Maharashtra

Nanded

CC/10/83

Abdul Rauf Fakir Ahamad Momin - Complainant(s)

Versus

Pankaj Narula, Maruti Suzuki India Ltd. - Opp.Party(s)

Adv. S.M. Chaoosh

17 Jul 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/83
1. Abdul Rauf Fakir Ahamad Momin Chaitanya nager, Airport Road, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Pankaj Narula, Maruti Suzuki India Ltd. Palam Gurgaon Road, Guragaon.GurgaonHariyana2. Main CRM Department, Maroti Suzuki India Ltd.Vanwadi, Pune.PuneMaharastra3. Seva Automotive Prv. Ltd. Bafna Chowk, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/83.
                          प्रकरण दाखल तारीख - 11/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 17/07/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
अब्‍दूल रऊफ फकीर अहमंद मोमीन
वय 45 वर्षे, धंदा व्‍यापार                                   अर्जदार
रा.चैतन्‍य नगर, विमान तळ रोड,
बी.अन्‍ड सी. कॉलनी जवळ, नांदेड
     विरुध्‍द.
1. पंकज नारुला
     मुख्‍य प्रबंधक सेवा, मारुती सुझुकी इंडिया लि.
पालम गुरगांव रोड, गुरगांव 122015 (हरयाणा राज्‍य)
2.   मुख्‍य सी.आर.एम. वीभाग, मारु    ती सुझुकी इंडिया लि.
7 वा मजला नॉर्थ ब्‍लाक, स्‍कार्ड वर्ल्‍ड, वानवाडी, पूणे.
3.   मारुती सुझुकी इंडिया लि.                           गैरअर्जदार युनिट 712, सातवा मजला, वर्ल्‍ड ट्रेड सेंटर,
1, कफफी परांड, मुंबई 400 005.
4.   सेवा अटोमोटीव्‍ह प्रा.लि.नांदेड हैद्राबाद रोड,
बाफना चौक, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील                 - अड.एस.एम.चाऊस
गैरअर्जदार क्र. 1 ते 4 तर्फे वकील        -  अड.पी.एस. भक्‍कड
                               निकालपञ
                  (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
              गैरअर्जदार  यांचे सेवेच्‍या  ञूटी बददल अर्जदार आपल्‍या तक्रारीत म्‍हणतात की, ते एक प्रतीष्‍ठीत नागरीक आहेत त्‍यांनी मारुती सूझूकी इंडिया लि. या कंपनीची मारुती रिटस व्‍ही.डि.आय. ही कार दि.06.06.2009 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून विकत घेतली.  त्‍यांचा रजिस्‍ट्रेशन नंबर एम.एच.-26-व्‍ही-1918 असा आहे. गैरअर्जदार क्र.3 हे
 
 
वाहनाचे उत्‍पादक असून त्‍यांनी कारसाठी वॉरंटी दिली आहे. त्‍याप्रमाणे ती 60000 किलोमिटर किंवा 25.06.2012 पर्यत होती. अर्जदाराने फक्‍त दोनदा त्‍यांची नवीन कार सर्व्‍हीसिंग करुन घेतली होती. वाहन हे फक्‍त 13000 किलोमिटर चालले आहे व गैरअर्जदार क्र.4 ने सेवा बरोबर दिली नाही. वादातील वाहनाचे इंजिनमध्‍ये काही आवाज येत असल्‍याने दि.27.07.2010 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र.4 यांचे वर्कशॉपयमध्‍ये त्‍यांचे वाहन आणून त्‍यांची तपासणी केल्‍यानंतर ते नियमितपणे केल्‍यावर तक्रार दूर होईल असे सांगितले. अर्जदाराने त्‍यांस होकार देऊन गाडी दूरुस्‍त करण्‍यास सांगितले व गैरअर्जदार क्र.4 ने गाडी दूरुस्‍त झाली म्‍हणून वादातील वाहन अर्जदारास दिले. तेव्‍हा इंजिनमधील आवाज येतच होता. दि.30.01.2010 रोजी वादातील वाहन गैरअर्जदार क्र.4 यांचे वर्कशॉपमधून  आपल्‍या घरी नेत असताना इंजिनमधून मोठा धूर निघून वाहन बंद पडले व गैरअर्जदार क्र.4 चे सांगणेप्रमाणे ते वाहन टोचन करुन त्‍यांचे वर्कशॉप मध्‍ये नेले. त्‍यांनी वाहनाची तपासणी केल्‍यावर इंजिनमध्‍ये मोठा बीघाड दिसत असूनतो दूरुस्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल परंतु त्‍यासाठी लागणारा सर्व खर्च दयावा लागेल असे सांगितले तेव्‍हा अर्जदाराने वाहन वॉरंटी असल्‍याचे सांगितले. परंतु गैरअर्जदार क्र.4 हे ऐकण्‍याचे मनस्थितीत नव्‍हते. त्‍यांनी सांगितले तूमची कार दूरुस्‍त होत नाही वर्कशॉपमधून घेऊन जा तेव्‍हा अर्जदाराने पून्‍हा सांगितले वादातील वाहनाचा पूर्ण विमा आहे, वॉरंटी आहे तेव्‍हा तूम्‍ही गाडी दूरुस्‍त करा तूम्‍हाला विमा कंपनी कडून किंवा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून खर्च मिळून जाईल परंतु त्‍यांनी ऐकले नाही. दि.08.02.2010 रोजीला गैरअर्जदार क्र.4 ला ईमेल केला व तक्रार केली व गैरअर्जदार क्र.4 चे वागणूकीबददल कळविले. यानंतर गैरअर्जदार क्र.4 ने वकिलामार्फत नोटीस दिली व अर्जदाराने गाडी दूरुस्‍त करण्‍यास परवानगी न दिल्‍याने त्‍यांचेकडे गाडी पडून आहे त्‍यामूळे रोज वाहनाचा पार्कीग चार्ज रु.200/- प्रतिदिन लावण्‍यात येईल. अर्जदाराने दि.18.02.2010 रोजीला कायदेशीर नोटीस दिली तेव्‍हा गैरअर्जदाराकडून तूमची तक्रार प्राप्‍त झाली असून एक वीशेष पथक तूमची गाडी दूरुस्‍त करण्‍यासाठी येईल असे सांगितले व गैरअर्जदार क्र.4 यांनी धमकी देऊन गाडी बिघडण्‍यासाठी सर्वस्‍व तूम्‍ही जबाबदार आहेत असे सांगितले. गैरअर्जदाराकडून फार मोठा धोका व फसवणूक करण्‍यात आलेली आहे व वाहनाची रक्‍कम रु.5,50,000/- अडकलेले आहेत. वाहनात उत्‍पादन दोष आहे म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, रु.5,50,000/- व्‍याजासह वाहना बददल त्‍यांना मिळावेत, तसेच मानसिक व आर्थिक ञासाबददल रु.5,00,000/- किंवा मा. मंचास वाटेल तो आदेश व्‍हावा असे म्‍हटले आहे.
 
 
              गैरअर्जदार क्र.1,2, व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांची तक्रार खोटी व मूददामहून दिलेली आहे. ते गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द करु शकत नाहीत. ज्‍यावेळेस त्‍यांचे अधिकृत विक्रेते गैरअर्जदार क्र.4 यांनी गैरअर्जदार कंपनीचे वाहन विकले त्‍यावेळेस वाहनाचे पीडीआय करुन ते सूरक्षीत व चांगले स्थितीत असल्‍याबददलची खाञी करुन घेतलेले आहे. गैरअर्जदाराने यासाठी 24 महिन्‍याचे किंवा 40000 किलोमिटर पर्यत वॉरंटी दिलेली होती.यासाठी निश्‍चीत वॉरंटी देण्‍यात ओली आहे ही गोष्‍ट त्‍यांना मान्‍य आहे. परंतु वॉरंटी ही काही अटी व शर्तीवर देण्‍यात आलेली आहे व ती मर्यादित स्‍वरुपाची आहे, असे बूकलेट मध्‍ये माहीती दिलेली आहे. वाहनाच्‍या नियमित मेन्‍टेन्‍ससाठी ग्राहकांनी पहिली सर्व्‍हीसिंग 1000 किलोमिटर किंवा एक महिना, दूसरी फ्रि सव्‍हीसिंग 5000किलोमिटर किंवा सहा महिन्‍याने  व यापूढे अशी दिलेली आहे. क्‍लॉज 3 प्रमाहणे गैरअर्जदार हे वाहनाचा दोषयूक्‍त पार्ट दूरुस्‍त करुन किंवा बदलून देतील व अशा वेळेस ग्राहकाला रक्‍कम दयायची गरज नाही, पण यासाठी निर्मीती दोष पाहिजे. अर्जदाराचे वाहन गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे आल्‍यानंतर वाहनाचा खालचा भाग चेंबर हा डॅमेज झालेला दिसला त्‍यामूळे त्‍यातील ऑईल स्‍टेनर तूटून खाली पडला आहे ही गोष्‍ट मॅकेनिकने अर्जदाराच्‍या निदर्शनास आणून दिली त्‍यामूळे अर्जदारास ऑईल स्‍टेनर व ऑईल पॅन बदलण्‍यास सांगितले कारण त्‍यामध्‍ये आवाज येत होता ते परत वाहन ठेऊन जा ते परत चेक करण्‍यात येईल असे सांगितल्‍यावर अर्जदाराने त्‍यांस संमती दिली नाही व दि.27.01.2010 रोजीला गैरअर्जदार क्र.4 यांचे वर्कशॉपमध्‍ये वाहनाची डिलेव्‍हरी घेतली. यानंतर इंजीन सिझड झाल्‍यावर वाहन दि.29.01.2010 रोजी गैरअर्जदार यांचेकडे आणले. यासाठी गैरअर्जदार वॉरंटीमध्‍ये दूरुस्‍ती करुन देण्‍यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार कंपनी ही अतीशय नामांकीत कंपनी असून गेल्‍या 25 वर्षापासून ते वाहन निर्मीतीत आहेत व चांगली सेवा देत आहेत. चेंबरचे डॅमेज हे अर्जदाराच्‍या निष्‍काळजीपणामूळे झालेले असून यात निर्मीती दोष नाही. दि.22.01.2010 रोजी अर्जदाराचे वाहन हे 13515 किलोमिटर चाललेले असून ते तपासल्‍यावर ऑईल चेंबर डॅमेज होते व स्‍टेनर तूटून ऑईल चेंबर मध्‍ये पडले होते. त्‍यासाठी अर्जदाराने रु.3540/- दि.30.01.2009 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे दिलेले आहेत व वाहनाची डिलेव्‍हरी घेतलेली आहे. यानंतर दि.30.01.2010 रोजी वादातील कारचे इंजिन सिझ व त्‍या दिवशी वाहनाची रिंडीग 13696 किलोमिटर व ते टो करुन    वर्कशॉपमध्‍ये आणले होते.        अर्जदाराने लिगल नोटीस  पाठवून वॉरंटीमध्‍ये मोफत वाहन दूरुस्‍त करावे
 
