Maharashtra

Nagpur

CC/731/2015

SHRI. ANILKUMAR JAIN - Complainant(s)

Versus

PARAS ENTERPRISES, THROUGH MANAGER, SHRI. SHASHIKANT BANSAL - Opp.Party(s)

Adv. Manoj G. Joshi

03 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/731/2015
( Date of Filing : 21 Nov 2015 )
 
1. SHRI. ANILKUMAR JAIN
R/O. FLAT NO. 202, NARAYAN SAHNIWAS, 226-A, GOKULPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
2. SAU. RAKHI ANILKUMAR JAIN
R/O. FLAT NO. 202, NARAYAN SAHNIWAS, 226-A, GOKULPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
3. REENA SUNILKUMAR JAIN
R/O. FLAT NO. 202, NARAYAN SAHNIWAS, 226-A, GOKULPETH, NAGPUR-440010
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. PARAS ENTERPRISES, THROUGH MANAGER, SHRI. SHASHIKANT BANSAL
OFF. NO. 4, D.D.A. MARKET, MEERA APT. OUTER RING ROAD, WES VIHAR, G.H. NO. 4, NEW DELHI-11006
DELHI
DELHI
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:Adv. Manoj G. Joshi , Advocate
For the Opp. Party: ADV. S. B. SOLAT, Advocate
Dated : 03 Mar 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.             तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍सचा व्‍यवसाय करतो. तक्रारकर्त्‍याला पर्यटनाकरिता जायची इच्‍छा असल्‍यामुळे त्‍याने  विरुध्‍द पक्षाशी दूरध्‍वनी क्रं. 0913813755 वरुन  संपर्क साधून मानसरोवर येथील पर्यंटन यात्रेबाबत विचारणा केली असता विरुध्‍द पक्षाने प्रति व्‍यक्‍ती रुपये 1,50,000/- प्रमाणे  खर्च सांगितला व प्रति व्‍यक्‍ती मागे रुपये 25,000/- विरुध्‍द पक्षाच्‍या बॅंक खात्‍यात जमा करावयास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने प्रति व्‍यक्‍ती रुपये 25,000/- याप्रमाणे 3 व्‍यक्‍तीकरिता एकूण रुपये 75,000/- विरुध्‍द पक्षाच्‍या आय.सी.आय.सी. बॅंक खाते क्रं. 288055004, मध्‍ये दिनांक 22.04.2014 ला जमा केले व त्‍याबाबतची विरुध्‍द पक्षाने त्‍याबाबतची पावती दिली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला ई-मेल द्वारे मानसरोवर यात्रा सहलीची रुपरेषाबाबत माहिती  कळविली व त्‍याप्रमाणे प्रथम यात्रेकरुच्‍या पथक समुहात दि. 06.08.2014 ते 01.09.2014 पर्यंत जाण्‍याचे निश्चित ठरले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  न्‍यू दिल्‍लीला जाण्‍यापूर्वी मानसरोवर परिसरात जमीनीची घसरण झाल्‍यामुळे सदरची यात्रा सहल रद्द करुन हीच यात्रा वरीलप्रमाणे प्रथम पथक पुन्‍हा दि. 01.09.2014 ला निघेल असे सांगण्‍यात आले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडून तक्रारकर्त्‍याला प्रथम पथक यात्रासहल दि. 09.09.2014 ला न्‍यू दिल्‍ली येथून निघणार असल्‍याचे कळविले.  त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता दि. 08.09.2014 ला न्‍यू दिल्‍ली येथे पोहचला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या सूचनेनुसार व मागणीप्रमाणे प्रत्‍येकी रुपये 90,000/- याप्रमाणे एकूण 3 व्‍यक्‍तींचे रुपये 2,70,000/- विरुध्‍द पक्षाच्‍या आय.सी.आय.सी.आय. बॅंक खाते क्रं. 0288055004 मध्‍ये दि. 09.09.2014 ला जमा केले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची दिल्‍ली येथे राहण्‍याची व्‍यवस्‍था तसेच सहली दरम्‍यान दि. 08.09.2014 ते 13.09.2014 दरम्‍यान राहण्‍याची व्‍यवस्‍था केली. परंतु या दरम्‍यान नियमित जेवण, प्रवास खर्च व इतर खर्च तक्रारकर्त्‍याला करावा लागला, जेव्‍हा की, सदरचा खर्च विरुध्‍द पक्षाला करणे आवश्‍यक होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास दि. 08 सप्‍टेंबर 2014 ऐवजी  09 सप्‍टेंबर 2014 ही तारीख बदलविण्‍यास तसेच नोंद घेण्‍याचे सूचित केले आणि नंतर एकाएकी दि.11 सप्‍टेंबर 2014 ला सूचित करुन दि. 14.09.2014 ला नवी दिल्‍ली वरुन यात्रेला निघण्‍याचे कळविले. याबाबत विरुध्‍द पक्षाने कळवितांना वायू वाहतूक खर्च हा रुपये 8000/- प्रत्‍येकी प्रमाणे 3 व्‍यक्‍तीचे रुपये 24,000/- वायू वाहतूक बुकिंग खर्च यात वाढलेला खर्च जमा करण्‍यास सांगितले. वास्‍तविकतः हा खर्च विरुध्‍द पक्षाने करावयास हवा होता. त्‍यानंतर काठमांडू येथे पोहचल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने 3 व्‍यक्‍तीपोटी रुपये 25,000/- प्रमाणे रुपये 75,000/- तक्रारकर्त्‍याला आगाऊ मागितले व पैसे न दिल्‍यास किंवा  जमा न केल्‍यास अर्जदाराला नागपूरला परत जावे लागेल किंवा प्रवास करता येणार नाही असे सांगितले. तसेच विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याशी असभ्‍यपणे वागला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याजवळ कोणताही पर्याय नसल्‍याने त्‍याने रुपये 75,000/- विरुध्‍द पक्षाला दिले, परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍याची पावती देण्‍यास नकार दिला व साध्‍या कागदावर रुपये 75,000/- दि. 14.09.2014 ला नगदी दिल्‍याबाबत अर्जदाराला लिहून दिले.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने करारप्रमाणे युनायटेड स्‍टेट कॉलर रुपये 25,000/-ची इन्‍श्‍युरन्‍स सेवा प्रत्‍येकी देण्‍याचे कबूल केले. परंतु सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाने काठमांडू येथे इन्‍श्‍युरन्‍स कंपनीकडे जमा केली नाही. सम्राट टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स ऐलो पागोडा येथे इन्‍श्‍युरन्‍स कंपनीकडे रक्‍कम भरली नाही. तसेच करारानुसार विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याला वातानूकुलित बस वाहतूक सेवा देण्‍याचे ठरले होते, परंतु विरुध्‍द पक्षाने योग्‍य ती सेवा दिली नाही. विरुध्‍द पक्षाने मानसरोवर ते अष्‍टपद भेट देखील करण्‍यात येणार होती. परंतु त्‍याकरिता चीन सरकारकडून अनुमती मागावी लागते, परंतु त्‍याची ही विरुध्‍द पक्षाने अनुमती घेतली नाही. यात्रासहल 15 दिवसाची असतांना ही सदरची यात्रा 12 दिवसात संपुष्‍टात आणली, त्‍यामुळे 3 दिवसाचा एकत्रित खर्च परत करावयास पाहिजे होता  तो खर्च ही परत केला नाही.
  4.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की,  तो मुळतः जैन धर्माचा आहे व विरुध्‍द पक्षाने सहल दरम्‍यान शुध्‍द शाकाहारी जेवण देण्‍याचे कबूल केले असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शाकाहारी-मासांहारी जेवणाच्‍या एकाच टेबलावर बसविल्‍याने तक्रारकर्त्‍याच्‍या भावना दुखावल्‍या. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने मंचासमक्ष तक्रार दाखल करुन तक्रारकर्त्‍याकडून जास्‍तीची घेतलेली रक्‍कम रुपये 75,000/- विरुध्‍द पक्षाला परत करण्‍याचे आदेशित करावे. इन्‍श्‍युरन्‍स विमा रक्‍कम यु.एस.डॉलर 3 व्‍यक्‍तींचे रुपये 25,000/- परत करण्‍याचे आदेशित करावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व न्‍यूनतम सेवेकरिता नुकसान भरपाई देण्‍याचा ही आदेश व्‍हावा अशी मागणी केलेली आहे.
  5.      विरुध्‍द पक्षाने आपला लेखी जबाब दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, त्‍यांनी सम्राट टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स यांनी आयोजित केलेल्‍या मानसरोवर यात्रा पोटी तक्रारकर्त्‍याने प्रति व्‍यक्‍ती रुपये 1,15,000/- प्रमाणे 3 व्‍यक्‍तीकरिता एकूण रक्‍कम  रुपये 3,45,000/- विरुध्‍द पक्षाकडे अदा केले. परंतु या व्‍यतिरिक्‍त अतिरिक्‍त रक्‍कम दिल्‍याबाबतचे एक ही दस्‍तऐवज अभिलेखावर दाखल केले नाही. सदर टूर विरुध्‍द पक्षाने आयोजित केला नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने कोणतीही अतिरिक्‍त रक्‍कम किंवा विमा रक्‍कम दिली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता कोणतीही रक्‍कम घेण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्त्‍याने सम्राट टूर्स व ट्रॅव्‍हल्‍स यांना प्रतिवादी बनविणे आवश्‍यक होते त्‍यामुळे सदरची तक्रार आवश्‍यक विना प्रतिवादी अभावी खारीज करण्‍यात यावी.   तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या अॅनेक्‍चर 6 मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याला संपूर्ण टूरचा प्रोग्राम दिला होता, त्‍याप्रमाणे सम्राट टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स यांनी आयोजन केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने टूर प्रोग्रामचा आनंद घेतला. तक्रारकर्त्‍याच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍याने रुपये 75,000/- ऐलो पागोडा केंद्राच्‍या स्‍वागत केंद्राला अदा केले, परंतु सदरची रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा केलेली नाही. तक्रारकर्त्‍याने  अभिलेखावर दाखल केलेले वादातीत दस्‍तऐवज रुपये 75,000/- पावती प्रतिज्ञेवर खरी असल्‍याचे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी आहे. तसेच सदर वादातीत दस्‍तऐवजावर वि.प.ची स्‍वाक्षरी नाही. त्‍यावर ति-हाहित व्‍यक्‍तीची स्‍वाक्षरी आहे त्‍यामुळे सदरचे दस्‍तऐवज खरे असल्‍याबाबतची सिध्‍द करण्‍याची जबाबदारी तक्रारकर्त्‍याची आहे. त्‍यामुळे सदरचा वाद मंचासमक्ष समरी ट्रायल अंतर्गत येत नसून सदरचा वाद हा दिवाणी न्‍यायालयात दाखल करणे आवश्‍यक असल्‍याने प्रस्‍तुत प्रकरण खारीज करण्‍यात यावी.
  6.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व उभय पक्षांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मूद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

अ.क्रं.                                 मुद्दे                                     उत्‍तर

 

1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?होय

  1.       काय आदेश ?               अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने मानसरोवर यात्रे करिता प्रति व्‍यक्‍ती  रुपये 25,000/-  प्रमाणे 3 व्‍यक्‍तींकरिता एकूण रुपये 75,000/- विरुध्‍द पक्षाच्‍या बॅंक खात्‍यात जमा केले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते म्‍हणून तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 2(4, व 5) वर दाखल केलेल्‍या पत्राचे अवलोकनावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने दि. 14.09.2014 ते 26.09.2014 या कालावधीत केलेल्‍या यात्रेचे आयोजन विरुध्‍द पक्ष यांनी श्री सम्राट टूर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स यांची नेमणूक करुन त्‍यांच्‍या मार्फत केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला पर्यटना दरम्‍यान रुपये 75,000/- दिल्‍याचे तक्रारीत नमूद केले आहे व सदरची तक्रार ही तक्रारकर्त्‍याने प्रतिज्ञालेखावर दाखल केली आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याने मंचाच्‍या अभिलेखावर दाखल केलेली रक्‍कम रुपये 75,000/-ची स्‍वीकृत पावती खाेटी असल्‍याचे सिध्‍द केले नाही. विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याकडून करारानुसार 3 व्‍यक्‍तीकरिता रुपये 1,50,000/- प्रमाणे संपूर्ण रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावर पर्यटना दरम्‍यान तक्रारकर्त्‍याकडून रुपये 75,000/- या अतिरिक्‍त रक्‍कमेची मागणी केली ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍या प्रति सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून अतिरिक्‍त घेतलेली रक्‍कम रुपये 75,000/- तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदरहू रक्‍कमेवर तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच दि. 04.11.2015 पासून ते रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्‍याज अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारीची ब व क फाईल तक्रारकर्त्‍याला परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.