Maharashtra

Nashik

CC/23/2011

Rakhamabai sanpatrao Bankar - Complainant(s)

Versus

Parashari gramin Bigar sheti - Opp.Party(s)

30 Jun 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/23/2011
 
1. Rakhamabai sanpatrao Bankar
Pinpal gao Basvant ,Niphad,nashik
...........Complainant(s)
Versus
1. Parashari gramin Bigar sheti
Pinpalgao Niphad,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr R S Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

               (मा.अध्‍यक्ष श्री.आर.एस. पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) 

 

                        अर्जदार क्र.1 ते 6 यांना सामनेवाले क्र.1 ते 4 यांचेकडून वैय्यक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या एकूण सात मुदतठेवींची एकूण रक्‍कम रु.6,98,000/- मिळावी, या रकमेवर 12% दराने निर्धारीत व्‍याज मिळावे व अर्जाचा निकाल होईपर्यंत 15 टक्‍के दराने व्‍याज मिळावे, इतर नुकसान भरपाई म्‍हणून रु. 20,000/- मिळावेत व अर्जाचा खर्च मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

            सामनेवाले क्र.1 व 2 यांनी याकामी पान क्र. 25 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र. 26 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे

            सामनेवाले क्र.3 व 4 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. त्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द दि. 20/4/2011 रोजी एकतर्फा आदेश करण्‍यात आलेले आहेत.

            अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे

काय?-- होय. फक्‍त सामनेवाले क्र. 1 यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

3.  अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 यांचेकडून ठेवपावतीवरील रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

4.  अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी

    रक्‍कम  वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय ---होय

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 यांचेविरुध्‍द अंशतः

   मंजूर करणेत येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 ते 4

   यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

विवेचनः

            याकामी अर्जदार यांचेवतीने अँड.श्रीमती आर.आर.महाजन यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.  सामनेवाला यांचेवतीने अँड.एन.एच.लाहोटी यांनी युक्‍तीवाद केलेला आहे.

          अर्जदार यांनी याकामी पान क्र. 30 ते 36 लगत एकूण 7 मुळ अस्‍सल ठेवपावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. पान क्र. 30 ते 36 लगतच्‍या ठेवपावत्‍या सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेल्‍या नाहीत. पान क्र.30 ते 36 लगतच्‍या ठेवपावत्‍यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला  यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

            अर्जदार यांनी याकामी सामनेवाले क्र. 2 व 3 यांना अनुक्रमे संस्‍थेचे चेअरमन व व्‍यवस्‍थापक म्‍हणून व सामनेवाला नं.4 यांना सहायक निबंधक म्‍हणून सामिल केलेले आहे. परंतु प्रस्‍तुत तक्रार अर्जाचे कामी सामनेवाले क्र. 2 व 3 यांना महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 88 नुसार जबाबदार धरलेले आहे व तसा अहवाल तयार झालेला आहे याबाबत कोणतेही कागदपत्र मंचासमोर दाखल नाहीत. याचा विचार होता मा. उच्‍च न्‍यायालय,  औरंगाबाद खंडपीठ यांचेसमोरील रिट पिटीशन क्र. 5223/2009 निकाल तारीख 22/12/2010 सौ. वर्षा रविंद्र इसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी या निकालपत्रामधील अंतीम आदेश व विवेचनाचा विचार करता प्रस्‍तुत तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र. 2 व 3 यांना संस्‍थेचे कारभाराबाबत व अर्जदार यांचे देय रकमेबाबत वैयक्‍तीकरित्‍या जबाबदार धरता येत नाही असे या मंचाचे मत आहे.    

            सामनेवाले क्र. 4 हे सहायक निबंधक आहेत. त्‍यांचेवर सामनेवाला नं.1 पतसंस्‍थेची जबाबदारी व ठेवीवरील रक्‍कम परत करण्‍याची जबाबदारी सहकार विभागाने नेमलेली आहे. हे दर्शवण्‍याकरीता अर्जदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही यामुळे सामनेवाला नं.4 यांना या कामी जबाबदार धरता येत नाही

      सामनेवाला नं.1 व 2 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार क्र.3 ते 5 यांचे एकत्र कुटुंब आहे ही बाब नाकारलेली आहे तसेच कै.रखमाबाई किती तारखेला मयत झाल्‍या याचा उल्‍लेख अर्जदार यांनी तक्रार अर्जामध्‍ये केलेला नाही. संस्‍थेची फसवणुक केलेली आहे. रखमाबाई दि.29/8/2008 रोजी मयत झालेल्‍या असूनही त्‍याची माहिती न देता रखमाबाईच्‍या मत्‍युनंतर 11 महिन्‍यांनी ठेवपावत्‍यांची नुतनीकरण करुन घेतलेले आहे.  अर्जदार स्‍वच्‍छ हाताने मंचासमोर आलेले नाहीत, रखमाबाई यांना अर्जदार क्र.2 ते 5 हेच वारस आहेत.  अर्जदार क्र.6 यांचा उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही, सर्व मुदत पावत्‍या वैय्यक्‍तीक नावाने असल्‍याने एकत्रीत तक्रार अर्ज चालत नाही, सामनेवाला यांनी कोणतेही बेकायदेशीर कृत्‍य केलेले नाही. अर्जदार यांनी ठेवपावतीवरील रक्‍कम परत मागीतलेली नव्‍हती, मुदत ठेवपावत्‍यांच्‍या तारखा वेगवेगळया असल्‍याने एकत्रीत तक्रार अर्ज चालत नाही.  अर्ज रद्द करण्‍यात यावा. असे म्‍हटलेले आहे.

      परंतु अर्जदार क्र.2 यांनी पान क्र.28 लगत प्रतिज्ञापत्र देवून अर्जदार क्र.6 व अर्जदार क्र.3 यांचे नाते काय आहे याचा खुलासा केलेला आहे.  मयत कै.रखमाबाई यांना अर्जदार क्र.2 ते 6 यांचे व्‍यतिरीक्‍त अन्‍य कोणी वारस आहेत याबाबत कोणताही जादा पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही. तसेच पान क्र.30 ते 36 लगतच्‍या ठेवपावतीबाबत अर्जदार क्र.2 ते 6 यांचे व्‍यतिरीक्‍त अन्‍य कोणीही सामनेवाला यांचेकडे पैसे परत मिळावेत अशी मागणी केली आहे काय याबाबतही सामनेवाला यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

      सामनेवाला यांचेवतीने अँड एन.एच.लाहोटी यांनी युक्‍तीवाद करतांना पान क्र.25 चे लेखी म्‍हणण्‍यामधील हकिकत कथन केलेली आहे. मात्र वर उल्‍लेख केल्‍यानुसार मयत रखमाबाई यांना अर्जदार क्र.2 ते 6 यांचे‍व्‍यतिरीक्‍त अन्‍य कोण वारस आहेत याबाबतचा कोणताही पुरावा सामनेवाला यांनी दाखल केलेला नाही.  अर्जदार क्र.2 ते 6 या सर्व व्‍यक्‍ती एकाच कुटुंबातील आहेत ही बाब अर्जदार यांचे तक्रार अर्जातील कथनावरुन स्‍पष्‍ट झालेली आहे.

      कोणत्‍याही ठेवीचे नुतनीकरण करतांना मुळ ठेवपावती व ठेवीदार याबाबत सामनेवाला नं.1 यांनी सर्व खात्री करुन व ठेवीदाराची सही घेवून नुतनीकरण करुन देणे गरजेचे असते व तशी जबाबदारी सामनेवाला नं.1 यांचेवर आहे.  रखमाबाई संपतराव बनकर हयात आहेत किंवा नाहीत याची कोणतीही खात्री न करता व त्‍यांची सहीची पडताळणी न करता ठेवपावती क्र.9560 चे नुतनीकरण सामनेवाला नं.1यांनी केलेले आहे ही बाब स्‍पष्‍ट होत आहे.

      वास्‍तविक ठेव पावतीवरील मुदत संपल्‍यावर सामनेवाला यांनी अर्जदार क्र. 2 ते 6 यांना त्‍यांचे वैयक्‍तीक नावावरील ठेवपावतीची रक्‍कम व्‍याजासह परत करणे गरजेचे होते व कै.रखमाबाई यांचे नावावरील ठेव पावती क्र.9507 या ठेवपावतीवरील अर्जदार क्र.2 ते 6 यांना योग्‍य तो इन्‍डेमन्‍टी बॉंड लिहून घेवून संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह परत करणे गरजेचे होते.  परंतु सामनेवाला नं.1 यांनी अर्जदार यांची ठेव पावत्‍यावरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजास‍ह परत केलेली नाही. ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह परत करण्‍याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाले क्र. 1 यांचेवर आहे. परंतु या तक्रार अर्जाचेकामी सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदार यांना पान क्र. 30 ते 36 चे ठेवपावतीवरील संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह परत केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

      पान क्र. 30 ते 36 चे ठेवपावतीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍थेकडून यांचेकडून पान क्र. 30 ते 36 चे ठेवपावतीवरील संपुर्ण रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

            सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार क्र.2 ते 6 हे एकत्रीतरित्‍या सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍था यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु. 15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु. 1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

           अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे दोन्‍ही बाजुंच्‍या वकिलांचा युक्‍तीवाद व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

 

                       आ दे श

1)      अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 ते 4 यांचेविरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

2)      अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 1 पतसंस्‍थेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

3)      आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार क्र.2 ते 6 यांना सामनेवाले पतसंस्‍था क्र. 1 यांनी पुढीलप्रमाणे रकमा दयाव्‍यातः

  (अ) अर्जदार क्र.2 श्री. संपतराव धोंडीराम बनकर यांना ठेवपावती क्र.9508 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.30/7/2009 ते दि.29/7/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.30/7/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

 (ब) अर्जदार क्र.5 श्री.संदीप आनंदराव बनकर यांना ठेवपावती क्र.9357 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि. 5/7/2008 ते दि.5/7/2009 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.6/7/2009 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(क) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीत रित्‍या कै.रखमाबाई संपतराव बनकर यांचे वारस म्‍हणून ठेवपावती क्र.9507  वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि. 30/7/2009 ते दि.29/7/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.30/7/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे. जरुरतर या ठेवपावतीबाबत अर्जदार क्र.2 ते 6 यांचेकडून योग्‍य तो इन्‍डेमन्‍टी बॉंड सामनेवाला क्र.1 यांनी लिहून घ्‍यावा.

(ड) अर्जदार क्र.3 श्री.आनंदराव संपतराव बनकर यांना ठेवपावती क्र. 9510 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि. 30/7/2009 ते दि.29/7/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.30/7/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(इ) अर्जदार क्र.4 श्री.राजेंद्र आनंदराव बनकर यांना ठेवपावती क्र.9509 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि. 30/7/2009 ते दि.29/7/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.30/7/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(ई) अर्जदार क्र.5 श्री.संदीप आनंदराव बनकर यांना ठेवपावती क्र.9511 वरील रक्‍कम रु. 1,00,000/- (रक्‍कम रु. एक लाख रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि. 30/7/2009 ते दि.29/7/2010 पर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे व दि.30/7/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

(उ) अर्जदार क्र.2 श्री. संपतराव धोंडीराम बनकर यांना ठेवपावती क्र.4601 वरील रक्‍कम रु. 98,000/- (रक्‍कम रु. अठयान्‍नव हजार रुपये) दयावेत. तसेच सदर मंजूर रकमेवर दि.1/4/2010 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.

4) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीतरित्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार ) दयावेत.

   (5) अर्जदार क्र.2 ते 6 यांना एकत्रीतरित्‍या अर्जाचे खर्चापोटी  रु. 1000/- (अक्षरी रुपये  

   एक हजार) दयावेत. 

 

 

 

 

                (आर.एस. पैलवान)              (सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)     

              अध्‍यक्ष                                              सदस्‍या                

ठिकाणः- नाशिक.       

दिनांकः- 30/06/2011.

 

 

 
 
[HON'ABLE MR. Mr R S Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.