 
यासाठी बरेच प्रेशर टाकले आहे. यासाठी नोटीसा पाठविल्‍या आहेत. अर्जदाराची तक्रार ही वॉरंटीच्‍या कक्षात बसत नाही. सबब अर्जदाराने खोटी तक्रार देऊन दीशाहीन करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे म्‍हणून खर्चासह ती खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
              गैरअर्जदार क्र.4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ही तक्रार दाखल करण्‍यास काहीही कारण नाही. कारण गैरअर्जदार यांचेकडून सेवेत ञूटी झाली नाही किंवा अनूचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही. गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदाराचे वाहन वॉरंटी कालावधीत आहे परंतु अर्जदार ज्‍या ज्‍या वेळेस वाहन घेऊन आले त्‍या त्‍या वेळेस गैरअर्जदारानी वाहनाची सर्व्‍हीसिंग करुन दिलेली आहे. गैरअर्जदार क्र.4 हे मारुती कंपनीचे अधिकृत विक्रेते आहे. त्‍यांचेकडे तज्ञ मॅकेनिक आहेत. गैरअर्जदार हे ठरवून दिलेल्‍या अटी व शर्ती प्रमाणे वाहनाची सर्व्‍हीसिंग करुन देतात. अर्जदाराने गैरअर्जदाराचे वर्कशॉपमध्‍ये दि.27.01.2010 रोजी वाहन घेऊन आले त्‍यावेळेस त्‍यांचे जॉब कार्ड तयार करण्‍यात आले अर्जदाराचे तक्रारीप्रमाणे इंजिनमध्‍ये आवाज येत आहे यावर गैरअर्जदार यांनी ते वाहन तपासून पाहिले तेव्‍हा त्‍यांचे असे निदर्शनास आले की, सदर गाडीचा ऑईल पॅन (चेंबर) डॅमेज झालेला होता, अर्जदाराच्‍या गाडीला खालच्‍या बाजूने अपघाती मार लागला व त्‍यांचे इंजिन ऑईल चेंबर डॅमेज झाले होते. गैरअर्जदराने ऑईल चेंबर काढून पाहिले असता गैरअर्जदाराच्‍या असे निदर्शनास आले की, गाडीचा ऑईल स्‍क्रीनर तूटून चेंबरमध्‍ये पडलेला होता. ही बाब गैरअर्जदाराच्‍या मॅकेनिकने अर्जदारास सांगीतली असता अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या मॅकेनिकला फक्‍त ऑईल स्‍क्रीनरव ऑईल चेंबर बदलण्‍यास सांगितले. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदाराने गाडीचे ऑईल स्‍क्रीनर व ऑईल चेंबर बदलले. त्‍यामूळे गाडीचा लाल लाईट बंद झाला. सदर बदल केल्‍यानंतर गाडीच्‍या इंजिनमधून सिटी सारखा आवाज येऊ लागला. गैरअर्जदाराच्‍या मॅकेनिकने अर्जदारास गाडीचे इंजिन तपासून फॉल्‍ट काढावा लागेल तूम्‍ही गाडी सोडून जा असे म्‍हटल्‍यावर अर्जदाराने गाडी ठेवण्‍यास व इंजिनचे काम करण्‍यास नकार दिला. गैरअर्जदाराच्‍या मॅकेनिकने गाडी तशीच नेल्‍यास इंजिन सिझ होऊ शकते किंवा इंजिन खराब होऊ शकते व वॉरंटी मध्‍ये प्राब्‍लेम येऊ शकतो असे म्‍हटल्‍यावर अर्जदार म्‍हणाला की तो स्‍वतःच्‍या जिम्‍मेदारीवर वाहन घेऊन जात आहे व पूढे म्‍हणाला की गाडीमध्‍ये काही प्राब्‍लेम आल्‍यास तो स्‍वतः जबाबदार राहील. गैरअर्जदाराच्‍या मॅकेनिकने त्‍याबददल टिप्‍पनी जॉब
कार्डवर केली व त्‍यानंतर त्‍यावर अर्जदाराने सही केली व गाडी घेऊन गेला. 
 
 
अर्जदाराने दि.27.01.2010 रोजीचे खोटे कथन केलेले आहे.गैरअर्जदार क्र.4 ने अर्जदारास गाडी दूरुस्‍त झाली म्‍हणून दिले ही बाब खोटी व वस्‍तूस्थितीच्‍या विरुध्‍द जाऊन आहे. अर्जदाराचे वाहन दि.30.01.2010 रोजी गैरअर्जदार यांचे वर्कशॉपमधून नेत असताना इंजिनमध्‍ये मोठयाने धूर आला व वाहन बंद पडले ही बाब वस्‍तूस्थितीला धरुन नाही. अर्जदाराने गैरअर्जदार यांचे वर्कशॉपमधून स्‍वतःचे जबाबदारीवर दि.29.01.2010 रोजी वाहन नेले आहे व दि.30.01.2010 रोजी गाडीचे इंजीन सिझ झाले. यासंबंधी गैरअर्जदाराकडे सांगितल्‍यावर, त्‍यांचे वाहन दूसरे वाहनाला टोचन करुन वर्कशॉपमध्‍ये आणले. थोडक्‍यात गाडीचे इंजिनमध्‍ये निर्माण दोष नव्‍हता. जे झाले ते अर्जदाराच्‍या चूकीमूळे व निष्‍काळजीपणामूळे झालेली आहे म्‍हणून गैरअर्जदार हे अर्जदाराची गाडी वॉरंटीमध्‍ये दूरुस्‍त करुन देणे लागत नाहीत. यासंबंधी गैरअर्जदाराने मारोती कंपनीला ही सर्व हकीकत कळविली असता त्‍यांनी दि.09.02.2010 रोजीच्‍या पञाद्वारे कळविले की, ( this is a pure abusement case, this cannot be covered under Warranty) गाडीची वॉरंटी ही काही अटी व शर्तीवर देण्‍यात येते. अर्जदाराने अड. सब्‍बनवार यांचेकडून गैरअर्जदारास नोटीस दिली. त्‍याचे दि.15.02.2010 रोजीला उत्‍तर दिले आहे परंतु अर्जदाराने अड.एस.एम.चाऊस यांचेमार्फत नोटीस दिली. यात अर्जदाराने खोटी व बनावट माहीती दिली. यांला दि.02.03.2010 रोजी गैरअर्जदाराने उत्‍तर दिलेले आहे. अर्जदार हे आपली तक्रार अदलून बदलून येऊन सांगत आहेत. गैरअर्जदाराच्‍या वर्कशॉपमध्‍ये भरपूर गाडया आहेत व गाडयाचे काम करण्‍यासाठी जागा उपलब्‍ध नाही. म्‍हणून अर्जदारास कळविले की, जर तूमची गाडी परत घेऊन गेले नाही किंवा दूरुस्‍त करुन घेतली नाही तर त्‍यांना प्रति दिवस रु.200/- प्रमाणे पार्कीग चार्जेस घावे लागतील व बाब काही गैरकायदेशीर नाही. गैरअर्जदाराकडून अर्जदारास कोणताही मानसिक ञास किंवा आर्थिक ञास झालेला नाही. उलटपक्षी गैरअर्जदाने स्‍वतःचे हाताने स्‍वतःची गैरसोय करुन घेतलेली आहे. म्‍हणून गैरअर्जदाराची विनंती आहे की, त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1,2,3 व 4 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
 
 
 
 
 
 
          मूददे                                       उत्‍तर
1.                 गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी किंवा सेवेतील
     अनूचित प्रकार अर्जदार सिध्‍द करतात काय ?         नाही.
2.    काय आदेश ?                       अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदाराचे वाहन मारुती रिटस व्‍ही.डी.आय.-एम.एच.-26-व्‍ही-1918 हे वाहन गैरअर्जदार क्र.4 यांचेकडून दि.27.01.2010 रोजी नेल्‍यानंतर त्‍यांनी वाहन वॉरंटीत दूरुस्‍त करुन दिले नाही व रक्‍कमेची मागणी केली हे दि.30.01.2010 रोजी गैरअर्जदार यांचे वर्कशॉपमधून इंजिन मधून मोठमोठयाने धूर आला हे सर्व काम गैरअर्जदार क्र.4 यांनी वॉरंटीत दूरुस्‍त करुन दिले नाही म्‍हणून कंपनी व गैरअर्जदार क्र.4 यांचे विरुध्‍द तक्रार दाखल केली आहे. यात सर्व गैरअर्जदार यांचे म्‍हणणे व वीशेषतः गैरअर्जदर क्र.4 यांचे म्‍हणणे वाचल्‍यानंतर व गैरअर्जदार क्र.4 ने जे जॉब कार्ड दाखल केलेले आहे ते पाहिले असता हे स्‍पष्‍ट दिसते की, वाहन हे दि.27.01.2010 रोजी गैरअर्जदार क्र.4 यांचे वर्कशॉपमध्‍ये अर्जदाराने आणले, इंजिनमधून आवाज येत असल्‍याची तक्रार दिली. त्‍यावेळेस जॉब कार्ड वर गैरअर्जदार क्र.4 यांनी इंजिन ऑईल व त्‍यापूढे ऑईल पॅन डॅमेज असे लिहून दिलेले आहे. त्‍यावेळेस रिंडीग 13755 किलोमिटर अशी दाखवलेली आहे. त्‍यानंतर गैरअर्जदाराने काय केले तर ऑईल पॅन चेंज केले व त्‍यासोबत ऑईल पॅन चेंज रु.250/-, टाईमींग बेल्‍ट रु.350/-, ऑल कोड क्‍लीअर रु.530/- फ्रंन्‍ट बंम्‍पर आर आर रु.100/-, ऑईल पंप स्‍टेनर यावीषयी रु.150/- असे एकूण रु.3540/- घेतलेले आहेत हे त्‍यांना मान्‍य आहे. गैरअर्जदार क्र.1,2,3 यांचे लेखी म्‍हणण्‍याप्रमाणे  त्‍यांनी वाहनाची डिलेव्‍हरी देताना गैरअर्जदार क्र.4 ने पीडीआय करुन वाहनाची तपासणी करुन कोणताही दोष नसलेले व चांगले कंडीशनमध्‍ये असलेले वाहन अर्जदारास दिले होते व यानंतर अर्जदाराने ते वाहन जवळपास 13755 किलोमिटर चालवले तोपर्यत त्‍यात कोणताही दोष नव्‍हता. अर्जदाराने फ्रि सव्‍हीसिंग दोन वेळा करुन घेतल्‍या तेव्‍हा देखील त्‍यांची वाहना वीषयी कोणतीही तक्रार नव्‍हती. परंतु दि.27.01.2010 रोजी वर्कशॉपमध्‍ये वाहन गैरअर्जदार क्र.4 चे मॅकेनिकने अर्जदाराला त्‍यातील दोष विचारुनच जॉब कार्डवर त्‍यांची नोंद केली व त्‍यानंतर वाहनाची तपासणी केली तेव्‍हा त्‍यांचे असे लक्षात आले की, गैरअर्जदार क्र.4 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍याच्‍या परिच्‍छेद क्र.8 मध्‍ये म्‍हटल्‍याप्रमाणे गाडीची ऑईल पॅन चेंबर डॅमेज झालेले होते. अर्जदाराच्‍या
 
 
गाडीला मागच्‍या बाजूने अपघात झाला असेल त्‍यामूळे चेंबर डॅमेज झाले होते. गैरअर्जदार क्र.4 चे मॅकेनिकने ऑईल चेंबर काढून पाहिले असता त्‍यांचे असे लक्षात आले की, सदरील चेंबरमध्‍ये ऑईल स्‍टेनर तूटून पडले आहे. मॅकेनिकने ही बाब अर्जदाराच्‍या निदर्शनास आणून दिली, यानंतर अर्जदाराने आईल चेंपॅन व ऑईल स्‍कीनर बदलण्‍यास सागितले. त्‍यानुसार गैरअर्जदाराने तेवढेच काम केले परंतु यानंतरही इंजिनमधून शिटटी सारखा आवाज येऊ लागला, तेव्‍हा यांचा संपूर्ण शोध घ्‍यावा लागेल व गाडी ठेऊन जा असे सांगितले परंतु अर्जदाराने नकार दिला. वॉरंटीतील प्रॉब्‍लेम येऊ शकतो असे सांगितले परंतु अर्जदाराने स्‍वतःच्‍या जबाबदारीवर वाहन घेऊन जात आहे असे सांगितले व गैरअर्जदार यांचा सल्‍ला डावलला. या बददलची टिप्‍पणी अर्जदाराने जॉबकार्डवर केली आहे. यांचे पूष्‍टी साठी आम्‍ही जॉब कार्ड पाहिले असता त्‍यावर वरील मजकूर लिहून त्‍याखाली अर्जदाराने सही केली ही बाब पाहिली असता त्‍यावर तक्रार अर्जावर केल्‍याप्रमाणे अर्जदार यांची सही आहे हे स्‍पष्‍ट होते. अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात दि.30.01.2010 रोजीला त्‍यांचे वर्कशॉप मध्‍ये वाहन आणले असे म्‍हटले आहे परंतु ही वस्‍तूस्थिती नसून अर्जदाराने त्‍यांचे वाहन दि.27.01.2010 रोजीच आणले होते व जूजबी स्‍वरुपाची दूरुस्‍ती करुन त्‍यांचे जिम्‍मेदारी वर ते वाहन घेऊन गेले. त्‍यामूळे अर्जदाराचे म्‍हणणे खोटे वाटते. ते सर्व गेट पासवर नमूद केलेले आहे. त्‍यामूळे दि.30.01.2010 रोजीला तक्रार अर्जात उल्‍लेख केल्‍याप्रमाणे त्‍यांचे वाहन बंद पडले हे खरे नसून त्‍या आधीची वस्‍तूस्थिती जॉब कार्डवर व गेट पासवरुन समोर येते. दि.30.01.2010 रोजी गाडीचे इंजिन सिझ झाले व ते टो करुन गैरअर्जदार क्र.4 यांचे वर्कशॉप मध्‍ये आणले.यात दि.27.01.2010 रोजीच्‍या जॉब कार्डवर त्‍यांचा उल्‍लेख आला आहे की, इंजिन चे चेंबर डॅमेज झाले व ऑईल  स्‍कीनर डॅमेज झाले ते ही बदलण्‍यात आले.त्‍यामूळे जे काही झाले ते अर्जदाराने त्‍यांचे वाहन वर्कशॉपमधून नेले व त्‍यावेळेस वाहन हे 13695 किलोमिटर चालले होते. म्‍हणजे वाहन चालले होते व यानंतर इंजिन सिझ झाले. सदरचा प्रकार हा खालून अपघात होऊन चेंबर डॅमेज झाल्‍यामूळे झाला. कारण ऑईल स्‍कीनर तूटल्‍यामूळे इंजिनला ऑईल व्‍यवस्थित सप्‍लाय झाले नाही व यानंतर जबरदस्‍ती करुन वाहन चालविल्‍यामूळे इंजिन सिझ झाले. हा दोष अपघातामूळे झालेला असून वॉरंटीमध्‍ये येत नाही. यासाठी मारोती कंपनने देखील दि.09.02.2010 रोजी अर्जदारास दाखवलेले आहे की, ( this is a pure abusement case, this cannot be covered under Warranty)असे म्‍हटलेले आहे. तेव्‍हा ही बाब वॉरंटीमध्‍ये येत नसल्‍यामूळे ती कंपनी किंवा सर्व्‍हीस सेंटर वॉरंटीत दूरुस्‍त करुन देणार नाहीत. यावीषयी तक्रार अर्जामध्‍ये
 
 
परिच्‍छेद क्र.6 मध्‍ये अर्जदाराने स्‍वतः असे म्‍हटले आहे की, गैरअर्जदार क्र.4 यांनी हे वाहन दूरुस्‍त करुन दयावे यासाठी तूम्‍ही कोणतीही काळजी करु नये, यासाठी तूम्‍हाला विमा कंपनी कडून किंवा निर्मीती कंपनीकडून  खर्च मिळेल. आम्‍हाला असे वाटते की, अर्जदार यांनी चेंबरला खालून मार लागून अपघाताने तो डॅमेज झालेला आहे त्‍यामूळे त्‍यातील ऑईल स्‍कीनर ही तूटलेले आहे. अपघातात नूकसान झालेले असेल तर यासाठी विमा कंपनी ला व त्‍यांने तक्रार अर्जात विमा कंपनीचा उल्‍लेख केला आहे, तेव्‍हा असे असताना विमा कंपनीला यांची सूचना देऊन त्‍यांचे सर्व्‍हेअर मार्फत वाहनाची तपासणी करुन घेणे व अपघातात ही बाब झाल्‍यामूळे इंजिनचा पूर्ण खर्च विमा कंपनीस मागणे हे अभ्रिप्रेत असताना व असे न करता किंवा या तक्रार अर्जात विमा कंपनीस पार्टीही न करता अर्जदार हे फक्‍त वॉरंटीवरच जोर देतात, हा न उमजण्‍याचा भाग आहे. तसेच अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जात चेंबर डॅमेज झाल्‍या बददल कोणताही उल्‍लेख केलेला नाही व असे असताना विमा कंपनीचा उल्‍लेख त्‍यांनी केलेला आहे. यांचा अर्थ वाहनाचा चेंबर हा अपघातात डॅमज झाला व तो वॉरंटीत येत नाही. यासाठी अर्जदाराने व गैरअर्जदारांनी एकमेकांना नोटीस दिल्‍या, एकमेकांने उत्‍तर, प्रतिउत्‍तर त्‍यांला दिले. गैरअर्जदार कंपनीने वॉरंटीचे अटी व शर्तीचा उल्‍लेख केलेला असून, या नियम व अटी प्रकरणात दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामूळे एखादया अपघातामूळे जर वाहनाचे नूकसान झाले असेल तर ते वॉरंटीमध्‍ये येत नाही ही बाब‍ स्‍पष्‍ट केलेली आहे व ते नियम ही दाखल केलेले आहेत. यावीषयी गैरअर्जदार क्र.1 या कंपनीने दि.09.02.2010 रोजी एक पञ पाठवून या बाबीचा वाहन वॉरंटीत येत नसल्‍याबददलचा उल्‍लेख केलेला आहे. अर्जदाराने तक्रार करताना लिमिटेशन बददल खालील प्रमाणे दाखल केलेले आहे ते असे की,
(d)             any repairs or replacement required as a result of accidents or collusion.
(e)              any defects caused by misuse, negligence, abnormal use or insufficient care.
(f)               any vehicle which has been modified or altered, including without limitation, the installation of performance accessories.
 
        Company not liable.
 
अर्जदाराने त्‍यांचे वाहन दि.27.01.2010 रोजी आणल्‍यानंतर त्‍यात काय प्रॉब्‍लेम होते व मॅकेनिकने काय तपासून पाहिले यावीषयीचे तपशीलवार शपथपञ श्रीकांत गुंडेरारव भगनुरे व बालाजी छोटूराम झांगडे यांचे शपथपञ
 
 
त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍याचे पूष्‍ठर्थ दाखल केलेले आहे.गैरअर्जदार यांची पूर्ण सफाई त्‍यांचे जॉब कार्ड वर आलेली आहे. त्‍यामूळे या प्रकरणाचा निकाल लावण्‍यासाठी अर्जदाराच्‍या वाहनाची इंजिन बददलची तक्रार ही वॉरंटीत येत नसल्‍याकारणाने गैरअर्जदार क्र.4 यांनी एक तर वाहन दूरुस्‍त करुन घ्‍या किंवा या बददलचे पार्कीग चार्जेस पे करा अशी नोटीस दिली त्‍यांला गैरकायदेशीर असे संबोधता येणार नाही. सबब अर्जदाराच्‍या वाहनाची इंजिनची दूरुस्‍ती ही वॉरंटीत येत नसल्‍याकारणाने तक्रार सर्व गैरअर्जदार यांचे विरुध्‍द खारीज करण्‍यात येते.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                        आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात येतो.
 
2.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                                         उभयपक्षांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                          श्रीमती सुवर्णा देशमूख                      श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                             सदस्‍या                                          सदस्‍य.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक