मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,रत्नागिरी यांचेसमोर तक्रार अर्ज क्र. : 152/2009 तक्रार अर्ज दाखल झाल्याचा दि. 25/11/2009 तक्रार अर्ज निकाली झाल्याचा दि. 06/08/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्रीमती सुरैया आझाद नांदगावकर रा.शरीफ अपार्टमेंट, करीम पार्क, महाड नाका, खेड, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द नाडकर डेव्हलपर अँड बिल्डर करीता भागीदार 1. श्री.खलील शरीफ नाडकर 2. श्री.महामुद अ.करीम नाडकर रा.खेड महाड नाका, ता.खेड, जि.रत्नागिरी. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे – विधिज्ञ श्री.जाडकर सामनेवालेतर्फे - विधिज्ञ श्री.शिंदे आ दे श तक्रारदारतर्फे आज रोजी नि.66 वर पूरशिस दाखल. “तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्यान दि.22/06/2010 रोजी झालेल्या तडजोडीनुसार खरेदीखत सोडून इतर सर्व पूर्तता सामनेवाला यांनी केली असल्याने प्रस्तुत तक्रार अर्ज यापूढे चालविणेचा नाही” अशी विनंती करणेत आलेने प्रस्तुत नि.66 वरील पूरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत तक्रार अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी (अनिल गोडसे) दिनांक : - 06/08/2010 अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |