1/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदारांना लिहून दिले आहे.  त्‍यानुसार तक्रारदार हे सदर मिळकतीचे कायदेशीर मालक झाले असलेने तक्रारदारांचे नाव मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड पत्रकी मालक म्‍हणून नोंद होणे आवश्‍यक आहे.  त्‍याकरिता तक्रारदार यांनी सिटी सर्व्‍हे ऑफिस, कोल्‍हापूर येथे चौकशी केली असता सदर कार्यालयाने प्रथम घोषणापत्र प्रॉपर्टी कार्ड सदरी नोंद होणे आवश्‍यक आहे व तदनंतरच तक्रारदाराचे नांव सदर कार्डला नोंद होवू शकेल असे सांगितले. म्‍हणून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे वारंवार विनंती केली परंतु वि.प. यांनी घोषणापत्राची नोंद प्रॉपर्टी कार्ड सदरी केलेली नाही.  तक्रारदार यांनी वि.प. यांना दि. 25/10/2021 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली.  परंतु तरीही वि.प यांनी त्‍यास प्रतिसाद दिलेला नाही.  सदरची नोटीस व वि.प. यांना नोटीस पोहोचल्‍याची पोहोचपावती याकामी तक्रारदारांनी दाखल केली आहे.  सदरची सर्व कागदपत्रे विचारात घेता, तक्रारदार यांनी वि.प. यांना मोबदला रक्‍कम अदा करुनही व मिळकतीचे नोंद खरेदीपत्र करुन देवूनही वि.प. यांनी सदर मिळकतीचे घोषणापत्र प्रॉपटी कार्ड सदरी नोंद करुन दिले नाही ही बाब स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराचे तक्रारअर्जातील सदरची कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत.  वि.प. यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत.  म्‍हणून, वि.प. यांचेविरुध्‍द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे.  म्‍हणजेच वि.प. यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही.  तक्रारदारांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍ठयर्थ पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्‍वासार्हता ठेवणे न्‍यायोचित वाटते.  सदरची बाब विचारात घेता, वि.प. यांनी वाद मिळकतीचे घोषणापत्र प्रॉपर्टी कार्ड सदरी नोंद करुन दिलेले नाही ही बाब शाबीत होते.  सबब, वि.प. यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. 

 

8.    सबब, तक्रारदार हे वाद मिळकतीचे घोषणापत्राची नोंद  प्रॉपर्टी कार्ड सदरी करुन मिळणेस पात्र आहेत.  तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- अशी रक्‍कम वि.प. यांचेकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग मंच येत आहे.

 

      सबब, प्रस्‍तुत कामी आम्‍ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत. 

 

 

आदेश

 

 

1)     तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

 

2)    तक्रारदार यांनी वि.प. यांना वाद मिळकतीचे घोषणापत्र प्रॉपर्टी कार्ड सदरी नोंद करुन द्यावे.

 

3)    मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/-  वि.प. यांनी तक्रारदारास अदा करावेत.

 

4)    वर नमूद सर्व आदेशांची पूर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

5)    विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 व 72 अन्‍वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

6)    आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.