( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री यंगल, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक : 28 आक्टोबर, 2010 ) तक्रारकर्ते श्री रामकिसन सुकाजी कुरंजेकर, जि.नागपूर, यांची तक्रार विरुध्दपक्ष न्यु आशियाना डेव्हलपर्स तर्फे भागीदार/मालक, श्री सुनील दयाशंकर पांडे, जि.नागपूर. यांचे विरुध्द त्यांनी भुखंडाचे विक्रीपत्र तक्रारदाराला नोंदवुन न दिल्यामुळे ग्राहक सरंक्षण कायद 1986 च्या कलम 12 अन्वये या मंचात तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षाने भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे किंवा तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दिलेली रक्कम रुपये 3,94,342/-, 24 टक्के व्याजासह परत करावे किंवा विरुध्द पक्ष भुखंडाचे विक्रीपत्र नोंदवुन देण्यास असमर्थ असेल तर, तक्रारदारास झालेल्या फसवणुकीबद्दल रुपये 1,00,000/- तसेच मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली. तक्रारीचा तपशील खालीलप्रमाणे - तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदारास प्रत्येकी 1617.89 चौरस फुटाचे चार भुखंड एकुण आराजी 6471.56 चौ.फुट भुखंड क्रमांक 21,22,23,24, खसरा क्रमांक 47/1, 47/2, मधील मौजा बोथली, ता.उमरेड, जि.नागपूर येथील मोबदला रुपये 4,85,344/- प्रति फुट रुपये 75/- च्या भावाने विकत घेण्याचे ठरविले आणि बयाणा पत्रावर रुपये 1,18,336/- देण्याचे उभयपक्षकरांमध्ये ठरले. बयाणा पत्रात विक्रीपत्र करुन देण्याची मुदत दिंनाक 20.5.2010 पर्यत देण्यात आलेली होती.
- तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे, विरुध्द पक्षाने कबुल होते की, भुखंडाचे गैरकृषीत रुपातर व नगररचनाचे प्रमाणपत्र 9 महिन्याचे आत आणुन देऊ आणि जर ते शक्य झाले नाही तर, विरुध्द पक्षाने व्याजासकट नुकसान भरपाईची रककम तक्रारदारास परत करतील.
- तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांनी बयाणा पत्रातील रक्कम व मासिक किस्त नियमाप्रमाणे विरुध्द पक्ष कंपनीकडे जमा केले. त्याचे विवरण तक्रारदाराने तक्रारीत नमुद केले आहे.
- तक्रारदाराने दिनांक 11.5.2008 ते दिनांक 10.1.2010 पर्यत ठरल्याप्रमाणे नियमितपणे रक्कमेची किस्त व बयाणा रक्कम भरली. तक्रारदाराने एकुण 3,94,342/- विरुध्द पक्ष कंपनीकडे भरले. तक्रारदाराने गैरकृषी व नगररचनाचे प्रमाणपत्र मागीतले असता विरुध्द पक्षाने त्याबद्दल उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर दिनांक 10.1.2010 पर्यत एकुण 20 किस्त भरल्यानंतर तक्रारदाराने पुढील मासिक किस्त भरण्याचे थांबविले. दिनांक 8.3.2010 रोजी तक्रारदाराने विरुध्द पक्षाला पत्र देऊन त्याद्वारे विरुध्द पक्षाला उर्वरित रक्कम भरण्याची तयारी दर्शविली व विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. त्यावर विरुध्द पक्षाने विक्रीपत्र करुन देण्यास टाळाटाळ केली व तक्रारदारास तोंडी सांगीतले की शेत मालकाने त्यांच्या कंपनीच्या नावे आजपावेतो विक्रीपत्र नोंदवुन दिले नाही. परंतु लवकरच शेतमालकाकडुन विक्रीपत्र करुन देण्याचे आपणास कळवु.
- दिनांक 29.3.2010 रोजी तक्रारदाराने पत्राद्वारे गैरअर्जदारास विक्रीपत्र नोंदवुन देण्यास सुचविले व तक्रारदाराकडुन घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी व तक्रारदाराला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबद्दल रक्कमेची मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही.
- तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे, विरुध्द पक्षाने एकंदरीत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असुन मंचाने तक्रारदाराचे मागणी केल्याप्रमाणे आदेश करावे ही विनंती केली.
- दिनांक 3.5.2010 रोजी तक्रारदाराने वकीलामार्फत सुध्दा कायदेशिर नोटीस विरुध्द पक्षाला बजावली. परंतु विरुध्द पक्षाने आजपावेतो त्याची दखल घेतली नाही.
- तक्रारदाराने त्यांचे तक्रारीसोबत एकुण 21 कागदपत्रे दाखल केली आहे. त्यात करारनामा, बयाणापत्र, नकाशा, शेतजमीनीची प्रत, रसिदीच्या प्रती, नोटीसची प्रत, पोचपवती, अर्जदाराने कलेले अर्ज, जाहिरात, लोकेशन मॅप, नोटीसची प्रत,पोचपावती,इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे.
- तक्रार दाखल झाल्यावर मंचाने विरुध्द पक्षास नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्यात आली. नोटीस मिळुन विरुध्द पक्ष हजर झाले व त्यांनी दिनांक 8.7.2010 रोजी आपला लेखी जवाब दाखल केला.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात तक्रारदाराचे सर्व विपरित विधाने अमान्य केले आहे. परंतु तक्रारदाराकडुन प्राप्त झालेल्या रक्कमेची बाब अमान्य केली नाही.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात नमुद केले आहे की, वादातील शेत जमीन श्री वरघने व श्री हुसकले यांचे मालकीची होती. परंतु ती वरघने याच्या मृत्युने त्यांचे वारसदार आणि श्री हुसकले मध्ये काही वाद झाला आणि सदरची जागा श्री हुसकले यांना विकण्याचा अधिकार नाही आणि ते अधिकार मिळविण्यासाठी दिवाणी न्यायालयात कारवाई सुरु आहे. त्यामुळे वादातील भुखंडाचे विक्रीपत्र करुन देणे अशक्य आहे.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरात नमुद केले आहे की त्यांना कसल्याही प्रकारची तडजोड करण्याचे उद्देशाने श्री हुसकले यांचे सोबत खसरा नं.47/1 व 47/2 मध्ये अर्ध्या जागेचा करारनामा दिनांक 30.5.2008 ला केला व त्यानंतर देखिल विरुध्द पक्षाने त्याजागेतील संपुर्ण भुखंड विकलेले आहे व त्यावर देखिल विरुध्द पक्षाने तक्रारदाराला परस्पर बोलावुन त्यांना मुळ शेत मालक यांना प्रत्यक्ष भेटवुन दिले व विरुध्द पक्षाने तक्रारदाराला म्हटले की जर तक्रारदाराला मान्य असेल तर श्री. हुसकले यांचेकडुन घेतलेल्या जागेमधुन 4 भुखंड घेऊन विक्रीपत्र करुन देतो. परंतु तक्रारदाराने विरुध्द पक्षाला सांगीतले की जो पर्यत श्री हुसकले व श्री वरधने यांचेमधील वाद मिटत नाही तोपर्यत मला विक्रीपत्र करुन घ्यायचे नाही आणि त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारदाराला विक्रीपत्र करुन दिले नाही.
- विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे वादातील भुखंडाबद्दल दिवाणी न्यायालयात दावा दाखल असल्यामुळे विक्रीपत्र करुन तक्रारदाराला करुन देऊ शकत नाही.
- विरुध्द पक्षाचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी तक्रारदाराची कुठल्याही प्रकारे फसवणुक केलेली नाही त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करावी. अशी विनंती केली.
- विरुध्द पक्षाने त्यांचे उत्तरासोबत मा.दिवाणी न्यायालयातील दाव्याची प्रत दाखल केली आहे.
- उभयपक्षकारांचे वकीलांचा दिनांक 14.10.2010 रोजी युक्तिवाद ऐकला व कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निरिक्षण व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
- तक्रारदार आणि विरुध्द पक्षामध्ये नमुद भुखंडाबद्दचा करार झाला होता ते दाखल करारनामा व बयाणापत्रावरुन सिध्द होते. सदर जमीन विरुध्द पक्षाचे मालकीची नसतांना त्यांनी तक्रारदारासारख्या ग्राहकांशी भुखंड विक्री करारानामे करुन, तसेच रक्कमा स्विकारुन गंभीर स्वरुपाची फसवणुक केली आहे.
- उभयपक्षकारांत झालेल्या करारानुसार विक्रीपत्राकरिता रक्कम रुपये 3,94,324/- तक्रारदाराने विरुध्द पक्षाला दिले. तरी विरुध्द पक्षाने तक्रारदाराला विक्रीपत्र करुन दिले नाही ते दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते आणि विरुध्द पक्षाने मान्य केल्यामुळे वादातीत आहे. सबब हे न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश पारित करित आहे.
-// अं ति म आ दे श //- 1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर. 2. विरुध्द पक्षाने तक्रारदाराला रक्कम रुपये 3,94,342/-दिनांक 11.5.2008 पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो 18 टक्के द.सा.द.शे दराने व्याजासह परत करावी. 3. विरुध्द पक्षाने मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/-( रुपये पाच हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रुपये 1000/-(रुपये एक हजार फक्त) असे एकुण रुपये 6,000/- (रुपये सहा हजार फक्त ) तक्रारदारास द्यावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |