Maharashtra

Nagpur

CC/168/2022

SHRI. ANIL UPASRAO KADVE - Complainant(s)

Versus

PARAMPARA LAWN & BANQUET, THROUGH DIRECTOR/ OWNER- GURUGOVINDSINGH OSAN - Opp.Party(s)

ADV. A.T. SAWAL

16 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/168/2022
( Date of Filing : 03 Mar 2022 )
 
1. SHRI. ANIL UPASRAO KADVE
R/O. FLAT NO.2/5, 42, M.I.G. COLONY, VISHWAKARMA NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. PARAMPARA LAWN & BANQUET, THROUGH DIRECTOR/ OWNER- GURUGOVINDSINGH OSAN
63, S.F.A. BHANDAR ROAD, VARDHAMAN NAGAR CHOWK, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. A.T. SAWAL, Advocate for the Complainant 1
 
Dated : 16 Feb 2023
Final Order / Judgement

आदेश

आदेश पारीत व्दारा श्री. एस आर आजनेमा  सदस्य.

  1. तक्रारदाराने त्यांचे मुलीचे लग्नाकरिता वि.प.चे लॉन व बॅंकेट हॉल दिनांक 6.3.2021 ते 7.3.2021 या कालावधीकरिता आरक्षीत केला व त्यांकरिता वि.प. यांना रुपये 5,000/- नगदी व धनादेश क्रमांक-००००२६ बॅंक ऑफ बडोदा बॅंकेचे अन्वये 45000/- असे एकुण रुपये 50,000/- दिले होते. त्याबाबत वि.प.ने पावती दिली. महाराष्‍ट्र शासनाने कोव्हीड महामारीमूळे दिनांक 26.2.2021 ते 7.3.2021 या कालावधीकरिता अधिसुचना जारी केल्यामूळे नागपूर महानगरपालीका अंतर्गत लॉन व मंगलकार्यालयात लग्न समारंभ करण्‍यावर बंदी आणल्याने नोंदणी स्थळी लग्न करता येणे शक्य नव्हते त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला नोंदणी रक्कम रुपये 50,000/- परत मागीतले. परंतु वि.प.ने लग्न पूढे ढकलण्‍याबाबत सांगीतले. वरपक्षाकडुन आनंद गूजरात येथे लग्नाचे स्वागत समारंभाकरिता लॉनची नोंदणी झाली व त्यांठिकाणी लग्नसमारंभावर बंदी नव्हती तसेच नववधुचे लग्नानंतर परदेशी जाण्‍याचे नक्की झाले होते त्यामूळे लग्न पूढे ढकलणे शक्य नसल्याने वि.प.चा लग्न पूढे ढकण्‍याचा प्रस्ताव तक्रारदाराने नाकारला व रक्कम परत मागीतली. परंतु वि.प.ने रक्कम परत केले नाही.
  2. तक्रारदाराने वि.प.कडुन लग्नकार्याकरिता कोणतीही सेवा घेतली नाही. वि.प. ने रक्कम परत न केल्यामूळे तक्रारदाराने दिनांक 5.3.2021 ला लकडगंज पोलीस स्टेशन व मा. जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला वकीलामार्फत दिनांक 13.12.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली असता वि.प.ने त्यांची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन  वि.प.ने तक्रारदाराकडुन स्वि‍कारलेली रक्कम रुपये 50,000/- दिनांक 10.1.2021 पासुन द.सा.द.शे. 24 टक्के दराने व्याजाची मागणी केली. तसेच वि.प. ने तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी, तक्रारीचे खर्च देण्‍याची मागणी केली.
  3. तक्रारदाराची तक्रार दाखल करुन वि.प. यांना आयोगामार्फत नोटीस काढण्‍यात आली. वि.प.ला दिनांक 6.4.2022 रोजी नोटीस प्राप्त होऊनही वि.प.आयोगात हजर झाले म्हणुन सदर तक्रार दिनांक 10.8.2022 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ आले.

  मुद्दे                                 उत्तर

  1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ?               होय.
  2. वि.प.ने तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली आहे काय ?          होय.
  3. काय आदेश  ?                               अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने त्यांचे मुलीचे लग्नाकरिता वि.प.चे लॉन व बॅंकेट हॉल दिनांक 6.3.2021 ते 7.3.2021 या कालावधीकरिता रुपये 50,000/- देऊन आरक्षीत केल्याचे नि.क्रं.2(1) वर दाखल दस्तऐवजांवरुन स्प्‍ष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. मा. शासन पब्ली‍क हेल्थ डिपार्टमेंट यांची दिनांक 27.2.2021 ची अधिसूचना व मा. आयुक्त महानगर पालीका नागपूर यांचे पत्र क्रं. आ.क./६२६/२०२१ दि.२२.२.२०२१ चे आदेशान्वये नागपूरातील संबंधीत सभागृह /मंगल कार्यालय/लॉन यां ठिकाणी होण्‍या-या लग्नसमारंभाचे आयोजनास दिनांक 25.2.2021 ते दिनांक 7.3.2021 पर्यत प्रतिबंध घालण्‍यात आले होते. तक्रारकर्ता व वि.प. यांचेमधील करार अस्तीत्वात आला नाही त्यामूळे तक्रारकर्ता वि.प.कडुन लग्नसमारंभ आरक्षणापोटी जमा केलेली रक्कम मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे. सबब आदेश खालीलप्रमाणे

अंतीम आदेश

1.तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.वि.प. यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारदाराला लग्नसमारंभ आरक्षणापोटी जमा केलेली रक्कम रुपये 50,000/- परत करावी. तसेच सदर रक्कमेवर रक्कम जमा केल्याचे दिनांक 24.1.2022 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजदाराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेता येणारी रक्कम अदा करावी.  

3.वि.प.ने तक्रारदाराला शारिरिक, मानसिक त्रासापोटी रुपये 20,000/- द्यावे. तसेच तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- द्यावे.  

4.उभयपक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.

5.तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.